Homeनागपूर न्यूजनागपूर पोलिसांनी गाठला नीचतेचा कळस: चित्रा वाघ यांचा घणाघात

नागपूर पोलिसांनी गाठला नीचतेचा कळस: चित्रा वाघ यांचा घणाघात

Advertisements


दारु पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात वाघ यांनी धरले सरकारला धारेवर

मारहाणीमुळे आत्महत्या करणारे महेश राऊत यांच्याही मृत्यूची घेतली दखल

नागपूर,ता. ६ ऑगस्ट: दारु पाजून नुकतेच एका दलित अल्पवयीन मुलीवर ५ ऑटोचालक तसेच दोन कुलींनी केलेली अत्याचाराची घटना महाराष्ट्राच्या उपराजधानीला काळीमा फासून गेली,याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष् चित्रा वाघ यांनी आज नागपूरात प्रेस क्लब येथे पत्र परिषद घेतली.अतिशय गजबजलेल्या मेयो चौकात दोनवेळा या अल्पवयीन मुलीला अत्याचार केल्यानंतर आणून सोडल्या जातं आणि पोलिसांना सीसीटीव्ही फूटेज तपासून याचा मागमूस ही घेता येत नसेल तर नागपूर पोलिसांनी गाठलेला हा नीचतेचा कळस असल्याचा घणाघाती आरोप चित्रा वाघ यांनी केला.याप्रसंगी पोलिसांच्या मारहाणीत नुकतेच अपमानित होऊन महेश राऊत या लेखापालांनी आत्महत्येसारखे विघातक पाऊल उचलले,या संदभात देखील चित्रा वाघ यांनी नागपूर पोलिसांच्या कार्यशैलीवर कठोर ताशेरे ओढले.
नागपूर शहरातील सर्वात गजबजलेल्या मेयो चौकात दोन वेळा एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार करुन तिला या चौकात सोडले जाते मात्र सीसीटीव्ही सर्विलेंस असतानाही त्यावेळी कर्तव्यावर असणा-या पोलिसांना याची खबरबात लागत नाही!पोलीसांची नजर तर खूप तीक्ष्ण समजली जाते मग या घटनेत पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेला काय झाले होते?पोलिस स्काॅड,पोलिस यंत्रणा,दामिनी पोलिस यांची भूमिका काय?कधी फिरतात हे?घटना घडून गेल्यावर?सरकार कोणाचीही असो घटना या घडतातच मात्र राज्य सरकार त्यावर काय भूमिका घेते हे ही महत्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शुक्रवारी ही अत्याचाराची घटना घडली मात्र एफआयआर रविवारी नोंदवली गेली.घटना घडली त्याच दिवशी पीडीताचे मेडीकल झाले असते तर आज जे दोन आरोपी फरार आहेत त्यांना फरार होण्याची संधी मिळाली नसती,असे त्या म्हणाल्या.

पीडीताला विश्‍वासात घेऊन वॉर्डनने तिच्याकडून माहिती काढून घेतली नसती तर कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे उडवणारी एवढी गंभीर घटना समोर आली नसती.हे काम पोलिसांचे होते कि वॉर्डनचे?अश्‍या यंत्रणेला काय म्हणावे?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नागपूरातील दूसरी घटना म्हणजे लेखापाल महेश राऊत यांची आत्महत्या.त्यांच्या कुटुंबाशी देखील भेट घेतली असून पोलिस दल आता आपले कृत्य लपवण्यासाठी महेश यांच्या आत्महत्येला नवरा-बायकोमधील आपापसातील वादाचा अतिशय घृणास्पद असा रंग चढवत असल्याचा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला.राऊत यांना अतिशय लहानगी मुले आहेत.एक ५ वर्षाचा तर दूसरे पाल्य हे फक्त २ वर्षाचे आहे.असा सुशिक्ष्ति आणि कुटुंबवत्सल माणूस आत्महत्यासारखे टाेकाचे पाऊल उचलेल का?घराजवळ एका मनोरुग्णाला मारहाण होत असल्याची तक्रार कंट्रोल रुमला करण्याचा गुन्हा इतका मोठा होता का की दोन बीट मार्शल त्यांच्या घरी गेले आणि कुटुंबियांसमोर,शेजा-यांसमोर त्यांना बाहेर परिसरात आणून जबर मारहाण करतील?

