Homeनागपूर न्यूजगडकरी मनपाचे हकदार नाहीत:पर्यावरणप्रेमींच्या तीव्र भावना

गडकरी मनपाचे हकदार नाहीत:पर्यावरणप्रेमींच्या तीव्र भावना

Advertisements

महापालिकेचे काम उत्तम गडकरींचे विधान:सोशल मिडीयावर उमटल्या तीव्र प्रतिक्रिया

सोनेगाव,गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणात पुन्हा कोट्यावधींचा खर्च

तलावा ऐवजी डबक्यांचे होणार साैंदर्यीकरण:तिस-या लाटेपूर्वी आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे काय?

कंत्राटदार आधी ठरतात:सौंदर्यीकरणराच्या कागदी योजना नंतर बनतात:स्थानिकांच्या भावना

नागपूर,ता. २९ ऑगस्ट २०२१: केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी काल शनिवार दि. २८ ऑगस्ट रोजी सोनेगाव तलावाच्या विकासासह सौंदर्यीकरणाच्या कामाचे भूमीपूजन केले,यावेळी बोलताना नागपूर महानगरपालिकेने गेल्या ५ वर्षात केलेली कामे ही फक्त ‘ट्रेलर’असून खरा चित्रपट पुढे आहे असे विधान त्यांनी केले. नागपूरकर नागरिकांना गडकरी यांच्या भाषणातील आता अगदी ‘मुखोद गद’झालेले मुद्दे म्हणजे,पाणी,सांडपाण्याचा पुर्नवापर,नागद नदीचे सौंदर्यीकरण,सिमेंट रस्ते,शिक्ष् ण,आरोग्य क्ष्ेत्रातील मनपाची कामगिरी,सिम्बॉयसिस,सीएनजी बसेस,मेट्रो इ.पुन्हा एकदा उच्चारवाणीने त्यांच्या भाषणात कर्णी पडलेत,आता नागपूरकरांनी मनपाला चांगल्या कामाचे बक्षीस ही देण्याचे त्यांनी आवाहन केले,यावर शहरातील पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त करीत या दोन्ही तलावांवर होणारा कोट्यावधींचा खर्च म्हणजे तलावाचे साैंदर्यीकरण नसून ‘डबक्यांच्या’ सौंदर्यीकरणावर होणारा अपव्यय असल्याची टिका केली,यापेक्ष्ा या दोन्ही डबक्यांच्या नैसर्गिक स्त्रोतांचा श्‍वास मोकळा करण्यासाठी तसेच अंबाझरी,फूटाळा आणि गोरेवाडा या तीन्ही तलावांच्या नैसर्गिक स्त्रोतांचे संरक्ष् ण करण्यासाठी हा पैसा खर्च करावा, त्यांच्या संरक्ष् णासाठी तातडीने संरक्ष् ण भिंती बांधाव्या,अशी मागणी गडकरी यांना केली आहे.

आंघोळीला साबण नाही पण पावडरचा डब्बा घेऊन फिरतात आहे‘अश्‍या तीव्र शब्दात शहरातील अनेक पर्यावरणप्रेमींनी मनपातर्फे या दोन्ही तलावांच्या ५ ते ७ व्यांदा ‘पुर्न सौंदर्यीकरणा‘वर होणा-या खर्चावर टिका केली.या दोन्ही तलावांना कॅचमेंट नाहीत,पावसाचं जेवढं पाणी पडतं,तेच या तलावांचे पाणी म्हणून गणल्या जातं.यांच्या नैसर्गिक स्त्रोतांचा श्‍वास विकासाच्या नावाखाली गेल्या काही दशकात ले-आऊट्सच्या सिमेंट क्रांक्रिटच्या थडग्यांखाली कधीचाच कायमचा कोंडला गेला असल्याचे ते सांगतात.

