

देशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहील्या क्रमांकावर
पत्र-परिषदेत केला दावा
नागपूर,ता. २१ जुलै: विदर्भात शिवसेनेच्या अनेक पदाधिका-यांवर वाळू तस्करीसारख्या अवैध गतिविधींचा ठपका लागला असून त्यांना अटक देखील झाली आहे,अश्या पदाधिका-यांवर संघटनेतर्फे कारवाई देखील झाली मुंबईत ३६ विधानसभा क्ष्ेत्रात खांदेपलट झाला असून विदर्भात देखील खांदेपलटाची शक्यता आहे. मराठवाड्यात मुलाखती घेऊन नव्याने नियुकत्या करणार,चांगल्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे सांगून शहर किवा ग्रामीण कोणत्याही भागात असे कार्यकर्ते जे युवकांसाठी चांगले काम करु शकतील त्यांनाच युवा संघटना संधी देईल असे विधान युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई यांनी केले.ते आज दि. २१ जुलै २०२१ रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत बोलत होते.
याप्रसंगी मंचावर खासदार कृपाल तुमाने,विधान परिषद सदस्य व संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी आदी उपस्थित होते.वरुण सरदेसाई युवासेनेचे अध्यक्ष् व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरुन युवासेनेच्या कार्यकारिणीची रुपरेषा ठरविण्यासाठी सध्या विदर्भाच्या दौ-यावर आले असून आज त्यांनी नागपूरातील कार्यकर्त्यांशी संवाद सांधला.करोनामुळे जमिनीस्तरावरील कार्यकर्त्यांशी संवाद हा कमी झाला,राज्यभरात या कार्यकर्त्यांसोबत हा संवाद पुन्हा सुरु व्हावा यासाठी वरुण सरदेसाई यांनी पुणे जिल्ह्यातून आपल्या दौ-याला सुरवात केली आहे.मराठवाड्याचा ४ दिवसांच्या दौ-यानंतर आज त्यांनी नागपूरात युवासेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.परवा ते यवतमाळ तर त्यानंतर अमरावती,अकोला अश्या विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यांच्या दौरा करणार असल्याची माहिती संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांनी याप्रसंगी दिली.
याप्रसंगी वरुण सरदेसाई यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तर दिले.युवासेनेच्या संघटनेत प्रभाग व बूथनिहाय नियुक्त्या केल्या जाणार असल्याचे ते म्हणाले.यासाठी मुंबईवरुन चमू येणार असल्याचे त्यांनी सांगितले.मनसेमधून आदित्य शिरवडकर हे युवासेनेत आले असून नागपूरात ते दर महिन्यात एक आठवडा राहून विस्तारक म्हणून काम बघतील अशी माहिती त्यांनी दिली.आम्हाला नागपूरात पक्ष् बांधणी करायची असल्याचे त्यांनी सांगितले.आज नागपूरात घेतलेली बैठक फक्त आणि फक्त युवासेनेची ताकद कशी वाढवता येईल यासाठी घेण्यात आली असल्याचे व ती अतिशय यशस्वीरित्या पार पडली असल्याचे ते म्हणाले.
आघाडीतील इतर राजकीय पक्ष्ांचा स्वबळाचा नारा यासंबधी बोलताना निवडणूका या युतीत,आघाडी किवा स्वबळावर लढायच्या यासंबधीचे निर्णय हे पक्ष् प्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेचे नेते घेत असतात मात्र शिवसेना व युवासेनेचं काम करीत असताना आमची ही जवाबदारी आहे की शिवसेनेचे,युवासेनेचे संघटन हे मजबूत केले पाहिजे उद्या जर पक्ष् प्रमुखांनी आदेश दिला की कुठलीही निवडणूक स्वबळावर लढायची तर त्यासाठीची तयारी ही शंभर टक्के झाली पाहिजे म्हणून आम्ही ही तयारी करीत असल्याचे व हे दौरे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.कुठलाही निर्णय आला तरी युवासेनेची,शिवसेनेची नागपूर जिल्ह्याची निवडणूक लढण्यास आमची पूर्ण तयारी असणार आहे.
आदित्य ठाकरे यांच्या लक्ष्ात आलं की कुठेतरी पक्ष् कार्यकर्त्यांसोबत करोनामुळे संवाद हा होत नाही आहे त्यामुळे त्यांनी करोनाची दूसरी लाट अोसरल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेच्या ‘शिव संपर्क अभियान’ राबवलं जात आहे.याच अभियानात आम्ही युवासेनेचा संवाद दौरा पार पाडतोय असे ते म्हणाले.
मनसेचेच्या युवासेनेचा पदभार राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे सांभाळणार अशी चर्चा आहे त्यांनी धुरा सांभाळली तर शिवसेनेच्या युवासेनेला आव्हान निर्माण होईल का?या प्रश्नावर बोलताना हा त्या पक्ष्ाचा अंतर्गत विषय असल्याचे ते म्हणाले.ते त्यांचं काम करतात आम्ही आमचं काम करु राजकारणात ’जर अाणि तर’ याला कुठलाही अर्थ नसतो,असे ते म्हणाले.
शिवेसनेचे काही पदाधिकारी हे राष्ट्रवादीत गेलेत यावर बोलताना एखाद दोन पदाधिकारी गेल्याने शिवसेनेची ताकद कमी होत नसल्याचे ते म्हणाले.आजच्या तारखेत देशातील पहील्या क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्या जातं.आमची ताकद ही उत्तरोत्तर वाढतच जात असल्याचे ते म्हणाले.
संघटनेत दूफळी,मतभेद आजच्या ही बैठकीत दिसून आले असून आजच्या तुमच्या बैठकीत काही पदाधिकारी हे अनुपस्थित राहीले यावर बोलताना शिवसेना ही एक कुटुंब आहे,काही मतभेद असतील तर एकत्र बसून सोडवू असे ते म्हणाले.

आमचे चॅनल subscribe करा