

पेठे पुढाकार घेऊन अहीरकरांची नाराजी का दूर करत नाही?
कार्यकर्त्यांना पडला प्रश्न:पक्ष् कार्यालयातील बैठकीतही अहिरकर अनुपस्थित
डॉ.ममता खांडेकर
(Senior journalist)
नागपूर,ता. १६ जून: काल मंगळवार ता.१५ जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्ाची पक्ष् कार्यालय गणेशपेठ येथे सायंकाळी पावणे चार वाजता माजी गृहमंत्री व पक्ष्ाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली.ही बैठक मनपा निवडणूक व पक्ष् बळकटीनिमित्त आयोजित करण्यात आली होती,बैठकीचा विषय जरी ‘प क्ष् बळकटी’ असला तरी एवढ्या महत्वाच्या बैठकीत माजी शहराध्यक्ष् व नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष् अनिल अहीरकर हे अनुपस्थित होते!मंचावर पक्ष्ाच्या सर्वच तुल्यबळ नेत्यांचा जमावडा असताना अनिल अहीरकर यांच्या अनुपस्थितीने मात्र अनेक कार्यकर्ते हे अस्वस्थ झालेत,बैठकीनंतर नवनियुक्त शहराध्यक्ष् दुनेश्वर पेठे हे अनिल अहीरकर यांची नाराजी का दूर करीत नाही?अशी चर्चा होती.
शहराध्यक्ष् पदी नियुक्ती पत्र प्राप्त झाल्यानंतर दुनेश्वर पेठे यांनी नागपूरात आपली पहीलीच पत्र परिषद घेतली त्यातही अनिल अहीरकर हे अनुपस्थित होते, हे विशेष!पत्रकारांनी याबाबत पेठे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रश्न टोलवून लावला व ते वेगळ्या कामात असतील,तुम्ही यात गटतट शोधू नका,असा सल्लाही पत्रकार मंडळीला दिला मात्र सूत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे अहीरकर यांना पेठे यांनी दूरध्वनीवरुन निमंत्रण न देता,एका सामान्य कार्यकर्त्याने पेठे यांच्या सूचनेनुसार दूरध्वनी केला व पत्र परिषदेचे निमंत्रण दिले!
याचा अर्थ गेल्या कित्येक वर्षांपासून पेठे व अहीरकर यांच्यातील धगधगत असणारा ‘वैचारिक मतभेदांचा’विस्तव दोघांचीही पक्ष्ात अतिशय जवाबदारीच्या पदावर नियुक्ती होऊन देखील विझला नाही.पेठे यांनी स्वत: दूरध्वनीवरुन निमंत्रण न देता कार्यकर्त्याकरवी निमंत्रण देणे याचा अर्थ पेठे यांनाच अहीरकर यांची उपस्थिती पत्र परिषदेत टाळायची होती,ही त्यांची कृती कार्यकर्त्यांपर्यंतही अचूक पोहोचली.
पेठे यांच्या या कृतीवर नाराज होत अहीरकर यांनी अनिल देशमुख यांच्यासोबत रविभवनमध्ये पार पडलेल्या बैठकीत प्रमुख पदाधिका-यांच्या उपस्थितीत आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली असल्याची चर्चा आहे. देशमुख यांनी देखील‘ माझ्याही लक्ष्ात आलं’ अशी पुष्टि जोडली. यावेळी अहीरकर यांच्यासोबत एक माजी आमदार तसेच प्रमुख नेतेमंडळी ही उपस्थित होती.
काल पक्ष्ाच्या कार्यालयात पेठे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत झाडूनपूसून सर्वच नेत्यांनी मंचावरुन ’पक्ष् संघटना मजबूत करा,मनपा निवडणूक एकजुटीने लढा,गट-तट मतभेद विसरुन जा ‘चा सूर कार्यकर्त्यांसमोर आवळला मात्र नेत्यांच्या या मांदियाळीत शहरातील प्रमुख व्यक्तिच अनुपस्थित असल्याने अनेकांची खप्पामर्जी झाली.
‘
११ यूथ एक बूथ ‘ची चमू साकार करण्याची वलग्ना करणारी मंडळीच गटातटामुळे कार्यकर्त्यांमधली दरी सांधण्याचे प्रयत्न जोपर्यंत वरिष्ठ पातळीवरच करणार नाही तोपर्यंत ती ‘एकी’ खालपर्यंत कशी झिरपणार?व कृतीत केव्हा उतरणार?हा प्रश्न कार्यकर्त्यांना छळत होता.पेेठे शहराध्यक्ष् पदी नियुक्त होताच त्यांच्या या दुस-या उपक्रमात देखील अहीरकर यांची अनुपस्थिती बरेच काही सांगून गेली.
पक्ष्ाचे प्रदेशाध्यक्ष् व सार्वजनिक बांधकाम मंत्री जयंत पाटील यांनी शिर्डी,बुलढाणा इ. अनेक बैठकीत बूथ लेवलवर कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याची सूचना केली आहे.विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम-पीच असणारे शहर नागपूर व नागपूरात मनपामध्ये भाजप पक्ष्ाची गेल्या १५ वर्षांपासून असणारी अर्निबंध सत्ता या बाबतीत जयंत पाटील हे कमालीचे गंभीर आहेत.
