Homeनागपूर न्यूजधम्मदीक्षेचा वर्धापनदिन सोहळा साधेपणाने साजरा करणार

धम्मदीक्षेचा वर्धापनदिन सोहळा साधेपणाने साजरा करणार

Advertisements

दीक्षाभूमी स्मारक समितीची माहिती

नागपूर,ता. १३ ऑक्टोबर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्‍टोबर १९५६ साली नागवंशीयांच्या भूमीत लाखो अस्पृश्‍यांना तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा धम्म देत अशोका विजयादशमीला नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन सोहळा घडवून आणला. तेव्हापासून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी दरवर्षी न चुकता १४ ऑक्टोबर आणि विजयादशमीला दीक्षाभूमीवर येतात. धम्मदीक्षेला आज ६४ वर्ष पूर्ण होत आहे. परंतु, यावर्षी कोरोना विषाणूंनी थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नव्हे म्हणून प. पू. डॉ. आबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीने यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारे धम्मपरिषद व मुख्य धम्म सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

दीक्षाभूमीवर अनुयायांनी गर्दी करू नका. दरवर्षी प्रमाणे पंचशील ध्वजारोहण व बुद्धवंदना साधेपणाने घेण्यात येणार अशी माहिती पत्रपरिषदेत समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी आज दिली. यावेळी पत्रपरिषदेला डॉ. आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, विलास गजघाटे व एन. आर. सुटे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना फुलझेले यांनी सांगितले की, कोरोनाचे जीवघेणे सकंट देशावर घोघांवत असताना कोरोनाचे नियम पाळणे आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यंदा महामानव बाबासाहेबांच्या अनुयायांनी घरीच राहून १४ ऑक्टोबर आणि २५ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला होणारा धम्मचक्र प्रवर्तन सोहळा घरीच राहून साजरा करून बाबासाहेबांना आंदरांजली वाहावी असे आवाहन त्यांनी केले.

२४ ऑक्टोबरला समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण होणार तसेच समता सैनिक दलातर्फे मानवंदना यावेळी देण्यात येईल. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते तथागत बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यापर्ण करून बुद्धवंदना व भीम वंदना घेण्यात येईल. ९ वाजता स्तुपाच्या आत भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते बुद्धवंदना घेण्यात येईल.

सकाळी ९.३० वाजता भिक्षुसंघाद्वारे बुद्ध गाथांचे पठन व गांथांचे मराठी आणि हिंदीमध्ये भाषांतर कार्यक्रम पार पडणार असेही ते म्हणाले. अनुयायांसाठी यंदाच्या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण आवाज इंडिया व युसीएन बुद्धा या टीव्ही चॅनल्सवर दाखविण्यात येणार. यावेळी विलास गजघाटे यांनी सांगितले की, सोहळ्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. स्तुपाच्या डोम करीता केंद्र सरकारने दहा कोटी मंजूर केले. परंतु, आतापर्यंत चारच कोटी आल्याने काम रखडलेले आहे. त्यामुळे हे काम पूर्णत्वास आणण्याकरिता सरकारने प्रयत्न करावे, स्तुपातील चवथ्या गेटजवळील व स्तुपासमोरील आरोग्य विभागाची जागा महाविद्यालयाकरिता द्यावी, स्तुपा समोरील सिमेंटरोडचे काम लवकरात लवकर प्रशासनाने पूर्ण करावे अशी मागणी केली.

धम्मचक्र प्रवर्तन सोहळा साजरा करण्याकरिता देशासह जगभरातील लाखो बौद्ध अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यास पवित्र दीक्षाभूमीवर लाखोंच्या संख्येत येतात. परंतु, जगभरासह राज्यातही कोरोनाच्या महामारीने थैमान घातले आहे. अशात गर्दीला टाळण्यासाठी आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाच्या विनंतीला गृहीत धरून स्मारक समितीने यंदाचा धम्मदिक्षेचा सोहळा कार्यक्रम रद्द करण्याचा हिताचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे घरातच राहूण बाबासाहेबांना अभिवादन करून सहकार्य करण्याचे आवाहन समितीने केले

कोविड योद्धांच्या दू:खात समिती सहभागी-
यावर्षी कोविड-१९ मुळे जगभरात लाखोंच्या संख्येत नागरिकांना जीव गमावावा लागला. यात फ्रंटलाईनवर काम करणारे, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस, सफाई कर्मचारी व कोरोना योद्धांचे बलिदान गेले. या कोविड योद्धांना व त्यांच्या कुटुंबीयांच्या दुखात समिती सहभागी आहे. अशा कोविड योद्धांना आदरांजली वाहण्यासाठी यंदा दीक्षाभूमी स्तुपावर कुठल्याही प्रकारची रोषणाई करण्यात येणार नाही असा निर्णय समितीने घेतला.

Latest बातम्या