

निविदा न काढताच दिले कंत्राट:पैसे ही पाण्यात पूल ही पाण्यात
प्रशांत पवार यांचा आरोप
नागपूर,ता. ८ जुलै: प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज गुरुवारी तो धो-धो बरसला मात्र जीवघेण्या उमस उकाड्यापासून बचाव झाला असताना नागपूरकर नागरिक दुस-या समस्येत फसला. मनीष नगरच्या अंडरपास पूलच चांगलाच पाण्याखाली बुडाला होता.शहरातील ‘जय जवान जय किसान’संघटनेचे सदस्य तर अध्यक्ष् प्रशांत पवार यांच्यासह या तुंबलेल्या पाण्यात ‘स्वीमिंग पूल’चा आनंद लुटून आले.जनतेच्या कराचा पैसा या पुलासारखाच कसा महामेट्रोने ‘महाभ्रष्टाचारात’बुडवला,याचे प्रात्यक्ष्कि त्यांनी त्या ठिकाणी जनतेसमोर ऐन पाण्यातून पाणीदारपणे सादर केले.
एकूण ९० कोटींच्या लागतने बनलेला हा मनीषनगरचा अंडरपास पूल आहे.नॅशनल हायवे ॲथोरिटीतर्फे या पूलाचा कंत्राट मेट्रो रेल्वेला देण्यात आला होता.मेट्रोने मात्र या पुलाच्या निर्माणाकरिता नॅशनल कंन्सट्रक्शन कंपनीला हायर केले.नॅशनल हायवे ॲथोरिटी आपलं कोणतही काम कोणत्याही कंपनीला देऊ शकते मात्र कोणत्याही कामाची निविदा आधी काढावी लागते.नॅशनल हायवे ॲथोरिटीने निविदा न काढताच कंत्राट महामेट्रोला दिले,पुढे महामेट्रोनेही कोणतीच निविदा न काढताच या पुलाच्या बांधकामाचे कंत्राट एनसीसीला दिले असा आरोप प्रशांत पवार यांनी केला.
सर्वात जास्त नागपूरकरांवर कहर म्हणजे कोणतेही बांधकाम करताना आधी त्या निर्माणकार्याचे काटेकोर डिझाईन तयार होत असतात.या कंपनीने कोणत्याही अभियंताकडून याचे डिझाईन तयार करवून घेतले नाही,याचा डीपीआरच तयार झाला नसल्याचा धक्कादायक आरोप पवार यांनी केला.साधे घर बांधतानाही माणूस हजारदा विचार करतो त्याचे घर कसे असावे,येथे तर सार्वजनिक उपयोगासाठी वापर होणा-या अतिशय महत्वाच्या पुलाचा प्रश्न होता तरी एवढी हलगर्जी?
पूलाची निर्मिती झाल्यानंतर मात्र डीपीआर सेंशन झाल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.त्यामुळेच या पुलामध्ये अनेक त्रुट्या राहून गेल्या.मुख्य त्रुटी होती या पुलाच्या दोन्ही बाजूने असणा-या नागरिक वस्तीतील ड्रेनेज सिस्टिमची.साधारणत:नागपूर शहरात १० फूटांच्याखाली ही सिस्टिम आढळते.मुंबईत ती २५ फूटांच्या खाली आहे.त्या लेवलशी पाण्याची लेवल मॅच करुन या पुलाची निर्मिती झाली असती तर एवढी मोठी समस्या निर्माणच झाली नसती,असा दावा प्रशांत पवार यांनी केला.
या पुलाच्या बांधकामाबाबत मेट्रो रेल्वेने कोणताही शास्त्रशुद्ध अभ्यास न करता बांधकाम ‘उरकून’घेतल्यानेच पहील्याच पावसात याची ‘पोलखोल’झाली,असे प्रशांत पवार म्हणाले.‘जय जवान जय किसान’संघटना ही फार पूर्वीपासूनच पुलाच्या बांधकामात मेट्रो रेल्वेच्या महाभ्रष्टाचाराबाबत आवाज उठवत आली असल्याचे व नागपूरकर जनतेला जागरुक करीत असल्याचे ते म्हणाले.
…….

आजच्या पावसाने अतिशय वर्दळीचा असणा-या नरेंद्र नगर पूलाचा देखील असाच नजारा नागपूरकरांनी अनुभवला.पांढ-या रंगाची कारच पुलाखालील पाण्यात अर्धी बुडाली असल्याचा व्हिडीयो आज चांगलाच व्हायरल झाला.

आमचे चॅनल subscribe करा