Homeनागपूर न्यूजपत्नीवर बलात्कार!तिच्यातील ‘स्व’ची जागरुकता अन् न्यायालयाचा निकाल

पत्नीवर बलात्कार!तिच्यातील ‘स्व’ची जागरुकता अन् न्यायालयाचा निकाल

Advertisements

(मुक्तवेध)

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १ सप्टेंबर २०२१: तारखेविषयी सांगायचं तर २१ सा व्या शतकातल्या तिस-या दशकातील ही घटना आहे,घटनेविषयी सांगायचे तर नुकतेच पत्नीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी बळजबरीने प्रस्थापित केलेले लैंगिक संबध किवा लैंगिक कृती भारतीय कायद्याच्या दृष्टिने बलात्कार मानता येणार नाही,असा निर्वाळा छत्तीसगढ उच्च न्यायालयाने दिला ,स्त्रीविषयी सांगायचे झाले तर या प्रकरणातील ही पत्नी,पतीविरुद्ध बलात्काराचा खटला दाखल करुन न्यायालयाची पायरी चढली याचा अर्थ माणूस म्हणून तिच्यातला ‘स्व‘हा पूर्णपणे जागरुक असल्याची साक्ष् देणारा ठरला,न्यायालयाचा निकाल काहीही लागला असला तरी हे ही नसे थोडके,असे समाधान बुद्धिजीवी स्त्री वर्गाला लाभले आहे.

पतीने हुंड्यासाठी शोषण केले व बळजबरीने पती बलात्कार करीत असल्याची याचिका या महिलेने दाखल केली होती,यावर सुनावणी करताना न्या.एन.के.चंद्रवंशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.‘महिलेने वयाची १८ वर्षे पूर्ण केली असतील तर तिच्या पतीने तिच्याशी प्रस्थापित केलेले लैंगिक संबंध किंवा लैंगिक कृती ही बलात्कार ठरु शकत नाही,असे स्पष्ट करीत न्यायालयाने पतीविरुद्धचे बलात्काराचे कलम हटवले.महत्वाचे म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात पतीला बलात्काराच्या आरोपात दोषी मानले होते!

याचे तीव्र पडसाद ‘स्त्रीवादी’(स्त्रीवादी शब्द अनेकांचा रक्तदाब वाढवणारा ठरतो)नव्हे तर समाजातील‘बुद्धिजीवी’महिलांमध्ये उमटणे स्वाभाविक होते.आम्ही कोणत्या शतकात जगत आहोत?वल्कलं नेसणा-या आदिमानवाच्या?तेव्हा ना समाज होता,ना संस्कृती होती,ना नीती-नियम होते ना कायदा.त्यामुळे तिच्यातला ‘स्व’जागरुक होण्याचा प्रश्‍न ही निर्माण होत नाही पण?आजचे शतक कोणते आहे?शाहू,फुले,आंबेडकरांनी तसेच सावरकर,आगरकर ,टिळकांनी तत्कालीन शतकामध्ये भारतीय समाजामध्ये स्त्रीयांविषयीच्या अनेक कुप्रथा संपुष्टात आणण्यासाठी समाजाचा रोष पत्करला होता.त्यांचा खडतर संघर्ष हा आपल्याच समाजाच्या कल्याणासाठी आपल्याच समाजाच्या विरोधात होता,या संघर्षाला दोन शतक म्हणजे २०० वर्ष उलटून गेली तरी भारतीय कायद्याच्या दृष्टिने आज ही पत्नीमधला ‘स्व’याला कोणतेही सन्मानाचे स्थान देण्याचे धाडस आजच्या नव्या भारताची आव आण-या धुरीणांमध्ये नाही?

अर्थातच या निकालाचे दूरगामी परिणाम उमटणार असून ज्या महिला घर नावाच्या चार भिंतीत शारिरीक,मानसिक,भावनिक कोंडमारा सातत्याने सहन करीत आहेत त्यांच्या मनोबलावर हा एकप्रकारचा आघातच आहे.समाज,कायदे,धर्म हे आज ही तिच्यातील ‘स्व‘जपण्यास अपुरे पडत असताना न्यायालयात देखील तिच्या आत्मसन्मानाला योग्य न्याय मिळत नसल्याची वेदना खूप गहीरी ठरणार आहे.

