Homeनागपूर न्यूजराऊतांनी यादी उद्याच जाहीर करावी: प्रवीण दरेकर यांचे राऊतांना खुले आव्हान

राऊतांनी यादी उद्याच जाहीर करावी: प्रवीण दरेकर यांचे राऊतांना खुले आव्हान

प्रताप सरनाईक ईडी प्रकरण

नागपूर,ता. २५ नोव्हेंबर: शिवसेना नेते संजय राऊत यांनी नुकतेच प्रसार-प्रचार माध्यमांकडे प्रताप सरनाईक ईडी कारवाई प्रकरणी बोलताना माझ्याकडे शंभरपेक्ष्ा जास्त नेत्यांची नावे आहे जी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार असून केंद्र सरकार त्या नेत्यांवर देखील बघू कोणती कारवाई करते?असे आव्हान केले हाेते. विधान परिषद विरोधी पक्ष् नेते प्रवीण दरेकर हे पदवीधर निवडणूकीनिमित्त नागपूर दौ-यावर आज बुधवार दि. २५ नोव्हेंबर रोजी नागपूरात आले असता आयोजित पत्र परिषदेत,राऊत यांच्या या वक्तव्याविषयी पत्रकारांनी त्यांना छेडले,यावर राऊत यांनी उद्याच्या उद्या ती यादी जाहीर करावी.शंभर टक्के उद्याच द्या,अश्‍या खोट्या याद्या बिद्याला आम्ही भीत नाही,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हेच सांगितलं की द्या ती यादी,नुसतेच बोलताय,आज तिसरा दिवस आहे,कुठे आहे यादी?मी देखील अापल्या माध्यमातून हेच आव्हान करतोय नेमके काय आहे हे सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर येऊ द्या,फक्त बोलण्यासाठी मिडीया समोर बोलताय की, प्रत्यक्ष् त्या ठिकाणी काही आहे?आणि असलं तरी महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाऊ द्या,असे आव्हान त्यांनी केले.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात प्रवर्तन निदेशालय(ईडी)ने छापेमारी करीत शिवसेनचे आमदार प्रताप सरनाईक तसेच त्यांच्या मुलगा पुरवेश सरनाईकला बांद्रा येथील त्यांच्या घरात क्वारंटाईन केले.मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये शिवसेना अामदार प्रताप सरनाईक यांच्या घर व कार्यालयासह दहा ठिकाणी ईडीने काल मंगळवारी छापे मारले होते.सरनाईक हे नेहमी भारतीय जनता पक्ष्ाच्या विरोधात बोलत असल्याने आकसापोटी केंद्राने ही कारवाई केल्याचा शिवसेनेच्या नेत्यांचा आरोप आहे.

दरेकर हे सध्या पदवीधर निवडणूकीनिमित्त गेल्या दहा दिवसांपासून प्रचारासाठी राज्याच्या दौ-यावर आहेत.काल ते मराठवाडा,यवतमाळ,वर्धेचा दौरा आटोपून नागपूरात भाजपचे अधिकृत उमेदवार महापौर संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी नागपूरात आले आहेत.याप्रसंगी बोलताना त्यांनी संदीप जोशी हे उत्तम उमेदवार असून त्यांच्यातील संघटन कौशल्य,क्रिडा काैशल्य इ.चे कौतूक करीत पदवीधर मतदार संघाची ही निवडणूक फक्त नागपूर किवा भाजपसाठी नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाची असल्याचे सांगितले.या निवडणूकीच्या निकालातून उद्याची दिशा व भविष्य ठरणार असल्याचे ते म्हणाले.

गेली पाच वर्ष फडणवीस सरकारच्या माध्यमातून राज्याने विकास बघितला आहे,नागपूर,विदर्भाच्या विकासाची गती बघितली आहे.विदर्भात तर विकासाच्या गतीची दोन चाके होती.एक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर दुसरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.प्रंचड गतीने विकास हाेणारी फडणवीस काळातील ती एक चांगली कारर्कीद होती.नंतर मात्र अनैसर्गिकरित्या महाराष्ट्रात महाविकासआघाडीचे सरकार स्थापित झाले.मात्र गेल्या एक वर्षापासून महाराष्ट्राच्या जनतेने राज्यात कसलाही चांगला कारभार पाहीला नाही. एक वर्ष या आघाडी सरकारला पूर्ण होत असले तरी राज्याच्या जनतेला हे सरकार कोणतेही समाधान देऊ शकले नसल्याची टिका त्यांनी केली.

हे सरकार म्हणजे विकास कामांना स्थगिती देणारे सरकार ठरले. राज्यातील महीला या तर क्वारंटाईन केंद्रात देखील अत्याचाराला बळी पडल्या.शेतकरी अद्यापही संकटातच आहे.विद्यार्थ्यांच्या भविष्याचा तर संपूर्ण बोजवाराच वाजवला.वीज बिलाबाबत तर सगळा आनंदी आनंदच आहे. एकीकडे उर्जामंत्री कोणीही मागणी केली नसताना पहील्याच अधिवेशनात १०० युनिटपर्यंत गरिबांचे विज बिल हे माफ केले जातील अशी घोषणा करतात.यानंतर विज बिलामध्ये सवलत देण्याची घोषणा करतात.मात्र उलट वाढीव बिले जनतेच्या मानगुटावर टाकून वाढीव बिले कशी योग्य आहे याचे समर्थन करताना दिसतात.हे सरकार म्हणजे जुल्मी सरकार असून ग्राहकांच्या जखमेवर मीठ चाेळणारे आहे. राज्यातील फडणवीस सरकारची पाच वर्षांची कारकीर्द फक्त राज्याचा विकास करणारी होती तर आघाडी सरकारची एक वर्षाची कारर्कीद ही राज्याला ‘भकास’करणारी असल्याचा घणाघात त्यांनी केला.

ही निष्क्रीय सरकार सत्तेत आल्यानंतर पदवीधर मतदार संघाची ही पहीलीच निवडणूक आहे.आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे जनता संतप्त आहे.आपला संताप ते मतपेटीद्वारे आता व्यक्त करणार असल्याचे ते म्हणाले.म्हणूनच ही निवडणूक मी महत्वाची असल्याचे सांगत आहे. नागपूर विभागाची सीट हा भाजपचा पारंपारिक गड राहीला आहे. यंदा ही भाजप उमेदवराचा मोठा विजय होणार असून जनतेची नकारात्मकता ही मतांमध्ये भाजपच्या बाजूने परिवर्तित होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

आघाडीच्या तिन्ही पक्ष्ात एकवाक्यता नाही.हे सरकार म्हणजे गोंधळाने भरलेले आहे.उर्जामंत्र्याची न्याय मागणीही अर्थमंत्र्यांनी मान्य केली नाही उलट परिवहन मंत्री यांना एक हजार कोटीचे पॅकेज त्वरित उपलब्ध करुन देण्यात आले,यावरुन आघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्ष्ाला कशी वागणूक मिळतेय हे स्पष्ट होतंय.एक तर काँग्रेसला निधी खेचून आणने जमत नाही आहे,नाही तर काँग्रेसचे ऐकले जात नाही,काँग्रेसमध्ये धाडसच नाही किवा काँग्रेसला महाविकासआघाडी सरकारमध्ये हेतूपुरस्सर बाजूला ठेवले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

कोविडच्या बाबतीत जगभरात सुधारणा होत असताना महाराष्ट्रात अजूनही सरकार चाचपडतंय.बिहार निवडणूकीने जनाधार हे भाजप पक्ष्ाच्या बाजूने असल्याचे सिद्ध झाले आहे. नागपूर विभागातही भाजपचे उमेदवार संदीप जोशी हे ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होतील,संदीप जोशी हे रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी होणार असल्याचे भाकीत करुन विधान परिषदेत ते पदवीधरांच्या विविध विषयांबाबत चांगले नेतृत्व करतील,असा विश्‍वास दरेकर यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

आज पदवीधर हा पदव्यांची भेंडोली घेऊन विद्यापीठातून बाहेर पडतोय मात्र नोकरीची कोणतीही शाश्‍वती त्याला नसते.भाजपचा हा प्रयत्न राहणार आहे की पदवीधरांना निश्‍चित कालावधीत नोकरी उपलब्ध व्हावी.याशिवाय पदवीधरांना उद्योग-व्यवसाय उभे करण्यासाठी अर्थ पुरवठा करण्याची व्यवस्था देखील आमचा पक्ष् करेल.शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येईल.उद्योजक म्हणन पदवीधर उभा राहीला तर तालूका,जिल्हास्तरावरील अर्थव्यवस्थाही बळकट होईल,असेे ते म्हणाले.

कालच्या पंतप्रधान यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या ऑन लाईन बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात भाजपकडून होणारे आंदोलन याची तक्रार केली होती,यांना आवरा असे ते म्हणाले,याबाबत प्रश्‍न विचारला असता,हे सरकार सर्व आघाडीवर अपयशी सरकार असून आंदोलन का सुरु आहे हे पंतप्रधानांनाही नीट माहिती असल्याचा दावा त्यांनी केला.

