
८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण ही पवारांचीच शिकवण
नागपूर,ता. ५ जून: एक निर्धारित समयी आपल्या कामाची चूणूक दाखवून पदापासून दूर गेलं पाहीजे जेणेकरुन नव्या नेतृत्वाला नव्या पर्दापणाला संधी मिळेल जी राष्ट्रवादी पक्ष्ाच्या हितासाठी जास्त योग्य राहील.मी माझ्या योग्यतेप्रमाणे गेल्या साढे चार वर्षांपासून शहर अध्यक्ष् पदावर आहे तेव्हापासून मी पक्ष् वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला.शहर अध्यक्ष् पदावर असताना मी कोणताही गटतट ठेवला नाही.आमच्या पक्ष्ाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांचीच शिकवण आहे की ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करा मी त्यांच्या मार्गदर्शनानुसार चाललो म्हणूनच बरेच लोकं मला म्हणत ही होते की ‘अनिल हा काही राजकारणी नाही’लोकांचे हे म्हणने मला आवडत ही होतं असे विधान राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष् अनिल अहिरकर यांनी आज शनिवार दि. ५ जून रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत केले.
१०० टक्के राजकारण करणारी माणसे वेगळीच असतात मात्र माझा पिंड हा संघटनेत काम करणा-यांचा आहे.विद्यार्थीदशेत ही मी संघटनेचेच काम केले.तीन वेळा मी विद्यापीठ प्रतिनिधी देखील राहीलो.मात्र काही कालांतराने असं वाटलं ‘पैसा खूदा तो नही मगर खूदा से कम भी नही’.काही अश्या घटना माझ्यासोबत घडल्या की तुमच्याकडे पैसा असेल तर विद्यापीठाचे अध्यक्ष् पद ही तुम्हाला देऊ शकतो!राजकारणात देखील असंच काहीसं घडतं.
२५ वर्षे मी क्रीडा संघटनेत देखील काम केलं.राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत माझा महत्वपूर्ण सहभाग राहीला.अनेक व्यापारी संघटनांचा देखील मी अध्यक्ष् राहीलो मात्र तीन-चार वर्षानंतर मी अध्यक्ष् पद सोडत राहीलो कारण नव्या लोकांनाही संधी मिळाली पाहीजे,हाच माझा विचारांचा कल राहीला असल्याचे ते म्हणाले.
गिरीश गांधी यांच्यामुळे राजकारणात आलो.विशेष त: मध्य नागपूरचे अध्यक्ष् पद मागितले.५ ते ६ नगरसेवक निवडून आणन्याची क्ष् मता ही सिद्ध केली.माझे ते काम बघून बहूतेक प्रदेश पदाधिका-यांना ते आवडलं असेल म्हणून शहराचं अध्यक्ष् पद मला त्यांनी बहाल केलं.
माझ्या पूर्वी या पदावर अनिल देशमुख होते.मी या पदावर आल्यानंतर शहरात संघटना कशी मोठी होईल याकडे लक्ष् दिलं व जवळपास दररोज लहान मोठे इव्हेंट्स घेत राहीलो.आपले विभागीय अध्यक्ष् यांना प्रोत्साहन देण्याचे काम मी काल राजीनामा देण्याच्या दिवसापर्यंत केले आहे.
अनेक लोकांची ईच्छा अध्यक्ष् होण्याची असते तो एक मानवी स्वभाव आहे मग त्यात राजकारण आणतात तो ही एक स्वाभाविक भाग आहे.राजकारणात हे घडतंच राहणार मी माझ्या अधीन असणा-या सहका-यांना देखील हेच सांगितले या घडामोडीला खेळीमेळीच्या वातावरणात घ्यायचं असतं.
