
दोनशे पदाधिकारी महीनाभर गाव मोहीमेवर
नागपूर,ता.२३ नोव्हेंबर : प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेनुसार ‘गाव तिथे भाजपा ’अभियाना अंतर्गत गाव समीतीची रचना पुर्ण करण्यासाठी जिल्हयातील २०० पदाधिका-यांना जिल्हयातील ७७० ग्राम पंचायत व त्या अंर्तगतच्या सर्व लहान मोठया १५६६ गावांची जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक सुधाकर कोहळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
हे सर्व पदाधिकारी महीनाभर गाव मोहीमेवर असणार आहेत. आज पासुन अभियानाला सुरवात करण्यात येत असुन २४ डिसेंबर २०२३ पर्यत हे अभियान सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्रदधेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचीत्य साधुन गाव तिथे भाजपा अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे.
गाव तिथे भाजपा अभियान हे भाजपची पाळमुळं ग्रामिण भागात अधिक मजबुत करण्यासाठी तसेच ग्रामिण भागातील संघटन अधिक मजबुत करण्यासाठीचे अभियान असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हयातील एकुण २३८६ बुथसमीतीची रचना यापुर्वीच पुर्ण करण्यात आली, असुन संघटनेला अधिक बळ मिळावे यासाठी या अभियानाची आवशकता आहे.
या अभियांना अंतर्गत प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सावनेर तालुक्यातील चिचोली, पोटा चनकापुर व हिंगणा विधानसभेतील दवलामेटी या तिन ग्राम पंचायतींमध्ये बैठक घेवुन ग्राम पंचायत स्तरावर अघ्यक्ष व ग्राम समीतीची घोषणा करणार असल्याची माहिती कोहळे यांनी दिली.
जिल्हा अध्यक्ष या नात्याने सुधाकरराव कोहळे सावनेर तालुक्यातील केळवद,पाटणसावंगी,वाघोडा,तर कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी व धापेवाडा या ग्राम पंचायती व त्या अंतर्गत असलेल्या गावांमध्ये बैठकींच्या माध्यमातुन गाव समीतीची निवड करतील. .
प्रदेश ओबीसी मोर्चा प्रभारी व सह प्रवक्ते आशिष देशमुख यांना सावनेर तालुक्यातील दहेगाव रंगारी, पिपळा (डा.बं.), भानेगाव,वलनी,सिल्लेवाडा या ग्राम पंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे . रामटेक लोकसभा निवडणुक प्रमुख या नात्याने अरविंदजी गजभिये यांना उमरेड विधानसभा क्षेत्रातील बेला,सिर्सी,मांढळ,वेलतुर,नांद या ग्राम पंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे आमदार समीर मेघे यांना कामठी विधानसभा क्षेत्रातील कोराडी,भिलगाव,येरखेडा,रनाळा,वडोदा या ग्राम पंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे आमदार टेकचंद सावरकर यांना हिंगणा विधानसभा क्षेत्रातील गोधनी (रेल्वे),बोकारा,लाव्हा, सोनेगाव (निपानी), इसासनी या ग्राम पंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे
या अभियानात जिल्हयातील सर्व आमदार,माजी आमदार,जिल्हा पदाधिकारी,विवीध आघाडया,सेल मोर्चे यांचे पदाधिकारी मंडल स्तरावरील पदाधिकारी असे जवळपास २०० पदाधिका-यांची या अभियानासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
या अर्तगत संबधीत पदाधिकारी गावातील कार्यकर्त्याची मोठी बैठक घेतील या बैठकीत गाव समीती अध्यक्ष दोन महामंत्री,उपाध्यक्ष,एक महीला प्रतिनीधी, एक युवा प्रतीनिधी एक अनु.जाती जमाती प्रतिनीधी या सोबतच युवा मोर्चा अध्यक्ष व महामंत्री,महीला मोर्चा अध्यक्ष व महामंत्री अशी १३ सदस्यीय गाव समीतीची रचना आहे.,असे कोहळे यांनी सांगितले.
पत्रपरीषदेला जिल्हा अध्यक्ष सुधाकरराव कोहळे, लोकसभा निवडणुक प्रमुख अरविंद गजभिये, माजी आमदार सुधीर पारवे, श्रीकांत देशपांडे ,चरणसिंग ठाकुर,किशोर रेवतकर,अनिल निधान,आदर्श पटले, अजय बोढारे, उकेश चव्हाण, आशीष फुटाणे, रोहित पारवे, सह प्रसिध्दी प्रमुख कपिल आदमने उपस्थित होते.
………………

आमचे चॅनल subscribe करा