Homeनागपूर न्यूजमहाराष्ट्रात फडणवीसांचा हिंदू कार्ड निकामी:अतुल लोंढे

महाराष्ट्रात फडणवीसांचा हिंदू कार्ड निकामी:अतुल लोंढे

Advertisements

हिंदूंना भिती दाखवून देशातील सत्ता कायम ठेवण्याची भाजपची रणनीती:अतुल लोंढे

मुंबई, दि. २१ एप्रिल २०२२: देशावर ७०० वर्ष मुस्लिमांनी राज्य केले तर १५० वर्ष इंग्रजांनी राज्य केले. या राजवटीत हिंदूंना काही धोका नव्हता आणि आजही नाही. परंतु विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसांकडून हिंदूंना धोका असल्याची जी आवई उठवली जात आहे त्या मागील ‘मी पुन्हा कधीही सत्तेत येऊ शकणार नाही‘ हा खरा धोका त्यांच्यासाठी आहे, असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी लगावला आहे.हिंदूंना भीती दाखवून देशातील सत्ता भारतीय जनता पक्षाने कायम ठेवली असली तरी महाराष्ट्रात फडणवीसांचा हिंदू कार्ड निकामी ठरणार आहे,असे प्रत्यूत्तर लोंढे यांनी दिले.

देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पक्षाचा समाचार घेताना अतुल लोंढे म्हणाले की, सनातनी म्हणता, धर्म धोक्यात आहे असेही म्हणता परंतु वस्तुस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात भाजपाची पुन्हा सत्ता येऊ शकत नाही, देशातील सत्ता हिंदूंना भीती दाखवल्याशिवाय कायम राहू शकत नाही. अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांना वाटते की, ‘मी पुन्हा येईन,’ पण हिंदूंची मते काही भाजपाला मिळत नाहीत आणि हिंदूंच्या मतांशिवाय पुन्हा सत्तेत कसे येणार? हीच खरी भिती आहे, असे लोंढे म्हणाले

Latest बातम्या