नागपूरात राष्ट्रवादीत दोन गट आहेत हे मान्य करुन ही दोन्ही गटांना संतुष्ट करीत अहीरकर व पेठे यांना महत्वाचे पद देऊन महत्वाची जवाबदारी त्यामुळेच सोपवण्यात आली आहे.निवडणूकीच्या तोंडावर पाटील यांना कोणत्याही गटाला नाराज ठेवायचे नव्हते.
अहीरकर यांनी देखील प्रदेश उपाध्यक्ष् पदी नियुक्तीनंतर घेतलेल्या आपल्या पहील्याच पत्र परिषदेत पेठे यांचा नामोल्लेख न करता,सार्वजनिक जिवनात योग्य वर्तन असणा-या व्यक्तिलाच शहराध्यक्ष् पद देणे योग्य राहील यासाठी जयंत पाटील स्वत: नागपूरात येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतील असे आत्मविश्वासपूर्ण विधान केले होते.पेठे यांच्या शहराध्यक्ष् पदी नियुक्तीचा उघड उघडपणे त्यांचा विरोधच होता,याला कारणीभूत पेठे यांनी वेळोवेळी अहीरकर शहराध्यक्ष् पदी असताना त्यांच्या विरोधात केलेले बंड याची किनार तर होतीच,मात्र तोच कित्ता पेठे यांनी देखील आपल्या पहील्याच पत्र परिषदेत गिरवला व कार्यकर्त्यांसमोर एकीचा आदर्श न ठेवता,अहीरकर यांना पत्र परिषदेचे निमंत्रण स्वत: न देता एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून दिला!
कालच्या बैठकीत पेठे यांनी, अहीरकर यांचे शहराध्यक्ष् पदी असतानाचे पक्ष्ासाठी केलेले काम बघता थोडी माघार घेणे गरजेचे असल्याचा सूर खासगीत ऐकू आला.शहरातील १५१ बूथवर अहीरकर यांनी पक्ष्ाचे अस्तित्व निर्माण करण्यात महत्वाचा पुढाकार घेतला आहे तर पेठे यांना गेल्या १० वर्षांपासून मनपाच्या राजकारणाचा दांडगा अनुभव आहे,पेठे यांनी विधान सभेची देखील निवडणूक लढली आहे शिवाय सध्या मनपात ते एकमेव राष्ट्रवादीचे नगरसेवक असून गटनेतेही आहेत.
मनपाची निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली असताना व समोर भारतीय जनता पक्ष्ासारखा शिस्तबद्ध पक्ष् असताना मनपाची निवडणूक असे गटतट राखून नाहीच लढवता येत,जयंत पाटील यांनी शहरातील नेत्यांना येत्या मनपा निवडणूकीत किमान एवढी जागा मिळवा जेणेकरुन महापौर आपला राहील तसेच राष्ट्रवादी पक्ष्ाच्या सहभागाशिवाय सत्ता स्थापन होणार नाही,असा टार्गेट दिला असल्याचे बोलले जात आहे.
माजी आमदार राजेंद्र जैन पक्ष् निरीक्ष् क असून जयंत पाटील यांच्या जवळचे मानले जातात.प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे आणि शिंगणे यांच्यामाध्यमातून शहरातील पक्ष्ाच्या प्रत्येक घडामोडीवर जयंत पाटील यांचे जातीने लक्ष् आहे.
याच वर्षी पक्ष्ात प्रवेशकर्ते झालेले आभा पांडे व प्रशांत पवार या शहरातील दोन्ही मोठ्या नावाचा व कामाचा करिष्मा याचा देखील पक्ष्ाला मनपा निवडणूकीत फायदा करुन घ्यायचा आहे तर ‘एकमेकांचे तोंड ही ना पाहू शकणा-या’ पेठे आणि अहीरकर यांना आपापसात सगळे ‘मनभेद’मिटवून,एकमेकांशी पटवून घ्यावेच लागणार आहे. विशेष म्हणजे आभा पांडे व प्रशांत पवार हे दोन्ही नेते पेठे व अहीरकर या दोघांच्याही बैठकीला प्रामाणिकपणे व पक्ष्ाशी बांधिलकी म्हणून उपस्थिती दर्शवित आहेत!
पक्ष्ाच्या संदर्भात या पुढे ही अहीरकर तसेच पेठे यांच्या अनेक बैठका समोर असणार आहेत त्या बैठकांमध्ये तरी हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसतील अशी अपेक्ष्ा राष्ट्रवादीचा कार्यकर्त्या करीत आहे.सध्या सगळं नवीन-नवीन आहे,थोडा वेळ लागेल,वरच्या लेवलवर गुटबाजी संपुष्टात आली तर आणि तरच कार्यकर्तास्तरावर मनपा निवडणूकीत एकदिलाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लढू शकतील,असा देखील सूर कालच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांमध्ये ऐकू आला.
नेत्यांना ज्यांच्या जिवावर मनपा निवडणूक लढायची आहे त्या कार्यकर्त्यांची ‘दिल की बात’आता तरी हे दोन्ही नेते समजून घेतील का?

आमचे चॅनल subscribe करा