Homeनागपूर न्यूजमहीलांनी समाजाचा आदर्श व्हावा:काय म्हणतात संध्या कृष्णा खोपडे या आमदार पत्नी?

महीलांनी समाजाचा आदर्श व्हावा:काय म्हणतात संध्या कृष्णा खोपडे या आमदार पत्नी?

Advertisements
Advertisements

(जागतिक महिला दिन विशेष)

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. ८ मार्च २०२१: माझ्या लग्नाला ३० वर्ष पूर्ण झाले.१९९१ मध्ये लग्न झाले.हे लग्न नातेवाईकांच्या मार्फत जुळवून आणले होते.माझ्या मावशीने हे स्थळ सुचवले.अकोला शेगाव हेच माहेर,वडील मूळचे सावनेर येथील असले तरी नोकरीमुळे अकोल्यात स्थायिक झाले होते.माझे शिक्ष् ण हे अकोल्यातच झाले.आम्ही दोन भाऊ अाणि तीन बहीणी.मी सर्वात मोठी.त्यामुळे कुटुंबातील हे पहीलं लग्न होतं.
त्यावेळी कृष्णा खोपडे हे याच परिसरात शाहू दाल मिलजवळील लहानश्‍या घरात रहात होते.तो संपूर्ण भाग हा मुस्लिम बहूल होता मात्र मी लग्न करुन आले तेव्हा मला याच मुस्लिम कुटुंबियांकडूनही खूपच आपुलकी मिळाली.त्या घरात १५ वर्षे संसार केला.नागपूरातील रेशिम बाग येथील जैन कलार सभागृहात लग्न पार पडले.लग्ना पूर्वी फक्त एकदा कृष्णा खोपडे यांना भेटले.ते अतिशय अबोल मी भयंकर बोलघेवडी.सुरवातीला त्यांचा हा अतिशय अबोलपणा जड गेला मात्र हळूहळू सवय झाली.माझे शिक्ष् ण हे पदवीधर असून डी.एड करीत असतानाच लग्न झाले.

खोपडे कुटुंबियांचा व्यवसाय होता.पीसीएस ऑफ लाईफ सेंटर या नावाने हातठेला बनविण्याचा तो व्यवसाय होता.राजू ठेला वर्क्स,रोहीत ठेला वर्क्स या नावाने पिढीजात व्यवसाय आज ही दीर चालवतात.

लग्न झाले तेव्हा हे काँग्रेस पक्ष्ात होते,वयाच्या १५ व्या वर्षापासून ते काँग्रेसी विचारसरणीचे होते मात्र माझे लग्न झाले आणि ते भारतीय जनता पक्ष्ाच्या विचारसरणीने प्रभावित झाले आणि भाजपमध्ये आले.

मला राजकारणात मुळीच रस नाही,राजकारण म्हणजे नुसता ‘चिखल‘असे त्या सांगतात.तुम्हीच पाहता आहात ना?पूजा चव्हाण प्रकरण?धनंजय मुंढे प्रकरण?भारतीय संस्कृतीचा संस्कार त्यागून विदेशी संस्कार स्वीकारले जात आहे.कुठे आपल्या भारतातील सुनीता विलियम्स!झांशीची राणी!महिला म्हणून याच आज ही समाजाचा आदर्श आहेत.

मला ही आदर्श समाज घडविण्यासाठी शिक्ष्किा व्हाययं होतं.माझी आई,बहीण,मावशी आणि आत्या या देखील शिक्ष्ि का आहेत.पण लग्न झालं आणि १९९४ ला पहीला मुलगा झाला आणि १९९५ मध्ये लगेच दुसरा ही मूलगा जन्माला आला.मोठा मुलगा अभिलाष हा मॅकेनिकल इंजिनिअर आहे,धाकटा रोहीत त्याला वडीलांसारखं राजकारण आवडतं.दोघांनीही प्रेम विवाह केला.माझ्या दोन्ही सूना अभिलाषा आणि धाकटी सून चैताली याच माझ्या मुली झाल्या.मला मुलगी नसल्याचं शल्य होतं पण?सूना घरी आल्या आणि मुलींची आई होण्याची हौस ही फिटली.

