Homeनागपूर न्यूजपर्यावरणवादी गिरीश गांधींचे वक्तव्य पूर्णत: ‘राजकीय’

पर्यावरणवादी गिरीश गांधींचे वक्तव्य पूर्णत: ‘राजकीय’

Advertisements

‘वनराई‘चे अध्यक्ष् पद सोडा नेत्यांची बाजू मांडा:पर्यावरणवाद्यांचा संताप

नागपूर,ता. २३ जून: नागपूरातील ‘अजनीवन’ येथे हाेणा-या इंटरमॉडेल स्टेशनचा प्रकल्प हा विकासाच्या दृष्टिने महत्वाचा असून त्यासाठी झाडे कापणे ही गरज अाणि अपरिहार्यता अाहे.पर्यावरण सरंक्ष् ण करताना विकास मागे राहणार नाही,याची दक्ष् ता घेणे भारतासारख्या देशात आवश्‍यक आहे,त्यामुळे अतिरेकी पर्यावरणवादातून अजनी येथील प्रकल्पाला नागरिकांनी विरोध करुन नये,अशी भूमिका वनराईचे प्रमुख व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.गिरीश गांधी मांडली,यावर शहरातील अनेक पर्यावरणवाद्यांनी आक्ष्ेप नोंदवला असून गिरीश गांधी यांनी ‘वनराई‘चे अध्यक्ष् पद सोडून नेत्यांची बाजू मांडावी,असा संताप व्यक्त केला आहे.

गिरीश गांधी यांचे हे वक्तव्य तद्दन ‘राजकीय‘असून शहरातील एका नेत्याला खूश करण्यासाठी असे विधान करण्यात आले असल्याची टिका करीत त्यांनी नेत्याची चाटूकारिता कायम ठेवावी आम्ही मात्र न्यायालयात अजनीवन प्रकल्पात तोडल्या जाणा-या ४० हजार जुनी झाडे वाचवण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू,असे ‘पर्यावरण प्रेरणा विदर्भच्या’ सदस्यांनी खास ‘सत्ताधीश’ला सांगितले.आमचा विरोध प्रकल्पाला नाही हे पर्यावरणवादी म्हणून घेणारे गिरीश गांधी यांना समजूनच घ्यायचे नव्हते म्हणूनच त्यांनी आम्हाला अतिरेकी पर्यावरणवादी ठरवले,आमचा विरोध प्रकल्पाच्या नावावर ४० हजार झाडे कापण्याला आहे कारण गिरीश गांधी यांनाही हे चांगल्याने माहिती आहे,एकदा ही झाडे मूळासकट कापण्यात आल्यानंतर त्यांचे कुठेही पुर्नरोपण होऊच शकत नाही.

मूळात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे जी पाचपट जास्त झाडे लावण्याचा दावा करतात ती लावायला नागपूरात जागा कुठे आहे?नागपूरात पहीला उड्डाणपूल बांधला तेव्हा ९० झाडे तोडली त्याच्या दहापट झाडे लावण्याचा आग्रह आम्ही धरला होता,असे गडकरी सांगतात,नागपूरात कोणत्या ठिकाणी ही दहा पट झाडे ‘उगवली?‘असा प्रश्‍न पर्यावरण प्रेरणेचे सदस्य करतात.शहराच्या मध्यभागातील अतिशय घनदाट असणा-या भागातून ४० हजार हिरवीगार झाडे नष्ट करतील आणि त्याच्या पाच पट झाडे ते कुठे लावतील?तर शहराच्या बाहेर पडीक जमीनीत!त्याचा नागपूरकरांना काय फायदा हाेणार आहे हे गिरीश गांधी सांगू शकतील का?

सिमेंट रसत्यांच्या मधोमध झाडे लावण्याच्या नावाखाली चक्क बोगनव्हिला ही गुलाबी फूलांची झाडे लावली जातात,अश्‍या वेलीतून किती प्रमाणात पर्यावरणाचे रक्ष् ण होते?हे स्वत:ला पर्यावरणवादी म्हणून घेणारे गिरीश गांधी सांगू शकतील का?असा सवाल संस्थेच्या सदस्यांनी उपस्थित केला.

