Homeराजकारणदेवेंद्र फडणवीस यांचा सत्ताधारी आघाडीवर टीकेचा पहिला बाण

देवेंद्र फडणवीस यांचा सत्ताधारी आघाडीवर टीकेचा पहिला बाण

Advertisements
Advertisements

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तासाभरातच भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते व संभाव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी आघाडीवर टीकेचा पहिला बाण सोडला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमावर टीकास्त्र सोडले. महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा करण्यात आल्या असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्रांचा साधा नामोल्लेखही या कार्यक्रमात असू नये हे दुर्दैवी आहे. नवे सरकार या मुद्द्याकडे लक्ष्य देईल, अशी आशा करू या, अशा शब्दांत फडणवीस यांनी नव्या सरकारमधील उणिवेवर बोट ठेवले.

Devendra Fadnavis

@Dev_Fadnavis

राष्ट्रवादीतून बंड करून भाजपसोबत गेलेल्या अजित पवार यांचे बंड फसल्याने देवेंद्र फडणवीस यांना अवघ्या ८० तासांत मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर महाविकास आघाडीने राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आणि या आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी आजच शिवतीर्थावर एका नयनरम्य व ऐतिहासिक अशा सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर अवघ्या दोनच तासांत मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेऊन नव्या सरकारने कामाचा धडाका सुरू केला आहे.

Latest बातम्या