संसाराविषयी सांगायचे झाले तर,सुखा नंतर दू:खं आणि दु:खा नंतर सुखं आमच्याही वाट्याला आलंच.तुकोबारायाच म्हणतात ना ‘सुख पाहता जवापडे दू:खं पर्वता एवढे’.हरीपाठ हा मुखोद्‌ गद आहे.मोठा मूलगा झाला तो क्ष् ण माझ्यासाठी अतिशय अनमोल होता.
आमदार झाल्यानंतर सहजीवनात काय फरक पडला?या बाबत सांगताना ‘पहीले पैसा नव्हता आता वेळ नसतो’असे संध्या खोपडे या हसून सांगतात.सकाळी ९.३० वा.निघून जातात ते रात्रीच घरीच येतात.कालच ७ मार्च रोजी त्यांचा ६० वा.वाढदिवस होता पण ते दिवसभर उपाशी होते.संध्याकाळी घरी आल्यावरच जेवले.आज खसखसची भाजी केली.खसखसची भाजी त्यांच्या खास आवडीची आहे.आमच्या घरी स्वयंपाकीण बाई नाही.त्यांना कुटुंबियांच्याच हातचा स्वयंपाक आवडतो.काल वाढदिवस असतानाही सायंकाळी ७.३० वा.त्यांचे औक्ष् ण केले!
आपले खासदार नितीन गडकरी यांचा वारसा हुबेहूब ते चालवतात.‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणावे आपूले’हीच तुकोबारायांची ओवी ते आयुष्यात ही जगतात.फूलांचा सुगंध हा मुठीत धरल्यानंतर ही दरवळतोच,तसंच त्यांचं आयुष्य आहे.समर्थ म्हणतात ना ‘मरावे तरी कीर्तीरुपे उरावे’त्यांनी पैसा नाही पण कीर्ती खूप कमावली,याचा अभिमान वाटतो.

(संध्या ताईंनी दारातील अंगणात अशी ‘कमळाची’काढलेली सुरेख रांगोळी)

त्यांचं लहानपण खूप संघर्षात गेलं म्हणून ही पिढी सुखी आहे.एका पिढीला सुखी करण्यासाठी आधीच्या पिढीला त्याग हा करावाच लागतो.मी जेव्हा लग्न करुन या कुटुंबात आले तेव्हा चार बहीणी आणि चार भाऊ असे भरलेपुरले हे कुटुंब होते फक्त एका बहीणीचे लग्न झाले होते.हेच घरात सर्वात मोठे.त्यामुळे वडीलांची सगळी जवाबदारी यांनी चोखपणे पार पाडली.

जीवनातील सर्वात सुखाचा क्ष् ण कोणता?असा प्रश्‍न विचारता हे जेव्हा उपमहापौर झाले तो,असे त्या क्ष् णाचाही विलंग न करता सांगतात.आमदार बनले तेव्हाही खूप आनंद झाला.दु:खाचा क्ष् ण याविषयी बोलताना दु:खंच दु:खे होती जिवनात ,आज ही मागे वळून बघितले की डोळ्यात आश्रू तरळतात.मात्र ’डर के आगे जीत है,स्माईल करो और शुरु हो जाओ’जो व्यवहार आपल्याला उचित वाटत नाही तो आपण ही इतरांशी करु नये.

जया अंगी मोठेपण तयाला यातना कठीण’असेच कृष्णा खोपडे यांचे आयुष्य आहे.काय राहून गेलं?असे विचारले असता आधी वाटायंच आपण काही तरी बनले पाहीजे,हेच ध्येय होतं पण मुले झाली आणि जगण्याला जणू ध्येयच मिळालं.त्यामुळे काहीच उणं राहीलं नाही.
महिला दिनी काय संदेश द्याल,यावर बोलताना ‘नो लाईफ विदाऊट वाईफ’असे सांगून संध्याताई अगदी खळखळून हसल्या.नवरा आणि बायको ही संसाराची दोन चाके आहेत,एक जरी बिघडला तरी संसाराचा रथ ओढल्या जाऊ शकत नाही.

आमचा संसार म्हणाल तर ‘जल बिना मछली’सारखा आहे.एकमेकांशिवाय राहू शकत नाही.विशेष म्हणजे त्यांचा अबोल स्वभाव असल्यामुळे तसे ही ते बाहेरचे तानतणाव घरी आणत नाही.मी मात्र सतत बोलतच असते आणि ते एेकत असतात.त्यांना ही आता सवय झाली आहे ऐकायची,असे सांगून पुन्हा एकदा मोठ्याने संध्याताई हसतात.

(जागतिक महिला दिनी ’सत्ताधीश’ने पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या पत्नी संध्या खोपडे यांची घेतलेली ही खास मुलाखत खास आपल्या लाखो वाचकांसाठी)

Latest बातम्या