सौंदर्यीकरणावर जनतेच्या कराचा कोट्यावधी पैसा खर्च करण्या आधी सोनेगाव तलावरुपी डबक्यांना मूळ स्वरुपात आणावे.त्याचा नैसर्गिक स्त्रोतांचा शोध घेऊन तो मोकळा करावा.गांधी सागर तलाव देखील तलाव नसून डबकेच आहे कारण या तलावाचे देखील मूळ नैसर्गिक स्त्रोत हे रेल्वेची जागा,कॉटन मार्केट,एम्प्रेस मिल इत्यादींच्या विकास कामात कधीचेच लृप्त झाले आहेत,जोपर्यंत या ठिकाणी एम्प्रेस मिल होती तोपर्यंत या तलावाला खालून पाझर होता मात्र ज्या वेळी ‘मिल ’ चा ‘मॉल‘झाला हे झरे लृप्त झालेत.आता गांधी सांगर तलावाचे देखील डबकेच झाले असल्याचे त्यांचे म्हणने आहे.

परिणामी,गांधीसागर तलावाच्या सौंदयीकरणासाठी सांगितल्या जात असल्याप्रमाणे ५२ कोटींची निविदा काढण्यात आली असल्याने व त्यात १४ कोटी ९० लाख रुपये फडणवीस यांच्या मुख्यमंंत्री काळात नागपूर महानगरपालिकेकडे जमा असल्याने फक्त वरवरचे सौंदर्यीकरण म्हणजे,खोलीकरण,सशक्तीकरण,जॉगिंग ट्रॅक,बोटिंग,लेझर शो इ.च्या सुविधा निर्माण करणे म्हणजे जनतेच्या पैश्‍यांचा चुराडा असल्याचे मत येथील स्थानिक रहीवाशी देखील व्यक्त करतात.

त्यापेक्ष्ा येथील अवैद्य धंदे यांना पायबंद बसावा,आत्महत्या रोखण्यासाठी भिंती बांधाव्या,साैंदर्यीकरणाला विरोध नाही मात्र कंत्राटदाराचे नाव,निधी,कार्यकाळ,किती काळात काम पूर्ण होणार?पुढील २५ वर्षांसाठी या दोन्ही साेनेगाव व गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणाचा रखरखाव व सुरक्ष्ेची जवाबदारी कंत्राटदारांवर राहणार का?या संपूर्ण माहितीचे फलक गडकरी यांच्या उद् घाटनाच्या वेळीस कार्यक्रम स्थळांवर का नव्हते?असा अाक्ष्ेप पर्यावरणप्रेमी नोंदवतात.

सर्वात महत्वाचे म्हणजे हे उपक्रम नागपूर महानगरपालिकेचे असताना देखील कार्यक्रम स्थळी मनपाच्या फलकाऐवजी नेत्यांचेच फलक झळकत होते!मग कशाच्या आधारावर गडकरी हे मनपासाठी नागपूरकरांकडून मनपाच्या चांगल्या कामांसाठी बक्षीस मागत आहेत?असा प्रश्‍न ते उपस्थित करतात,गडकरी हे काही मनपाचे हकदार नाहीत,ते केंद्रिय मंत्री आहेत,मनपाच्या ढिसाळ व भ्रष्ट काराभारासाठी नागपूरकरांकडे त्यांनी बक्षीस मागू नये,अशी भावना ते व्यक्त करतात.

करोना काळात जेव्हा नागपूरचीच नव्हे तर देशातील आरोग्य व्यवस्थाच पार कोलमडून पडली होती,अनेकांनी आपले आप्तस्वकीय या महामारीत गमावले,ते दु:खं ती यातना कधीही न भरुन निघणारी असताना,करोनापासून कोणताही धडा न घेता अद्यापही कोट्यावधी रुपये हे शहरातील डबक्यांच्या किवा नागनदीसारख्या नाल्याच्या पुर्नजिवन किवा सौंदर्यीकरणावर खर्च होणार असतील तर या शहरातील नागरिकांचा मग कोणीही वाली उरला नसल्याचा संताप देखील चांगलाच व्यक्त होत आहे.

