Homeनागपूर न्यूजपेटंट फेस्ट हे देखील इनोव्हेशन: फडणवीस

पेटंट फेस्ट हे देखील इनोव्हेशन: फडणवीस

पेटंट फेस्ट नंतर ‘नागपूर शार्क टँक’ हा कार्यक्रम घ्या :फडणवीसांचा सल्ला

– पेटंट फेस्टचा थाटात समारोप

नागपूर,१४ ऑगस्ट २०२३ : आजपर्यंत नागपूरात व्हिजन नेक्स्ट संस्थेच्या माध्यमातून अनेक महोत्सव साजरे झाले मात्र आज ज्या पेटंट फेस्टची सांगता झाली त्यातून अनेक हिरे सापडले आहेत,खूपदा असं होतं की आपल्या आजुबाजूला खूप लोकं खूप काही संशोधन करत असतात ज्याची आपल्याला माहिती नसते मात्र व्हिजन नेक्स्टच्या माध्यमातून पेटंट महोत्सव जाे साजरा झाला हा पेटंट फेस्ट देखील एक इनोव्हेशन असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ते सुरेश भट सभागृहात आयोजित पेटंट आणि आयडिया फेस्टच्या पुरस्कार समारोहात बोलत होते. यावेळी मंचावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा सदस्य आ. कृष्णा खोपडे, व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि माजी महापौर संदीप जोशी, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनचे सचिव मनोज चव्हाण आणि कोषाध्यक्ष डॉ. योगिता कस्तुरे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले,की आजचं युग हे युवा पिढीचं युग असून ते वेगवेगळ्याप्रकारे संधोशन करित असतात.आज देशात नव्या पिढीमुळे अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत.जगातल्या तिस-या क्रमांकाची स्टार्ट अप इको सिस्टिीम भारतात आहे.याची सुरवात संकल्पनेतून होत असते.‘ज्या संकल्पनेची वेळ आलेली असते तीच पेटेंटमध्ये परिवर्तित होत असते’.आज नवी इको सिस्टिम तयार झालेली पाहायला मिळते.विविध प्रयोग करुन सर्वसामान्य लोकांचे जीवन सुलभ झाले पाहिजे,या उद्देशातून खूप मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहेत.त्या सगळ्या नव्या संकल्पना पेटंट झाल्या पाहिजेत आणि त्यानंतर त्यांना व्यावसायिक आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचे स्वरूप देखील दिले पाहिजे, असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले.

जगातील तिसऱ्या क्रमांकाचे स्टार्टअप हब म्हणून भारताकडे पाहिले जाते. हल्दी घाटीची लढाई आणि अमेरिकेसोबतची ‘हळदी’च्या पेटंटची लढाई दोन्ही महत्वाचे आहेत.‘प्रोडक्ट‘ पेटंट आणि ‘प्रोसेस’ पेटंटमध्ये भारत देश हा अडकला होता.आयुर्वेदानुसार जवळपास पाच हजार वर्षांपासून आपण हळदीचे गुणकारी औषध म्हणून वापर करीत होतो.मात्र,अमेरिकेने हे त्याचे पेटंट असल्याचा दावा केला होता.त्यावेळी भारताचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी ती लढाई जिंकली होती.भारत या देशाला, औषधी गुणधर्म असलेली हळद याच्या विषयी पाच हजार वर्षांपासून केवळ ‘माहितीच ‘ नव्हते तर औषधी गुणधर्म म्हणून ती भारतात पाच हजार वर्षांपासून ‘वापरली’ देखील जात आहेे,हा दावा मान्य करण्यात आला व हळदीच्या पेटेंटची लढाई आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारत जिंकला असल्याची माहिती याप्रसंगी फडणवीस यांनी दिली.

ती लढाई जेव्हा आपण जिंकलो तेव्हा पासून आपल्याला पेटंटचं महत्व लक्षात आलं,असं ते म्हणाले.तेव्हापासून आपण प्रोडक्ट पेटंटकडून, प्रोसेस पेटंटकटे वळलो.आपण आज ज्यांचा सत्कार केला त्यापैकी एक असणारे डॉ.ढोबळे यांचे एकूण ५२ पेटंट आहेत.जोपर्यंत पेटंटचा अधिकार आपल्याकडे येत नाही तोपर्यंत त्या संकल्पनेवर कोणीही दावा करु शकतो,त्यामुळेच संकल्पनेचे पेटंट घ्या,जेव्हा पेटंट ‘स्केलेबल’ आणि ‘कमर्शियल व्हायब्रल’ करतो तेव्हाच आपण स्टार्ट अप करु शकतो,त्याशिवाय ती संकल्पना आजच्या जगात टिकू शकत नाही,असे फडणवीस यांनी सांगितले.

