Homeनागपूर न्यूजरांगेत उभे राहून वीस-वीस हजार रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर घेणारे ते दोन संपादक........

रांगेत उभे राहून वीस-वीस हजार रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर घेणारे ते दोन संपादक….. !

(मुक्तवेध)

कोण देतोय,कोणाचे पैसे होते यापेक्षा कोण ‘घेतोय’पत्रकारितेत हा मुद्दा गांर्भीयाचाच:ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे यांची सार्वजनिक मंचावरील खंत

घातसूत्राच्या’ करंजीकरांनी जगभरातील भ्रष्टाचारातून ‘भारतालाच’ठेवले नामानिराळे!२०२५ मध्ये पुस्तक पूर्ण झाल्यावर भारताबाबत बोलेल दिली ग्वाही!

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.६ डिसेंबर २०२२: रविवारचा दिवस,जनमंचाचा कार्यक्रम,स्थळ साई सभागृह,प्रमुख वक्ते हे जगभराची भटकंती करुन अनुभवसंपन्न झालेले ‘घातसूत्रा’चे लेखक,अभिनेते,व्यवस्थापन सल्लागार आणि अर्थशास्त्रज्ञ असलेले सुप्रसिद्ध दीपक करंजीकर.निमंत्रणातच ’जागतिक भ्रष्टाचार व त्याची पाळेमुळे’हा विषय ठलकपणे अधोरेखित केला असला तरी भारतात नोटबंदी आणि इतर भ्रष्टचाराविषयी देखील ते भरभरुन बोलतील अशी श्रोत्यांना अपेक्षा होती मात्र जागतिक भ्रष्टाचाराची पाळेमुळे प्रभावीपणे अधोरेखित करताना करंजीकर यांनी ब-याच अंशी भारतातील आजचे ‘राजकीय वर्तमान’तेवढ्या तडफेने अधोरेखित करण्यास मात्र हात आखडताच घेतला.
अश्‍या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले दैनिक भास्करचे समूह संपादक प्रकाश दुबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मात्र करंजीकरांनी विशद केलेल्या जगभरातील घटनांच्या संदर्भावरुन मला तीव्रतेने‘भारताची’आठवण येत असल्याचे नमूद केले.व्यापारिक संबंधांबाबत बोलताना(देशातील धनाढ्य ‘अ’ आद्य अक्षर असणारे दोन उद्योजक)हळूच त्यांनी ‘सत्ता की सहभागिता’हा विषय छेडला.नोटबंदी का घोटाला…..भारत के एक आदमी के घोटाले की जांच करो….रिझर्व बँक के गव्हर्नर……या विषयाचे काय ….!

उदाहरण ही दिलं..२००८ साली अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूकीदरम्यान एका चित्रपट निर्मात्याशी अथक प्रयासानंतर भेट झाली.हा निर्माता तोच आहे ज्यांनी ‘ज्यूरासिक पार्क’बनवला.त्यावेळी मात्र ते एका वेगळ्याच चित्रपट निर्मितीत आकंठ बुडाले होते.ते तत्कालीन राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार ओबामासाठी चित्रपट बनवित होते.अहंआश्‍यर्च…ते अतिशय घाईघाईने…व्हिएतनामवर चित्रपट तयार करीत होते!व्हिएतनाम युद्धात रिपब्लीकन पक्षातर्फे करण्यात आलेली हिंसा,बर्बरता,घोटाळे हा त्यांच्या चित्रपटाचा विषय होता….!यात तथ्य ही होते मात्र….चित्रपट अभिव्यक्तीचा विषय मात्र ‘रिपब्लिकन पक्ष’होता….!याच निवडणूकीत डेमोक्रेटिक पक्षाचे ओबामा विजयी झाले होते….!

हाच अनुभव भारताच्या अनुषंगाने देखील बघितला पाहिजे असे ते सांगतात.भारतात खनिज तेलापासून खाण्याच्या तेलापर्यंतची मालकी ज्या उद्योजकाकडे आहे,भारतातही निवडणूकी पूर्वी असाच उदात्तीकरणाचा एक चित्रपट निर्मित आणि प्रसिद्ध ही झाला होता….!जुरासिक पार्कची निर्मिती देखील याच उद्योजकाच्या पैश्‍यातून झाली आहे…!

त्याच उद्योगपतीचा पैसा हा नागपूरात दिवाळीनिमित्त पार पडलेल्या राज्यातील एका फार मोठ्या राजकिय नेत्याच्या स्नेहमिलन किंबहूना स्नेहभोजनाच्या सोहळ्यात देखील गिफ्ट वाऊचरच्या रुपाने वाटल्या गेला,‘व्रण’मात्र यासाठी उमटला कारण त्या वाऊचर घेणा-यांच्या रांगेत दोन संपादक देखील होते!

