

गुन्हाच केला नाही त्यामुळे जामीन ही घेणार नाही:धोटे यांचा इशारा
प्यारे खान ऑक्सीजन मॅन नसून पॉयझन मॅन:धोटे यांचा घणाघात
दर आठवड्याला घेणार ताजबागचे दर्शन:धोटे यांचा निर्धार
गुन्हा दाखल करणारा स्वत:च कुख्यात गुन्हेगार!धोटे यांचा दावा
कालची ताजबाग रहीवाश्यांची पत्र परिषद प्यारे खान पुरस्कृत!
प्यारे खानच्या समर्थकांनी वाटले पत्रकारांना प्रेस नोट:सीसीटीव्ही फूटेज मिळवणार
गडकरी वाड्याच्या ‘पाळीवाला’ गडकरींनी समज द्यावी:धोटे यांची मागणी
नागपूर,ता.१२ ऑगस्ट: नऊ ऑगस्ट क्रांती दिनी मोठ्या ताजबागचे दर्शन घेण्याकरिता गेले असता आदल्याच दिवशी ८ ऑगस्ट रोजी त्या परिसरातील अनेक रहीवाश्यांची दूकाने,शौचालये,घरे बुलडोजर लाऊन जमीनदोस्त करण्यात आली होती त्यामुळेच बाबा ताजुद्दीन यांचे दर्शन तसेच तेथील रहीवाश्यांच्या आग्रहाखातर मोठ्या ताजबागला गेले होते मात्र त्या ठिकाणी मला पाहताच तरुणांनी एकच गर्दी केली,आपली कैफियत माझ्याकडे मांडली,अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचे संसार आणि रोजीरोटीची साधने ज्या प्रकारे बेचिराख करण्यात आलीत,ठिकठिकाणी मला नेऊन दाखवत होती,ताजबाग ट्रस्टचे विशवस्त प्यारे खान यांच्या विषयी त्यांच्या मनात खूप रोष होता,या दरम्यान त्यांनी प्यारे खान विषयी नारेबाजी ही केली मात्र मी कोणत्याही नारेबाजीमध्ये सहभागी नसताना, माझ्यासह शंभर लोकांवर सक्करदरा पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले,ताजबाग परिसराचे दर्शन हा माझा कोणताही ‘राजकीय’कार्यक्रम नसल्याचा खुलासा आज प्रेस क्लब येथे ‘अन्याय निवारण समितीच्या’अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी पत्र परिषदेत केला.
माझ्यावर ज्या सय्यद तालीफ ताजी नावाच्या इसमाने सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला तो स्वत: त्या परिसरातील एक कुख्यात गुन्हेगार आहे.त्याच्या आईविरुद्ध २००१ मध्ये गंभीर गुन्ह्या दाखल होऊत त्यात त्यांना अटक झाली होती.त्यांच्या घरी तरुण मुली पोलिसांना गवसल्या होत्या,असा गंभीर आरोप याप्रसंगी धोटे यांनी केला.स्वत: सय्यद तालीफ हा ताजबाग परिसरातील कुख्यात गुंड अबूचा खासमखास गुर्गा होता मात्र आता तो प्यारे खानच्या गटात सहभागी झाला आहे.अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सय्यद तालीफला अटक देखील झाली होती मात्र बाबा ताजुद्दीन घराण्याचा वारस असल्याने या श्रद्धेय नावाची बदनामी होईल त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या विनंतीमुळे तत्कालीन गुन्हे शाखाच्या अधिका-यांनी त्याला सोडून दिले होते,असा आरोप धोटे यांनी केला.
माझ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यापूर्वी मी असा काय गुन्हा केला याचा एक ही पुरावा सक्करदरा पोलिसांनी दाखवला नाही.ठाणेदार जयंत पाटील यांनी मला त्या ठिकाणाहून निघून जाण्याचे फरमान सोडले होते मात्र गोर गरीबांचे अश्रू पुसणे हे सामाजिक कार्यकर्त्या म्हणून माझे कामच असल्याने मी त्यांच्या सूचनेला जुमानले नाही.यावर त्यांनी मला कायदेशीर कारवाई करण्याची धमकी ही दिली.
ट्रस्टचे विशवस्त प्यारे खान यांनी देखील त्यांच्या पूर्वसूचनेशिवाय ताज बाग परिसरात कश्या काय आल्या म्हणून विचारणा केली.ताज बाग दरगाह ही प्यारे खान यांची काही वैयक्तीक जागीर नाही,ते फक्त त्या वैभवाचे,श्रद्धास्थानाचे चौकिदार आहेत त्यांनी मालक होण्याचा आव आणू नये,असा घणाघात यावेळी ज्वाला धोटे यांनी केला.प्यारे खान यांच्या अहंकाराला उत्तर देण्यासाठीच या पुढे आता मी दर आठवड्याला बाबा ताजुद्दीन यांच्या दर्शनासाठी जाणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.प्यारे खान यांनी वाघिणीच्या जबड्यात हात घालण्याचे दुस्साहस केले आहे,याला प्रतिउत्तर आता न्यायालयात दिले जाईल,असा इशारा त्यांनी दिला.
मला ताज बाग परिसरात येण्यास मज्जाव असल्याची कायदेशीर नोटीस ट्रस्टी म्हणून त्यांनी द्यावी अशी मागणी ही त्यांनी या प्रसंगी केली.केवळ प्यारे खानच नव्हे तर ठाणेदार जयंत पाटील,या झोनचे उपायुक्त नरुल हसन व पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्या म्हणाल्या.कोणताही गुन्हा केला नसताना माझ्यासह शंभर जणांवर गंभीर गुन्हयांची नोंद करण्यात आली,याचे उत्तर मी कायदेशीररित्या देईल,असे त्या म्हणाल्या.
मी नारेबाजी केलीच नाही फक्त ट्रस्टच्या कार्यालयासमोर लोकांना संबोधित केले की सणासुदीच्या दिवसात लोकांच्या चेह-यावर हास्य आणि आनंद असतो,या ठिकाणी मात्र लोकांच्या डोळ्यात अश्रू तरळले आहेत.हे जर थांबले नाही तर क्रांती होईल,आंदोलन छेडले जाईल,इतकंच मी संबोधित केले व एक सामाजिक कार्यकर्ती होण्याच्या नाते मला देशाचा संविधान तो अधिकार देतो,असे कडक बोल त्यांनी पत्र परिषदेत सुनावले.
गुन्हेगाराला बंदूकीचा परवाना व बंदूकधारी सुरक्षा!
माझ्यासह शंभर निरपराध ताजबाग परिसरातील तरुणांवर,लहान लहान लेकरांवर ज्या गुन्हेगार पार्श्वभूमीच्या सय्यद तालीफ ताजीने तक्रार नोंदवली त्यालाच पोलिसांतर्फे बंदूकीचा परवानाही बहाल केला गेला असून त्याच्या सुरक्षेसाठी दोन बंदूकधारी पोलिसही ही देण्यात आले आहे.या तस्कराला नेमकी कोणापासून भीती आहे?असा सवाल त्यांनी केला.
कालची पत्र परिषद प्यारे खान पुरस्कृत-
काल तातडीने ताज बाग परिसरातील काही नागरिकांनी माझ्या नावाचा उल्लेख करुन पत्र परिषद घेतली.९ ऑगस्टची रॅली,मोर्चा,सभा इत्यादीसाठी त्यांनी मला दूषणे जरी दिली असेल तरी मी त्यांचे दु:खं समजू शकते,मला त्यांच्याविषयी सहानुभूतीच आहे कारण त्यांच्या लहान-लहान लेकरांना,तरुण मुलांना ठाणेदार पाटील यांनी ४८ तास पोलिस ठाण्यात डांबून ठेवले होते.एवढंच नव्हे तर प्यारे खान याने या नागरिकांना धमकी दिली की आता तर फक्त एफआयआर दाखल केल्या आहेत,माझ्या विरोधात बोलणे नाही सोडले तर तुमच्या मुलांना कायमचा कारागृहातच डांबून ठेवील.

या तरुणांना मध्यरात्री घराघरातून उचलून नेण्यात आले.कोणताही समन्स नाही,अटक वारंट नाही तर फक्त प्यारे खान यांच्या ‘आदेशानुसार’ही कारवाई निरपराध तरुणांवर,अल्पवयीन मुलांवर करण्यात आली.यामुळे त्यांचे जन्मदाते घाबरले.त्यांनी प्यारे खानचे पाय धरले.सुरवातीला प्यारे खान बधला नाही मात्र माझ्या विरोधात पत्र परिषद घ्या,अशी अट घातल्यामुळे नाईलाजाने त्यांना काल माझ्या विरोधात पत्र परिषद घ्यावी लागी,असा दावा यावेळी ज्वाला धोटे यांनी केला.
एवढंच नव्हे तर ताजबाग ट्रस्टचे तीन ते चार माणसे या पत्र परिषदेत उपस्थित होती,त्यांनीच माझ्या विरोधात प्रेस नोट छापून पत्रकारांना वितरीत केल्या.याचा पुरावा म्हणून कालच्या पत्र परिषदेचे सीसीटीव्ही फूटेज मिळवण्यासाठी मी प्रेस क्लबच्या अध्यक्षांना अर्ज देणार आहे.