ज्या महापालिकेचे काम गडकरी हे उत्तम ठरवतात त्या मनपामध्ये आरोग्य विभागाचा करोना काळातील भ्रष्ट कारभार विरोधकांनीच समोर आणला,मनपाच्या आरोग्य विभागातर्फे चालविण्यात येणारा एक ही दवाखाना अद्यापही नागरिकांना अद्यावत सोयीसुविधा देण्यास सुसज्ज नाही,कराेनाची तिसरी लाट आल्यास पुन्हा त्यांची पोलखोलच होणार आहे,ऑक्सीजन अभावी अनेकांचा तडफडून जीव गेला,मनपाच्या या आरोग्य विभागात पुरेसा मेडीकल स्टाफ नाही,योग्यता नसलेल्या अधिकारी व कर्मचा-यांचा भरणा आहे,ज्यांना जनतेच्या सुख-दु:खाशी काही एक घेणे-देणे नसून फक्त शासकीय पगार व ‘वरची मलाई‘ओरपण्यात रस आहे अश्‍या कारभाराला केंद्रिय मंत्री जेव्हा ‘उत्तम‘ठरवितात तेव्हा,अनेकांचा जीव खवळतो व समाज माध्यमातही त्याचे प्रतिबिंब उमटताना दिसतात.

सीताबर्डी,धरमपेठ रोडवर एक इंचचा तरी फूटपाथ गडकरी यांना दिसतो का?उड्डान पुलांवरुन गाड्यांचा ताफा निघतो तिथून तो दिसणे अशक्य आहे,मनपाच्या अनेक झोनच्या अधिका-यांनीच शहरातील फूटपाथ दूकानदारांना विकून हप्तेखोरीची ‘परंपरा’ कायम राखली आहे तरी देखील गडकरी यांना मनपाचा कारभार उत्तम वाटतो?शहरात मोकाट श्‍वांनाचा नागरिकांना होणारा त्रास मनपाच्या आरोग्य विभागाची ‘उत्तम‘ कामगिरीचेच आणखी एक उदाहरण आहे.दर वर्षी श्‍वानांच्या नसबंदीवर कोट्यावधीचा खर्च होऊन ही चीनच्या लोकसंख्येला ही मागे टाकेल एवढी संख्या मोकाट श्‍वानांची एकट्या नागपूर शहरात झाली आहे.एका-एका गल्लीत ६- ७ मोकाट श्‍वांनाचा झुंड ‘सुखनैव ’ विहार करीत असतो.

एेन शहराच्या मध्यभागी यशवंत स्टेडियम समाेर परप्रांतिय भिक्ष्ेक-यांनी आपल्या मुलाबाळांसोबत वर्षानुवर्षे ठाण मांडले आहे,सकाळची प्रात:विधी एवढ्या मोठ्या संख्येने तिथेच मनपाच्या रस्त्यांवरच उरकली जात असल्याने तेथील दूकानदार व स्थानिक रहीवाशी २४ तास दूर्गंधीमुळे नाकाला ‘मुखपट्टीका ’बांधून असतात,तलावांसोबत शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणाचे काय?असा सवाल विचारला जात आहे.

तृतीयपंथियांनी जवळपास शहरातील प्रत्येकच सिग्नलवर धुमाकूळ घातला आहे,चारचाकीवाले तर काच वर करुन बाहेरुन त्यांच्या शिव्या ऐकतात पण दूचाकीवाला मात्र बिचारा मध्यवमवर्गीय सिग्नलवर आयताच त्यांच्या तावडीत सापडतो,मग तृतीयपंथियांचा हात आधीच या सामान्य मध्यमवर्गीयाच्या रिकाम्या झालेल्या खिश्‍यापर्यंत जातानाचे दृष्य,शहरातील सौंदर्यीकरणात कोणती भर घालतात?हा प्रश्‍न देखील अनेकांना अस्वस्थ करतो.

नागपूर शहराच्या बाह्य भागांची अवस्था शब्दात मांडण्यासारखी नसली तरी ऐन मध्यभागी रामकृष्ण मठाजवळील कचरा मनपाच्या एजी, बीव्हीजीसारख्या कंपनीतर्फे का उचलला जात नाही?अहोरात्र या उच्चभ्रू भागात कच-यांचा ढीग का दृष्टिक्ष्ेपात पडत राहतो?कारण रामकृष्ण मठ झोनल अधिका-यांचे हात ओले करीत नाही,म्हणून का?असा संताप ही शब्दांमधून व्यक्त होत आहे.

