Homeनागपूर न्यूजनागपूरातील चार विधानसभेच्या जागा जिंकू:नाना पटोले

नागपूरातील चार विधानसभेच्या जागा जिंकू:नाना पटोले

जागरुक कार्यकर्त्यांनाच मिळणार तिकीट-आ.विकास ठाकरे

काँग्रेस कार्यकर्त्यांची सक्रियता अपर्याप्त:माजी खासदार विलास मुत्तेमवार

पटोले,मुत्तेमवार यांचे मोदींवर शरसंधान

कर्नाटकात काँग्रेसचा विजय निश्‍चित:कर्नाटकात पराभव दिसताच ‘हिंदू खतरे मे!’

‘नफरत छोडो भारत जोडो’राहूल यांनी दिलेला संदेश पक्षातही अमलात आणा

प्रदेशाध्यक्षांच्या मनपा निवडणूक नियोजन बैठकीला केदार,नितीन राऊत,सतीश चतुर्वेदी यांची अनुपस्थिती!

पक्षापेक्षा कोणताही नेता मोठा नाही:पक्षाच्या कार्यात अनुपस्थित राहील्यास तिथल्या तिथे शवविच्छेदन :नानांची स्वपक्षीय नेत्यांना तंबी

प्रसार-प्रचार माध्यमांची देखील साथ नाही! विरोधकांना इडी,सीबीआयच्या चौकशींचा धाक

‘नाममात्र’वर ही नानांनी ओढले ताशेरे

नागपूर,ता.४ मे २०२३: शिक्षक मतदार संघाचा उमेदवार मतदानाच्या १५ दिवसांपूर्वी ठरला,१५ दिवसाच्या तयारीने आम्ही विरोधकांना पाणी पाजले,यावरुन काँग्रेस पक्ष किती शक्तीशाली आहे याचा अंदाज येतो.नागपूर विधानसभेच्या दोन जागा आम्ही जिंकलो तर बंटी शेळके मध्य नागपूर तर गिरीश पांडव यांचा अवघ्या दोन हजारच्या जवळपास मतांनी पराभव झाला,याचा अर्थ नागपूरची जनता ही भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला कंटाळली आहे,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,प्रशासन,सरकार सगळं काही त्यांचं असतानाही आपण ताकदीने लढलो आणि विजय खेचून आणला,या ही वेळी नागपूरातील चार विधानसभेच्या जागा काँग्रेस जिंकणार असल्याचा दावा, अखिल भारतीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.ते देवडिया काँग्रेस भवन येथे नागपूर महानगरपालिकेची निवडणूक या संदर्भात आयोजित नियोजन बैठकीत बोलत होते.

याप्रसंगी मंचावर माजी केद्रिय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे, ॲड.अभिजीत वंजारी, पुरुषोत्त्म हजारे, गिरीश पांडव,अतुल कोटेचा,संदेश सिंगलकर,डाॅ.गजराज हटेवार,प्रा.दिनेश बानाबाकोडे,प्रशांत धवड,गुडडु तिवारी,माजी नगरसेवक बाबा शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले,की उदयपूर येथील पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात संघटनात्मक चर्चेवर भर देण्याचा ठराव पारित झाला होता.याशिवाय महाराष्ट्रातील शिर्डी येथील अधिवेशनात देखील संघटनात्मक ढाचा मजबूत करण्यावर जोर देण्यात आला,याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.संघटनात्मक ढाचा मजबूत असेल तर काँग्रेसला कोणीही हरवू शकत नाही,त्यातल्या त्यात नागपूरमध्ये हर हरवू शकत नाही.कारण,नागपूरात पुरोगामी विचारांचा मोठा पगडा आहे.

केंद्र व राज्य सरकारला लोकशाही मान्य नाही,अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.काँग्रेस पक्षातही १२-१२ वर्ष संघटनात्मक निवडणूकाच होत नसे.राजीव गांधी यांनी काँग्रेसच्या घटनेत दुरुस्ती करुन दर पाच वर्षांनी संघटनात्मक निवडणूका घेणे बंधनकारक केले.पण,राज्यात गेल्या वर्षभरापासून स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूकाच घेण्यात आल्या नाही,संपूर्ण कारभार प्रशासक पाहतात आहेत,हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखे पाप असल्याची टिका नाना यांनी केली.