गिरीश गांधी यांची भूमिका ही शहर,पर्यावरण किवा पर्यावरणवाद्यांच्या हिताची राहूच शकत नाही कारण त्यांचे स्वत:चे पूत्र भारतीय जनता पक्ष्ाचे नगरसेवक आहे.स्वत:गिरीश गांधी हे गडकरी यांच्या अतिशय जवळचे मानले जातात अश्‍यावेळी गिरीश गांधी यांच्याकडून, नागपूरकरांच्या हिताचा व गडकरी यांच्या प्रकल्पाच्या मधात येणा-या पर्यावरणाचा, सारासार विवेकबुद्धीतून विचार होईल अशी आशाच ठेवणे मूर्खपणाचे असल्याची टिका पर्यावरणवादी करतात.

नुकतीच गडकरी यांनी अजनीवन प्रकल्पाला होणारा वाढता विरोध बघता त्यांच्या निवासस्थानी पर्यावरणवाद्यांची बैठक घेतली,कोण होते या बैठकीत?गिरीश गांधी यांचे सुपुत्र,भाजप पर्यावरण सेलचे अध्यक्ष् स्वानंद सोनी,नीरीचे माजी संचालक सतीश वटे व ग्रीन व्हिजिलचे कौस्तुभ चॅटर्जी.बैठकीत वटे यांच्या अध्यक्ष् तेखाली एक समिती स्थापन करुन त्यात नीरीच्या शास्त्रज्ञांचे मत लक्ष्ात घेतले जाईल कोणती झाडे कापायची कोणती झाडे तोडली जाणार नाही मूळात शहरातील हॅव्हीवेट केंद्रिय मंत्र्यांसमोर या प्रकल्पामुळे होणारे पर्यावरणाचे अतोनात नुकसान व शेकडो प्रजातींच्या पशु-पक्ष्यांसह पुढील पिढींवर होणा-या कायमच्या दुष्परिणामांबाबत कोणी तोंड उघडले का?असा सवाल या संस्थेच्या सदस्यांनी केला.

हा प्रकल्प एकूण ४९६ एकरमध्ये हवाच कशाला?तुम्हाला इंटर मॉडेलच्या माध्यमातून रस्ता,रेल्वे,वायू आणि जल अश्‍या सर्व प्रकारच्या वाहतूकीला एकाच ठिकाणाशी जोडायचेच आहेत तर प्रकल्पातील मूळ नकाशाप्रमाणे हे इंटर मॉडेल फक्त ४६ एकरमध्ये होणार आहे तेवढ्याच पट्ट्यातील झाडे तोडली गेली पाहिजे मात्र उर्वरित ४०० एकरच्या वर जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हवी कशाला?पर्यावरणाची अपरिमित हानि करुन या सव्वा चारशे एकरच्या जागेत ‘कमर्शियल कॉम्पलेक्स‘असणार आहे,या कमर्शियल कॉम्पलेक्सची खरंच नागपूरकरांना गरज आहे का?

स्वत:गडकरी प्रकल्पाचे नवे डिझाइन येत्या दोन महिन्यात पूर्ण झाल्यानंतर लगेच प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील असे सांगून येत्या ३ वर्षात आगामी निवडणूकीसाठी मते मागावयास जाताना हा प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रयत्न असल्याचे उघडपणे सांगतात,याचा अर्थ पर्यावरणाची अपरिमित हानि ही ‘राजकीय मतांसाठी ’केली जात आहे का?असा सवाल संस्थेच्या सदस्या अनुसूया काळे यांनी केला.

गिरीश गांधी हे गडकरी यांची ‘रि’ओढत भारतवनचे जंगल सौंदयीकरणासाठी कापले जात असल्याने विरोध केला असल्याचे सांगतात. अजनीतील झाडे ही शहराच्या हितासाठी कापली जात असल्याचे सांगतात,संपूर्ण भावी पिढी ही या नुकसानातून कायमची होरपळून निघणार आहे,पर्यावरण हे पर्यावरण असतं.त्यात हिताचं व अहिताचं असं काही नसतं,एवढं ही कळत नसेल तर स्वत:ला नागपूर शहराच्या पर्यावरणाचे हितचिंतक समजणा-या गिरीश गांधीना एवढ्या गंभीर विषयात नाक खूपसायला नको होते,असा संताप व्यक्त केला जात आहे.त्यांचे मत नागपूरच्या हितमध्ये नाही तर नेत्यांची बाजू मांडण्यात असल्याची टिका करुन २०१७ मध्ये या प्रकल्पाचा डिपीआर तयार झाला व एवढ्या मोठ्या प्रमाणात नागपूरच्या मध्यभागी एवढा मोठा हरित पट्टाच नष्ट होणार असल्याचे माहिती असूनसुद्धा गिरीश गांधी यांच्या ‘वनराई’ने काय केले?गेल्या चार वर्षात महामार्ग प्राधिकरणाला वेळेवर झाडे लावण्यास जागरुक पर्यावरणवादी म्हणून बाध्य केले असते तर ती झाडे आज चार वर्षांची असती,अशी बोचरी टिका गिरीश गांधींवर पर्यावरणवाद्यांनी केली.