मीच राष्ट्रवादींच्या प्रदेशाध्यक्ष्ांना सांगितले माझा कार्यकाळ ३ वर्षांचा होता मात्र मला साढे चार वर्षे काम करायला मिळाले.आता माझा कार्यकाळ संपला आहे माझा राजीनामा स्वीकारा.त्यांनी मला आणखी एक दिवस थांबायला सांगितले त्यामुळे आणखी एक दिवस मुंबईत थांबलो.माझ्यासोबत ज्येष्ठ नेते दीनानाथ पडोळे हे देखील होते.
राजीनामा दिल्याशिवाय मी मुंबईतून जाणार नसल्याचे मी वरिष्ठांना सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा केली व यानंतर माझा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची माहिती अनिल अहीरकर यांनी दिली.
यानंतर ही त्यांनी मला एक दिवस थांबवून पक्ष कार्यालयात बोलावून महाराष्ट्र प्रदेशचं उपाध्यक्ष् पद बहाल केलं जे मी आनंदाने स्वीकारलं.आता नवीन जवाबदारी व नवीन ठिकाण यात देखील मी आपल्या कामाची चूणूक दाखवून देईल असे ते बोलले.
गेल्या ४ वर्षात राष्ट्रवादीच्या आंदोलनाबाबत प्रश्न विचारला असता पक्ष्ातर्फे पेट्रोल,डिजेल भाववाढीवर अनेक आंदोलन झालीत,आमच्या नेत्यांवर जेव्हा जेव्हा चूकीचे आरोप झालेत तेव्हा देखील राष्ट्रवादी शहरात रस्त्यावर उतरली असल्याचे त्यांनी सांगितले.उघड्या डोळ्यांनी बघितले तर संविधान चौकातील आंदोलने तुम्हाला दिसतील,अशी पुश्तीही त्यांनी जोडली.
नागपूर मनपाच्या निवडणूकीसंबधी बोलताना माझ्या कार्यकाळात मी सर्व वार्डात बूथ लेवलवर संघटना बळकट केली,मनपा निवडणूकीत आम्हाला कंत्राटी पद्धतीने जागा नकोत त्यामुळेच वारंवार प्रसार प्रचार माध्यमात देखील मी सांगितले आहे वेळ पडली तर आम्ही ‘एकला चालो रे हे धोरण स्वीकारु’.याशिवाय नागपूर शहराच्या विधान सभेच्या किमान दोन जागा मी अधिकारवाणीने पक्ष् श्रेष्ठींना मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष् नाना पटोले यांच्या मनपाच्या सर्व जागा लढू या विधानाकडे लक्ष् वेधले असता प्रत्येक पक्ष्ाला आपल्या कार्यकर्त्यांना स्फूर्ती द्यायची असते,असे बोलणे गरजेचे आहे कारण यामुळेच प्रत्येक वार्डातील कार्यकर्ता हा कामाला लागतो.आपल्या कार्यकर्त्यांना ऑक्सीजन देण्यासाठी राजकारणात असे विधान करावेच लागतात अशी स्पष्टोक्ती या प्रसंगी अनिल अहीरकर यांनी दिली.
महाविकासआघाडीमध्ये सन्मान राखून जर जागांचे वाटप झाले तरच अाम्ही ते स्वीकारु.गठबंधनात आमच्या ताकदीचा फायदा त्यांना आणि त्यांचा आम्हाला होणारच आहे.शेवटी पक्ष्ाची ताकद वाढवणे हेच अध्यक्ष्ांचे काम असते.
नागपूरात कोणत्या तीन विधानसभा मतदारसंघांची माणगी करणार आहे?या प्रश्नावर बोलताना दक्ष्ि ण,पूर्व मध्य यापैकी जी ही सूटेल त्याचा निर्णय पक्ष्श्रेष्ठी घेतील.मनपामध्ये देखील ४० टक्के ज्यांचा पालकमंत्री आहे त्या पक्ष्ासाठी जागा सूटतील.आमचा पालकमंत्री नसल्याने शिवसेना व राष्ट्रवादी ३०-३० टक्के जागांवर निवडणूक लढवू हा फॉर्मूला ठरला असल्याची माहिती त्यांनी दिली.