भाजपची सत्ता मनपात आल्यानंतर सर्वात आधी जर सत्ताधा-यांनी काय केले असेल तर ओसीडब्ल्यूकडे शहराच्या पाण्याचे व्यवस्थापन देऊन ‘सार्वजनिक’नळांना टाळे लावले.प्रत्येकाने आपल्या घरी नळाचे कनेक्शन घेतलेच पाहीजे आणि बिल भरलेच पाहीजे तरच पाणी मिळेल,असा कारभार खासगी कंपनीला सोपवून भाजपने नागपूरकरांच्या तोंडचे पाणीच पळवले,असे नाना म्हणाले.ही व्यवस्था आता संपवली पाहिजे,आज ही शहराच्या अनेक भागात नागरिकांना प्यायला पाणीच मिळत नाही,यासाठी आता आंदोलन करण्याचे आवाहन यावेळी नाना यांनी केले.

विलास मुत्तेमवार हे खासदार होते तेव्हा त्यांना देखील मेट्रोचा भार हा नागपूरकरांवर पडेल हे माहिती असल्यानेच त्यांनी ’आधी मिहान मग मेट्रो’हे धोरण स्वीकारले होते,आधी तरुणांच्या हाताला रोजगार मग मेट्रोचा प्रकल्प ते राबविणार होते,त्यातही मेट्रोसाठी नागपूरकरांकडून पैसे वसूल केले जाणार नाही असे धोरण ते राबविणार होते,त्यांनी मात्र मेट्रोच्या प्रकल्पामध्ये एवढा भ्रष्टाचार केला की नवनवीन बंगले बांधले.मिहान भकास केले,जे उद्योग होते ते ही गेले आणि दूसरे उद्योग आलेच नाही.त्याच मिहानसाठी लोकांची घरे, गाव आणि शेतजमिनी ताब्यात घेण्यात आली होती.मात्र,भाजपने त्यावर आपली राजकीय पोळी शेकून घेतली.

यशवंत स्टेडियमवर भव्य सभा घेत सभेत गडकरी यांनी तरुणांना आकर्षित करणारे प्रेझेंटेशन दिले होते.त्यात मिहानमध्ये साढे चार लाख नोक-या ते निर्माण करणार असल्याचे म्हणाले.वर्षाला ५० हजार नोक-या देणार व नागपूर शहराचा काया पलट करणार असा दावा त्यांनी २०१४ च्या निवडणूकीत केला होता,मात्र आज मिहान गायब असून मेट्रो आधी आली,ज्या मेट्रोने नागरिकांना लृटण्याचे काम फक्त केले व नागपूरला जगातील सर्वात महागडं शहर करुन ठेवलं,अशी बोचरी टिका याप्रसंगी नाना यांनी केली.

जी-२० साठी आधी ३०० कोटींचा खर्च होणार होता,एका सनदी अधिका-याने सांगितले तो आता ७०० काेटी झाला आहे,यानंतर तो ३ हजार कोटींवर गेला.मनपा,राज्य व केंद्राने खर्च केलेले हे ३ हजार कोटी रुपये कोणाचे होते?सर्वसामान्य जनतेचेच होते ना?जनतेच्या पैशांची अक्षरश:जी-२० च्या नावाखाली उधळपट्टी करण्यात आली.रंगबिरंगी कुंड्या गायब झाल्या,शहराला झगमगते करण्यासाठी वीज कुठून घेतली तर रस्त्यांवरील डीपीतून घेण्यात आली,आता महावितरण वाढीव बिले जनतेला पाठवित आहे,चमक दमकवर पैसा सरकार खर्च करेल,भुर्दंड कोण भरणार तर जनता!या सर्व गोष्टी जनतेला कळू द्या की भाजपने गेल्या पंधरा वर्षांच्या कारभारात घरोघरी ‘पाकिटमार’तयार केले,असा चिमटा नानांनी काढला.

प्रसार-प्रचार माध्यमे देखील आपल्या जवळ नाही,अशी खंत व्यक्त करीत इडी,सीबीआयचा धाक विरोधकांना दाखवला जातो.देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्याप्रमाणे काँग्रेस कोणत्याही अपेक्षाशिवाय लढली होती अगदी तसाच संघर्ष मनपाच्या निवडणूकीसाठी करण्यास सज्ज व्हा.महापौर,सभापती पदाची अपेक्षा ठेऊ नका.प्रभागनिहाय समित्या तयार करा.सामान्य जनतेसोबत रोजच संपर्क झाला पाहिजे.घरोघरी जनतेचा आवाज हा काँग्रेसचा अावाज झाला पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.

