Homeनागपूर न्यूजवारांगणा वस्ती बाहेर पडल्यास संकटात साथ देणार नाही:ज्वाला धोटे

वारांगणा वस्ती बाहेर पडल्यास संकटात साथ देणार नाही:ज्वाला धोटे

Advertisements

If Ganga Jamuna is shut down, sex workers will disperse across Nagpur' |  Nagpur News - Times of India

रहीवाशी वस्तीमधील स्त्रियांच्या समस्यांसोबतही ज्वाला

नागपूर,ता. ९ ऑगस्ट: बरोबर एक महिना अगोदर ९ ऑगस्ट २०२१ रोजी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अचानक शहरातील गंगा-जमुना या वारांगणांच्या वस्तीमध्ये कलम १४४ लागू केले व सर्वत्र बेरिकेट्स लाऊन तिथे दिवस-रात्र पोलिसांचा कडक पहारा लावला.यामुळे गेल्या एका महिन्यापासून आपाल्या मागण्यांसाठी अडून बसणा-या वारांगणा व स्थानिक रहीवाशी यांच्यातील आंदोलनांनी चांगलाच पेट ही घेतला.एकीकडे ज्वालामुखी अशी ओळख असणा-या राष्ट्रवादीच्या अर्बन सेलच्या अध्यक्ष्ा ज्वाला धोटे तर दूसरीकडे स्थानिक रहीवाश्‍यांची बाजू घेऊन रस्त्यांवर उतरणा-या राष्ट्रवादीच्याच तडफदार नेत्या आभा पांडे यांच्यातच चांगलीच चकमक घडलेली नागपूरकरांनी पाहीली मात्र नुकतेच या वस्तीमधून कलम १४४ हटविण्याचा आदेश पोलिस आयुक्तांनी दिला,बॅरिकट्सही हटविण्यात आले आता फक्त प्रश्‍न उरला आहे तो ‘मूळ समस्येचा’.

तो म्हणजे वारांगणा त्यांच्या वस्तीच्या बाहेर येऊन, अगदी मुख्य रस्त्यावर येऊन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्‍लील हावभाव करतात,त्या वस्ती बाहेर पडल्यामुळे या अतिशय रहदारीच्या रस्त्यावर चांगलाच ट्राफिक जाम होतो,अनेक अपघात देखील वारांगणा वस्ती बाहेर आल्याने घडलेत,त्या वस्तीबाहेर पडत असल्यामुळेच येथील रहीवाश्‍यांनी महल्ला मिटिंगमध्ये वारांगणांची तक्रार केली,त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिस आयुक्तांनी तिथे कलम १४४ लागू केले,आता मात्र हे कलम हटल्यामुळे ज्वाला धोटे यांनी, मी जरी वारांगणाच्या न्याय हक्कासाठी लढा देत असले तरी मी तेथील रहीवाशी महिलांसोबत देखील असल्याचे खास ‘सत्ताधीश‘ला सांगितले व वारांगणा या पुन्हा रस्त्यावर येऊन धंदा करतील तर या नंतर त्यांच्या लढ्यात मी साथ देणार नसल्याचा परखड इशारा ही देण्यास त्या विसरल्या नाहीत.

या वस्तीमधून कलम १४४ हटल्याने येथील रहीवासी हे चांगलेच अस्वस्थ झालेत.ही वस्ती आज ना उद्या पुन्हा सुरु होणार हे त्यांना देखील माहिती आहे मात्र त्यांची मूळ समस्या ही वारांगणांची ‘वस्ती’ नसून वारांगणांचे ‘वागणे’ही आहे.या वारांगणांनी त्यांच्या वस्ती बाहेर पडू नये,रस्त्यावर येऊन अश्‍लील हावभाव करु नये,एवढीच येथील रहीवाश्‍यांची मागणी होती.येथील वारांगणा ज्वाला धोटे यांना आपला नेता मानतात,त्यांचे एेकतात त्यामुळेच ज्वाला यांनीच त्यांना मार्गदर्शन करावे,योग्य सल्ला द्यावा,अशी अपेक्ष्ा येथील स्थानिक रहीवाशी व्यक्त करतात.

०१४ मध्ये ही तत्कालीन पोलिस आयुक्तांनी याच मुद्दावर ही वस्ती सील केली होती मात्र २०१४ ते २०२१ एवढी वर्षे उलटून देखील ‘ये रे माझ्या मागल्या’अशी स्थिती वस्ती आणि वारांगणांची आहे.धंद्यासाठी त्या कोणाचेही ऐकत नाही,नीतीमत्ता याच्याशी त्यांचा दुरान्वयानेही संबंध नाही,त्यांचा फक्त एकच देव आहे आणि तो म्हणजे ‘पैसा’,यासाठी त्या वस्ती बाहेर पडून, इतरांना किती ही त्रास किवा मनस्ताप झाला तरी ग्राहकीसाठी सर्वच तारतम्य सोडत असतात,याचा स्थानिकांना खूपच त्रास होताे.वस्ती तर पुन्हा सुरु होईल पण स्थानिकांच्या मूळ समस्येचं काय?हा प्रश्‍न आता स्थानिकांना भेडसावतोय.

