
नागपूर,ता. १७ ऑगस्ट: मनपा आयुक्त तुकाराम मुंढे हे २८ जानेवारी २०२० पासून आयुक्त पदी रुजू झाले.तेव्हा पाासून आजतागम मुंढे आणि सत्ताधारी यांच्यात पराकोटीचा वाद निर्माण झाला आहे. शहरातील विकासावर याचा परिणाम होत आहे.याबाबत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांनी विचारले असता,यामध्ये राज्य सरकारने मध्यस्थी करावी अशी मागणी मी केली होती मात्र सरकार ते करत नसल्याचे फडणवीस म्हणाले.
आज सोमवार दि. १७ ऑगस्ट रोजी मनपा मुख्यालयात त्यांनी शहरातील समस्त आमदार,जनप्रतिनिधी तसेच मनपा प्रशासनाच्या अधिका-यांसोबत कोविड-१९ संदर्भात आढावा बैठक घेतली.बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
याप्रसंगी बोलताना विषय पाणी कराचा असो,नाले,रस्ते किवा कश्याचाही संदर्भात असो,आयुक्त आणि सत्ताधारी यांचे कधीच एकमत झाले नाही. नुकतेच वाढीव ५ टक्के पाणी कर रद्द करण्यासंबधी सत्ताधा-यांनी आयुक्तांच्या दालनात मूक आंदोलन केले.यासंबधी विचारले असता, नागपूर महानगरपालिकेत जी स्थिती उद् भवली आहे ती शहराच्या विकासासाठी घातक ठरतेय. सरकारने मध्यस्थी करुन यावर तोडगा काढला पाहीजे मात्र सरकार असे करत नाही.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच त्यांचे पूत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंढे यांचीच पाठराखण केली. याशिवाय सरकारमधील मंत्रीही मुंढेच्या समर्थनार्थ वेळोवेळी पुढे आलेलेे आहेत. त्यामुळे मुंढेंना सरकारच पूर्ण पाठींबा आहे आणि या वादामध्ये सरकारकडून कुठलीही मध्यस्थी केला जाणार नाही,असे एकंदरीत परिस्थितीवरुन आज तरी दिसतंय,असे फडणवीस म्हणाले.
नागपूर बद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की,नागपूरात कोरोनाचा प्रकोप वाढतोय, हळू हळू संक्रमणाचा प्रादुर्भाव उच्चांक गाठतोय,त्यामुळे एक महिना नागपूरसाठी क्रिटिकल आहे..नागपुरात चाचण्यांची टक्केवारी ही वाढवली पाहिजे.ते केल्यास सुरुवातीला रुग्ण वाढतील, मात्र, नंतर स्थिती नियंत्रणात येईल. असा सल्ला प्रशासनाला दिला असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यासाठी नागपूरात मोठे रुग्णालय उभारण्यापेक्षा छोटे कोविड केयर सेन्टर उभारा असा सल्ला दिला आहे.
राज्यात मुंबईत करोना चाचणींचे प्रमाण हे कमी ठेवले जात आहे त्याबद्दल विचारले असता,मुंबईत दोन कोटी तर नागपूरात २५ लाख लाेकसंख्या असताना नागपूरात दररोज ३ हजार आणि मुंबईत ५ हजार चाचण्या केल्या जात आहे, त्यामुळे नक्कीच मुंबईत चाचण्या कमी ठेवल्या जात आहे. पुण्यात ७ हजार चाचण्या दररोज होत असताना असताना मुंबईत ५ हजार का?असा सवाल त्यांनी केला.
चाचण्यांचे प्रमाण वाढवल्याने सुरुवातीला रुग्ण वाढतात नंतर स्थिती सुधारते आणि दिल्ली त्याचे उदाहरण आहे.चाचण्या वाढवल्याने दिल्लीत मृत्यू दर कमी झाला.
संजय राऊत यांच्या डॉक्टर बद्दल च्या वक्तव्यावर बोलताना ते कोणत्या मूड मध्ये तसे बोलले माहीत नाही, मात्र डॉक्टर खूप काम चांगले करत आहेत. राऊत यांनी तसे बोलायला नको होते, डॉक्टर चे मन दुखावले गेले आहे, असे बोलणे चुकीचे आहे.एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी डॉक्टरांबद्दल अवमानकारक विधान केले होते. ‘डॉक्टरपेक्ष्ा कम्पांऊंडरला जास्त कळतं,मी तर नेहमी कम्पांऊंडरकडूनच औषध घेतो’असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.
डॉक्टरांबद्दल अत्यंत अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समस्त डॉक्टर वर्गाची माफी मागावी अशी मागणी इंडियम मेडिकल असोसिएशेनच्या महाराष्ट्र शाखेने देखील केली आहे.आयएमएच्या कार्यकारिणीच्या रविवारी झालेल्या बैठकीत राऊत यांच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.आयएमएचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष् डॉ.भोंडवे यांनी माध्माला दिलेल्या प्रतिक्रियेत ’करोनाच्या संकटाचा मुकाबला करीत असताना डॉक्टर आज अापल्या प्राणाची बाजी लावून काम करतात आहेत,अशावेळी त्यांचे कौतूक करणे तर सोडाच पण राऊत यांनी डॉक्टरपेक्ष्ाही कंपाऊंडरला जास्त कळतं असे म्हणने निषेधार्ह्य असल्याचे सांगितले.

आमचे चॅनल subscribe करा