आघाडी सरकारच्या काळात प्रकल्प बाहेर गेले असल्याचा फडणवीसांचा आरोप चुकीचा
नागपूर,ता. ३१ ऑक्टोबर २०२२: राज्यात येऊ घातलेले प्रकल्प आमच्यामुळे राज्या बाहेर गेलेत असा गैरसमज पसरविण्याचे काम आघाडी सरकार करीत आहे मात्र,आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच प्रकल्प राज्या बाहेर गेलेत असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.तसे पुरावे त्यांनी आज सोमवारी मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिले.यावर १५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता मुंबईतीत मंत्रालयात फॉस्कॉनसंबधीची मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार का पडली होती?असा प्रश्न प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला.
फॉस्कॉन प्रकल्प महाराष्ट्रात येणार नसल्याची कबुली स्वत: तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनीच दिली होती,असे फडणवीस म्हणाले.महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या कार्यकाळात घडलेल्या घटनांमुळे महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी देशातील कोणतेही उद्योजक तयार नव्हते,आता त्या परिस्थितीवर मात करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत,असा खुलासा फडणवीस यांनी पत्र परिषदेत केला.
महाराष्ट्रात येऊ घातलेली रिफायनरी व त्याची तीन लाख कोटींची गुंतवणूक परत पाठवून आघाडी सरकारने महाराष्ट्राचे अतोनात नुकसान केले आणि आता तेच गुंतवणूक परत जात असल्याची ओरड करीत असल्याने याचे आश्चर्य वाटत असल्याचे फडणवीस म्हणाले.
यावर,आपण मुख्यमंत्री राहीला आहात आणि आता जबावदार उपमुख्यमंत्री आहात त्यामुळे तुम्हाला असे खोटे बोलणे शोभत नाही,असा घणाघात अतुल लोंढे यांनी केला.
या पूर्वी देखील पत्र परिषदेत मी उल्लेख केल्याप्रमाणे ,१५ जुलै रोजी मुंबईच्या मंत्रालयात दूपारी बारा वाजता जी बैठक झाली होती मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ती हाय पावर समिती आहे मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी ती कशासाठी घेतली होती?ती बैठक आणि त्या बैठकीतला वृतांत काय सूचित करतात?एवढं खोटं का बोलता आहात की महाविकास आघाडीसरकारच्या काळात प्रकल्प राज्या बाहेर गेलेत!
फॉस्कॉनचा प्रकल्प जर महाविकासआघाडी सरकारच्या काळात राज्या बाहेर गेला तर या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी,वीजेच्या सवलती,जमीनीच्या सवलती इत्यादी बाबतची बैठक मंत्रालयात तुमच्या कार्यकाळात का झाली?याचे उत्तर फडणवीसांनीच महाराष्ट्राच्या जनतेला द्यावे,असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले.

आमचे चॅनल subscribe करा