Homeनागपूर न्यूजफूटाळा: भरण टाकून काँग्रेसच्या नगरसेवकाने बांधला अनाधिकृत लॉन!(भाग-२)

फूटाळा: भरण टाकून काँग्रेसच्या नगरसेवकाने बांधला अनाधिकृत लॉन!(भाग-२)

Advertisements

(छायाचित्र-नगरसेवक कमलेश चाैधरी)

मॅटर कोर्टात: नगरसेवक कमलेश चौधरी यांचे स्पष्टीकरण

शासकीय जागेवर अतिक्रमण कराल आणि सांगाल मॅटर कोर्टात आहे हीच का काँग्रेसची लुटारु संस्कृती:ज्वाला धोटे यांचा सवाल

नागपूरच्या हेव्हीवेट नेत्याचे फूटाळातील अतिक्रमणाला संरक्ष् ण!

नागपूर,ता.१९ जुलै:‘सत्ताधीश’ने काल रविवार दि. १८ जुलै २०२१ रोजी नागपूर शहराचे वैभव असणा-या फूटाळा तलावाचे ‘प्राक्तन’आपल्या ‘सत्ताधीश ऑन द स्पॉट’विशेष बातमीत ठलकपणे अधोरेखित केले,ही बातमी व्हायरल झाल्यावर ‘सत्ताधीश’ला फूटाळा तलावावर शहरातील कोणकोणत्या पक्ष्ाचे कोणकोणते राजकारणी हे नैसर्गिक ‘बलात्कार’करीत आहेत याची पुराव्या सहीत माहिती प्राप्त झाली.यात प्रामुख्याने काँग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी यांनी कश्‍याप्रकारे गेल्या अनेक दशकांपासून वायुसेना नगरकडे जाणा-या रस्त्यालगत फूटाळा तलावात धरण टाकून लॉनचे निर्माणकार्य केले व वर्षाला २५ लाख रुपयांची कमाई करतात याचे पुरावे देण्यात आले.
‘सत्ताधीश’ने याबाबत कमलेश चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण अद्याप हायकोर्टात प्रलंबित असून याचा निकाल १९८४ पासून लागला नसल्याचे त्यांनी सांगितले!माजी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी कमलेश चौधरी यांचे फूटाळा तलावावरील अनाधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते याबाबत कलम ४६१ अन्वये त्यांना तशी नोटीस देखील देण्यात आली होती मात्र हे प्रकरण अद्याप हायकोर्टात प्रलंबित असल्याकारणाने जोपर्यंत हायकोर्ट हा लॉन व इतर खोल्यांचे बांधकाम अनाधिकृत ठरवित नाही तोपर्यंत मनपाला माझे बांधकाम तोडण्याचा कायदेशीर हक्क नसल्याचे कमलेश चौधरी यांनी ‘सत्ताधीश’ला सांगितले.

(छायाचित्र-काँग्रेसचे नगरसेवक कमलेश चाैधरी यांचा हाच तो फूटाळा तलावावरील डी.सी लॉन)

मनपाने असे केल्यास मी कलम ४५६ च्या अपीलमध्ये जाऊ शकतो,असे ते म्हणाले.या कलमातंर्गत मला अपीलमध्ये जाण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगून राज्य सरकार जोपर्यंत या अपीलावर निर्णय जाहीर करीत नाही तोपर्यंत मनपा या लॉनवर कोणतीही कारवाई करु शकत नाही,असे त्यांनी सांगितले.

याशिवाय माझ्याकडे फक्त दोनच म्हशी आहे.सत्ताधीशने व्हिडीयोमध्ये ज्या म्हशी फूटाळात आंघोळ करताना दाखवल्या त्या तेलंगखेडी हनुमानमंदिराच्या असल्याचे ते म्हणाले.त्यांच्या २ म्हशी कुठे आंघोळ करतात?हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीतच राहीला……!
माझे घर अद्याप टिनाचे असून ते ही माझ्या वडीलांच्या दिलीप चौधरी यांच्या काळातील असल्याचे त्यांनी सांगितले.वडीलोपार्जित घराचे थोडेफार मी बांधकाम केले बस एवढेच…..!माझ्या घराला कोणतीही सीमा बांधण्यात आली नसून संपूर्ण परिसर मोकळा आहे.सर्वोच्च न्यायालयाने माझे घर हे वैद्य मानले असून फक्त लॉनसंबधी प्रकरण हायकोर्टात सुरु असल्याचा खुलासा कमलेश चौधरी यांनी केला.

