Homeनागपूर न्यूजगडकरींचे संपूर्ण लक्ष विकासाकडेच:शरद पवार यांचे गौरवोद्गार

गडकरींचे संपूर्ण लक्ष विकासाकडेच:शरद पवार यांचे गौरवोद्गार

Advertisements

नाग विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्सतर्फे अायोजित संवाद उपक्रमात पवार यांनी केले गडकरींचे काैतूक

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता. १७ नोव्हेंबर: कोणताही राजकीय पक्ष सत्तेवर आल्यास पक्षीय धोरण बाजूला सारुन त्याचे एकमेव लक्ष तीन गोष्टींवर असणे अत्यंत गरजेचे आहे,आपली अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने शेती,उद्योग आणि व्यापार या तीन गोष्टींवर आधारित आहे,या तीन गोष्टींच्या विकासावर सत्ताधारी पक्षाने लक्ष केंद्रित करायला हवे,केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे संपूर्ण लक्ष विकासाकडेच असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे नाग विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्सतर्फे आयोजित ‘व्यापारी व उद्योगक संवाद ’कार्यक्रमात काढले.

गडकरी हे पक्ष पाहत नाही तर समस्या बघतात,विकासाच्या मुद्दावर सदैव समर्थन देण्याची नीती गडकरींची असते,पक्ष नव्हे तर समस्या बघणारे ते एकमेव नेते असल्याचे कौतूकही पवार यांनी याप्रसंगी केले.गडकरी यांचे गोडकौतूक करताना पवार यांनी मात्र अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टोला हाणल्याचे बोलले जात आहे.राज्यात गडकरी व फडणवीस यांच्यातील अदृष्य विस्तवाची, खासगीतही चर्चा होत असते,हे विशेष.आज पवार यांनी देखील हाच धागा पकडून गडकरी यांच्या विकासात्मक ध्येय धोरणांचे कौतूक करण्यास कोणतीही कमतरता ठेवली नाही.

याप्रसंगी अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष बी.सी.भरतीया यांनी अमरावतीत झालेल्या दंगलीदरम्यान व्यापारांची दूकाने फोडण्यात आली,त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सरकारने या सर्व व्यापा-यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी पवार यांच्या समक्ष ठेवली.

अनेक व्यापारी व उद्योजकांनी मिहान,बुटीबोरी येथील उद्योगांची स्थिती,अवाजवी करप्रणाली इ.समस्यांविषयी पवारांसमोर आपल्या व्यथा मांडल्या.यावर संपूर्ण मुद्दांची व प्रश्‍नांची एक यादी व्यापा-यांच्या शिष्टमंडळाने बनवावी व येत्या दहा दिवसात मला पाठवावी अशी सूचना पवारांनी केली.

हिवाळी अधिवेशनानंतर मी तुम्हाला वेळ देतो,संबंधित विभागाच्या अधिका-यांसोबत बसून व्यापारी व उद्योजकांच्या समस्यांवर तोडगा काढता येईल असे ते म्हणाले.जानेवरीच्या पहील्या आठवड्यात व्यापारी व उद्योजकांच्या शिष्टमंडळाने मुंबईला येऊन भेटण्याचे निर्देश शरद पवार यांनी दिले.

अमरावतीच्या दंगलीत व्यापा-यांचे आर्थिक नुकसान झाले यावर देखील एक धोरण बनायला हवे असे ते म्हणाले.अश्‍या दंगलीत व्यापा-यांच्या आर्थिक नुकसानाची भरपाई सरकार ऐवजी आंदोलनाच्या आयोजकांकडून केल्या गेली पाहिजे,असे त्यांनी सांगितले.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या तीन अर्ध्यव्यू असणा-या शेती,व्यापार व उद्योगाकंडे कोणत्याही पक्षाचे सरकार असो त्यांनी लक्ष दिले पाहिजे,असे ते म्हणाले.आर्थिक विकासात असंतुलन असेल तर त्यात संतुलन साधायला हवे.या तिन्ही क्षेत्रांचा समतोल विकास झाला पाहिजे यासाठी एक धोरण असायला हवे.

जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात एकूण ८० टक्के कृषि आधारित अर्थव्यवस्था होती,आज ती ३० टक्क्यांवर आली आहे.कृषि क्षेत्राचा विकासही तितकाच महत्वाचा आहे.शेतक-यांना देखील रोजगार उपलब्ध झाला पाहिजे.