पैसा कोणाचा…कोण वाटतोय…हा मुद्दा गौण असून तो घेतोय कोण?पत्रकारितेच्या क्षेत्रात हा गांर्भीयाचाच विषय असल्याचे त्यांनी सार्वजनिक मंचावरुन सांगितले आणि…नागपूरकर श्रोते ही अल्पकाळासाठी स्तंभित झाले.भारत हा एकमेव असा देश आहे ज्याने ट्रम्पच्या निवडणूक प्रचारात सहभाग घेतला!याविषयीची चर्चा माध्यमात कुठे होती?

भारताला जी-२० च्या शिखर परिषदेचे अध्यक्ष पद मिळाले,१६० बैठका ही पार पडतील मात्र नुकतेच २७ नोव्हेंबर रोजी चीनच्या दक्ष् ण कोप-यात असणा-या कोबिंग शहरात अशीच एक शिखर परिषद पार पडली.यात १९ देशांनी भाग घेतला.भारताचे सर्व शेजारी राष्ट्रे यात सहभागी झाली.इंडोनेशियाचे अध्यक्ष देखील होते.याच बैठकीत ‘हिंद महासागरचे‘चीनी हिंद महासागर’नामकरण करण्यात आले! या चीनी हिंद महासागराच्या रक्षणासाठी हवा तेवढा पैसा या सर्व देशांना पुरवण्याचे आश्‍वासन चीनने दिले,आम्ही जी-२० चा झेंडा नाचवतोय मात्र चीनने या परिषदेसाठी भारताला का निमंत्रित केले नाही?भारत-अमेरिका संयुक्त सैन्य प्रशिक्षण घेत असताना हे घडले…!

पत्रकारो को ’जलपान’करा देते है….!आता तर खनिज तेलवाल्याने भारतीय जनसंचार संस्थाच विकत घेतल्या आहेत.तत्कालीन विश्‍वनाथ प्रताप सिंग सरकारच्या भ्रष्टाचार विरोधात वार्तांकन करणा-या ‘हिंदूस्तान प्रसार वाहिनीच’पुढे विकत घेण्यात आली आणि डायरेक्टर पदी कोणाला बसवले तर संजय पुगलिया यांना!

या दोन ‘’आद्यअक्षराच्या उद्योजकांमुळेच आपल्या शहराच्या एका खासदाराकडून तर ‘ते’मंत्रालयच काढून घेण्यात आले….!

स्व.राजीव गांधी यांनी ऐकेकाळी धारावी झोपडपट्टीच्या पुर्नविकासाठी १०० कोटी देऊ केले होते,आज तेवढ्याच क्षेत्रफळासाठी आम्ही देतोय…४२ हजार कोटी…!विकास कोण करतोय?तर तेच खनिज तेलवाले उद्योजक….!

पत्रकार म्हणून आम्हाला याचा विचार करावा लागणार आहे,तेलवाल्यांवर बंधन नाही,त्यांना जे वाटेल ते विकत घेऊ शकतात,चिली देशातील सरकार पाडण्यासाठी १५ लाख डॉलर कोणाला देण्यात आले होते?तर एका वृत्तपत्र मालकाला!पुढे पेप्सीकोचा तोच उपाध्यक्ष झाला…!

महाराष्ट्रात मात्र दिवाळीनिमित्त मुंबई आणि नागपूर अर्थात पुरोगामी महाराष्ट्राच्या राजधानी व उपराजधानीत पत्रकारांना मुंबईत ५०-५० हजारांचे तर नागपूरात २०-२० हजारांचे गिफ्ट वाऊचर वाटण्यात आले…खेदाची बाब आहे त्या रांगेत नागपूरातील दोन संपादकांचाही समावेश होता….!

आम्हाला मग वाचकांना ‘नैतिकता‘शिकवण्याचा तरी अधिकार उरतो का?इतरांचा भ्रष्टाचार काढण्याचा अधिकार राहतो का?इतरांना ते किती भ्रष्ट आहेत हे सांगत असताना आम्ही किती सज्जन आहोत याचा भास निर्माण करण्यात काहीच लाज शरम वाटणार की नाही?ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे यांच्या बोलण्यातील रोख जणू हेच अधोरेखित करीत होता का….!

ज्येष्ठ संपादक यांच्या या विधानानंतर ‘सत्ताधीश’ने या तथ्याचा मागोवा घेतला आणि ‘लोकशाही’असलेल्या या देशात काहीही अशक्य नाही,याचीच प्रचिती आली…! तर एका मराठी वृत्त वाहीनीचा संपादक देखील याच रांगेत असल्याचे देखील तथ्य समोर आले.

म्हणूनच….गुजरातचा मोरबीचा पूल पडतो आणि त्यात १४० निष्पापांचे,सत्ताधारी व कंत्राटदारांच्या अभद्र युतीमुळे हकनाक बळी जातात, त्यानंतर ही माध्यमे त्या निष्पाप महिला,लहान मुलांच्या थडग्यावर बसून गुजरातचा एकहाती ’विजय’ रंगविण्यात मशगुल होतात, तेव्हा कंत्राटदार,ठेकेदार,सरकार,राजकीय पक्ष आणि माध्यमांच्या सहभागीतेतून निर्माण झालेल्या धोक्याकडेच जणू ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे इशारा करीत आहेत,अशी जाणीव होते.

