Homeराजकारणभाजप सरकार स्थापनेचा दावा करणार नाही:चंद्रकांत पाटील

भाजप सरकार स्थापनेचा दावा करणार नाही:चंद्रकांत पाटील

नागपूर: आज दिवसभर वेगाने घडलेल्या घडामोडीत सायंकाळी महत्वाचे घटनाक्रम घडले व शेवटी भारतीय जनता पक्ष्ाचे प्रदेशाध्यक्ष् चंद्रकांत पाटील यांनी भाजप सरकार सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली. काल राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी भाजपला राज्यातील सर्वात मोठा पक्ष् म्हणून सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते तसेच ११ तारखेच्या सायंकाळी ८ वाजेपर्यंत बहूमताचा आकडा सादर करण्यास सांगितले होते.

रविवारी दिवसभर पार पडलेल्या भाजपच्या कोअर कमेटीच्या बैठकीत पक्ष्ातील शीर्षस्थ नेत्यांंमध्ये खलबते सुरु होती. सकाळी बैठक झाल्यानंतर पुन्हा सायंकाळी ४ वा. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात कोअर कमेटीची बैठक पार पडली. बैठकीला दिल्लीतून राष्ट्रीय अध्यक्ष् अमित शहा यांनी देखील संबोधित केल्याची चर्चा आहे. बहूमत नसल्यामुळे सरकार स्थापनेचा दावा करु नये,असा निर्णय बैठकीत झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना बैठकीतील हा निर्णय राजभवनात जाऊन कळवला.यावेळी त्यांच्यासोबत चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवर,गिरीश महाजन,विनोद तावडे,पंकजा मुंडे आदी नेते होते.

राजभवनातून बाहेर आल्यानंतर माध्यमांना संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात राज्यातील विधान सभेची निवडणूक ही भाजप,शिवसेना,रिपाई, रासप, शिवसंग्राम,रयत या महायुतीने लढवली होती, या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने सत्ता स्थापनेसाठी भरघोस जनादेश दिला. त्यामुळे काल राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. आम्ही निवडणूक महायुती म्हणून लढलो. जनादेश हा महायुतीला मिळाला आहे. मात्र शिवसेना सरकार स्थापन करु इच्छित नाही.

जनादेशाचा अनादर करुन, जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान करुन शिवसेना जर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत सरकार स्थापन करु इच्छिते तर आमच्या त्यांना ‘शुभेच्छा’आहेत! राज्यपालांकडे भाजपने सत्ता स्थापनेच्या दाव्यास नकार दिला असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

Latest बातम्या