कालच्या पत्र परिषदेत त्या पिडीतांनी आमची ‘गलतफहमी’दूर झाली असल्याची बतावणी केली मात्र एका रात्रीत गलतफहमी अशी कशी दूर झाली?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.गेल्या वर्ष भरापासून मी नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर शरसंधान करते आहे तरी देखील माझी त्यांच्या विषयीची गलतफहमी दूर होत नाही,ताजबागमध्ये एका रात्रीत पिडीत रहीवाश्यांची गलतफहमी प्यारे खानविषयी दूर होते!
८ ऑगस्ट रोजी अतिक्रमण हटविताना स्वत: प्यारे खान त्या ठिकाणी उपस्थित होते त्याच वेळी पिडीत जनतेने त्यांना अक्षरश: कंबरे खालच्या शिव्या वाहिल्या,ताजबाग परिसरात एकेकाळी ऑटो चालविणारा माणूस आज लंदनमधून मागविलेल्या दोन कोटींच्या आलिशान कारचा मालक झाला.हा चमत्कार कसा घडला?असे चमत्कार फक्त त्यांच्यासारख्यांसोबतच कसे घडतात?असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.
अन्याय निवारण समितीच्या कार्यकर्त्यांच्या घरी रात्री बारा वाजता पोलिस हजर-
अन्याय निवारण समितीचे दोन महत्वपूर्ण सदस्य चाकोरे जे विदर्भ जन आंदोलनाचे नेते आहेत व स्वत: नावाजलेले चार्टेड अकांऊटेंट आहेत तसेच रिपब्लीकन खोब्रागडे गटाचे विदर्भ सचिव सरदार कर्नल सिंह यांच्या घरी लकडगंज पोलिस ठाण्यातील पोलिसांनी रात्रीच्या बारा वाजता दस्तक दिली!तीन महिन्या पूर्वीच्या एका घटनेविषयी चौकशी करण्याची सबब त्यांनी पुढे केली मात्र कोणताही समन्स न बजावता रात्रीच्या बारा वाजता कोणाच्याही घरी दस्तक देण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला?असा संताप व्यक्त करीत,लकडगंज पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक पोटे यांना यासंबंधी जाब विचारला असता,ताज बाग येथील घटनाक्रमाशी याचा संबंध असल्याची कबुली त्यांनी दिली.
तुमच्याकडे लकडगंजसोबतच सक्करदरा पोलिस ठाण्याचाही अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे का?असे धोटे यांनी त्यांना विचारले असता,त्यांनी वेळ मारुन नेली.हा संपूर्ण प्रकार म्हणजे माझ्या विरोधात मोठ्या प्रमाणात कट कारस्थान रचल्या जात असून यात एका फार मोठ्या राजकीय नेत्याचा हात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.
सत्ता आणि संपत्तीच्या जाेरावर हा सगळा अन्यायकारक खेळ सुरु असल्याचा त्या म्हणाल्या.कोणत्याही धार्मिक संस्थेतील सर्वोच्च पदावरील व्यक्तीची नियुक्ती न्यायाधीशांच्या परवानगीने होत असते.प्यारेखान यांची नियुक्ती मात्र या नियमाला अपवाद ठरली आहे.एका फार मोठ्या राजकीय नेत्याच्या वरदहस्तातून प्यारे खान यांची विशवस्त पदी नियुक्ती, नियमांचा भंग करुन करण्यात आली,असा आरोप धोटे यांनी केला.
गडकरींनी आपल्या ‘पाळीवा’ला समज द्यावी!
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे प्यारे खान यांच्यावर किती सख्य आहे हे केवळ ताजबाग परिसरातील नागरिकांनाच नव्हे तर संपूर्ण नागपूरकरांना माहिती आहे .त्यांच्याच ‘असीम’ कृपेमुळे प्यारे खान सारखी विभूती एका धार्मिक,श्रद्धेय संस्थेच्या सर्वोच्च पदी विराजमान झाली आहे त्यामुळे गडकरी यांनीच आपल्या पाळीवाला योग्य ती समज द्यावी अशी विनंती या प्रसंगी धोटे यांनी गडकरींना केली.माझा जन्मदाता या राज्याचे अकरा वर्षे खासदार राहीले आहे,मी या राज्याच्या एका माजी उपमुख्यमंत्र्याची नात आहे.माझ्या रक्तात वाघिणीचे रक्त आहे त्यामुळे मला खोट्या गुन्ह्यात अडकविणारे प्यारे खान व त्यांच्या इशा-यावर चालणारा पोलिस विभाग यांच्याविरुद्ध कायदेशीर लढा न्यायालयात देणार आहे मात्र गडकरी यांनी देखील प्यारे खान यांना योग्य ती समज देण्याची मागणी याप्रसंगी धोटे यांनी केली.
