Homeनागपूर न्यूजमाझ्या अटकेमागे ‘अदृष्य’हात:अनिल देशमुख

माझ्या अटकेमागे ‘अदृष्य’हात:अनिल देशमुख

खोट्या आराेपांखाली केला गुन्हा दाखल:देशमुखांचा पत्र परिषदेत आरोप

२३० बयाण,१३० धाडी तरीही काहीच गवसले नाही

न्यायमूर्ती लोया,निर्दोष सुटका प्रश्‍नांवर अनिल देशमुखांचे ‘मौन’

कारागृहात केला गेला खूप छळ:कसाबच्या ईमारतीत ठेवण्यात आले:माजी गृहमंत्र्यांची दाहक व्यथा

न्यायदेवतेने न्याय दिला: आरोप नाही तथ्य तपासले

स्वगृही परतलेले अनिल देशमुख यांचे भव्य स्वागत

विमानतळावर उमळला जनसैलाब:संदल,ढोल,पुष्पवर्षाव,आतिषबाजीने देशमुखांचे जंगी स्वागत

विमानतळ ते जीपीओ चौकात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष:गगनभेदी घोषणा

दुपारी ४ वाजता देशमुखांचं विमानतळावर आगमन,घरी पोहोचायला लागले चार तास!

‘संघर्षयोद्धा’‘टायगर ईस बॅक‘चे बॅनर झळकले:विमानतळ ते जीपीओ चौकापर्यंत देशमुखांवरील अन्यायाचे विवरण करणारे शेकडो लक्षवेधी फलक:कार्यकर्त्यांच्या टीर्शट्सवरदेखील अन्यायाचा पाढा!

फूलांनी सजलेल्या गाडीत अनिल देशमुखांची जंगी मिरवणूक:संपूर्ण विदर्भात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढवणार:अनिल देशमुखांचा निर्धार

संपूर्ण जीपीओ चौकच लखलखत्या रोषनाईने उजळला:कार्यकर्त्यांची तूफान गर्दी

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.११ फेब्रुवरी २०२३: मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेल्या बॉम्ब प्रकरण व त्यानंतर लगेच मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याच्या घटनेनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्कालीन मुंबईचे पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांची पदानवतीवर केलेली बदली, त्यानंतर त्यांचे केलेले निलंबन,फौजदार सचिन वाझे याला देखील निलंबित करुन पोलिस विभागातून काढले,यानंतर परमबिर सिंगने अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या वसूलीचा केलेला आरोप,त्यांचा राजीनामा,ईडी आणि सीबीआयकडून त्यांना झालेली अटक,वयाच्या ७३ व्या वर्षी तब्बल २१ महिन्यांचा तुरुंगवास,ईडीच्या न्यायालयापासून तर सर्वोच्च न्यायालयापर्यंंत सुटकेसाठी त्यांनी केलेली गुहार,वारंवार जामीन फेटाळ्या जाणे,तुरुंगातून सुटकेसाठी कासाविस झालेलं मन,कारागृहातील दुखापत,यानंतर काही अटी व शर्थीसह आधी मुंबई उच्च न्यायालयातून मिळालेला जामीन,या जामीनाला ईडी व सीबीआयकडून सर्वोच्च न्यायालयात दिल्या गेलेले आव्हान,सर्वोच्च न्यायालयातून मिळालेला दिलासा,स्वगृही नागपूर व दिल्लीला जाण्याची मिळालेली परवानगी या सर्व पार्श्वभूमीवर आज तब्बल २१ महिन्यांनी अनिल देशमुखांचे स्वत:च्या कर्मभूमीत, नागपूरात आगमन झाले.

त्यांच्या आगमनाची जय्यत तयारीच राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली होती.यात नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील ग्रामीण भागातील कार्यकर्ते पदाधिका-यांनी हिरीरिने नोंदवलेला सहभाग,अगदी काटोल,नरखेड,सावनेर या अनिल देशमुख यांच्या मतदारसंघ व जवळपासच्या ग्रामीण भागातील हजारो कार्यकर्ता व पदाधिका-यांनी आज दुपारी नागपूर विमानतळावर उस्फूर्ततेने केलेली एकच गर्दी ,संपूर्ण विमानतळाला राष्ट्रवादीच्या जत्रेचे प्राप्त झालेले स्वरुप.जिथे पहावे तिथे अनिल देशमुख यांचे मोठमोठे कट आऊट्स लागलेले होते.देशमुख यांना ‘संघर्षयोद्धा’ची उपाधी बहाल करीत,त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे बॅनरच आज विमानतळ ते त्यांच्या जीपीओ चौकातील घरापर्यंत झळकले होते.अनेक कार्यकर्त्यांच्या टी-शर्ट्सवरही ’टायगर ईस बॅक’चे लक्षवेधी स्लोगन झळकत होते.राष्ट्रवादीतर्फे दुपारी २ वाजता ची देशमुखांच्या आगमनाची वेळ दिली असताना,सकाळपासूनच गर्दीने विमानतळ परिसर फूलून गेला होता.

