Homeनागपूर न्यूजदू:खद!जिवंत आयुष्याचा जोडीदार बघता-बघता झाला मृतदेह!

दू:खद!जिवंत आयुष्याचा जोडीदार बघता-बघता झाला मृतदेह!


पत्नीचा रुग्णालयासमोर प्राणांतिक आक्रोश:भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या

नागपूर,ता. ९ ऑगस्ट: शहरात मृत्यच्या दहशतीने आता सर्वसामान्यांना मूळापासून हादरवले आहे.ऑगस्ट महिन्यापासूनच करोना मृत्यूच्या विळख्याने सामान्यांना करकरचून जखडले आहे.शहरात दररोज खाटा तसेच वेळेवर उपचार न मिळाल्याने नागपूरकर ज्येष्ठ नागरिक हा तडफडून आपले प्राण कधी रुग्णालयात तर कधी रस्त्यावर सोडत आहेत. वैशाली पिंजरकर महाल,संघ बिल्डींगजवळील रहीवाशी असून भारतीय जनता पक्ष्ातील महीला आघाडीच्या कार्यकर्त्या आहेत. त्यांचे यजमान विद्याधर पिंजरकर यांनी नुकताच वानाडोंगरी येथील शालिनीताई दत्ता मेघे रुग्णालयात उपचारा अभावी तडफडून प्राण सोडला! जिवंत आयुष्याचा जोडीदार वैशाली या त्या रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या…बघता-बघात त्यांचे मृतदेहात रुपांतर झाले आणि त्या….विमन्सक होऊन रुग्णालयासमोरच आक्रोश करु लागल्याची घटना सोशल मिडीयावर व्हायरल झाली.

वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे रुग्णालयात ही दूर्देवी घटना घडली.त्यांचे यजमान रेल्वे विभागातून निवृत्त झाले होते. श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने वैशाली यांनी त्यांना शालिनीताई मेघे रुग्णालयात दाखल केले हाते. मात्र या रुग्णालयात अतिशय हलगर्जीची वागणूक त्यांना एका डॉक्टरांकडून मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. ‘काकाजी काही होत नाही तुम्हाला चूपचाप बैठो’असं या ज्येष्ठ नागरिकाला तेथील स्टाफने वारंवार सुनावले. चुपचाप बैठो…चुपचाप बैठो…असेच त्यांन वारंवार ऐकावे लागले. वैशाली या हात पाय जोडून तेथील व्यवस्थापनेला,डॉक्टर्स लोकांना,स्टाफला यांना खूप त्रास होत आहे हो…यांना ऑक्सीजन लावा अशी विनंती करीत राहील्या मात्र तेथील डॉक्टर्सला माणूसकीचं पाझर फूटलंच नाही…. विद्याधर यांचे ह्दय बंद झाले तेव्हा त्यांना आयसीयूमध्ये घेऊन जाण्यात आले मात्र तेव्हा वेळ निघून गेली होती!

हे डॉक्टर आहेत की जल्लाद!असा प्राणांतिक आक्रोश या माऊलीने रुग्णालयासमोर करण्यास सुरवात केली आणि त्यांचा हा आक्रोश मग मोबाईल कॅमे-यात अलगद कैद झाला. फक्त पैसे खाण्यासाठी रुग्णालये सुरु आहेत अशी मार्मिक टिका वैशाली यांनी केली.दीड-दीड लाख रुपये सरकार या रुग्णालयांना देते ते सामान्य माणसांना मारण्यासाठी का? फक्त पैसे खाण्याचे काम ही रुग्णालये करीत असल्याचा आक्रोश त्या करीत राहील्या..एवढे पैसे खाऊनसुद्धा त्यांचे पोट भरत नाही..हे असे डॉक्टर…काही कामाचे नाही साले..हलकट…अशी शिवी त्यांनी व्यवस्थेवर आणि व्यवस्थापनावर दू:खावेगातून हासडली! मी बीजेपीची महिला आघाडीची सभासद असल्याचे उघडपणे सांगत आहे आणि याची मला काहीच भीती नाही कारण मी आता गप्प बसले तर इतरांचेही प्राण जातील.तीन दिवस या रुग्णालयात त्यांचे यजमान भरती होते.अत्यंत त्रासात होते. त्यांना श्‍वास घेण्यास खूप त्रास होत होता मात्र धृतराष्ट झालेल्या रुग्णालयाच्या प्रशासनाने शेवटपर्यंत ना त्यांना ऑक्सीजन लावले ना वेंटिलेटरवर ठेवले.