प्यारे खान यांची ताजबागमध्ये तानाशाही-
ताजबाग परिसरातील अनेक नागरिकांनी प्यारे खानच्या विरुद्ध असंख्य तक्रारी सक्करदरा पोलिस ठाण्यात केल्या असून या विषयी नागरिकांच्या तक्रारींची (भारतीय दंड संहिता १५४)कोणतीही दखल सक्करदरा पोलिसांनी घेतली नाही,असा आरोप याप्रसंगी धोटे यांच्यासोबत मंचावर बसलेल्या पिडीतांनी केला.आम्ही संविधानाला मानणारे नागरिक आहोत मात्र आमच्या संवैधानिक अधिकारांची गळचेपी केली जात असल्याचे ते म्हणाले.

आम्हाला मध्यरात्री अटक करण्यात आली.कायद्याप्रमाणे २४ तासात ना आम्हाला न्यायालयात सादर करण्यात आले ना आमची वैद्यकीय चाचणी करण्यात आली.पोलिसांच्या अश्या तानाशाही वृत्तीमुळे आमच्या पैकी कोणासोबतही अनुचित घटना घडली असती तर याला जवाबदार कोण असते?
कायदा व सुव्यवस्थेची ‘धज्जीया’ तर स्वत:पोलिस आयुक्त अमितेश कुमारच उडवित असल्याचा घणाघात त्यांनी केला.कायदा सुव्यवस्थेची बागडोर तर प्यारे खानसारख्या लोकांच्या हातात आहे.केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हातात कायदा व सुव्यवस्थेची बागडोर असताना जसे गडकरी सांगतात तसेच प्यारे खान करीत असतो,असे माध्यमांकडे अटक झालेल्या या नागरिकांनी आरोप केले.
एक साथ शंभर लोकांवर १४७ अंतर्गत जे गुन्हे दाखल करण्यात आले ते गैरकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. जावेद नावाच्या व्यक्तीला सरळ मध्यरात्री घरातून उचलून नेण्यात आले.त्यांची ना वैद्यकीय तपासणी करण्यात आली ना त्यांना अटकेचे कारण सांगण्यात आले.सक्करदरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी सर्वांना बोलावले असल्याचे सांगण्यात आले असल्याचे राशिद यांनी सांगितले.
जोपर्यंत वरुन आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला व इतरांना नाही सोडू शकत असे पाटील म्हणाले.ही आहे कायद्यांच्या रक्षकांकडूनच भेदभावपूर्ण वागणूक.अमितेश कुमार तर आम्हाला १४४ अन्वये कलमा लावण्याची धमकीच देतात.बलवा-दंगेसारखा प्रकार आमच्या ताजबाग परिसरातील हातावर पोट असणा-या नागरिकांच्या मनात तरी येईल का?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सर्वात मोठा तानाशाह तर प्यारे खान आहे त्यांच्याच विरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजे याशिवाय त्यांच्यावर वरदहस्त असणा-यांवर देखील कायदेशीर कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.
रफीक भाई यांनी सांगितले की त्यांनी तर प्यारे खान यांचे पाय धरले आणि त्यांच्यावरील दाखल गुन्हे परत घेण्यास सांगितले.’ही तर माझी सुरवात आहे,जर माझ्या विरुद्ध पुन्हा गेलात तर पाच एफआयआर अजून तयार आहे,जर तुम्ही उद्या धोटे विरुद्ध पत्र परिषद नाही घेतली तर तुझ्या मुलांनाही कारागृहात डांबील’असा सज्जड दमच प्यारे खान यांनी ट्रस्टच्या कार्यालयात बोलावून दिला असल्याचा आरोप रफीक यांनी केला.
पत्र परिषदेची प्रेस नोट मी तुम्हाला तयार करुन देईल.ज्वाला धोटेंना टार्गेट करा,असा दमच त्यांनी दिला होता.अनेकांनी आपल्या मुलाबाळांसाठी प्यारे खानचे पाय धरले.कालची पत्र परिषद ही प्यारे खानच्या दबावात घेण्यात आली मात्र पत्र परिषद घेणारे हे नंतर रडलेत!
ज्या ज्वाला धोटे त्यांच्या प्रश्नांवर धावून येतात त्यांच्या विरोधात प्रेस नोट वितरीत करण्यात आल्या याचा जबर धक्काच त्यांना बसला होता,असे नासिर यांनी सांगितले.आम्ही ज्वाला ताईंची वैयक्तीकरित्या माफी मागू असेही ते म्हणाले असल्याचे नासिर यांनी सांगितले.

आमचे चॅनल subscribe करा