(छायाचित्र-ज्वाला धोटे)

शासकीय जागेवर अतिक्रमण करुन कोर्टात प्रकरण प्रलंबित असा खुलासा करणे हीच आहे का काँग्रेस पक्ष्ाची संस्कृती?ज्वाला धोटे यांचा संताप-

गुगल मॅप काढून बघितल्यास काँग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी यांनी फूटाळा तलावात भरण भरुन अनाधिकृतपणे लॉन बांधला आहे,हे स्पष्टपणे दिसेल.हा लॉन त्यांनी एका कंत्राटदाराला चालवायला दिला असून वर्षाकाठी त्यांना २५ लाखांची कमाई यातून होते,याचे माझ्याकडे ठोस पुरावे आहेत.सत्य हे कटू असले तरी सत्य हे सत्य असतं आणि सत्याला कोणीही दडवू शकत नाही.

याबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष् व पश्‍चिम नागपूरचे अामदार विकास ठाकरे यांच्याकडे विचारणा केली असता कारण हा प्रभाग त्यांच्या मतदारसंघात येतो त्यांनी शहरातील एका हेव्हीवेट नेत्याकडे बोट दाखवले……!

मनपा आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली असता त्यांनी देखील त्याच हेव्हीवेट नेत्याकडे बोट दाखवले…..!

पालकमंत्री यांच्याकडेही या अतिक्रमणाविषयी पाठपुरावा केला असता त्यांनी देखील त्याच हेव्हीवेट नेत्याकडे बोट दाखवले…..!काेणीही तोंड उघडायला तयार नाहीत.

जांबुवंतराव धोटे यांच्या मुलीला हे सर्व जनप्रतिनिधी व शासकीय अधिकारी हेव्हीवेट नेत्याचे कारण सांगून अतिक्रमण तोडू शकत नसल्याचे सांगतात याचा अर्थ काय?

हे पण वाचा…..

सत्ताधीश ऑन दी स्पॉट’’विकासाची गुंडागर्दी‘

वरुन दाखवायचे आम्ही विरोधी पक्ष् असून एकमेकांविरुद्ध लढतो,आतून सेटिंग करतात!एकमेकांच्या अतिक्रमणांना आश्रय नव्हे तर ‘राजाश्रय’देतात!हीच का काँग्रेसची संस्कृती!एकीकडे गोर गरीबांचे,हातावर पोट असणा-या हॉकर्सची लहान लहान दूकाने अतिक्रमण विभाग उधळून लावतात,दिव्यांगाना देखील सोडत नाही आणि काँग्रेसचाच एक नगरसेवक गेल्या अनेक दशकांपासून या शहराची सुंदर धरोहर असणा-या फूटाळा तलावात भरण भरुन अतिक्रमण करुन लाखो रुपये कमवत आहे त्याच्या अतिक्रमणाला धक्का देखील लावल्या जात नाही?

आधी सरकारी जागेवर अतिक्रमण कराल व नंतर सांगाल प्रकरण कोर्टात आहे,जनप्रतिनिधी असून हाच आदर्श नागपूरकर जनतेसमोर ठेवता का?स्वत:काळे कारनामे करता तेव्हा जनतेनेही ते केले तर स्वीकाराल का?

कोर्टात तर बलात्कारी,खूनी व भू-माफियाही जातात म्हणून ते गुन्हेगार नाही असं होतं का?कमलेश चौधरी यांचे वडील दिलीप चौधरी हे जांबुवंतराव धोटे यांचे अनुयायी होते मात्र १२ वर्षे खासदार पदावर राहून देखील धोटे हे एकमेव असे खासदार आहेत ज्यांच्या नावावर आजपर्यंत नागपूर शहरात एक स्वत:च्या मालकीचे झोपडी सुद्धा नाही!