याचा त्यांच्या संवेदनशील मनावर विपरित परिणाम झाला आणि त्यांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले.अपमानाचे शल्य ते पचवू शकले नाहीत यावरुन नागपूर पोलिसांचा नीचपणा कळतो,असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. या संदर्भात आजच पोलिस आयुक्तांसोबत बोलले असता चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.एवढ्या गंभीर घटनेतसुद्धा पोलीस आयुक्तांनी दोषी पोलिसांच्या फक्त तात्पुरत्या बदल्या केल्या,याकडे वाघ यांचे लक्ष् वेधले असता दोषी पोलिसांना बडतर्फ करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली असल्याची त्यांनी सांगितले याशिवाय राज्याचे गृहमंत्री तसेच पाेलिस महासंचालकांची देखील या दोन्ही प्रकरणात भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी फडणवीस सरकारच्या काळात देखील कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात अनेक घटना नागपूरात घडल्या याविषयी प्रश्‍न विचारले असता माझी बांधिलकी सरकारसोबत नसून १०० टक्के बांधिलकी जनतेसोबत असल्याचे त्या म्हणाल्या.फडणवीस यांची ही सरकार असती व सरकार चुकीची भूमिका घेत आहे असं लक्ष्ात आले असते तर आपल्याच सरकारविरुद्ध चित्रा वाघ यांनी भूमिका घेतली असती,असा दावा त्यांनी केला.

लैंगिक शोषणाच्या घटना या फक्त सर्वसामान्य महिलांसोबतच घडत नाही तर पोलीस दलात देखील अश्‍या घृणास्पद घटना घडत असल्याचे त्यांनी सांगितले.आजच नागपूर पोलिस दलातील एका महिला पोलिस शिपाईला पोलिस आयुक्तांसमोर उभे केले,सध्या अकोला येथील एका पोलीस ठाण्यात पीएसआय असणा-याने या महिला पोलिसाचे लैंगिक शोषण दोन वर्षांपूर्वी केले होते मात्र अजूनही तिला न्याय मिळाला नाही.पोलीस आयुक्तांनी या संदर्भात लवकरच एफआयआर दाखल करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे वाघ यांनी सांगितले.

राज्यात पहील्यांदाज एका मंत्र्यावरच बलात्काराचे आरोप!
याप्रसंगी बोलताना त्यांनी माजी वनमंत्री संजय राठोड यांचा उल्लेख करीत या राज्यात तर पहील्यांदाज एका मंत्र्यावर बलात्काराचा आरोप झाला,‘हमारा कोई कूछ नही बिघाड सकता’अशी घातक मानसिकता अश्‍या घटनांना खतपाणी देत असल्याची टिका त्यांनी केली.संजय राठोड व पूजा चव्हाण प्रकरणी दोन प्रत्यक्ष् दर्शी साक्ष्ी दार असताना व हे दोन्ही साक्ष्ीदार प्रत्यक्ष् घटना घडली तेव्हापासून पूजा हिला रुग्णालयात दाखल करेपर्यंत सोबत असताना त्यांची चौकशी पुणे पोलिसांनी का केली नाही?असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सर्वात महत्वाचे म्हणजे पोलिस नियंत्रण कक्ष्ाला त्यांचा फोन गेल्यानंतर या नियंत्रण कक्ष्ातून त्यांना एक क्रमांक देण्यात आला होता त्यावर संभाषण साधायला सांगण्यात आले होते,तो क्रमांक कोणाचा होता?त्या संभाषणात काय होतं?हे समोर कधी येणार?

पुणे पोलिसांनी ऑडियो क्लिपमधील आवाज हा संजय राठोड यांचाच असल्याचा अहवाल फोरेंसिक लॅबने दिला असल्याचे म्हटले मात्र हा अहवाल तर दोन महिन्यांपूर्वीच पुणे पोलिसांना मिळाला होता,ही घटना फेब्रुवारीमध्ये घडली,अहवाल दोन महिन्यांपूर्वीच पुणे पोलिसांना मिळाला तरी दोन महिने पोलिस विभाग गप्प का?अजूनही या हाय प्रोफाईल प्रकरणात एफआयआर दाखल झाली नाही.
माझा न्यायदेवतेवर विश्‍वास आहे त्यामुळेच या प्रकरणात गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही न्यायालयात पीआयएल दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Latest बातम्या