मनपाच्या नेमक्या कोणत्या विभगाच्या कोणत्या भ्रष्टाचारमुक्त कामगिरीला केंद्रिय मंत्री उत्तम ठरवित आहेत?असा प्रश्‍न आता नागपूरकरांना पडला आहे.

दरवेळी नारळ फोडून,भाषणे देऊन नागपूर शहराच्या,तलावांच्या सौंदर्यीकरणात भर पडो ना पडो,कंत्राटदार,मनपाचे प्रशासकीय अधिकारी व काही सत्ताधारी पदाधिकारी यांचे मात्र ‘कल्याण‘घडते, गांधीसागर तलावाचे मनपातर्फे पहील्या वेळी  सौंदर्यीकरण झाले तरी दरवर्षी या तलावामधील मासोळ्या का मरतात?पर्यावरणाची अतोनात हानी का होत आहे?गडकरी हे पर्यावरणवाद्यांचा सल्ला का घेत नाहीत?तलावा जवळील स्थानिक रहीवाश्‍यांच्या काय अपेक्ष्ा आहे,हे का विचारात घेत नाही?असे अनेक प्रश्‍न शहरातील पर्यावरणवाद्यांना व स्थानिक रहीवाश्‍यांना पडले आहेत. काम कोणाला द्यायचे,आधी कंत्राटदार ठरतो मग वातानुकूलीत कक्ष्ात बसून प्रकल्पाचा नकाशा तयार होतो,तोच प्रकल्प विकासाच्या गोंडस नावाखाली जनतेच्या मथ्यावर मारला जातो, हे सर्वकाही जनतेच्या कल्याणासाठी,सुविधेसाठी आहे अशी दिशाभूल केली जाते,५४ कोटींच्या या गांधीसागर सौंदर्यीकरणाच्या प्रकल्पातही कंत्राटदारावर पुढील २५ वर्षांसाठी रखरखाव व सुरक्ष्तितेसाठी जवाबदारी का निश्‍चित करण्यात आली नाही?केंद्रिय मंत्री आज या प्रकल्पाचे उद् घाटन करीत असताना कुठेही असा फलक का नव्हता?असा सवाल विचारला जात आहे.

५४ कोटींच्या या प्रकल्पात किमान १ कोटी खर्च करुन डबके झालेल्या या तलावांमधील ऑक्सीजनची पातळी वाढवण्यासाठी यंत्रे बसवा.यामुळे तलावातील मासोळ्या यांचे प्राण तरी वाचतील,असा आर्जव येथील स्थानिक रहीवाशी करीत आहे कारण मृत मासोळ्यांच्या दुर्गंधीमुळे त्यांना नरक यातनाच त्या काळात भोगावी लागत असते.

मेट्रोच्या पिल्लरमुळे अंबाझरी तलावाच्या सुरक्ष्ा भिंतीला मोठे भगदाड पडले आहे,अविरत त्यातून पाण्याची एक मोठी धार वाहत आहे,एक दिवस पावसाने पातळी ओलांडताच आधीच कमजोर झालेली ती भिंतच वाहून क्ष् णार्धात अगदी धंतोलीपर्यंतची घरे पाण्याखाली बुडालेली दिसतील,ती धार थांबवण्यासाठी मनपाने काय केले?मेट्रोने मनपाकडे या कामासाठी एक कोटी रुपये जमा केल्याचा दावा केला आहे,अंबाझरीचा बंधारा मजबूत करण्यासाठी व सतत वाहणारी ती धार थांबवण्यासाठी मनपा कशाची वाट बघत आहे?महाप्रलयाची का?

आधी अंबाझरीची धार बंद करावी कि डबक्यांचे सौंदर्यीकरण? नागरिकांच्या जीवांची तमा नसल्यानेच मनपाची ‘प्राथमिकता’ ही कोट्यावधी खर्च करुन आधी डबक्यांच्या सौंदर्यीकरणात आहे,हे स्पष्ट झाले असताना त्याच मनपाचा कारभार गडकरी ‘उत्तम‘कसे मानू शकतात,असा संतप्त सवाल शहरातील पर्यावरणप्रेमी करीत आहेत.

Latest बातम्या