उद्याेगांच्या गुंतवणूकीसाठी राज्यातले वातावरण देखील चांगले असायला हवे.नागपूरचे उद्योजक हे तर शेजारच्या मध्यप्रदेश,छत्तीसगड व आंध्रप्रदेशात उद्योग सुरु करीत असल्याकडे पवार यांचे उपस्थित उद्याेजकाने लक्ष वेधले.एमएमआरडीचे धोरण यासाठी कारणीभूत असल्याचे उद्योजकाने सांगितले.

भरमसाठ शुल्क आकारणी करुन एमएमआरडी उद्योजकांना डिमांड पाठवित असल्याची तक्रार याप्रसंगी करण्यात आली.ट्रेड यूनियनमुळे देखील त्रस्त होऊन अनेक उद्योग नागपूरातून निघून गेल्याचे सांगण्यात आले.

सरकारने संसाधने पुरविली,वीज पुरवठा केला,अर्थसहाय्य केले मात्र कामगार संघटनांच्या धोरणांमुळे उद्योग टिकून राहत नसल्याचे सांगण्यात आले.

यावर आजच्या संवाद-उपक्रमात जे-जे मुद्दे व्यापारी वर्गाने उपस्थित केले ते सर्व राज्याच्या विकासाशी निगडीत असल्याचे शरद पवार म्हणाले.आपली व्यथा व प्रश्‍ने मांडताना एकाही उद्योजकाने सरकारवर टिका केली नसल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

याप्रसंगी मंचावर नाग विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अश्‍विन मेहाडिया,,माजी अध्यक्ष हेमंत गांधी,राष्ट्रवादी नेत्या आभा पांडे, शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे,राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर आदी उपस्थित होते.

गांधी तुम्ही आमचेच,परत या:प्रफूल्ल पटेल

पवार यांना विदर्भाविषयी काही सांगण्याची गरज नाही,अनेक दशकांपासून ते विदर्भाला ओळखतात.जेव्हा त्यांच्या मनात महाराष्ट्राच्या विकासाची गोष्ट येते तेव्हा त्यांची ईच्छा व मानस हा संपूर्ण राज्याच्याच विकासाचा असतो.हे खरे आहे जाेपर्यंत उद्योगांचा विकास होणार नाही तोपर्यंत रोजगार उपलब्ध होणार नाही.

आजही पवार यांनी ते थांबलेल्या हॉटेलमध्ये पोहोचताच ज्या मॅनेजरने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्याला व्यवसाय कसा सुरु असल्याचा प्रश्‍न विचारला.७० टक्के व्यापार सुरु झाल्याचे मॅनेजर यांनी सांगताच,चला सुरु तर झाला,असे पवार म्हणाले असल्याची माहिती पटेल यांनी विशद केली.

पवार यांची अर्थव्यवस्थेची नाडी ताडण्यात पीएच.डी आहे.बुटीबाेरीत इंडोरामाचा पहीला प्लान्ट आमच्या सरकारनेच आणला होता.मिहान हे देखील आमच्या सरकारच्या काळात विकसित झाला होता मात्र सरकार बदलले आणि मिहानचा विकास ठप्प झाला.
व्यापा-यांनी आज मांडलेल्या समस्यांचे योग्य निराकरण योग्य वेळी झाले पाहिजे.पाच वर्षांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण होणे म्हणजे यात व्यापारीच नव्हे तर सरकारचे देखील आर्थिक नुकसानच आहे.पवार यांनी आज लहान-लहान गोष्टींची देखील नोंद घेतली आहे.येथून गेल्यावर ते नक्कीच व्यापा-यांच्या समस्यांवर तोडगा काढतील.

राजकीय भाषणबाजी तर सगळेच करतात पण काम कोणी करत नाही,असा टोला त्यांनी मागील सरकारला हाणला.यासाठी व्यापक दृष्टिकोण असायला हवा.शेणाची गोवरी देखील आज ॲमेझोनवर विकल्या जात आहे.सरकारला देखील कामाचे स्वरुप बदलावे लागेल.पवार हे व्यापा-यांचे हितचिंतकच आहेत.

हेमंत गांधी तुम्ही ही आमचेच होते,राष्ट्रवादीत परत या,आम्हाला धनाने नव्हे तर तन आणि मनाने साथ द्या,अशी साद राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफूल्ल पटेल यांनी याप्रसंगी घातली.

Latest बातम्या