
वीर सावरकर व संघावर केलेल्या वक्तव्याचा केला तीव्र निषेध
नागपूर,ता.९ ऑक्टोबर २०२२: भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रीस स्वयंसेवक संघ(आरएसएस)इंग्रजांच्या पाठीशी होता आणि हिंदूत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटीशांकडून मानधन घेतले,असे अतिशय वादग्रस्त विधान काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी केले,त्यांच्या या विधानाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले.नागपूरात देखील शंकरनगर चौक येथे भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगरातर्फे राहुल गांधींचा तीव्र निषेध करण्यात आला.
आपल्या ‘भारत जोडो पदयात्रे’च्या ३१ व्या दिवशी शनिवारी ता.८ ऑक्टोबर रोजी तुरुवेकेरे येथे पत्रकार परिषदेत राहूल गांधी यांनी हे विधान केले.याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले.स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून मानधन घ्यायचे, संघाने ब्रिटिशांना मदत केली अश्या प्रकारची अतिशय चुकीची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. अश्या प्रकारे राहुल गांधी नेहमीच बरळत असतात. त्यांनी अश्या प्रकारचे चुकीचे वक्तव्य करणे त्वरित थांबवावे अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा येणा-या काळात यापेक्षा ही उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल,असा इशारा भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी- वखरे यांनी दिला.
आजचे आंदोलन प्रमुख्याने भाजपा शहर अध्यक्ष आ. प्रविण दटके, भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले यांच्या मार्गदर्शनात झाले.
आंदोलनाचे नेतृत्व भाजयुमो शहर महामंत्री सचिन करारे, दिपांशु लिंगायत यांनी केले. यावेळी भाजयुमो प्रदेश सदस्य रितेश राहाटे, मंडळ अध्यक्ष निलेश राऊत, पंकज सोनकर, कमलेश पांडे, पुस्कर पोशट्टीवार, इशान जैन, उदय मिश्रा, संदीपन शुक्ला, आशिष तिवारी, स्वप्नील खडगी, रोहित फुलसुंगे, दिपेश यादव, वरुण गजबिये, अनिकेत ढोले, अजय मेश्राम, सौरव साहू, अकिलेश ठाकूर, पिंटू पटेल, गोविंदा काटेकर, हर्षल वाडेकर, अभिषेक नागपुरे, सचिन किराड, अमित कोठारी, मयूर तपासे, शंकर विश्वकर्मा प्रामुख्याने उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा