Homeनागपूर न्यूजराष्ट्रवादीचे आंदोलनातून भाजपला प्रत्यूत्तर

राष्ट्रवादीचे आंदोलनातून भाजपला प्रत्यूत्तर


निमगडे प्रकरण शेकणार यासाठीच कुभांड!

नागपूर,ता. २१ मार्च: मुंबईचे पोलिस आयुक्त परमबिरसिंह यांनी जे पत्र मुख्यमंत्री यांना लिहले आहे त्या पत्रावरच आक्ष्ेप असून आतापर्यंत परमबिरसिंह यांनी पत्र का नाही लिहले?असा सवाल करीत त्या पत्रावर स्वाक्ष री का नाही?असा प्रश्‍न आज संविधान चौकात आंदोलन करताना राष्ट्रवादी नेत्यांनी विचारला.गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप करताना बारा पानी पत्र त्यांनी लिहले पण पत्रावर सही करण्यासाठी ते विसरले का?

ते पत्र खरं आहे की खोट?आणि अचानक त्यांना आताच का पत्र आठवलं की आताच आपण पत्र लिहायला पाहिजे,असा सवाल करीत आज राष्ट्रवादी पक्ष्ातर्फे भारतीय जनता पक्ष्ाच्या विरोधात तीव्र निर्देशने करण्यात आली. शहराध्यक्ष् अनिल अहीरकर यांच्या नेतृत्वात संविधान चौकात ही निर्दशने करण्यात आली.

माध्यमांना प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी नेत्या म्हणाल्या की नागपूर शहरात घडलेल्या वास्तूविशारद एकनाथ निमगडे हत्याकांड जे घडलं,त्याचा उलगडा होण्यासाठी तब्बल ५ वर्षे लागली.मुख्यमंत्री व गृहमंत्री पदी जेव्हा देवेंद्र फडणवीस होते तेव्हाचं ते हत्याकांड आहे मात्र ते अाताच्या सरकारने उघडकीस आणलं.

कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना आता भीती वाटायला लागली आहे कारण त्या हत्याकांडात मुख्यमंत्री यांचा जो स्वीय सहाय्यक होता तो ही निमगडे यांच्याकडे विमानतळाजवळील मोक्याच्या ५०० कोटींच्या त्या जमीनीसाठी गेला होता तसेच गेल्या महिन्याभरापासून मुन्ना यादव याचे प्रकरण पुन्हा नागपूरात गाजत आहे.

मुन्ना यादव याच्यावर अट्रासिटी दाखल असताना,गुन्हा दाखल असताना त्याला अटक झाली नाही.अश्‍या अनेक प्रकरणामध्ये फडणवीस यांचेच वरदहस्त असल्याचा घणाघाती आरोप यावेळी करण्यात आला.

एकंदिरत आजचे गृहमंत्री हे गलिच्छ राजकारणाचे बळी झाले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. गुन्हेगारी प्रकरणे तसेच अनेक माफियांना गृहमंत्र्यांनी वठणीवर आणले आहे,अनेक गरीबांना त्यांनी न्याय मिळवून दिला आहे,आणि आपली काही खैर नाही या शहरात असं फडणवीस यांना वाटू लागल्यानेच म्हणून परमबिर सिंह यांच्या मदतीनेच हे कुभांड रचल्या गेल्याचा आरोप यावेळी केला.

परमबिर सिंह यांच्या मागील बोलविता धनी हे फडणवीसच असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. एनआयए आता परमबिरसिंह यांची चौकशी करणार असल्यानेच चौकशीपासून त्यांना वाचविण्यासाठी फडणवीस यांनी परमबिरसिंह यांच्यासाेबत मिळून हे कुभांड रचले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Latest बातम्या