लग्न‘नावाचे ‘संस्कार‘ (नव्हे ‘सोपस्कार’)पार पडताच तिच्या देहावर पती नावाच्या ‘पुरुषा’चा ताबा या देशातील धर्म,समाज आणि कायदा प्रस्थापित करतो आणि तो ताबा ती मरेपर्यंत असतो,झाेपडपट्टीपासून तर उच्चभ्रूच्या बेडरुमपर्यंत आज ही ती हतबुद्ध आहे कारण देव,ब्राम्हण,अग्निच्या साक्ष्ीने किवा काजी समोर किवा मठात एकदा ‘लग्न‘नावाचा सोपस्कार पाड पडला की ती अलिखित पद्तीने त्याची जागीर,इस्टेट,खासगी मालमत्ता होते,‘माणूस‘म्हणून ती मागे उरत नाही…..!आणि हे अनेक घरात घडतं…..जे..खूप भयानक आहे….!
धर्म,समाज तिला देवीची उपमा देतो पण असते ती शेवटी भोग्याच.तिच्या शरीरावर सर्वस्वी तिचा अधिकार आहे ही कल्पनाच आम्हाला आज ही मान्य नाही,माझी ईच्छा आहे तर मी तिला भोगणारच,ही आक्रमकता आम्ही कितीही उच्चविद्याभूषित झालो असलो तरी ‘गुणसूत्रातून’ बाद झाली नाही.

मूळात पुरुष किवा स्त्री म्हणून आपल्या पाल्यांना घडवल्याच का जातं?पुरुषांनाही अनेक संस्काराच्या वेदना होतातच,त्यांच्यावर देखील समाजाकडून उगीच अनेक गुणविशेष लादल्या जातात,तू पुरुष आहेस बाईसारखं का रडतोस?हातात बांगड्या भरल्यास का?तू पोशिंदा आहे घर तुलाच चालवावं लागेल पैसा कमावावाच लागेल,हा देखील पुरुषांवर एक प्रकारचा अन्यायच आहे,का नाही पुरुष धाय माेकळून रडू शकत?त्याला ही मन आहे वेदना आहेत,का त्याच्या व्यक्त होण्यावर इतकी बंधने लादल्या गेलीत?तिच्यातला ‘स्व‘ला ही हा अधिकार आहे,तिची ईच्छा मारझोड करणा-या,घाणेरडी शिवीगाळ करणा-या पतीसोबत संभाेगाची नसताना फक्त धर्म,समाज आणि कायद्याने त्याला नवरा म्हणून अधिकार दिला आहे म्हूणन तिच्या मनासोबतच तिच्या देहाचेही लचके तो आक्रमकतेने तोडणार?

पतीकडून होणार बलात्कार हा काही वर्षांपूर्वी भारतात देखील वादाचा विषय झाला होता,यावर कायदेशीर मत ही मोदी सरकारने मागितले होते मात्र…..समाजाचा रोष पतकरण्याचे सामर्थ्य ेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेफूले,आंबेडकरांमध्ये होतेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे ते आधूनिक भारतातील कोणत्याही नेत्याच्या अंगी शोधूनही सापडू शकले नाहीत,जगातील कोणत्याही स्त्रीला तिला मारझोड झाल्यावर पतीसोबत संभोग करण्याची ईच्छा होत नाही कारण संभोग ही फक्त देहाची क्रिया नसून मेंदूतील स्त्रावाशी त्याचा संबंध आहे आणि हे वैद्यकशास्त्रात शास्त्रोक्तरितीतील अभ्यासात नमूद आहे.आधी मेंदूमध्ये संभोगाची ईच्छा निर्माण होते,यामुळे आधी मेंदूतून स्त्राव स्त्रवतो यानंतर शरीरातील अवयव कृतीसाठी तयार होत असतात,ज्या पत्नीला नैसर्गिकरित्या अशी ईच्छाच निर्माण झाली नसेल तर पतीद्वारे केली गेलेली कृती ही संभोग नसून बलात्कारच ठरते,एवढं साधं आणि सोपं निसर्गाचं गणित आहे,पण?भारतीय कायद्यात ते उमटायला अजून निदान पुढचे १०० वर्षे तरी लागतील कारण हा बदल कायद्यात तेव्हाच उमटेल जेव्हा दिल्ली पासून तर गल्लीपर्यंतच्या पुरुष आणि स्त्रीयांची ‘मानसिकता’बदलेल.