बांगर साहेबांनी नोटीस दिली होती त्यामुळे कमलेश चौधरी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची चाटूकारिता केली यामागे त्यांचे अतिक्रमण साबूत राहवे हाच उद्देश्‍य होता.कमलेश चौधरी यांना मुंढेंच्या गुड फेथमध्ये यायचे होते त्यामुळे मनपा सभेत ते मुंढेंच्या बाजूने भरभरुन बोलायचे!

हेच कमलेश चौधरी भू-माफिया मुन्ना यादव व त्याचा भाऊ मनोज यादव यांच्यासोबत घनिष्ठ संबध ठेवतात असा धक्कादायक आरोप ज्वाला धोटे यांनी केला.

ज्या पक्ष्ाचे ते नगरसेवक आहेत त्याच पक्ष्ाशी गद्दारी करतात,शहराध्यक्ष् विकास ठाकरे यांच्याच विरोधात गेल्या विधानसभेच्या निवडणूकीत काम केले याचा अर्थ ते आतून भाजपच्या बाजूने हाेते का?असा संशय घेतला जातो,याचे काय उत्तर आहे त्यांच्याकडे?
वरुन पांढरे कपडे मात्र कर्म काळे त्यामुळेच कोळसा कितीही उगाळला तरी तो चंदन होऊ शकत नसल्याचा संताप ज्वाला धोटे यांनी व्यक्त केला.

कोणीही अश्‍या अतिक्रमणाविषयी तोंड उघडायला तयार नाहीत मात्र ज्वाला धोटे यांना ना कोणती निवडणूक लढवायची आहे ना कोणतेही पद मिळवायचे आहे.

हे प्रकरण खूप गंभीर आहे आणि आता या विरोधात आम्ही स्वत: हायकोर्टात लवकरच पीआयएल टाकणार आहोत.हत्तीचे दात खायचे काही आणि दाखवायचे काही असतात.एकेकाळी इंदौर शहरा नंतर नागपूर शहराला ‘सिटी ऑफ लेक‘नावाची ओळख होती मात्र अनेक तलावात अतिक्रमणाचे साम्राज्य उभारुन त्यांचा सत्यानाश करण्यात आला.हा देखील एक प्रकारचा मानवाने निसर्गासोबत केलेला बळजबरीचा बलात्कार नाही ठरत का……..?

पंजाबराव कृषि विद्यापीठाच्या अनेक जागांवर असे अतिक्रमण झाले आहे मात्र या विद्यापीठाचे काहीच धोरण समाेर येत नाही,काय कारण आहे?

माझा विरोध कमलेश चौधरीला नाही तर अश्‍या निसर्गाला ओरबडणा-या वृत्तीला आहे…..!हा तलाव हॅरिटेजमध्ये येतो.माझा प्रश्‍न प्रशासनाला,सरकारला,मनपा पदाधिका-यांना,न्याय व्यवस्थेला आहे.ते कोणाच्या बाजूने उभे आहेत?गाेर गरीबांची झोपडी भर पावसाळ्यात,उन्हाळ्यात अतिक्रमणाच्या नावावर तोडली जाते,त्यांच्याकडे कोर्टात जायला पैसे नाहीत,कमलेश चौधरी यांच्याकडे पैसे आहेत म्हणून ते कोर्टात लढत आहेत,कोर्टाने आतापर्यंत निर्णय दिला नाही याचा अर्थ त्यांना अनाधिकृत आणि अवैध कारगुजारी करण्याचा परवाना मिळतो का?

कोर्टात तर छोटा राजन,दाऊद इब्राहिम,छोटा शकील देखील जातात,न्यायाचा आसरा घेऊन चुकीच्या कर्मांचे समर्थन नाही करता येत.

स्वच्छ‘असोसिएशनची माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना साद-
शहरातील ‘स्वच्छ‘असोसिएशने फूटाळा तलाव वाचवण्यासाठी हायकोर्टात अनेक वर्षे न्यायालयीन लढा दिला होता.एवढंच नव्हे तर माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांना देखील त्यांच्याच नागपूर शहरातले नदी व तलाव वाचविण्यासाठी२९ फेब्रुवारी २०२० रोजी एक निवेदन दिले होते.या निवेदनात शहराचे नैसर्गिक वैभव असणा-या ११ नद्या व तलावांचे संपूर्ण ऑडिट जोडण्यात आले होते.