मराठा समाजाच्या आरक्ष् णाबाबत प्रश्‍न विचारला असता,मराठा समाजामध्ये नाराजीचा सूर असल्याचे ते म्हणाले.आमचा पक्ष् मराठा आरक्ष् णाच्या शंभर टक्के बाजूने आहे. फडणवीस यांनी अत्यंत मेहनत करुन मराठा आरक्ष् णाचा प्रश्‍न न्यायालयात देखील तडीस लावला होता,या सरकारचे तर वकील देखील तारखेवर हजर राहीले नसल्याची टिका त्यांनी केली.यावरुन या सरकारला मराठा आरक्ष् णाचा मुद्दा हा झुलवत ठेवायचा असल्याचा आरोप त्यांनी केला.सोशल मिडीयावर देखील मराठा आरक्ष् णाच्या प्रश्‍नावरुन या सरकारवर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.याची किंमत याच पदवीधर निवडणूकीत या सरकारला मोजून द्यावी लागणार असल्याचे ते म्हणाले.

कालच मराठवाड्यातील दौ-यात सतीश चव्हाण या राष्ट्रवादीच्या उमेदवारानी मराठा आरक्ष् णासाठी कोणतीही भूमिका निभावली नसल्याचा संताप अनेक तरुणांनी माझ्याकडे व्यक्त केल्याचा दावा याप्रसंगी दरेकर यांनी व्यक्त केला.हेच मराठा तरुण पदवीधर निवडणूकीत आता या सरकारला ‘एकतर्फी ट्रेलर’ दाखवतील असा दावा त्यांनी केला.

धनगर अारक्ष् णाबाबत बोलताना आमच्या सरकारने धनगर यांच्या सर्वांगिण विकासासाठी एक हजार कोटींचे बजेट ठेवले होते मात्र आघाडी सरकारने ते बजेट देखील निरस्त करुन पाणी फेरल्याचा आरोप दरेकर यांनी केला.धनगरांनाही आरक्ष् ण मिळाले पाहिजे ही फडणवीस तसेच भाजपची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी नुकतेच भाजपने अनेक नेत्यांचे ‘वाळवंट’केल्याची प्रखर टिका केली होती.यात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे देखील नाव असल्याची बाब पत्रकारांनी लक्ष्ात आणून दिली व अनेक नेते भाजप पक्ष् सोडणार असल्याचा दावा पवार यांनी केला याकडे लक्ष् वेधले असता,अनेक नेते हे पक्ष्ात येतात किवा जातात.मी स्वत: मनसेतून आलो असलो तरी ज्या पक्ष्ाने मला घडवले त्या पक्ष्ाविषयी चुकीची नावेबोटे ठेवली नाही.पक्ष्ाने चाळीस वर्ष खूप चांगलं देऊन ही पक्ष्ाविषयी वाईट बोलणारे नेते आहेतच,असा अपरोक्ष् टोला त्यांनी खडसे यांना लगावला.

माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याविषयीच्या प्रश्‍नावर बोलाना बावणकुळे हे पक्ष्ाचे महत्वाचे नेते असल्याचे ते म्हणाले.महाराष्ट्रात त्यांना पक्ष्ाने सरचिटणीस पद बहाल केले,ते प्रदेशाचे महामंत्री असून निर्णय प्रक्रियेत त्यांचे स्थान महत्चाचे असल्याचे दरेकर यांनी सांगितले तसेच बावणकुळे यांचे पुर्नवसन झाले असल्याचा खुलासा केला.

यावेळी मनसेसोबत हातमिळवणी बाबत विचारले असता या विषयी बोलणे म्हणजे अतिशय प्री-मॅच्यूअर विधान होईल,असे त्यांनी सांगितले.राजकारणात सतत बदल घडत असतात,निवडणूकीची वेळ आली तर पक्ष्ातर्फे योग्य निर्णय होतील,असे दरेकर म्हणाले.

पत्र-परिषदेत खा.विकास महात्मे,प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम,आ.गिरीश व्यास,आ.प्रवीण दटके,आ.कृष्णा खोपडे,माजी आ.डॉ.मिलिंद माने,आठवले गटाचे प्रमुख राजेंद्र वाघमारे,शक्तीसिंग ठाकूर,किशोर पाटील,भाजपचे मिडीया प्रभारी चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.

Latest बातम्या