आम्हाला अतिरेकी पर्यावरणवादी म्हणून हिणवनारे गांधी यांनी लक्ष्ात घेतले पाहिजे,आमचा विरोध प्रकल्पाला नाहीच आहे मात्र आम्ही पुढच्या पिढीला काहीतरी देणे लागतो,मुके पशु-पक्ष्ी यांच्याप्रति आम्ही संवेदनशील आहोत,त्यांचा नैसर्गिक अधिवास या प्रकल्पामुळे कायमचा हिरावला जाणार आहे.मूळात पाच पट आणि दहा पट झाडे इतर ठिकाणी लावू हे जे ‘शब्दछल’ केले जातात त्यावरच नागपूरकर जनतेला विश्‍वास नसल्याचे पर्यावरणवादी सांगतात कारण आता पर्यंत महामेट्रो असो किवा उड्डाण पुले अश्‍या प्रकल्पासाठी जी शेकडो झाडे या शहरातील तोडण्यात आली ती नागपूर शहरात कुठेही प्रतिरोपण करण्यातच आली नाही किवा तसा प्रयत्न झालाच असला तरी हा प्रयोग अयशस्वी ठरला,असे ते सांगतात.

गिरीश गांधी यांचे वक्तव्य पर्यावरणवाद्यांच्या मोहिमेला धक्का:कौस्तुभ चॅटर्जी(अध्यक्ष्,ग्रीन व्हिजिल)
डॉ.गिरीश गांधी यांचे वक्तव्य हे शहरातील पर्यावरणवाद्यांच्या मोहिमेला धक्का देणारे आहे.पर्यावरणवाद्यांनी एकजूट होऊन शहराच्या पर्यावरणाच्या रक्ष् णासाठी कार्य केले पाहिजे,असे माझे वैयक्तिक मत आहे. गडकरी यांच्या बैठकीला मला देखील निमंत्रण होते.निमंत्रण असल्याने बैठकीला उपस्थित राहणे हे देखील तत्वाला धरुन होते मात्र अजनीवन प्रकल्पाबाबत मी एवढंच बोललो की नागपूरात कुठेही झाडांचे प्रतिरोपण हे यशस्वी झाले नाहीत.त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने या प्रकल्पासाठी वृक्ष तोड होणे हे नागपूरकरांच्या तसेच पशु-पक्ष्यांच्या हिताचे नाही.

पर्यावरणवाद्यांवर अतिरेकी पर्यावरणवादी किवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ‘विकासविरोधी‘असल्याचा ठपका ठेवला केला त्या विधानांशी मी सहमत नाही.माझं एवढंच मत आहे प्रकल्पधारकांनी व पर्यावरणवाद्यांनी मध्यम मार्ग काढावा.आम्हाला विकास ही हवा आहे आणि पर्यावरणाचे रक्ष् ण ही झाले पाहिजे.त्यामुळे अजनीवन इंटर मॉडल जे फक्त ४६ एकर जागेवर बनणार आहे तेवढीच वृक्ष् तोड करण्यात यावी,इतर बांधकामांची गरज हे पर्यावरणाचे नुकसान करुन व शहराच्या मध्य भागातील संपूर्ण हरित पट्टा नष्ट करुन निर्माण करण्याची गरज नाही.

आम्हाला इंटर मॉडेलची गरज आहे तेवढेच निर्माण झाले पाहिजे,कमर्शियल कॉम्पेलेक्सची गरज जरुरी नाही.या संपूर्ण प्रकल्पातून हजारो झाडे जी कापली जाणार आहे त्या मोबदल्यात पाच पट झाडे प्रतिरोपण करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा दावा हा सपशेल खोटा असून आतापर्यंत त्यांनी जे प्रकल्प हाती घेतले व ज्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वृक्ष् तोड झाली त्याचा ट्रॅक रेकॉड एवढा उत्साहवर्धक नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आज अजनीवन प्रकल्पाच्या विरोधात लढणारे पर्यावरणवादी हे स्वत:साठी लढत नसून येणा-या पिढीसाठी लढत असल्याने त्यांच्या उद्देश्‍यावर शंका उपस्थित करणे योग्य नाही.