या महिलेने पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन कूर्म गतीने का होईना,बदलकडे झेप घेतली आहे,बदल निश्‍चित घडेल या घटनेवरुन समाजातील बुद्धिजीवींमध्ये ही आशा पल्लवीत झाली आहे.बलात्कार जेव्हा बाहेरच्या,ओळखीच्या किवा नातेवाईकाच्या किवा अनोळखी पुरुषांकडून घडतात तेव्हा तो कायदेशीर गुन्हा मानला जातो मात्र आपल्याच सहजीवनाचा भागीदार असणा-या पुरुषाकडून बलात्काराची वेदना ही त्यापेक्ष्ाही कितीतरी भयंकर असते कारण ती फक्त देहाचवर नसते तर तिच्या आत्मसन्मानवार केलेला बलात्कार असतो, हे भारतीय कायद्यातील कलमांना समजायला निश्‍चितच वेळ लागेल,या बदलाची गती कूर्म असली तरी या घटनेतून एक सकारात्मक संदेश मात्र गेला आहे.

अश्‍या याचिकांच्या अत्यल्प प्रमाणाचे कारण तिचं आत्मनिर्भर नसणं हेच आहे.नाही तर ‘घरोघरी मातीच्या चुली’हीच म्हण खरी ठरली असती.आजही पत्नी म्हणून, सहचारिणी म्हणून तीची जागा पायपाेसाचीच असते,अनेक घरात ती पायातील वाहण असते,तिला टाचेखालीच ठेवलं पाहिजे या पुरुषी आक्रमकेखाली ती ही जगणं स्वीकारत असते,काही घरात ती पतीसोबत ‘संभाेग’या कृतीला त्यागाची मखलाशी लावते आणि फसव्या भावनेने सुखावते पण?काही घरात ती तिच्या देहाला उपभोग्य न मानता बरोबरीचा सन्मान मागते आणि इथेच ती ठेचली जाते,भारतीय कायदात,धर्मग्रंथातील शब्दात,समाजाच्या नजरेत…न्यायालयांच्या निकालात….!

हे फक्त भारतातच घडतं असे नाही जगभरात कुठेही ,कोणत्याही समाजात,कोणत्याही घरात असंच घडतं.दक्ष्ि ण कोरियाचीच गोष्ट सांगायची असल्यास ‘फेमिनिझम’ हा शब्द तिथे स्त्रीहक्कांपेक्ष्ाही पुरुषद्वेष या अर्थाने अधिक वापरला जातो.नुकतेच पार पडलेल्या टोकियाे ओलंपिकमध्ये ३ सुवर्णपदे जिंकणा-या ॲन सॅन या तरुणीला केवळ तिच्या केसांच्या लांबीवरुन छळ सोसावा लागला…!ॲन सॅनने नेमबाजीत ३ सुवर्ण पदके जिंकल्यावर हातात धनुषबाण घेऊन तिचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाला.