दुपारी चार वाजता मुंबईवरुन अनिल देशमुखांचे विमानतळावर आगमन झाले,तोपर्यंत अनेक तास ढोल ताश्‍यांच्या गजरात देशमुखांचे चाहते तूफान आनंद साजरा करीत होते,आदिवासी नृत्यांचा बहर सजला होता,जिथे पहावे तिथे फक्त राष्ट्रवादी पक्षाचे झेंडे लहरत होते.कार्यकर्ता व पदाधिका-यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.साहेबांवर अन्याय झाला ही भावना प्रत्येकाच्या चेह-यावर उमटली होती,न्यायालयाने दिलेल्या जामीनीचे मोल भर उन्हात अनिल देशमुखांचे हजारो-हजारो चाहते ओंजळीत धरत होते.

देशमुखांच्या आगमनानंतर फूलांनी सजलेल्या वाहनावर त्यांना उभे करण्यात आले व जंगी मिरवणूक,ढोल ताश्‍यांच्या गजरात निघाली.याप्रसंगी त्यांच्या कुटूंबियांनीही शेकडो कार्यकर्त्यांची आस्थेने विचारपूस केली,ओळख दाखवली.कुटुंबियांच्या चेह-यावरचा आनंद बघून कार्यकर्त्यांमध्येही चांगलाच जोश भरला.ही जंगी मिरवणूक आधी वर्धा रोड वरील साईंच्या चरणी स्थिरावली यानंतर व्हेरायटी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला मार्ल्यापण करण्यात आले.यानंतर गोवारी समाज चौक येथील स्मारकाला भेट देत, संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन रॅलीने जीपीओ चौकाकडे रॅलीने प्रस्थान केले.

जवळपास पावणे चार तास विमानतळ ते जीपीओ चौक या रॅलीने समस्त नागपूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते.अनिल देशमुख यांचे निवासस्थान असलेल्या जीपीओ चौकात वीजेच्या दिव्यांचा लखलखाट लक्ष वेधक होता.या ही ठिकाणी देशमुख यांचे मोठमोठे कटआऊट्स लोकांचे लक्ष वेधत होते.याच चौकात रॅलीचे समापन झाले मात्र जेसीबीच्या फूलांनी सजलेल्या केबिनवर उभे राहून रात्रीच्या पावणे आठ वाजता देशमुख यांनी गगनभेदी घोषणा देणा-या कार्यकर्त्यांना संबोधित केले.मनातली उद्वीग्नता काढली.

कार्यकर्त्यांना संबोधित करताना अनिल देशमुख म्हणाले,की मी आज त्याच जोशाने,त्याच हिंमतीने काम करायला परत आलो आहे.राष्ट्रवादीची ताकद संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये, संपूर्ण विदर्भामध्ये वाढवण्यासाठी पुढील काळात पुन्हा एकत्र राहून चांगल्या पद्धतीने,अजून गतीने काम करायचे आहे,असे ते म्हणाले.१४ महिने माझा जो छळ केला तो नंतर मी कधी तरी सांगील,१४ महिने मला ज्या ईमारतीत ठेवण्यात आलं होतं त्याच इमारतीत मुंबईवर २००८ साली हल्ला करणा-या पाकित्सानचा आतंकवादी मोहम्मद कसाब देखील राहीला होता,त्याच इमारतीत मला डांबून ठेवण्यात आलं होतं.

देशमुख यांच्या या विधानावर ‘शेम शेम’च्या प्रतिक्रिया उमटल्या.परंतू न्याय देवतेने न्याय दिल्यामुळे मी परत आपल्यात आलो असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी दूरुन आलेल्या सर्व ज्येष्ठ मंडळी,महिला भगिनी व तरुण तुर्कांचे त्यांनी आभार मानले.