मात्र तुमचं अस्तित्वंच नाही असे जर कोणी म्हणत असेल तर मग दाखवू आमची ताकद,असे ही ते म्हणाले.
शहरअध्यक्ष् पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?या प्रश्नावर बोलताना येत्या ३-४ दिवसात प्रदेशाध्यक्ष् जयंत पाटील हे नागपूरला येणार असून तेच निर्णय घेतील. माझ्याकडे या पदासाठी योग्य अशी ५-६ नावे आहेत मात्र पक्ष् श्रेष्ठी म्हणून तेच निर्णय घेतील,अश्या शब्दात त्यांनी हा प्रश्न टोलवून लावला.
एखाद्या मोठ्या नेत्याने एखाद्याचे नाव घेऊन टाकले तरी ते शहराध्यक्ष् होणार नाही,हे मी जाणीवपूर्वक सांगत असल्याचे अहीरकर म्हणाले.याचे कारण काल परवापर्यंत जे नेते नागपूरकडे पूर्णपणे दूर्लक्ष् करीत होते ते इतक्यात फारच लक्ष् द्यायला लागले.लक्ष् देत आहेत ही चांगली गोष्ट आहे मात्र असे करताना तुम्ही येथील लोकांनाच जर अडचणीत टाकायला लागले तर ते योग्य नाही.
कोणत्याही नेत्यामुळे पक्ष् चालत नाही,पक्ष् कार्यकर्त्यांमुळेच चालतो.म्हणूनच पक्ष् श्रेष्ठींना नागपूरात येण्याची विंनती केली तुम्ही नागपूरात या,कार्यकर्त्यांना भेटा आणि तिथून तुम्ही योग्य व्यक्ती निवडा.
तुमच्या नंतर शहर अध्यक्ष् कोण?यावर बोलताना माझ्यानंतर अनेक नावे असून ५-६ लोकांची फळी असल्याचे त्यांनी सांगितले.यात ज्येष्ठ असणारे व दोनवेळा नगरसेवक व दोन वेळा आमदार राहीलेले नेते दिनानाथ पडोळे आहेत,पक्ष्ाच्या सुरवातीपासून कार्याध्यक्ष् राहीलेले मस्के आहेत, नुकतेच पक्ष्ात प्रवेश केलेले प्रशांत पवार यांची नावे आघाडीवर आहे मात्र एक नाव मी जाणूनबूजून घेणार नाही कारण मला राजकारणात चारित्र्याने स्वच्छ असणारा माणूस राजकारणात हवा आहे., जनमाणसामध्ये ज्याची प्रतिमा चांगली नाही किवा शरद पवार यांनी जर तिकीट दिले नाही तर माझ्यासमाेर पवार साहेबांच्या फोटोला जोडे-चपला मारले तर हे मुळीच सहन होण्यासारखं नाही किवा घराच्या चार भिंतीत तुम्ही काय करता याच्याशी काेणाला काही एक घेणे-देणे नाही मात्र सार्वजनिक ठिकाणी वावरताना तुमचं वर्तन अयोग्य असणे,जुगार खेळणे कसं योग्य आहे?असा प्रश्न त्यांनी केला.
माध्यमांनीच हे दाखवलं आहे आम्हाला,राजकारणात किती दिवस हे सहन करणार?संयम ठेऊन राजकारण करण्याची गरज आहे त्याच बरोबर आपल्यामुळे पक्ष्ाची प्रतिमा खराब होणार नाही याची काळजी घेण्याची नितांत गरज असल्याचे अहीरकर यांनी सांगितले.