लवकरच असे प्रभाग अध्यक्ष नियुक्तीचे पत्र मी पाठवणार आहे.प्रभाग अध्यक्षांनी दर पंधरा दिवसांनी बैठक घेतलीच पाहिजे.संपर्क कोणाकोणासोबत झाला?जनतेचे कोणकोणते प्रश्‍न आहेत?हे समजून घ्या. पद आणि फोटोंचा मोह सोडून द्या.पंतप्रधान नरेंद्र माेदींचे फोटो देशभर लागले आहेत मात्र शेतक-यांचा कैवार घेणा-्या फोटोंच्या मागे शेतक-यांच्या खतांचे भाव हे तिप्पट वाढले आहेत,त्यातही गुजरातमधून भेसळ खतांचा पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे,जनतेला मी कसा लृटतोय?मोदीचे फोटो हे प्रदर्शित करतात.जनतेच्या मनात प्रचंड आग आहे,प्रचंड चीड आहे त्यामुळे काँग्रेसला घाबरण्याचे कारण नाही.आपण एकत्र लढलो आणि जिंकलोही.त्यांच्याकडे पैशांचा पिटारा आहे तर आपल्याकडे जनतेचा विश्‍वास आहे,असे नाना म्हणाले.

गुंड,पैसा,सत्तेचा दुरुपयोग,अगदी पोलिस विभागातील एसीपी देखील त्यांच्या कटात सहभागी दिसले,काँग्रेसला त्यामुळेच घराघरात जाऊन जनतेचा विश्‍वास जिंकायचा आहे.संपर्क नसेल तर निवडणूका जिंकण्याची अपेक्षाही करु नका.ते पोहोचतात,आपणही वेळेवर गेलो पाहिजे.एकदा निकाल लागल्यावर उपयोग नाही असे सांगून, राजकीय व सामाजिक जिवनात जवाबदारी फक्त निवडणूकीपुरती नसते तर ‘आपला पक्ष आपली जवाबदारी’असते,असे नाना म्हणाले.

पक्षापेक्षा काेणीही मोठा नाही,नागपूरात जे स्वत:ला पक्षापेक्षा मोठे समजतात,त्यांचे मी तिथल्या तिथेच पोस्टमार्टन करेल,कोणालाही सोडणार नाही,असा गर्भित इशारा याप्रसंगी नाना यांनी या बैठकीला पाठ दाखविणा-या ज्येष्ठ काँग्रेसी नेत्यांना दिला.बैठकीत काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार,नितीन राऊत तसेच सतीश चर्तुवेदी अनुपस्थित होते,हे विशेष!ज्याला कोणाला तिकीट मिळाले त्याचे पाय खेचू नका तर पक्षासाठी त्याला साथ द्या,असे आवाहन याप्रसंगी नानांनी कार्यकर्त्यांना केले.

मोदी-अदानी यांच्या संबंधाविषयी राहूल गांधी यांनी मोदी यांना जाब विचारण्याचे धाडस केले आणि भाजपने आपल्या नेत्याला बेघर केलं,देशातील जनतेचा कष्टाचा भारतीय जिवन बिमा मंडळात गुंतवलेला(एलआयसी)पैसा तसेच राष्ट्रीयकृत स्टेट बँक ऑफ इंडियातील जनतेच्या बचतीचा पैसा अदानी यांना मोदींनी देऊन टाकला, याविषयी संसदेत आवाज उठवला त्या राहूल गांधीची खोट्या गुन्ह्याखाली खासदारकी रद्द केली,अश्‍या भाजपला कार्यकर्त्यांनी मदत केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.जे पक्षाच्या बैठकीला येत नाही,या कार्यालयात आज उपस्थित नाही त्यांचाही हिशेब केला जाईल,असा इशारा नाना यांनी अप्रत्यक्षपणे केदार,नितीन राऊत तसेच सतीश चर्तुवेदी यांना दिला.

१३ वर्षांपूर्वी ललित टेकचंदानी सारखा दोन हजार जनतेचे, हजारो कोटी घेऊन फरार झालेला व मुंबईत वास्तव्यास गेलेला माणूस, सरसंघचालक व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत नॅशनल कॅन्सर इन्सिटट्यूटच्या लोकापर्ण सोहळ्यात एकाच मंचावर बसतो व पैसे परत मागणा-यांवर धाकदडपशाही करतो,मी संघाचा माणूस आहे,सरकार आमचीच आहे असे सांगतो,पोलिसांच्या संरक्षणात फिरतो,पैसे परत मागणा-यांना धमकावतो,अश्‍या ‘गुंडाइझम’ला संघ कॅन्सर रुग्णालयाचा संचालक कसा बनवते?सरसंघचालक मोहन भागवतांना आव्हान आहे त्यांनी त्या ‘वसूली संघटना ’विषयी माहिती घ्यावी असे नाना म्हणाले.

या पुढच्या काळात प्रभागवार बैठकी आयोजित केल्या जातील.त्या त्या प्रभागाचे काँग्रेस नेते हे संघटनात्मक पातळीवर कसे काम करीत आहेत हे बघितले जाईल,नाही तर ‘आपल्याच घरात अंधार’चिंता मात्र शहराची असे घडता कामा नये.प्रत्येक बूथ मजबूत असला पाहिजे.नागपूर शहर हे पूर्वीपासून काँग्रेसचेच शहर राहीले आहे.कोणी मोठा नेता नाही किवा छोटा नेता नाही.मी देखील प्रदेशाध्यक्ष असलो तरी कार्यकर्त्याच आहे.आपल्याला महाराष्ट्रात काँग्रेला सत्तेत आणायचंच आहे.राज्यात जनतेची पसंद ही काँग्रेसच आहे.भाजप म्हणजे घोषणेशिवाय काही नाही,दरराेज महागाई,बेरोजगारी वाढत असल्याची टिका त्यांनी केली.

भाजप ही काँग्रेसकडे नेतृत्व नसल्याची टिका करते मात्र राहूल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्‍मीरपर्यंत चार हजार किलोमीटची ’भारत जोडो’ पदयात्रा करुन, त्यांची क्षमता किती मोठी आहे हे सिद्ध केलं.त्यांच्या पदयात्रेला देशातील तरुण,महिला,शेतकरी यांचा खूप मोठा प्रतिसाद मिळाला.कनार्टकच्या निवडणूकीत मोदी आणि राहूल गांधी यांची तुलना केली जात आहे.मात्र,ते सभेत गर्दी पैशांनी आणतात.राहूल गांधी यांच्या सभेत उस्फूर्त गर्दी उमडते,एवढं मोठं परिवर्तन घडलं आहे.गांधी परिवाराचं नेर्तृत्व किती समर्पक आहे हे त्यांनी सिद्ध केलं.

राजकीय, सामाजिक तसेच प्रशासकीय असा प्रदीर्घ अनुभव असणारे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना ’नाममात्र’बोलले गेले.एवढ्या प्रदीर्घ व अनुभवी नेत्याला ते ‘नाममात्र’बोलले,त्यांनी पक्षासाठी केलंला त्याग,.बलिदान,याला नाममात्र संबोधण्यात आले,याला उत्तर द्या,शांत बसायचं नाही,त्यांना जशास तसे उत्तर द्या,माझ्याविषयी बोलले गेले तेव्हा पक्ष म्हणून अशोक चव्हाण यांनी लगेच त्याला उत्तर दिले.आपल्या नेतृत्वावर,अंगावर कोणी आले तर त्याला जशाच तसे उत्तर द्या,शांत राहू नका,तो मग गावातला नेता असो किवा प्रदेश पातळीवरचा,आपल्या नेत्याविषयी आदर भाव असला पाहिजे,काँग्रेस नेत्यांवर भाजप खोटे लांछन लावते तेव्हा गप्प नाही बसायचं,सतर्क रहा,जनतेच्या काँग्रेसकडून खूप अपेक्षा आहेत,आपली भूमिका ही लढवय्येची असली पाहिजे,असे आवाहन याप्रसंगी नाना यांनी केले.

औरंगाबाद येथे रामनवमी गुण्या गोविंदानेच उत्साहात दिवसभर हिंदू मुस्लिमांनी साजरी केली मात्र रात्रीच्या वेळी दहा बारा ‘भगवे’पोरांनी नारे लावले,शिव्या दिल्या मुस्लिमांना,घटना होणार हे पोलिसांना देखील माहिती होतं मात्र कोणताही बंदोबस्त नव्हता.परिणामी गाड्या पेटवल्या गेल्या.हा हिंसाचार धर्माच्या नावाखाली मुद्दामून घडवून आणण्यात आला.त्यामुळेच अधिक सर्तक रहा,असा सल्ला नाना यांनी याप्रसंगी कार्यकर्त्यांना दिला.

बाजार समित्यांच्या निवडणूका ही काँग्रेस समन्वयातून जिंकली.विकास ठाकरे हे शहराध्यक्ष आहेत त्यामुळे त्यांच्यावरच सर्व जवाबदारी आहे,हे डोक्यात ठेऊ नका,आपल्यात एकता राहीली पाहीजे,उपस्थित राहीलं पाहिजे,एकत्र राहीलो तर पैसे वाचतील,असा टोला देखील त्यांनी हाणला.

संघटनात्मकरित्या एकत्रित राहीलो तर भाजप देखील आपल्याला हरवू शकत नाही.नागपूर शहर संपूर्ण देशातील राजकाणारचा केंद्रबिंदू आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ही फार मोठी संधी आहे,गटा तटामुळे ती गमावू नका.ही संधी पुन्हा मिळणार नाही.ईद,रामनवमी,महावीर जयंती,आंबेडकर जयंती,हनुमान जयंती हे पाच मनोमिलनाचे उपक्रम आम्ही साजरे केले.प्रभागात देखील हे वेगवेगळ्या धर्मातील मनोमिलनाचे कार्यक्रम साजरे करा.‘जे याला रेस्पॉन्स देणार नाही मी त्याचा रेस्पॉन्स बरोबर करुन देईल’असा इशारा या प्रसंगी नाना यांनी दिला.

उद्या बौद्ध जयंती आहे दीक्षाभूमीवर जाऊन हा देखील उत्सव उत्साहात साजरा करा,असे आवाहन नाना यांनी केले.अंबाझरी येथील आंबेडकर स्मारक उधवस्त करणा-यांना न्यायालयाची चपराक मिळाली असून आम्ही त्या निकालाचे स्वागत करतो,असे नाना म्हणाले.

बैठकीमध्ये सर्व प्रथम आ.विकास ठाकरे यांनी स्व.महात्मा गांधी चे नातू अरुण गांधी यांच्या निधन प्रसंगी दोन मिनिट मौन धारन करुन श्रध्दाजली देण्यात आली.

पदाधिका-यांना संबोधित करतांना सांगितले विकास ठाकरे म्हणाले की,जनतेचे प्रश्‍न जसेच्या तसेच आहे.गेल्या वर्षभरापासून मनपाचा कारभार प्रशासक चालवित आहे.माजी नगरसेवकांचेही मनपा प्रशासक ऐकत नाही.सत्ताधारी भाजप जनतेच्या प्रश्‍नांसाठी धावत नाही.आम्ही दीड वर्षांपूर्वी ’जनसमस्या निवारण समिती’बनवली.बूथ व ब्लॉकस्तरावर कार्यकर्ते,पदाधिका-यांनी जनतेच्या कोणकोणत्या समस्यांची दखल घेऊन पाठपुरावा केला,लोकांच्या समस्यांना घेऊन ते समाज माध्यमातही किती सक्रीय आहे, अश्‍या जागरुक कार्यकर्त्यांना निवडणूकीच तिकीट दिले जाईल.कसबाची निवडणूक ही आदर्श प्रमाण आहे.जनतेचा उमेदवार हा निवडूण येत असतो.गटातटाचा किवा जातीचा उमेदवार नाही.

नागपूर मनपात काँग्रेस आल्याशिवाय राहणार नाही ही महत्वाची जवाबदारी तुम्हा-आम्हा सर्वांची आहे.देशात भाजपची सरकार आली.काय नव्हतं भाजपकडे नागपूरात?केंद्र सरकार,राज्याचा मुख्यमंत्री,१२ आमदार,३ खासदार,५ वर्ष राज्य केलं.१०८ नगरसेवक निवडून आले तरी देखील २०१९ च्या विधान सभेच्या निवडणूकीत बंटी शेळके व गिरीश पांडव फक्त दोन हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले.त्यांची ५ वर्षांची कारकीर्द जनतेने नाकारली असाच याचा अर्थ होतो.लाखोंच्या मताधिक्याने निवडून येणारे काही हजारच्या फरकाने जिंकले.याचा अर्थ जनतेला त्यांचा कारभार पसंद नव्हता.