या ११ नद्या व तलावांपैकी फक्त उत्तर दिशेला वाहणारा गोडेवाडा धरण तेवढा सुरक्ष्ति असल्याचे नमूद आहे. हे धरण वनविभागाच्या अधीन येतं.तेलंगखेडीचा फूटाळा तलाव जे पश्‍चिम दिशेकडून पूर्वेकडे वाहतो तो तलाव सुरक्ष्ति नसल्याचे सांगण्यात आले.तो कश्‍याप्रकारे सुरक्ष्ति नाही याचे संपूर्ण कागदोपत्री पुरावे ही निवेदनात जोडण्यात आले.पांढराबोडी तलाव हा तर संपूर्णपणे बुजवण्यात आला असून बाजीप्रभू नगरखाली सध्या हा संपूर्ण तलाव गडप झाला आहे!

अंबाझरी तलाव सभोवतालील उद्याेगांच्या प्रदुषित पाण्याने संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. सोनेगाव तलाव आता एखाद्या तरणताळाच्या स्वरुपात आढळतो कारण सभोवताल अनेक ले-आऊट्सचे निर्माण कार्य झाले.

शहराच्या मध्यवर्ती भागात असणारा सक्करदरा तलाव हा देखील संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे,या तलावाचे देखील लहानश्‍या तरणतालामध्ये परिवर्तन झाले असून याचे कारण या तलावाच्या परिसरात अनेक ले-आऊट्सचे बांधकाम झाले आहे.
शुक्रवारी-जुम्मा तलाव हा देखील संपल्यात जमा आहे याचे कारण या तलावाच्या परिसरात झालेले अतिक्रमण,ले आऊट्सची निर्मिती आणि रेल्वे स्टेशन यामुळे या तलावाची वाताहत झालेली आहे.

लेंडी तलाव हा देखील नकाश्‍यात आता शोधावा लागतो याचे कारण या तलावाच्या सर्व बाजूंनी अनाधिकृत ले-आऊट्सची झालेली निर्मिती.
नाईक तलाव.ले आऊट्सच्या जंगलात शोधून ही सापडणार नाही.

नाग नदी.जी आता नाग नाल्यात परावर्तित झाली आहे.अंबाझरी नदीतील पाणी हे हे नाग नदीचे मुख्य स्त्रोत होते.अंबाझरीचेच मुख्य स्त्रोत अतिक्रमणाने गिळंकृत केले असल्याने नाग नदीमध्ये आता जे पाणी दिसतं ते या शहराचं सिवरेज आहे…..!
पिवळी नदी…ही देखील कधीचीच नाल्यामध्ये परिवर्तित झाली आहे.

नीरीने २०१७-१८ मध्येच शहरातील या ११ नद्या व तलावांचे सर्वेक्ष् ण करुन नागपूर महानगरपालिकेला अहवाल सोपवला होता.आज २०२१ साल सुरु आहे,काय झाले या अहवालाचे?

पंतप्रधान मोदी यांनी २०१४ साली जेव्हा भारत देशाची सत्ता सांभाळली तेव्हा त्यांचे हे जगप्रसिद्ध वाक्य होते ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’!
त्यांच्याच पक्ष्ाची सध्या गेल्या १५ वर्षांपासून नागपूर महानगरपालिकेत सत्ता आहे मात्र शहराच्या या नैसर्गिक व प्राकृतिक वैभवाचा जो सत्यानाश झाला आहे तो कधीही न भरुन निघणारा असून काय काँग्रेस काय भाजपा,हे सगळे एकाच माळ्याचे मणि असल्याचा त्रागा शहरातील पर्यावरणवादी व्यक्क करीत आहेत,अतिक्रमणाच्या बाबतीत ‘आतून‘सगळ्यांची ‘एकी’ असल्याची चर्चा ही फार जुनीच आहे……!

Latest बातम्या