महापौर यांचे आश्‍वासन दिशाभूल करण्यासाठीच-
शहराचे प्रथम नागरिक म्हणजे महापौर ज्यांच्यावर शहराची जवाबदारी निश्‍चित असते त्यांनीच या प्रकल्पाबाबत तोडलेले तारे हे अतिशय निंदनीय असल्याचे पर्यावरण प्रेरणाच्या अनुसूया काळे सांगतात.एका खासगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत महापौरांनी ‘अजनीवन‘या शब्दाचीच खिल्ली उडवत,अजनी हे वन कधीपासून झाले हेच कळत नसल्याचे सांगितले.वन तर ते असतात जिथे वनासोबतच प्राणी ही असतात,असे तारे त्यांनी तोडले.एकीकडे शहराचे हे प्रथम नागरिक शहरातील हरित क्ष्ेत्र वाढवण्यासाठी ठिकठिकाणी वृक्ष्ारोपणाचा कार्यक्रम घेतात.राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत ५.८५ कोटींचा निधी मिळाला असता अजून ३३ कोटींचे विविध प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची घोषणा करतात.

उद्यान,सोसायट्या,रस्ते,दूभाजक,उड्डाणपूलाखाली तसेच मोकळ्या जागांवर वृक्ष्ारोपण करुन नागपूरातील हरित क्ष्ेत्र वाढवण्यासाठी बैठका घेतात.शहरात ७५ ऑक्सिजन झोन तयार करण्यासाठी जागा शोधण्याचे निर्देश ही त्यांनी दिले.पोहरा नदी काठालगत पिंपळ,वड,चिंच,कडुलिंबाचे वृक्ष् लावा,बर्डी उड्डाणपुलाखाली वृक्ष्ारोपण करण्याचा सूचना ही त्यांनी दिल्या मात्र दूसरीकडे दुटप्पीपणाचे धोरण स्वीकारत त्यांचीच सत्ता असणा-या मनपातील उद्यान विभागाने अजनीवनाच्या पहील्या टप्प्यातील ४४.४ एकर मधील ४ हजारच्या वर झाडे कापण्यासंबधी जाहीरात प्रसिद्ध करतात,हा महापौरांचा दुटप्पीपणा नाही तर काय?

खासगी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत तर त्यांनी २०१७ मध्ये जेव्हा हा प्रकल्प मंजूर झाला तेव्हा कोविड कुठे होता?ऑक्सीजनचा प्रश्‍न कुठे होता?असे चमत्कारिक विधान केले असल्याचा संताप पर्यावरणवादी व्यक्त करीत आहे.प्राधिकरणाला प्रकल्पाच्या पहील्या टप्प्यातील ४४.४ एकर जागेवर केवळ १ हजार ९०० झाडे दिसली,मात्र महापालिकेच्या सहाय्याने जेव्हा सर्वेक्ष् ण करण्यात आले तेव्हा त्याच जागेत ६ हजार ९५३ झाडे आढळली.एकूण ४४६ एकरात मग किती झाडांची कत्तल होणार आहे,हे शहराच्या या प्रथम नागरिकांना माहिती नाही का?ते शहराचे महापौर आहेत की पक्ष्ाचे कि नेत्यांचे?असा संतप्त सवाल पर्यावरणवाद्यांनी महापौरांना केला आहे.

नागपूर सुधार प्रन्यासकडू घेतलेली साधी उद्याने ही नागपूर महानगरपालिकेला सांभाळता आली नाही ते आता मनपाच्या उद्यानांमध्ये अजनीवनच्या मोबदल्यात शेकडो झाडे लावण्याचे शब्दछल करीत आहे यावर शेबंडं पोर तरी विश्‍वास ठेवेल का?