पदवीधरची निवडणूक जी भाजप कधीच हरला नाही त्या निवडणूकीत काँग्रेसने भाजपला पराभूत केले.शिक्षक मतदार संघाची निवडणूकही जे हरले.याही वेळी भाजपची सत्ता राज्यात होती.नागपूर शहर हे काही साधंसुध शहर नाही.जसजशी निवडणूक जवळ येते भाजप अधिक आक्रमक होते.त्यामुळेच ज्याला कोणालाही तिकीट मिळेल त्याला विजयी करण्यासाठी एकदिलाने काम करा,असे आवाहन यावेळी विकास ठाकरे यांनी केले.

आज तंत्रज्ञानाच्या युगात फक्त एक मॅसेज व्हॉट्स ॲपवर टाकला तरी हजारो कार्यकर्ते आंदोलन स्थळी जमतात.हीच काँग्रेसची संघटनात्मक ताकद असल्याचे ठाकरे म्हणाले.मनपा निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे.गेल्या दोन वर्षापासून काॅग्रेसच्या पदाधिका-यांनी प्रदेशच्या निर्देशानुसार महागाई,पेट्रोल,डिझल बाबत अनेक आंदोलने केली. संघटनेला बुथ स्तरावर मजबूत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मनपा मध्ये प्रशासक असल्यामुळे ६ ही विधानसभा निहाय प्रभाग निहाय ‘समस्या निवारण समिती’ बनवण्यात आल्या.व प्रभाग निहाय बैठकाचे आयाेजन येत्या १५ दिवसात करुन, त्यामाध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम काॅग्रेस पक्षाचे कार्यकर्ता प्रभाग निहाय करतील असे सांगून, येत्या महानगर पालिकेमध्ये काॅग्रेस नक्कीच जिंकेल असा विश्‍वास विकास ठाकरे यांनी व्यक्त केला.

माजी केद्रिय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी प्रत्येक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेला काॅग्रेस विचाराधारा सांगणे गरजेचे असल्याचे सांगितले. विचारधारेवर प्रेम करा.लोकांना काॅग्रेसच्या विचारधारेप्रति जागृत करण्याची गरज आहे. केंद्र सरकारनी मिहान,मेट्रो मध्ये ५० हजार लोकांना रोजगार देण्याची हमी घेतली होती,परंतू विदर्भातील युवकांना रोजगार मिळाला नाही. मिहान येथे येणारे मोठे उद्योग वापस गेले. ओसीडब्ल्यूला कंत्राट दिल्यावरही पानी समस्या मोठया प्रमाणात आहे. सामान्य जनतेला पानी मिळत नाही.पेट्रोल,डिझल,गॅस चे मोठया प्रमाणात भाव वाढलेले आहे.या मुळे सामान्य माणसाचे जीवन जगणे कठिन झाले आहे, त्यामुळे भाजपाला जनता कंटाळलेली आहे. पेट्रोल पंप वर मोदीं चे फोटो दिसत आहे. जर महागाई कमी झाली नाही तर भाजपा विरोधात पेट्रोल पंप वर मोठे आंदोलन करुन मोदींच्या फोटोला काळे फासले जाईल असा इशारा देत ,आक्रमकपणे जनतेसमोर जाण्यासाठी पुष्कळ कारणे असल्याचे सांगितले.मनमोहन सिंह यांची सरकार २०१४ पर्यंत देशात होती त्यावेळी देशातील जनतेला ६० रुपये प्रति लिटर पेट्रोल मिळत होतं,मोदींच्या काळात ते आता ११२ रुपये प्रति लिटर झाले आहे.

