आमचे सरकार संवेदनशील,लोकाभिमुख सरकार
सरकार पूर्णपणे जनतेच्या मागे:सर्वसामान्य जनता धोरणांचा केंद्रबिंदू
अण्णा हजारेंची मागणी अडीच वर्षात आघाडी सरकारने का केली अमान्य?कशाची होती भीती?
संजय राऊत आमचे सरकार पडण्याची तारीख सांगतात वर्ष सांगत नाहीत!मुख्यमंत्र्यांचा उपरोधिक टोला
लोकायुक्त कायदा कोणालाही अडकविण्यासाठी नाही
अडीच वर्षात धान खरेदीत केंद्रात प्रचंड भ्रष्टाचार :नाना पटोलेंनी दिला अजित दादांना मुद्दा!
अजित पवारांचा ७ एप्रिल २०१३ चा व्हिडीयो आठवा!
नागपूर,ता.१८ डिसेंबर २०२२: आमच्यावर नेहमीच विरोधक हे ‘खोके सरकार’‘स्थगिती सरकार’‘घटनाबार्ह्य सरकार’असा आरोप करीत असतात मात्र,आमची सरकार ही पूर्णपणे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अनुसरुन,जनमताचा आदर राखून,सभागृहात बहूमत सिद्ध करुन,बहूमताच्या जोरावर स्थापन झाले आहे.न्यायालयांनी देखील विधीमंडळाच्या कामकाजाला स्थगिती दिली नाही.२०१९ मध्ये राज्यात ‘अनैतिक‘सरकार स्थापन झाली होती,सोयरीक एकाशी तर संसार दुस-याशीच करण्यात आला.कोणी कोणासांबत काय केलं,हे महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेलाही माहीती आहे.त्यामुळे आमच्या सरकारला ‘खोके ’सरकारची भाषा वापरणे विरोधी पक्ष नेते अजित पवारांना शोभत नाही.खोक्यांचा एकावर एक ढिग रचल्यास त्याचा कडेलोट होईल,आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्याच्या खजिन्यात तरतूद होती दोन हजार कोटींची,प्रशासकीय मान्यता देण्यात आली सहा हजार कोटींच्या कामांना!‘आमदनी अठन्नी और खर्चा रुपय्या’राज्याचा आम्हाला ‘लवासा’करायचा नाही,अश्या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना डिवचले. नागपूरात उद्या पासून सुरु होणा-या अधिवेशना पूर्वी सिव्हिल लाईन्स स्थित रामगिरी बंगल्यात आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,वन मंत्री सुधीर मुनगंटीवार,चंद्रकांत पाटील,गिरीश महाजन आदी मान्यवर मंत्री उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,की नागपूरात या पूर्वी एक कार्यकर्ता,मग मंत्री म्हणून तर आता मुख्यमंत्री म्हणून येण्याची संधी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघेंमुळे मिळाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा यांच्या आर्शिवादाने तर देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने व ५० आमदारांच्या शुभेच्छांमुळे विदर्भात मुख्यमंत्री म्हणून येता आले.ख-या अर्थाने नागपूरविषयी मला फार जिव्हाळा आहे,मी गढचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री देखील राहीलो आहे.हे अधिवेशप फार महत्वाचे असून, विरोधकांच्या ईच्छेनुसार ते किती आठवड्यांचं चालावं,याचं उत्तर फडणवीसांनी दिलं असल्याचे ते म्हणाले.करोनाचं कारण देत त्यांनीच नागपूरात येण्याचे टाळले,यावर अधिक मी बोलू इच्छित नाही.
आमच्या सरकारने जी महत्वाची कामे होती त्यातील ७० ते ८० टक्के कामांवरील स्थगिती उठवली आहे.आमचे सरकार मनात आकस ठेऊन काम करीत नाही.अजित पवार हे आघाडी सरकारमध्ये अर्थ मंत्री होते त्यामुळे त्यांनी युती सरकारच्या काळातील किती कामांना स्थगिती दिली,हे त्यांना चांगल्याने माहिती आहे.
सीमावाद हा नवीन विषय नसून अनेक वर्ष जुना विषय आहे.सीमावादात देशाच्या इतिहासात पहील्यांदा केंद्र सरकारने हस्तक्षेप केला.गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत दोन्ही राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली व मध्यस्थी केली.आतापर्यंत कनार्टकात,महाराष्ट्रात व केंद्रात कोणाची सरकार होती?असा सवाल त्यांनी केला.
