Homeनागपूर न्यूजभारनियमाविरुद्ध भाजपतर्फे उद्या संविधान चौकात ‘कंदील आंदोलन’

भारनियमाविरुद्ध भाजपतर्फे उद्या संविधान चौकात ‘कंदील आंदोलन’

Advertisements

नागपूर,ता.२२ एप्रिल २०२२: महाविकासआघाडी सरकरारतर्फे सध्या संपूर्ण राज्यातच भारनियमन सुरु झाले आहे.ऐन एप्रिल महिन्यात सूर्य डोक्यावर तळपलेला असताना उर्जा मंत्र्यांनी ग्राहक,शेतकरी,उद्योजक,विद्यार्थी,रुग्ण आदी समाजातील सर्वच घटकांना भयंकर अडचणीत आणले असून भारनियमन तसेच ग्राहकांकडून अवैधरित्या अनामत रक्कम गोळा करण्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे रविवार दिनांक २३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता संविधान चौकात ‘कंदील’आंदोलन करण्यात येणार आहे.

नुकतेच माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी महाविकासआघाडी सरकार भारनियमाच्या नावाखाली भ्रष्टाचार करीत असल्याचा अारोप पत्र परिषदेत केला होता.ग्राहकांकडून अनामत रक्कम जमा करने म्हणजे आधीच करोनाने पिचलेल्या जनसामान्यांवर आर्थिक भुर्दंड लादण्याचा आरोप त्यांनी केला होता.कृत्रिम वीजटंचाई म्हणजे ग्राहकांना लुबाडण्याचा डाव असल्याचा आरोप करीत राज्यातील वीजटंचाईच्या समस्येला राज्य सरकारच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील अनेक भागात सहा ते आठ तासांचे भारनियमन सुरु आहे.एकीकडे ग्राहकांना वीज पुरविली जात नाही दुसरीकडे त्यांच्याचकडून दुप्पट अनामत रक्कम वसूल करुन त्यांच्या खिशाला कात्री लावल्या जात आहे.वीज ग्राहकांकडून ही सक्तीची वसुली त्वरित थांबवण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली असून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा बावणकुळे यांनी दिला होता.

एकीकडे शासकीय कार्यालयांकडे हजारो कोटींची थकबाकी असताना सामान्य वीज ग्राहकांकडून सक्तीची वसुली व वीज कापण्यापर्यंत उर्जा मंत्र्यांची मजल गेली आहे.ऐन उन्हाळ्यात सक्तीने वीजनिर्मिती संयंत्रे बंद ठेवण्यात आली असून राज्याचे वीज व्यस्थापनच कोलमडले आहे.हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्‍न यामुळे निर्माण झाला आहे.ठाकरे सरकार उर्फ वसुली सरकारविरुद्ध भाजपचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करणार असल्याचे बावणकुळे यांनी सांगितले.

आजच्या स्थितीत राज्यातील सुमारे २७ वीजनिर्मिती संयंत्रे बंद आणि काही जेमतेम चालवली जात आहे.मुळात ज्या वेळी वीजेची मागणी कमी होती त्याचवेळी या संयंत्रांची देखभाल दुरुस्ती करने गरजेचे होते परंतु तेव्हा आघाडी सरकार निष्क्रिय राहीली आणि ऐन उन्हाळ्यात राज्यातील जनतेला भाजून काढणा-या उन्हाच्या व उकाड्याच्या हवाली या नतद्रष्ट सरकारने केले,असा घणाघात त्यांनी केला.सरकारच्या बेशिस्त कारभारामुळे वीज मंडळाचा आर्थिक कारभार ढासळला असून त्याला आळा घालण्यासाठी अभ्यास गट नेमण्याची सूचना राज्य वीज नियामक आयोगाने केली होती मात्र चार महिने उलटल्यावरही राज्य सरकारने अभ्यास गटाची नियुक्तीच केली नाही.यातून ठाकरे सरकाररचा वीज मंडळ मोडीत काढण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न स्पष्ट होत असल्याचा आरोप बावणकुळे यांनी केला.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारने सत्तेवर असताना भारनियमनमुक्त महाराष्ट्र केला होता मात्र आघाडी सरकारने पुन्हा वीजटंचाई लादून राज्याच्या विकासाला खिळ बसवली असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्य सरकारने कोळसा टंचाईचे खापर केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो चांगलाच फसला आहे.खासगी क्षेत्रांकडून वीज खरेदीच्या दरावर केंद्रानेच अंकूश लावल्याने आघाडी सरकारमधील हितसंबीधातंची चांगलीच कोंडी झाली असून दलालांच्या टक्केवारीच्या राजकारणात राज्यातील जनता मात्र होरपळत असल्याचा आरोप त्यांनी केला.त्यामुळेच कृत्रिम वीज टंचाई निर्माण करुन जनतेला वीजसंकटात आघाडी सरकारने ढकलले.

राज्य महसूल विभागाने तातडीने थकबाकीची रक्कम वीज मंडळाला द्यावी व वीज ग्राहकांची वाढीव सुरक्षा ठेवीतून सुटका करावी राज्याला भारनियमनमुक्त करावे इ.मागण्यांसाठी  संविधान चौकात रविवारी सायंकाळी आंदोलनाची भूमिका भाजपने घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलनात शहर अध्यक्ष प्रवीण दटके, जिलाध्यक्ष अरविंद गजभिये,राज्यसभा खासदार डाॅ. विकास महात्मे,आमदार कृष्णा खोपड़े,विकास कुंभारे,मोहन मते, रामदास आंबटकर,समीर मेघे,टेकचंद सावरकर यांच्या नेतृत्वात माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार सुधाकर देशमुख,गिरिश व्यास, अनिल सोले,सुधाकर कोहळे,प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, माजी महापौर संदीप जोशी,
मंडल अध्यक्ष देवेन दस्तुरे,किशोर वानखेडे,संजय चौधरी,संजय अवचट,किशोर पलांदुरकर,विनोद कन्हेरे,प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम,अशोक मेंढे,संदीप जाधव,राजेश हातीबेड,अर्चना डेहनकर,निता ठाकरे,शहर महमंत्री संजय ,बाल्या बोरकर,राम आंबुळकर,सुनील मित्रा,भोजराज डुंबे,सर्व माजी नगरसेवक, राष्ट्रीय,प्रदेश,महानगर,मंडल,प्रभाग,बूथ स्तरावरील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत याशिवाय वीज ग्राहकांनी देखील आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपतर्फे करण्यात आले असल्याची माहिती पॅनल प्रवक्ते चंदन गोस्वामी यांनी दिली.

Latest बातम्या