नागरिकांना हवी असणारी सर्व संसाधने एकाच छताखाली या प्रकल्पात उपलब्ध होणार असल्याची वलग्ना करणारे महापौर आता करोना काळाचा बोध घेऊन त्या मॉल्समध्ये माणसाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सीजन सिलेंडरची उपलब्धता राहील का?असा धगधगता प्रश्‍न करतात.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रत्येक मुद्दाला पर्यावरणवाद्यांनी दिलेले मुद्देसूद उत्तर-

NHAI ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाला प्रतिसाद म्हणून, संदर्भ: NHAI/PIU-2 NGP/lMS/Trees/2021/287 दिनांक १२. ०६. २०२१ ज्यात IMS प्रकल्पाबाबत काल्पनिक व विखारी माहिती दिल्याबद्दल नागपूरचे नागरिक असलेल्या पर्यावरण कार्यकर्त्यांना तसेच माध्यमांना दोषी ठरविण्यात आले त्याबाबत वस्तुस्थिती दर्शविणारे काही मुद्दे खाली मांडले आहेत.

१) बिनबुडाचे, काल्पनिक, द्वेषपूर्ण, तथाकथित पर्यावरणवादी, विवेकहीन, दुष्ट हेतूने प्रेरित अशी काही शेलकी विशेषणे वापरून HNAI ने आमच्यावर दोषारोपण केले आहे.

आर्टिकल ५१-A (g), मधील म्हणण्यानुसार “ नैसर्गिक पर्यावरणाचा अविभाज्य भाग असलेली जंगले, नद्या, तलाव आणि जंगलीजिवांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आणि प्रत्येक सजीवांविषयी करुणा जोपासणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असले पाहिजे.” भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे असे आदर्श कल्याणकारी निर्माण करण्याकडे इशारा करतात. ह्याचे रचयिते दुसरे तिसरे कोणी नसून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आदरणीय  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होत. असे असुनही, नागपूरच्या हरितावरणाच्या संरक्षणासाठी तसेच असंख्य वृक्षांच्या कत्तलीविरोधात उभे ठाकणे, नागपूरच्या पर्यावरण रक्षणाविषयी बोलणे हे ‘तथाकथित पर्यावरणवाद्यांनी’ दुष्ट आणि द्वेषपूर्ण हेतूने प्रेरित, तथाकथित’ विकास आणि प्रगतीच्या विरोधात केलेले बंड आहे असे NHAI चे म्हणणे आहे.

आम्हाला येथे ह्या बाबीचा उल्लेख करणे सुसंगत वाटते की आम्ही नागपूरचे फक्त नागरिक, करदाते आणि मतदाते असून पर्यावरणवादी असल्याचा आमचा कोणताही दावा नाही किंवा कोणताही दुष्ट हेतू देखील नाही, नागपुरातील सर्व नागरिकांना (ह्यात संबंधित अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.) आणि सर्वांच्या पुढच्या पिढयांना, स्वच्छ आणि प्रदूषणविरहित पर्यावरण मिळावे एवढ्या किमान अपेक्षेव्यतिरिक्त ह्या प्रकल्पात आमची औद्योगिक किंवा मालमत्ताविषयक रुची  किंवा फायदा नाही, किंवा ह्या प्रकल्पाद्वारे पूर्ण होतील अशा कोणत्याही आर्थिक/ व्यक्तिगत महत्वाकांक्षा आम्हाला नाहीत.

२) काही ठळक तथ्ये:

i) IMS हे अनेक टप्प्यात चालणार आहे आणि ते फक्त पहिल्या टप्प्याएवढे मर्यादित नाही ह्या तथ्याविषयी- माहिती अधिकार आणि अनेक विश्वसनीय सूत्रांकडून नागरिकांनी गोळा केलेल्या अधिकृत दस्तऐवजातील माहितीनुसार हा IMS प्रकल्प एकूण ४४६ एकरांवर पसरलेला आहे. (संदर्भासाठी MOU जोडलेला आहे.) काही वृत्तमाध्यमांनी मिळविलेल्या विकासकामांच्या मास्टर प्लॅनमधून हे स्वच्छपणे निदर्शनास येते आहे की हा प्रकल्प चार टप्प्यांमध्ये (IMS-१, IMS-२, CBD-१, CBD-२) विभागला गेला असून सुमारे ४९० एकरांवर, ज्यात FCI गोदामांच्या मालकीची जमीन देखील अंतर्भूत आहे,  पसरलेला आहे. IMS-phase-१ ह्या चौरेचाळीस एकरांवरील प्रकल्पाच्या भोवताली होऊ घातलेल्या ह्या उपप्रकल्पांच्या बाबतीत संबंधित अधिकारी लपवाछपवी कां बरे करीत आहेत?