तुम्हाला पुन्हा इतक्या काळानंतर बघून खूप आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.मधल्या १४ महिन्यांच्या काळखंडात तुम्हाला बघू शकलो नाही,बोलू शकलो नाही पण आज सर्वांचे चेहरे बघून आनंद होत असल्याचे ते म्हणाले.न्याय देवतेनी न्याय दिला त्यामुळेच मी तुरुंगातून बाहेर येऊ शकलो,मला खोट्या आधारावर तुरुंगात डांबण्यात आले होते.ऐकीव माहितीच्या आधारे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला,अटक करण्यात आली,पण कोणताही पुरावा नव्हता.

परिणामी,उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्येच हे नमूद केलं आहे.जे आरोप करण्यात आले त्यात काहीही तथ्य नाही.ऐकीव माहितीच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कोणताही पुरावा देण्यात आला नव्हता.शंभर कोटींच्या खंडणीचा आरोप परमबिर सिंगने माझ्यावर केला होता परंतू जेव्हा चार्ट शीट कोर्टात दाखल केली त्यावेळी त्यात एक कोटी ७१ लाखांवर आले आणि १ कोटी ७१ लाखाचे देखील पुरावे त्यात नव्हते.

उच्च न्यायालयाने हेच निरीक्षण नोंदवले की परमबिर सिंगसोबत ज्या सचिन वाझेची साक्ष नोंदविण्यात आली आहे तो वाझे स्वत: दोन खूनांचा आरोपी आहे.२००४ व २०२० मध्ये त्याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.१६ वर्षे तो निलंबित होता.अश्‍या गुन्हेगारी पार्श्वभूमी असणा-या फौजदाराच्या आरोपावर सूड बुद्धीने मला अटक करण्यात आली असल्याचे देशमुख याप्रसंगी म्हणाले.ज्याची कोणती विश्‍वाहर्ता नाही त्याच्या बयाणावर मला अटक करण्यात आल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयांनी नोंदवले असल्याचे ते म्हणाले.

येत्या २८ फेब्रुवरी रोजी मतदारसंघ काटोल येथे सभा घेणार असून जनतेसमोर तथ्य मांडणार असल्याचे ते म्हणाले.

यानंतर त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला.

या ही वेळी त्यांनी कोर्टाच्या निरीक्षणाचा उल्लेख करीत सचिन वाझे व परमबिर सिंग यांच्या मागे अदृष्य हात कोणाचा आहे याची सर्वांनाच माहीती असल्याचा सूचक इशारा केला.परमबिर सिंग यांनी तर एफिडेवीट दिले की माझ्याकडे कोणतेही पुरावे नाही फक्त ऐकीव माहितीवर आरोप केल्याचे त्यांनी कोर्टाला सांगितले असल्याचे देशमुखांनी सांगितले.

याशिवाय चांदीवाल आयोगासमोर देखील एकदाही साक्ष नोंदविण्यास परमबिर सिंग उपस्थित राहीले नसल्याचे ते म्हणाले.

गृहमंत्री सारख्या अतिशय महत्वाच्या पदावर असणा-या एका मंत्र्यांनाच महाराष्ट्राच्या इतिहासात पहील्यांदाज अश्‍याप्रकारे शंभर कोटीच्या खंडणीचा आरोप करीत अटक होते,या मागे न्यायमूर्ती लोया यांची केस रि-ओपन करण्याचे विधान विधी मंंंडळात केले होते हे कारण असावे का?या प्रश्‍नावर मात्र त्यांनी ‘मौन’बाळगले.

आज जामीनावर सुटले आहात पुढे निर्दोष सुटका होईल का?या प्रश्‍नावर देखील त्यांनी बोलणे टाळले.हे दोन्ही प्रश्‍न न्यायालयीन खटल्याशी संबधित असल्याने त्यांनी उत्तर दिले नसल्याचे त्यांच्या स्वीय सचिवांनी नंतर ‘सत्ताधीश’ला सांगितले.कारागृहात छळ झाला याच वेळी कारागृहात त्यांना दुखापत देखील झाली होती,याविषयी विचारले असता,याबाबत नंतर कधीतरी सांगील,असे देशमुख म्हणाले.

पत्र परिषदेनंतर त्यांनी त्यांच्याच घरा मागील रेल्वेच्या भव्य लॉनमध्ये कार्यकर्त्यांकडून सत्कार स्वीकारत त्यांना संबोधित केले.

……………………………….

Latest बातम्या