गाणारांच्या समर्थकांचे अश्रू अनावर!
‘धनशक्ती’चा आरोप हा मतदारांचा अपमान
नागपूर,ता.२ फेब्रुवरी २०२३: माझ्या पराभवाची कारणे मतदारच सांगू शकतात,जुनी पेंशन हा मुद्दा निश्चितच या निवडणूकीत कळीचा ठरला,या मुद्दासाठी मी लढत आलो होतो,लढलो,भविष्यातही लढत राहील,असे शिक्षक मतदार संघ निवडणूकीतील पराभूत उमेदवार व माजी आमदार नागो गाणार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले.
या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने साथ दिली नाही,या आरोपात तथ्य नाही,त्यांनी पूर्ण शक्तीने साथ दिली असल्याचे गाणार म्हणाले.
या निवडणूकीत फार मोठ्या फरकाने पराभव झाला आहे याकडे लक्ष् वेधले असता याचे आत्ममंथन तर करुच पुढे व्यवस्थित काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
आता आमदार नसताना तुम्ही हा मुद्दा कसा रेटून नेणार?यावर बोलताना,या प्रश्नावर आम्ही लढत राहणार,आंदोलनाद्वारे,न्यायपूर्ण प्रक्रियेद्वारे असे ते म्हणाले.
या निवडणूकीतील पराभवानंतर गाणार यांच्या समर्थकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला असून त्यांचे अश्रू अनावर झाले होते,यावर गाणारांना प्रतिक्रिया विचारली असता,हे स्वाभाविक असल्याचे ते म्हणाले.समर्थक हे भावनिक असून भावनेच्या भरात त्यांनी स्वत:चं दु:ख व्यक्त केलं पण लोकशाहीमध्ये कर्तव्य म्हणून भावनेवर आवर घालावा लागतो.मतदारांचा निर्णय हा स्वीकारयचा असतो,अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या निवडणूकीत सर्वात जास्त आरोप हा ‘धनशक्ती’चा झालेला असल्याकडे लक्ष वेधले असता,असा आरोप म्हणजे मतदारांचा अपमान असल्याचे ते म्हणाले.लोकशाहीमध्ये मतदानाचा अपमान कोणी करु नये,असे आवाहन ही त्यांनी केले.लोकशाही,देश,राष्ट्र हे मतदारांच्या भरवश्यावर चालत असल्याचे ते म्हणाले.
पुढची भूमिका काय राहणार?असा प्रश्न ‘सत्ताधीश’ने विचारला असता,काम करत राहायचं असे उत्तर त्यांनी दिले.तेवढ्याच निष्ठेने निर्णय स्वीकारायचा आणि मतदारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत राहणार असे ते म्हणाले.
तुमच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती राजकारणात उगाच होरपळली गेली का?यावर बोलताना ते म्हणाले की ,होरपळलो नाही,स्वच्छ प्रतिमा ठेऊन पुन्हा काम करत राहायचं,स्वच्छ प्रतिमा ठेऊनच काम करु शकतो,त्याच्या करिता आमदार म्हणून निवडूनच आलं पाहिजे याची काही गरज नसते आणि मी ते काम करत राहील,असा निर्धार ही त्यांनी व्यक्त केला.
र्जुनी पेंशन‘चा मुद्दा हेच पराभवाचे कारण ठरले का?यावर बोलताना,जुनी पेंशनचा मुद्दा मी उपस्थित करीत राहीलो आहे,असे ते म्हणाले.त्याच्यासाठी मी लढत राहीलो,तो विषय ही सभागृहात उचलला आहे
मग हा मुद्दा मतदारांपर्यंत पोहोचवू शकले नाही का?यावर बोलताना,मतदारांपर्यंत पोहोचवला,त्यांना सभागृहातील व्हिडीयो ही दाखवले तरीही त्यांनी हा निर्णय घेतला,संपला विषय,इथे मग युक्तीवाद नाही.
……………………………………………………………..

आमचे चॅनल subscribe करा