धर्मादाय योजना,महात्मा फुले अनुदान योजना आम्ही सुरु केल्या,त्यांच्या पाठीशी खंबीरपणे हे सरकार उभे आहे.याच्यात राजकारण करु नये.हा अस्मितेचा प्रश्न असून सर्वांनी पाठीशी उभे राहण्याचे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले.
शेतक-यांसाठी आतापर्यंत ९ हजार कोटींची नुकसान भरपाई देण्यात आली.अतिवृष्टि,अवकाळी पाऊसामुळे झालेले नुकसान यासाठी ६ हजार ४०० कोटी मंजुर करण्यात आले.यातील ४ हजार ८०० कोटींचे वाटप देखील झाले.आम्ही एनडीआरएफचे नियम देखील बदलले.२ हेक्टर वरुन नुकसान भरपाईसाठी ३ हेक्टर निकष ठेवण्यात आले.५० हजार पर्यंत नियमित कर्ज फेडणा-यांसाठी योजना राबविली.शेतक-यांच्या विषयी हे सरकार संवेदनशील आहे.६ लाख ९० हजार कोटींमधून अडीच हजार कोटी आम्ही जमा केले,उर्वरित लवकरच जमा करु.
अजित पवार यांचा ७ एप्रिल २०१३ चा व्हिडीयो आठवा,शेतकरी पाणी मागत होते तेव्हा ते काय म्हणाले?धरणात जाऊन मूत्र विसर्जन करायचे का?!असे ते बोलले,नको ते मला बोलायचे नाही.आम्ही अठरा सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून यामुळे दोन लाख पन्नास हजार हेक्टर भूमि ओलिताखाली येणार आहे.फक्त चार महिन्यात आमच्या सरकाराने १८ हजार कोटींच्या कामांना मान्यता दिली आहे.आघाडी सरकाच्या अडीच वर्षात काय झाले?आमचे सरकार सर्वसमावेशक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
हे पण वाचा….
विदर्भावर आम्ही कधीही अन्याय केला नाही:अजित पवार यांचा खुलासा
विदर्भात समृद्धी महामार्गाचे पंतप्रधनांच्या हस्ते लोकार्पण झाले.विदर्भातील सहा प्रकल्पांचे उद् घाटन झाले.आमचे सरकार पूर्णपणे जनतेच्या मागे उभी आहे.चार महिन्यात एवढं केलं तर पुढील दोन वर्षात किती काम करु!दिवाळीत फक्त शंभर रुपयात शिधा वाटप करण्यात आले. ९६ टक्के लोकांनी याचा लाभ घेतला,अजित दादांनी याची दखल घेतली पाहिजे.सगळे सण जोरात साजरे करण्याची घोषणा आमच्या सरकारने केली.
म्हैसाळ योजनेत जत तालुक्यातील ६५ ते ७० गावांपर्यंत पाणी पोहोचवले.४८ गावे उरली आहेत त्यांनाही लवकरच पाणी पुरवठा केला जाईल.फक्त चार महिन्यात आमच्या सरकारने हे काम केले आहे.
आज मंत्री मंडळात २ हजार कोटींच्या कामांना मान्यता देण्यात आली असून, घाडगेवाडी गावाचाही यातून दुष्काळ दूर होईल.हे सरकार सर्वसामान्यांना केंद्र बिंदू मानून काम करतं.हे सरकार लोकाभिमूख सरकार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.उल्लासनगरमध्ये लाखो लोक जीव मुठीत घेऊन जगत आहेत.त्याचाही पुर्नविकास करण्याचा निर्णय मंत्री मंडळाने आज घेतला आहे.
जनतेला जे पाहिजे ते देणारे हे सरकार आहे.अण्णा हजारेंची मागणी आघाडी सरकारने अडीच वर्षात का पूर्ण केली नाही?त्यांना कशाची भीती होती?आम्हाला पारदर्शक काम करायचं आहे,असे ते म्हणाले.