नुकतेच महापौर संदीप जोशी यांनी या रुग्णालयाचा दौरा केला व रुग्णालयातील व्यवस्थेबाबत आढावा बैठक घेतली.मात्र अश्‍या रुग्णालयांवर आता कठोर कारवाईची गरज भासत असून विशेष: भाजप पक्ष्ावर आता अनेकांचा रोष ओढवत आहे. करोनाच्या काळात या पक्ष्ाने नागपूरकर जनतेला वा-यावर सोडल्याचे उघडपणे बोलले जात आहे. करोना महामारीच्या या भीषण संकटासमोर सर्वच राजकीय पक्ष्,स्थानिक प्रशासन हतबल झालेले दिसत असून यात मरण फक्त आणि फक्त शहरातील सर्वसामान्य नागरिकांवर ओढवत आहे.
आज शहरात जिल्हाधिकारी,मंत्री पासून तर आयुक्तांपर्यंत वरिष्ठ पातळीवरील राजकीय नेते व पदाधिकारी हे देखील करोना बाधित झाले आहेत मात्र हे ही वास्तव आहे त्यांना ‘व्हीआयपी’असल्यामुळे तातडीने,अद्यावत रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी खाटा उपलब्ध होतात,मरतो मात्र फक्त सामान्य माणूस आहे…आजही स्थायी समितीच्या अध्यक्ष्ांनी पिंटू झलके यांनी एम्स रुग्णालयाच्या व्यवस्थेची पाहणी केली.भाजपच्या पदाधिका-यांचे हे वांझोटे पाहणी दौरे यातून सामान्य माणसाचे प्राण वाचणार आहेत का?असा खरा सवाल आता उपस्थित केला जात आहे. आजही शहरात ९ सप्टेंबर रोजी ५१ रुग्णांचा करोनामुळे जीव गेला. काल ८ सप्टेंबर रोजी ३४ प्राणहानि झाली होती. एवढे मृत्यू एकाच दिवसात होत असून,दररोज एवढे कुटुंब हे उधवस्त होत असल्याचे भयाण वास्तव आहे.एकटी वैशालीताई रुग्णालयासमोर आक्रोश करताना दिसतेय आणि मोबाईलच्या कॅमे-यात टिपल्या जातेय.

आज नागपूरात घरोघरी मृत्यूचा आक्रोश आणि चार भिंतीतील मृत्यूच्या भीतीचे सावट..हेच प्राक्तन शहरवासीयांच्या नशीबी आले आहे. केंद्राने कधीचेच हात झटकलेत.राज्य सरकारला अख्या मुंबईत टोलेजंग अनाधिकृत इमारतीचे अतिक्रमण न दिसता कंगना रानौतने दीडशे स्के.फूटांवर केलेले अतिक्रमण ‘जाड भिंगातून’ दिसले आणि तेवढ्याच तत्परतेने तेथील महानगरपालिकेने ती मर्णिकर्णिका बुलडोजरने उधवस्त केली.

उपराजधानीत सामान्य माणूस तडफडून मरतोय,एका बेडच्या अभावी,वेंलिटेरच्या अभावी,एका ऑक्सीजनच्या अभावी याच्याशी राज्य सरकारला काही एक देणे-घेणे नाही. करोनाचा काळ हा आज नाही तर उद्या संपून जाईल मात्र शतकातील या जीवघेण्या महामारीच्या काळात केंद्र , राज्य व स्थानिक प्रशासनाने देशातील नागरिकांना उपचारा अभावी जे मरणाच्या दारावर नेऊन पोहोचवले आहे…ते….मतदार म्हणून हे नागरिक कधीही विसरणार नाहीत..हेच खरे!

Latest बातम्या