वारांगणांनी मुख्य रस्त्यावर येऊ नये,ग्राहकांना आवाज देऊ नये,त्यांना आकर्षित करण्यासाठी अश्‍लील हावभाव करु नये,आम नागरिकांच्या नजरेत वारांगणांनी पडू नये,अशी अपेक्ष्ा येथील स्थानिक रहीवाशी व्यक्त करतात.वारांगणांच्या नेत्या ज्वाला धोटे यांनीच आता त्यांचे मार्गदर्शन करावे,त्यांचे आचरण सुधरवावे अशी मागणी ते करीत आहेत.

यावर ज्वाला धोटे यांनी ‘सत्ताधीश‘सोबत मनमाेकळा संवाद साधताना आधी तर भाजपचे आमदार कृष्णा खोपडे व रविंद्र कुंभारे यांना ‘आडे हात’ घेतले.आज या दोन्ही आमदारांनी पोलिस आयुक्तांना एक निवेदन सोपवले ज्यात वारांगणांच्या या वस्तीत अनेक भुयारी मार्ग,तळघर आहेत ज्यात अल्पवयीन मुलींना डांबले जाते असे नमूद केले आहे.ज्वाला यांनी भाजपच्या या दोन्ही आमदारांची ही तिसरी टर्म असताना आजपर्यंत का नाही त्यांनी या भुयारी मार्गांचा शोध घेतला?असा प्रश्‍न केला.निदान त्यांनी आपले ‘वजन’वापरुन पुरातत्व विभाग तसेच शासनाच्या इतर विभागांची मदत घेऊन याचा शोध का नाही घेतला?निदान भरण टाकून हे भुयारी मार्ग किवा तळघर आजपर्यंत का नाही बुजवले?गेल्या १२ वर्षांपासून ते झोपले होते का?असा तिखट प्रश्‍न उपस्थित केला.

राज्याचे गृहमंत्री,पालकमंत्री,पोलिस विभाग यांच्याकडे किवा विधीमंडळ अधिवेशनात आतापर्यंत एकदा ही हा प्रश्‍न त्यांनी उपस्थित का नाही केला?देह व्यापार करणे हा या देशात गुन्हा नाही आहे,असे त्या सांगतात,हे दाेन्ही आमदार त्या मतदार संघांचे प्रतिनिधित्व करतात मग गेल्या एका महिन्यापासून या वस्तीतील शेकडो वारांगणा या उपाशी मरतात आहे,काय केले त्यांच्या भरणपोषणासाठी या दोन्ही आमदारांनी?या त्यांच्या मतदार नाहीत का?त्या मतदान करत नाही का?मग लोकप्रतिनिधी म्हणून या दोन्ही आमदारांनी या वारांगणांप्रति आपली कोणती जवाबदारी पार पाडली?उलट त्यांच्या विरोधात पोलिस आयुक्तांना निवेदन देतात?आमदार म्हणून निवडून आल्यानंतर यासाठीच घेतली होती का संविधानाची शपथ?असा धगधगता सवाल त्या उपस्थित करतात.

आजच का त्यांना वारांगणांच्या या वस्तीतील भुयारी मार्ग,तळघरे,अल्पवयीन मुलींचे शोषण हे मुद्दे आठवले?अल्पवयीन यांच्याकडून देहव्यापार करुन घेण्याचे कोणीही समर्थन करणार नाही,त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे,जी अल्पवयीन न्यायाधीशांसमोर बयाण देताना सांगेल की ती स्वखुशीने नव्हे तर तिच्यावर जोरजबरदस्तीने देह व्यापार करण्यासाठी दवाब आण्यात आला उलट तिचे मीच ‘पालकत्व’ स्वीकारेल,असे ज्वाला सांगतात.

स्थानिकांच्या रास्त मागणीचे ही मी मनापासून स्वागत करते.वारांगणा या पुन्हा रस्त्यावर आल्या तर पुढील कारवाईसाठी त्याच कारणीभूत राहतील.माझ्यासाठी प्रत्येक स्त्री सारखी आहे मग ती वारांगणा असो किवा स्थानिक रहीवासी.श्रीमंत-गरिब,लोकल-परगावचे असा भेद मी करत नाही.स्थानिक रहीवाश्‍यांना देखील काही अडचणी असू शकतात हे मी मान्य करते.

वारांगणा या जर मला त्यांच्या नेत्या मानत असतील तर त्यांना माझे ऐकावे लागेल.त्यांच्यामुळे स्थानिकांना या पुढे त्रास होता काम नये.वारांगणांना मी ‘धोटे स्टाईल’ने समजावण्याचा प्रयत्न करेल.जे काही चुकीचं वर्तन त्यांच्याकडून भूतकाळात घडलं ते पुन्हा घडता कामा नये,असा इशारा त्या देतात.

या पुढे वारांगणा या जर मुख्य रस्त्यावर आल्या तर पोलिसांनीच त्यांना दंडूक्याचा मार द्यावा.कायमस्वरुपी दोन तरी पोलिस त्या ठिकाणी गश्‍त घालत रहावे.वारांगणांनी त्यांच्या वस्ती बाहेर दिसता कामा नये,वस्ती बाहेर आढळ्यास त्यांना उचलून सरळ कारागृहात टाकावे. ज्वालामुखी स्टाईलने त्यांना मी एकदा समजावेल,तरीही त्यांनी ऐकले नाही व स्थानिकांना त्रास दिला तर त्या शोकांतिकेसाठी त्या स्वत: जवाबदार असतील…..!

Latest बातम्या