कोणी कितीही शक्तीशाली असला तरी अश्या लोकांना जर आपण पुढे वाढवलं तर ते नैतिकतेला धरुन होणार नाही अशी पुश्ती ही त्यांनी जोडली.याबाबत प्रदेशाध्यक्ष् जयंत पाटील तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी स्पष्ट बोलणे झाले की नागपूर शहरात जर एखादा नेता पक्ष्ाची प्रतिष्ठा मलीन करत आहे तर त्याची तक्रार तुमच्यापर्यंत आल्यानंतर त्या तक्रारीची शहानिशा केलीच पाहीजे व त्यावर निर्णय घेतलाच पाहीजे मग तो नेता लहान असो किवा मोठा असो,असे जर घडणार नसेल तर जनसामान्यात कोणता निरोप जाईल?याबाबत स्पष्ट बोलणे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणीतरी मोठा नेता या ठिकाणी येतो व नाव घोषित करतो हे योग्य नाही,माझ्या या तक्रारीमुळेच त्या नावावर ‘स्थगिती’मिळाली असल्याची पुश्तीही त्यांनी जोडली.
जो कोणी शहर अध्यक्ष् बनेल त्याला अनिल अहिरकर पूर्ण प्रामाणिकपणे माझ्या पूर्ण कार्यकर्त्यांसह ६ विभागीय अध्यक्ष् तसेच विविध सेल प्रमुखांसह सहकार्य करणार असल्याचे आश्वासन ही त्यांनी दिले.
मनपा निवडणूकीत किती नगरसेवक निवडून आनणार या प्रश्नावर उत्तर देताना किमान ४० नगरसेवक यावेळी निवडून आणना असल्याचे काम गेल्या ६ महिन्यापासूनच सुरु झाले असल्याचे त्यांनी सांगितले.वॉर्ड लेवलवर इच्छूकांनी गेल्या ६ महिन्यांपासूनच काम सुरु केले असून मनपाची निवडणूक ही नेत्याचंी नसून कार्यकर्त्यांचीच असल्याचे त्यांनी सांगितले.काँग्रेसप्रमाणे राष्ट्रवादीत मुंबई,दिल्लीतून निर्णय होण नाहीत,स्थानिक पातळीवरच पक्ष् श्रेष्ठीतर्फे ५-७ लोकांची समन्वय समिती स्थापन केली जाईल व या समितीच्यामार्फतच नावे निश्चिती व बी-फॉर्म वाटप होईल.
आभा पांडे यांच्या पक्ष् प्रवेशामुळे नाराजीच्या प्रश्नावर ही फार चुकीची संकल्पना असल्याचे अहिरकर यांनी सांगितले.आभा पांडे यांच्या मागे गेल्या ७ ते ८ वर्षांपासून मीच पक्ष्ात येण्याचा आग्रह धरला होता,या वेळेला त्या पक्ष्ात आल्यामुळे सर्वात जास्त आनंद मलाच झाला आहे.त्यांची क्ष मताच आहे तेवढी,कोणीही पक्ष्ात आले आणि त्यांना पद कसे मिळणार?आभा पांडे यांच्यासारख्या क्ष् मतावान इतरही लोकांना पक्ष् स्वीकारेल असा खुलासा ही त्यांनी केला.त्यांच्या शक्तीचा फायदा शेवटी पक्षालाच होणार आहे. यात निष्ठावंतांना डावलण्याचा प्रश्न येत नाही.घरातल्यांचा सन्मान करीत असतानाच बाहेरच्या चांगल्या व्यक्तींचा देखील सन्मान केला पाहीजे.उलट त्या पक्ष्ात आल्याने त्यांच्याकडेच आता ७-८ नगरसेवक निवडून आणण्याची अपेक्ष्ा आम्ही धरली असल्याचा खुलासा त्यांनी केला.
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपूर शहर तर्फे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी अनिल अहिरकर साहबे, यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे पक्ष कार्यालयामध्ये मोठया प्रमाणात स्वागत करण्यात आले.

आमचे चॅनल subscribe करा