त्यामुळे व्हिजन नेक्स्टचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी पेटंट फेस्टच्या माध्यमातून जो हा मॉडल तयार केला, पेटंट फेस्टच्या यशस्वी आयोजनानंतर त्यांनी या कार्यक्रमाची पुढची आवृत्ती म्हणून ‘नागपूर शार्क टँक’ हा कार्यक्रम आयोजित करण्याचा सल्ला यावेळी जोशी यांना फडणवीसांनी दिला. इन्वेन्शन आणण्याकरिता ते आम्ही उद्योजकांसमोर सादर करु.यासाठी आम्ही सगळे मदत करु.आजचा काळ हा फक्त संकल्पनेतून वर्षभरात अब्जाधीश होण्याचा काळ आहे.पेटंटमध्ये ती पॉवर असल्याचे ते म्हणाले.

आज भारताची इको सिस्टम १०० च्या जवळपास आहे.आज देशात ९० हजार स्टार्ट अप्स आहेत.युनिकॉनची संख्या रोज १०० च्या वर आहे.आता देशाच्या आय टी हब असणा-या बंगलौर,हैदराबाद नव्हे तर देशातील त्या ९० हजार स्टार्ट अप्स पैकी १६००० स्टार्ट अप्स व १५ युनिकॉन एकट्या महाराष्ट्रातून आहेत,अशी माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.

सर्वात महत्वाचे म्हणजे स्केल करणारे हे संशोधक पुणे,मुंबई,हैदराबाद किवा बंगलौरसारख्या शहरातूनच नव्हे तर टीयर-२,टीयर -३ शहरातून आले.अगदी ग्रामीण भागातून देखील आहेत,कृषि क्षेत्रातील सर्वाधिक संशोधन पेटंटसाठी सादर झाले आहेत.अनेक शेतकरी मुलांनी शेतीतील अडचणी दूर करण्यासाठी संशोधन केली आहेत.स्पीड ऑफ टेबल ॲण्ड स्पीड ऑफ डेटा हे २१ साव्या शतकाची वैशिष्ठे असल्याचे फडणवीस म्हणाले.ग्लोबल सप्लाय चेनसाठी या दोन्ही गोष्टी महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.हॅसल फॉर मूव्हमेंट गुड्स,लेबर्ससाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावा लागत असतो.आज वेळ हाच अमूल्य झाला आहे.समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प आठ तासात आपला माल मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचवू शकणार आहेत. वेळ वाचविणे खूप महत्वाचे आहे. प्रवासाचा वेळ आणि माहितीचा वेग यांचे महत्व मोठे आहे. यांतून पैशांची बचत होते,असे फडणवीस म्हणाले.

आज अापण फाईव्ह-जी च्या एरामध्ये वावरत आहोत.फायबरचा उपयोग करुन सगळं काही साध्य करु शकतो.गाव पाड्यांमध्ये चांगले शिक्षण,आरोग्याच्या सुविधा पोहोचवू शकतो,हे सगळं व्हिजनमध्ये रुपांतरित होत आहेत.आजची पिढी खूप भाग्यवान आहे ज्यांच्या स्वपनांना ‘फाईव्ह -जी’चे पंख मिळाले आहेत. पंख असणाऱ्या तरुणाईच्या संकल्पनेच्या बळावरच आज आपले पंतप्रधान ‘६ जी’ सर्वप्रथम भारतात आणण्याबद्दल ठामपणे सांगतात. चॅट-जीपीटी सारख्या ए आय प्लॅटफॉर्म मुळे माहितीच्या जगात मोठी क्रांती झाली आहे. जगातील सर्व बुध्दीमत्तेचा सार घेऊन ते आपल्याला हवी असलेली माहिती क्षणात उपलब्ध करून देते. आज आपण एका खूपच इंटरेसटिंग जगात वावरत आहोत.चॅट जीटीपी आपल्याला संशोधनाची चोरी करण्यासोबतच संशोधनाची चोरी थांबविण्याकरिता अशी दोन्ही प्रकारची संधी उपलब्ध करुन देते,असे ते म्हणाले.

आज आर्टिफिशियल इंटलिजेंसचा काही लोक विरोध करतात.मात्र २००७ साली देखील काही लोकांनी मोबाईलच्या ज्ञानाल विरोध केला होता,हे विसरता येत नाही.लोकांच्या जीवनात eaj of living आणण्याचं आहे. नव्या संकल्पना आणि पेटंटस आदींना बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पुढाकार घेईल असे आश्‍वासन फडणवीस यांनी याप्रसंगी दिले.आयआयएम नागपूरमध्ये सेंट्रल ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंन्टलिजेंस सुरु करणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले.एका संशोधनानुसार जगभरातील २३ कोटी नोक-या जाणार असून २७ कोटी निर्माण होणार असल्याचे भाकीत केले आहे.त्यामुळे learn, Unlearn आणि Relearn या पद्धतीने आपल्याला पुढे जाण्याची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले.