नागपूर नगर काँग्रेस कमेटीचे कार्यकर्ते यांनी विविध आंदोलनात सक्रीयता दाखवली असली तरी ती अपर्याप्त सक्रीयता असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.नाना पटोले,विकास ठाकरे यांनी याचा विचार करावा व जिथे भाजप चुकत असेल तिथे जनतेला सजग केले पाहिजे,असा सल्ला त्यांनी दिला.
आज १५०० कार्यकर्त्यांनी अर्ज घेतले.त्यांना नगरसेवक व्हायचं आहे मात्र वार्डाच्या समस्येपेक्षाही कोणता राजकीय पक्ष हा कसा सक्रीय आहे,जिल्ह्यात कोणते प्रश्‍न महत्वाचे आहे,कोणते प्रकल्प आलेत,त्यात किती भ्रष्टाचार झाला याचा अभ्यास करा,जनतेला काॅंग्रेसची ताकत दाखवून देवू, सर्वानी एकता दाखवून कार्य करावे असे म्हणाले,आपण विचारधारेशी बांधिल आहोत.विचारधारा म्हणून भाजपमध्ये गेला असाल तर तिथेच रहा,असा टोला ही त्यांनी हाणला.
देशपातळीवर मोदी यांना उघडे पाडण्याचे काम एकमेव राहूल गांधींनी केलं.ज्याने स्वत:च्या घरात तीन-तीन पंतप्रधान पाहीलेत ते राहूल गांधी मोदीं समोर ठस से मस होताना दिसत नाही.कर्नाटकातही काँग्रेसच सत्तेवर येत आहे.सिद्धरमय्यांच्या सभेला ३०-४० हजारांची गर्दी जमत आहे.याविरुद्ध ५६ इंचची छातीवाले मोदी हे विचलीत झाले आहेत.‘बजरंगबली की जय बोलो और मतदान करो’असे आव्हान मोदी कर्नाटकात करीत आहेत.बजरंग बलीचा निवडणूकीशी काय संबंध?बजरंत बली रागावला तर काय कराल?तेथील इसाई,मुस्लिम,बौद्ध,सिख यांची संपत्ती लृटण्याचे काम ते करतात आहेत,त्यांना मारहाण करतात त्यामुळेच कर्नाटकात काँग्रेस सत्तेत आली तर बजरंग दलावर बंदी आणण्याचे आश्‍वासन देण्यात आले,असे मुत्तेमवार म्हणाले.मोदींना पराभव दिसताच ‘हिंदू खतरे मे’ आठवतं,असा टोला त्यांनी हाणला.
नागपूरात गडकरी हे न दिसणा-या विकासाविषयी कधीही सांगत नाही.नाग नदी,पिवळी नदीच्या बाजूनेही लोक जात नाही,इतकी दुर्गंधी त्या नद्यांमध्ये आहे.त्यांना महालात दुर्गंधी येत असल्यानेच ते वर्धा रोड येथे रहावयास गेले.जयपाल रेड्डी मंत्री असताना आम्ही ३५० इलेक्ट्रीक बसेस शहरात आणल्या मात्र त्या खराब करणा-या माणसाला गडकरी बैठकीत घेऊन बसतात ज्याच्याकडून नागपूर मनपला १०० कोटी रुपये घेणे आहे,असा आरोप त्यांनी केला.
मेट्राने दीक्षाभूमीसमोर सेव्हेन स्टार कार्यालय बांधले.हा जनतेचा पैसा मेट्रो आणि सुविधांसाठी होता की मेट्रो कार्यालयासाठी?असा प्रश्‍न त्यांनी केला.नाना पटोलेंनी यांनीच आता विधान सभेत मेट्रोला रेती,क्रांक्रिट,सलाखी,पेंट कोणत्या कंत्राटदारांनी पुरवले?हा प्रश्‍न करावा,असे आवाहन मुत्तेमवारांनी केले.आ.अभिजित वंजारी यांनी पुढाकार घेऊन मेट्रोवर श्‍वेत पत्रिका काढावी अशी मागणीही त्यांनी केली.
उज्जवला गॅसचे फक्त देशभर फलकच लागले आहे.त्या आया बहीणी कधीच्याच परत चुलींच्या लाकडावर आल्या आहेत.एकेकाळी गडकरी,फडणवीस व घर घर की कहाणी स्मृति इराणी यांनी महागाईला घेऊन रस्त्यावरचे आंदोलन केले होते.गडकरी यांचा तर टमाटर घेऊन फोटो छापून आला होता.आपण मात्र काहीच करत नाही.वातावरण बदलण्याचे काम राहूल गांधींनी केले आहे.‘नफरत छोडो देश जोडो’आता आपल्या पक्षातही नफरत सोडा आणि एक होऊन जा असे आवाहन करीत,नागपूर हे सर्वाधिक महत्वाचे शहर असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे मनपाच्या निवडणूका एक दिलाने लढण्याचा व जिंकण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

 

 

Latest बातम्या