आजच्या काळातील प्रसार-प्रचार माध्यमांचे आदर्श पत्रकारितेचे निकष काय झाले आहेत?याकडे जणू ते अंगूलीनिर्देश करताना आढळतात.

आज ८० ते ९० टक्के प्रसार व प्रचार माध्यमांनी वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या नजरेत विश्‍वासहर्ता आधीच गमावली आहे.जेव्हा त्याच क्षेत्रातील एक महनीय व्यक्ती वाऊचर घेणा-यांच्या रांगेत दोन संपादकांचा उल्लेख करतात तेव्हा त्यांच्याच शब्दात सांगावयाचे झाल्यास पत्रकारितेच्या आत्म्यावर ‘व्रण’च उमटून जातो……!

एकेकाळी संपादकांच्या नावावर वृत्तपत्रांचा खप होत असे.संपादकांचा प्रत्येक शब्द वाचकांसाठी मंत्र स्त्रोताहून कमी श्रद्धेचा नसायचा.९० च्या दशकानंतर मात्र वृत्तपत्रांच्या अध:पतनालाच सुरवात झाली….!२००० सालापासून तर ‘वाऊचर’संपादकांचा भरणा या पवित्र अश्‍या क्षेत्रात केला जाऊ लागला.असे संपादक आपली अंतरआत्मा,सारासारविवेकबुद्धि,तल्लख बुद्धिमत्ता इत्यादी सर्व काही मालकांच्या ‘इच्छारुपी’ आदेशाच्या दावणीला बांधून नफ्यासाठी पत्रकारिता नावाचा ‘धंदा’करु लागली…..!

मालकासाठी किवा मालकाच्या चोरुन राजकीय नेत्यांकडून खंडणी घेणारे खंडणीखोर संपादक देखील मायबाप वाचकांनी याच शहरात बघितले आहेत आणि साक्षात दंडवत ही घातला आहे.नव्या पिढीने नेमका या क्षेत्रात कशाचा आदर्श घ्यावा?याचे ही सोयरसूतक राहीले नाही.तंत्रज्ञानी झालेल्या या पिढीला देखील ‘पॅकेजधारी’आणि ‘पाकिटधारी’पत्रकार बनण्याचा आदर्श जणू या ‘वाऊचरधारी’ दोन संपादकांनी दिला….!

वॉशिंगटन पोस्ट किवा न्यूयार्क टाईम्स आज देखील भारत देशातील भ्रष्टाचार प्रमुख पानांवर छापतात…भारतातील वृत्तपत्रे…….?

वृत्तपत्र क्षेत्रात प्रचंड मोठ्या शस्त्रक्रियेचीच गरज असल्याचे जुने जाणते प्रामाणिक ज्येष्ठ पत्रकार व संपादक सांगतात.अदानीने एनडीटीव्ही विकत घेऊन रवीश कुमारच्या रुपाने प्रसार-प्रचार माध्यमांना एक प्रकारचा इशाराच दिला आहे.सोन्याच्या पिंज-यातील ‘पोपट’ बना किवा सैरभैर होऊन आसमंतात विलीन व्हा,प्रत्येकाच्या दारावर हा धोका येऊन ठेपला असताना,पत्रकारांनी यातून धडा घ्यावा,स्वत:ची आचारसंहिता सांभाळावी,ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे यांना असेच काहीसे त्या मंचावरुन तर सुचवायचे नव्हते ना?

पत्रकारांनीच पुढाकार घेऊन‘वाऊचर’संस्कृती नष्ट केली पाहिजे.दिवाळी मिलन,स्नेह भोजन यात काहीच वावगे नाही,फार फार तर तोंड गोड करण्यासाठी मिठाईचा डब्बा ही चालतो,जाहीराती ही मिळवता येतात मात्र ५०-५० हजारांचे ‘वाऊचर!’हे पत्रकारांनाच नव्हे तर पत्रकारितेलाही कोणत्या दिशेेने घेऊन जात आहे?‘खोकेशाही’ करणा-या आमदारांविरुद्ध ‘वाऊचरधारी’संपादक आणि पत्रकारांना काहीही लिहण्याचा मग नैतिक अधिकार तरी उरतो का?

याचा विचार आज नाही केला तर पुढील दहा वर्षात वृत्तपत्रांना वाचक आणि माध्यमांना दर्शक मिळणे दूर्मिळ होईल,असे तर ज्येष्ठ संपादक प्रकाश दुबे यांनी सार्वजनिक मंचावर व्यक्त केलेल्या खंतामागील उद् बोधन नव्हते ना…..!

Latest बातम्या