याप्रसंगी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर म्हणाले,की Intellectual property rights मुळे नव्या संकल्पनांतून होणारा फायदा जगभरात पोहोचतो आहे अन्यथा अनेक संशोधन व संकल्पना या काही लोकांपुरती व काही देशांपुरतीच मर्यादित राहील्या असत्या. पेटंट ही संकल्पना आणि संशोधन यांना प्रोत्साहन देण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. नवे उद्योजक, तसेच अन्य क्षेत्रातील लोक यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा नवा प्रयत्न आपल्याला करायला हवा. या विषयात कायदा सुध्दा बनला पाहिजे. नवनव्या संकल्पना आणि संशोधन यांना प्रोत्साहन दिलेच पाहिजे आणि ते अश्‍या या उपक्रमांद्वारेच साध्य होईल यात शंका नाही असे मत राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.नागपूर हे इनोव्हेशन कॅपिटल आहे,अनेक संशोधन भारतात घडले मात्र त्याचे श्रेय इतर देशांना किवा रिजनला गेले.येत्या काळात या उपक्रमाला अधिक प्रोत्साहन देऊ,याबाबत केंद्राला अधिकार आहे मात्र राज्य विधीमंडळात याविषयी विधेयक पारित करुन ते केंद्राला पाठवू,असे आश्‍वासन मी विधान सभा अध्यक्ष या नात्याने पेंटंटधारकांना देतो.आज राजकीय क्षेत्रात अनेक इनोव्हेशन व आयडीयाज देणारी व्यक्ती आपल्यात आहे,असे सांगून त्यांनी फडणवीस यांचे नाव न घेता मिश्‍किली केली.आज जे पेटंट पुरस्कारप्राप्त झाले आहेत त्याचा फायदा फक्त नागपूरलाच नव्हे तर संपूर्ण राज्यालाच होईल.संदीप जोशी व त्यांच्या चमूला देखील नार्वेकर यांनी वारंवार अश्‍याप्रकारे उपक्रम घेत रहा,अश्‍या शब्दात शुभेच्छा प्रदान केल्या.

तत्पूर्वी व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि माजी महापौर संदीप जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, पेटंट महोत्सवाची व्याप्ती इतकी होईल याचा विचार केला नव्हता. १२०० हून अधिक ४५० पेक्षा अधिक पेटंटस् आलेत. १०+ पेटंट नावावर असलेल्यांना जेव्हा शोधायला गेलो तेव्हा लक्षात आले की नागपूर शहरात एक व्यक्ती अशी आहे की ज्यांच्या नावावर ५२ पेटंट आहेत, त्याखालोखाल ३५ आहेत. आज बुद्धीमत्ता ज्यांच्याकडे आहे तीच व्यक्ती ख-या अर्थाने श्रीमंत असल्याचे संदीप जोशी म्हणाले.पेटंट महोत्सवात सहभागी झालेला एक तरुण मुलगा अतिशय साध्या कपड्यात ज्यूरीसमोर आला होता.त्याचे वडील हातमजूर आहेत.वॉटर कन्व्हेक्शनवर त्याने संकल्पना सादर केली तर एक छकुली नावाची मुलगी हिने तर सिमेंट रसत्यावरु पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठीची संकल्पना उत्कृष्टरित्या मांडली.या तरुणाईच्या पेटंटचा विचार उपमुख्यमंत्र्यांनी करावा अशी विनंती जोशी यांनी फडणवीस यांना केली. हा महोत्सव ‘रेप्लीका’संपूर्ण राज्यातच झाला पाहिजे,असे मत ही त्यांनी व्यक्त केले.नागपूर हे इन्वेन्शन कन्वेन्शन सेंटर व्हावं,नव्या संकल्पना पुढे येऊन नवे पेटंटधारक व्हावेत,त्यासाठी शासन आणि बुद्धीमत्ता दरम्यान पूल बांधणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.असे अनेक आहेत ज्यांना पेटंट महोत्सवाविषयी माहितीच नव्हते,नाहीतर ४४१ पेक्षा अधिक पेटंट नागपूरातून समोर आले असते.अनेकांना पेटंट बघायचं होतं मात्र चोर्यक्रम होण्याची भीती असल्याने ते गुप्तता पाळण्यात आली.याप्रसंगी त्यांनी पेटंट फेस्टच्या संपूर्ण उपक्रमाचा आढावा घेतला.

