Homeराजकारणमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेमधून लोकांमधील मानवधर्म जागवला:आ.नीलम गो-हे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेमधून लोकांमधील मानवधर्म जागवला:आ.नीलम गो-हे


शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त केल्या शुभेच्छा प्रदान

नागपूर,ता. १९ जून: शिवसेनेच्या  ५४ व्या वर्धापनदिन निमित्ताने शिवसेना प्रवक्त्या, उपनेत्या तथा माजी विधानपरिषद उपसभापती आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सर्व शिवसैनिक, नागरिकांना शुभेच्छा दिल्या. हा वर्धापनदिन शिवसेनासाठी ऐतिहासिक आहे, आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांना सार्थ अभिमान वाटेल असे कार्य ते करीत आहेत. कोरोना महामारीच्या काळात देखील मुख्यमंत्री उद्धवजी हे जनतेचे रक्षण करण्यात अहोरात्र कार्य करत आहेत. आ. डॉ.नीलम गो-हे यांनी शिवसेनेच्या  ५४ वर्षाच्या या प्रदीर्घ वाटचालीमध्ये सर्वांनी साथ दिली असल्याचे त्या म्हणाल्या.

हिंदू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेला एका वेगळ्या प्रकारचं अस्मितेचं,अभिमानाचं,सह्दयतेची ओळख दिली आणि आता शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून सेवा,प्रबोधन,रचानात्मक कार्य आणि त्याच बरोबर सत्तेमधून लोकांमधील मानव धर्म जागविण्याचे कार्य ते करीत असल्याचे त्या म्हणाल्या.

शिवसैनिकांनी ठिकठिकाणी स्वत:मधील स्फूर्ती व उर्जा ही जागृत ठेवली आहे,त्याल मन:पूर्वक अभिनंदन करते व विशेष म्हणजे आपल्या सरकारने मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला,शेतक-यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला,त्याच बरोबर अन्न-धान्य सर्व लोकांना मोफत मिळावं असे निर्णय घेतलेले आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे राज्यातील महिलांना सुरक्षितता प्रदान करणा-या ‘दिशा’कायद्याची अंमलबजावणी करण्याचा देखील निर्णय सरकारच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितलले. या पुढच्या काळामध्ये कोरोनाच्या संकटातून आपण निश्‍चितच मार्ग काढून विकासाच्या मार्गावर अधिक आपल्याला सुरक्षितपणे जाता येईल,अशी सदिच्छा देखील आ.नीलम गो-हे यांनी व्यक्त केली.

Latest बातम्या