MOU च्या दुसऱ्या पानावरील मुद्दा क्रमांक ४ (दिनांक ६ मार्च २०१९, रेल्वे, RLDA आणि  NHAI ह्यांच्यात झालेला) ह्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘द इंटरमोडेल स्टेशन अ‍ॅट नागपूर’ (द “प्रोजेक्ट”) ज्यात प्रवासी, व्यावसायिक आणि संस्थात्मक सुविधांचा (जसे ऑफीस कॉम्प्लेक्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स,आणि हॉटेल) अंतर्भाव आहे, हा प्रकल्प अजनी रेल्वे स्टेशन आणि आजुबाजूच्या परिसरातील जमिनींवर योजनाबद्ध पद्धतीने उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

वर उल्लेख केलेल्या MOU मधील पान दोनवरील मुद्दा क्रमांक सहा मध्ये म्हटले आहे की, ‘हा  प्रकल्प एकूण ४४६ एकर जमिनीवर (“द प्रोजेक्ट एरिया”) दोन टप्प्यांमध्ये उभारण्याचे योजले आहे. ह्या MOU मधील परिशिष्ट A मध्ये निर्देशित केल्यानुसार ह्या प्रकल्पाचे (“द प्रोजेक्ट एरिया”) मालकत्व रेल्वे मंत्रालयाकडे (“द रेल्वे लँड”) आहे. फेज १ च्या अंतर्गत ४४. ४ एकर भूमीचा  वापर योजलेला असून तेथे IMS दळणवळणाच्या मूलभूत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच फेज २ मध्ये व्यावसायिक विकासाबरोबरच इतर पूरक सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे. ह्यासाठी रेल्वेला कामासाठी आवश्यक असलेली जमीन वगळता उरलेली संपादित जमीन वापरण्यात येणार आहे.

आम्ही ‘तथाकथित/ दुष्ट हेतूने प्रेरित पर्यावरणवादी’ किती सहजपणे संबंधितांचे हेतू वाचू शकलो आणि त्यांचे ‘उच्चशिक्षित’ आणि ‘जवाबदार’ अधिकारी त्यांचा स्वतःचा MOU नीट वाचून, समजून  घेण्यास का असमर्थ आहेत? की ते अद्यापही वस्तुस्थितीचा विपर्यास करीत आहेत की वस्तुस्थिती लपवित आहेत?

 ii) प्रकल्पग्रस्त झाडांच्या संख्येबाबत : ही वस्तुस्थिती आहे की जेथे एकूण ४४ एकर जागेत NHAI ने फक्त १९०० झाडे मोजली (IMS-१) त्याच ठिकाणी ‘तथाकथित/ दुष्ट हेतूने प्रेरित पर्यावरणवाद्यांच्या’ सततच्या आग्रहाने मनपा आणि NHAI  ह्यांनी सहसर्वेक्षण करून तेवढ्याच जागेत ६९५३ झाडे मोजली. एवढा प्रचंड आकाराचा प्रकल्प हाताळणाऱ्यांच्या कौशल्यांची, स्वच्छ मनांची आणि हेतूंची ही परीक्षाच नव्हे का?

वर उल्लेख केल्याप्रमाणे जर ४४ एकर जागेत ६९५३ झाडे (मनपा सर्वेक्षणानुसार) आहेत तर ४४६ एकरात ( ४४ च्या दहापट जागेत) किती झाडे असतील ज्यात सहज दृष्टीस पडणारी सेंट्रल जेलच्या जागेतील, राहते कॉलनी चौकाच्या कोपऱ्यातील, अजनीच्या रेल्वे कॉलनीतील, इत्यादी इत्यादी? आम्ही तथाकथित पर्यावरणवाद्यांनी प्रकल्पग्रस्त झाडांच्या संख्येबाबतच्या संदिग्धतेबद्दल पहिल्या दिवसापासून पाठपुरावा केला आहे. केवळ ४४ एकरांवरील झाडांपेक्षा अधिक झाडे धोक्यात आहेत हे आम्ही सांगत होतो. म्हणूनच ह्यावेळी प्रकल्प सुरु होण्याआधी लोक आणि अधिकारी ह्यांनी मिळून प्रकल्पाच्या संपूर्ण ४४६ एकरावरील झाडांची मोजणी करावी अशी विनंती आम्ही केली आहे. ज्यामुळे सत्य बाहेर येण्यास मदत होईल.