मुख्य कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘पेटंट फेस्ट’ या उपक्रमाला सहकार्य करण्याऱ्या सर्व प्रायोजकांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये नागपूर महानगर पालिका, विश्वराज एन्व्हायर्नमेंट प्रायव्हेट लिमिटेड, वर्ल्ड ट्रेंड सेन्टर – नागपूर, हॉटेल अशोका, दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था, विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड, झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अश्मी समूह, गोएलगंगा समूह, ‘एन्लायटन द सोल’ चे राजकुमार चावला, पीआर टाइम्सचे निखिलेश सावरकर व आय.टी.क्राफ्ट यांचा समावेश होता.

विशेष पुरस्कार डॉ. नितीन लाभसेटवार (जेष्ठ वैज्ञानिक, नीरी, नागपूर), ज्ञानेश्वर कांबळे (आयपीआर कन्सलटन्ट, टीसीएस) यांना सन्मानित करण्यात आले.

त्यानंतर मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते व्हिजन नेक्स्टच्या ‘पेटंट फेस्ट’ वरील सचित्र अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट ५ शैक्षणिक संस्थांना पुरस्कार-

यानंतर पुरस्कार प्रदान सोहळ्याला सुरुवात झाली. सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक दृष्टिकोन, नव्या संकल्पना आणि संशोधन यांकरिता ५ शैक्षणिक संस्थांना पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये दत्ता मेघे महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर, व्हीएसपीएम दंत महाविद्यालय, राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजनिअरिंग यांचा समावेश होता.

नागपूर शहरातील १०+ पेटंट्स धारकांना देखील येथे गौरवण्यात आले. यामध्ये डॉ. अजय गदीछा, डॉ. पद्मनाभ गाडगे, निलेश आवटे, अजिंक्य कोटावार, संजय ढोबळे, विजय उपाध्ये, डॉ. जी. के. आवारी, डॉ. एस. ए. तेलंग, डॉ. एस. डी. ठाकरे, संदीप खेडकर, डॉ. राहुल पेठे, डॉ. भालचंद्र हरदास, डॉ. संदीप जोशी, डॉ. लोकेश हेडा यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. अभय कोलते आणि चमू (इम्प्लांट प्लेसमेंट ड्राईव्ह), वेदांत पुल्लिवार (कॉम्पॅक्ट स्कूटर), शुभेंद्रसिंग ठाकूर (अर्ली डिटेक्शन ऑफ ओरल कॅन्सर), गणेश शेठ या अंड हरीश (बॅकवॉश+ क्लॉगिंग वॉटर), आकाश पोटे व मकरंद लोखंडे (सोलार कुकर), डॉक्टर नितीन लुटे व अंकुश (मायक्रोवेव्ह मेकॅनिकल फिबो), डॉक्टर अनिल ओंकार अप्रेटस ऑफ बेडरिडन, डॉक्टर अजित श्रीवास्तव (ग्राफाईन फ्रॉम वेस्ट बॅटरी), आलोक पाठक आणि सतीश कुलकर्णी केमिकल फ्री मेडिकल डिस्पोजेबल डॉक्टर आशिष बढिया आणि डॉक्टर नीती (फॉरेन्सिक बरण्ट डाटा एक्स्ट्रॅक्ट), डॉक्टर सचिन मरडागावणे, डॉक्टर रोशन साखरकर (फ्लेक्झिबल बर) यांना सर्वोत्कृष्ट पेटंट क विभागात तर डॉक्टर वृंदा कोलते (सुथर्स मटेरियल), डॉक्टर धनंजय तुटकाने (इंडक्शन मोटर फॉर फॅन), प्रज्वल ढोले (बायोडिग्रेडेबल वेस्ट ऑरेंज पिल्स), शुभम पाटील (युनिकनेक्ट), अमन पाटील आणि चमू (बियोंड ब्रेल मोबिलिटी जॅकेट), पवन कुमार (पोलाराइज्ड लाईट), शिरीष गवई (सक्शन बॅग दिस्पोजेबल), डॉ. अपूर्वा मिश्रा ( antiseptick dispensing surgical glow), देवयानी धोगोडे (३ d प्रिंटेड paws bone tissue), गरुडा-सार्थक, पिंकी गंगवाणी (English to language special translator), मिस आर्या डगवार (एअर pollution)

उपस्थित मान्यवर पाहुणे आणि बुद्धिवंत आणि दर्शकांचे आभार व्हिजन नेक्स्ट फाउंडेशनचे सचिव मनोज चव्हाण यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

……………………………

 

Latest बातम्या