तिचे केस बॉयकट होते.शेवटी तिथला ही एक वर्ग हा आपल्यासारख्याच पुराणमतवाद्यांच्या जातकुळीतला होता,त्यामुळे तिला सोशल मिडीयावर काय प्रतिक्रीया मिळाल्या?३ सुवर्ण जिंकले आहेच ,परंतु तिचे केस पहिल्यावर ती ‘स्त्री स्वातंत्र्य’वाल्या महिलांपैकी एक आहे हे सिद्ध होतं,त्यामुळेच मी तिचे कौतूक करणार नाही कारण अश्‍या महिला जगण्याच्या लायकीच्या नाहीत,असे मला वाटते….!
विशेष म्हणजे अश्‍या कालबाह्य,बुरसटलेल्या विचारांना भरपूर लाईक्स मिळाले आणि शेअर ही खूप झाले.नुकतेच दक्ष्ि ण कोरियामध्ये स्त्रियांना गर्भपाताच्या कायद्यासाठी प्रदीर्घ लढा लढावा लागला होता,ॲन सॅन वर टिका होताच या देशातील अनेक महिलांनी आपले केस बॉयकट केले आणि सोशल मिडीयावर तिला पाठींबा देण्यासाठी व्हायरल केले,‘मी टू’सारखी चळवळ बघता-बघता या देशात उभी झाली पण?प्रश्‍न तोच मात्र अनुत्तरीत राहाते आम्ही…कोणत्या शतकात कोणत्या दशकात बदलणार आहोत?

याच देशात स्त्रीचा कमनीय बांधा हे सौंदर्याचे मूळ समजल्या जात असल्याने ‘ती’ जन्माला येताच तिच्या कमरेभोवती बालपणापासून घट्ट कापड बांधला जातो,या विरोधात देखील या देशात २०१८ पासून मोठी चळवळ सुरु आहे.

भारतीय समाजात ‘लग्न’हा ‘संस्कार’मानला जातो,मग या संस्काराची परिणीती ‘बेडरुम‘मध्ये का नाही दिसून पडत?सम+भोग या शब्दापासून संभोग या शब्दाची उत्पत्ती झाली आहे,लग्न संस्कारामुळे पुरुषाला मिळालेल्या या अधिकाराचा उपभोग मात्र, ती मरे पर्यंत ‘तो’एकटाच उपभोगताना दिसतो,अनेक घरात अनेकांच्या बेडरुमध्ये या क्रियेमध्ये सम-भोग असतोच कुठे?अनैसर्गिक लैंगिक कृतीबाबत मात्र कलम ३७७ च्या आधारे गुन्हा दााखल होऊ शकतो, मग तिची मानसिक,शारिरीक,भावनिक ईच्छा नसताना ही वारंवार वर्षानुवर्ष पतीद्वारे केलेला संभोग हा बलात्काराच्या कलमात का नाही मोडू शकत?

कुटुंबसंस्थेला भारतीय समाजात फार महत्वाचे स्थान आहे,विवाहानंतर कौटूंबिक जीवनाला सुरवात होते,यात प्रजनन,संगोपन,शिक्ष् ण,संस्कार,समाज व देशासाठी नागरिक घडवणे अश्‍या अनेक गोष्टी गृहीत धरल्या जात असतात,विवाहानंतर पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हे दाखल होऊ लागल्यास या कुटुंबसंस्थेलाच तडा जाईल आणि भारतीय समाजाचा पारंपारिक डोलारा कोसळून पडेल या भीतीने, ना तथाकथित समाजधुरीण ना ‘ये नया भारत है‘ची आरोळी पिटणारे राजकारणी यांना ’ती‘च्या वेदनेवर फूंकर घालणारा ’ती’चा आत्मसन्मान जपणारा कायदा करण्याचे धारिष्टय होत आहे,म्हणूनच छत्तीसगढमधील या महिलेने आपल्याच पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याचे धाडस दाखवले त्याचे कौतूक करीत समाजातील स्त्री आणि पुरुष बुद्धिजीवींनी या घटनेची चांगलीच दखल सोशल मिडीयामध्ये घेतलेली दिसतेय.

वेळ लागेल पण आणखी १०० वर्षांनी का होईना,स्वत:च्या घरात स्वत:च्या बेडरुमध्ये तिच्यातील जागरुक झालेल्या ‘ स्व’ची दखल भारतीय समाजाला,देशातील कायद्याला,न्यायालयीन आदेशांना घ्यावीच लागणार ही अाशा जागृत झाली आहे.

Latest बातम्या