iii) वृक्षप्रत्यारोपण हे नागपुरात यशस्वी होऊ शकलेले नाही हे निरनिराळ्या (मनपा आणि इतर) अधिपत्याखाली राबविल्या गेलेल्या जुन्या उदाहरणावरून सिद्ध झाले आहे. सगळ्या झाडांचे प्रत्यारोपण होऊ शकत नाही हे देखील आम्ही अनुभवले आहे आणि प्रत्यारोपित झाडे जगण्याची शून्य शक्यता करदात्यांच्या पैशाची नासाडी करण्यास कारणीभूत होते.

iv) सुबाभूळ आणि बाभूळ संदर्भात- सुबाभूळ हे झाड शासनाने गुरांसाठी झटपट वाढणारा पौष्टिक चारा म्हणून खास बाहेरील देशातून जाणवले आहे हे संबंधित अधिकाऱ्यांना माहित असायला पाहिजे. भारत देशात पशुधनाची संख्या प्रचंड आहे. गोमातेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यावर सरकारचा भर आहे. अशा ह्या सुबाभळीला जैवविविधतेच्या दृष्टीने कवडीमोल मानणे हे सरकारच्या धोरणाला विरोध करणे आहे.

सर्वसामान्य जनतेला प्रकल्पग्रस्त झाडांच्या बाजूने बोलण्याबद्दल दुष्ट हेतूने प्रेरित, विवेकहीन घटक ठरवून हे संबंधित अधिकारी शांतीप्रिय समाजाला दडपत आहेत, बदनाम करीत आहेत, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाबद्दल बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी करीत आहेत आणि करदात्यांच्या म्हणजेच जनतेच्याच पैशाने हा प्रकल्प ढकलू पहात आहेत. जर सगळे आलबेल आहे तर हे अधिकारी एवढ्या खालच्या थराला जाऊन का वागत आहेत आणि ४४६ एकरांवरील झाडे मोजण्यासाठी आढेवेढे का घेत आहेत? पर्यावरण विभागाचा हिरवा कंदील मिळाविण्यासाठीच्या प्रक्रियेतून सुटण्यासाठी  कायद्यातील पळवाटा का शोधल्या जात आहेत?

आम्ही नागरिक तरीही प्रकल्पाच्या विरोधात नाहीच आहोत मुळी. आम्ही फक्त प्रकल्पाची जागा बदलण्याचा आग्रह धरत आहोत; तेदेखील मध्य आणि पूर्व नागपुरातील शेवटचा हिरवा तुकडा सुरक्षित राहावा म्हणून! कारण हीच शहराची फुफ्फुसेदेखील आहेत.

नियमितपणे कर भरणारा आणि आपापल्या प्रिय नेत्याला मत देणारा नागपुरातील एकही नागरिक विकास प्रकल्पाला विरोध करणार नाही. पण संबंधितांनी हेही लक्षात ठेवावे की ह्याच नागरिकांना त्यांच्यापासून लपवून ठेवल्या गेलेल्या तथ्यांच्या आधाराने त्यांच्या स्वतःच्या मताला आणि असंतोषाला लोकशाही पद्धतीने वाचा फोडण्याचा हक्क आहे. कायदे पाळणे आणि पर्यावरण राखणे ही ज्यांची कर्तव्ये आहेत त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत लोकांवर असभ्य भाषेत व्यक्तिगत दोषारोपण आणि चिखलफेक करून शहरातील लोकांना लक्ष्य करणे ह्यातून लोक आणि शासन ह्यांच्या आपसातील संबंधांच्या बाबतीत नवीन कायदा दृगोचर होतो आहे.

आम्ही नागरिक म्हणतो की आम्ही आमच्या महान राज्यघटनेने घालून दिलेल्या कायद्याचे पालन करू आणि नागपूरचे नाजूक पर्यावरण भविष्यात नष्ट होण्यापासून वाचविण्यासाठी, कोणत्याही व्यक्तिगत पातळीवरील निंदेला बळी न पडता काहीही करून सत्य लोकांसमोर आणण्याचा आमचा हक्क नक्की बजावू.

Latest बातम्या