आघाडी कडून मुंबईत काढलेल्या विशाल मोर्च्याविषयी याप्रसंगी छेडले असता,तो ‘नॅनो’मोर्चा होता असा उपरोधिक टोला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला.७ संघटना मिळून २०-२२ हजार ही एकत्रित्र करु शकले नाहीत.संजय राऊतांनी मराठा मोर्च्याचा व्हिडीयो ट्वीट केल्याचे सांगत,असे काम ते करु शकतात असे फडणवीस म्हणाले.
यावर मुख्यमंत्री यांनी, आम्ही रत्नागिरी येथे सभा घेतली होती,त्या सभेत आघाडीच्या मोर्च्याहून जास्त गर्दी असल्याचे ते म्हणाले.आघाडीच्या मोर्च्यात भगवे कमी व इतर पक्षांचेच झेंडे जास्त असल्याचा टोला देखील त्यांनी हाणला.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी येत्या फेब्रुवरीत शिंदे-फडणवीस सरकार पडणार असल्याचे भाकीत ट्वीटवर वर्तवले असून, ज्याप्रकारे आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर फडणवीस हे सातत्याने आघाडी सरकार लवकरच पडणार असल्याचे भाकीत वारंवार वर्तवित होते कारण त्यांनी शिवसेनेतील अंतर्गत खदखद हेरली होती,आता राऊतांना, शिंदे-फडणवीस युती सरकारमध्ये कोणाची खदखद दिसत आहे?या प्रश्नाकडे लक्ष वेधले असता,आमचे सरकार जेव्हापासून स्थापन झाले तेव्हापासून सगळ्यांनी भाकीत वर्तवणे सुरु केले,एक महिन्यात पडेल,तीन महिन्यात पडेल,आता पाच महिने झाले आता फेब्रुवरी सांगतात,काही लोकं म्हणाले आम्ही हात दाखवायला जात नाही,आम्ही ३० जून रोजी सरकार स्थापित करुन मजबूत हात दाखवला आहे,ज्यांना दाखवायचा आहे तो, संजय राऊत हे फक्त तारीख सांगतात,वर्ष सांगत नाहीत,कोणत्या वर्षाचा फेब्रुवरी महिना?अशी मिश्कली मुख्यमंत्री यांनी केली.
लोकायुक्त कायदा कोणालाही अडकविण्यासाठी तयार करण्यात आला नसल्याचे एका प्रश्नाबाबत ते म्हणाले.
मध्यप्रदेश सरकारने करोनाच्या काळात शेतक-यांचे वीजेचे बिल रद्द केले होते,आघाडी सरकार असे का करत नाही म्हणून फडणवीस यांनी जाब विचारला होता,तो व्हिडीयो व्हायरल होत असून ,आता उपमुख्यमंत्री हे सत्तेवर असल्याने ते शेतक-यांचे वीजेचे बिल का माफ करीत नाही?या प्रश्नावर बोलताना फडणवीस यांनी,आम्ही एक बिल ज्यांनी भरले त्यांची वीज न कापण्याचा निर्णय घेतला आहे शिवाय रबी पिकां साठी ही वीज कनेक्शन न कापण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.शेतक-यांचे वीज कनेक्शन कापू नये असे आदेश काढणारी ही आमची सरकार असल्याचे ते म्हणाले.
विधान भवनातील शिवसेनेच्या कक्षाबाबत प्रश्न विचारला असता,तुम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेविषयी विचारत आहात की ‘नॅनो’शिवसेनेबाबत,असा उपरोधिक प्रश्न त्यांनीच केला.
शिंदे-फडणवीस सरकारने धान खरेदी केंद्रे बंद केल्याकडे लक्ष वेधले असता,आघाडी सरकारच्या काळात धान खरेदी केंद्रात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे फडणवीस म्हणाले.ज्यांच्याकडे धान साठवणूकीची केंद्रे नव्हती त्यांना परवानगी देण्यात आली.ही १०० केंद्रे तोंड पाहून देण्यात आली होती,आता ती बंद करण्यात आली.मात्र,धान खरेदी करने पूर्णपणे सुरु आहे.शिंदे योग्य निर्णय सोयाबिन खरेदीसाठी,कापूस खरेदीसाठी घेतील,अजित पवारांनी आज पत्र परिषदेत हा विषय उपस्थित केला या मागे नाना पटोले यांनी हा विषय अजित पवारांना दिला असल्याचे फडणवीस म्हणाले.

आमचे चॅनल subscribe करा