Homeनागपूर न्यूजखाजगी रुग्णालयांना उपचाराची परवानगी देऊन कोविड रुग्णांचा जीव वाचवावा: प्रशांत पवार यांची...

खाजगी रुग्णालयांना उपचाराची परवानगी देऊन कोविड रुग्णांचा जीव वाचवावा: प्रशांत पवार यांची मागणी

Advertisements


नागपूर, ३ सप्टेंबर: शहरात दररोज कोविड रुग्णांचा आकडा हजाराच्या पलीकडे जात आहे. शासकीय व्यवस्था ही पूर्णपणे कोलमडली आहे. खाटा उपलब्ध नसणे,ऑक्सीजन,वेंटिलेटर,अॅम्बूलेंस उपलब्ध नसण्याच्या अमाप तक्रारी समोर येत आहेत,परिणामी नागपूर महानगरपालिकेने शहरातील ३७ खासगी रुग्णालयांना कोविडवर उपचार करण्याची परवानगी प्रदान केली आहे,मात्र यामधील काही रुग्णालये ही रुग्णांची अक्ष् रश: लृट करीत असून रुग्णाला मरणाच्या दारापर्यंत पोहाचविण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप ’जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी केला.

आज गुरुवार दि. ३ सप्टेंबर रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत त्यांनी उपरोक्त विधान केले.पुढे बोलताना ते म्हणाले,की नागपूर शहरात हजारो खासगी रुग्णालये असून त्यांच्याकडे खाटांची देखील व्यवस्था आहे. मनपाच्या आरोग्य अधिका-यांच्या मतानुसार ही खासगी रुग्णालये कोविडच्या उपचाराकरिता सहकार्य करण्यास तयार नाहीत. कोणी तयारी दर्शवली तर त्यांच्या रुग्णालयाची तपासणी केली असता खाटांच्या संख्येनुसार त्यांच्याजवळ पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध नाहीत. मात्र हीच रुग्णालये इतर व्याधीग्रस्त रुग्णांचे उपचार करण्यासाठी मोठी रक्कम घेऊन उपचार करीत आहे. नियमानुसार अश्‍या रुग्णांपैकी जर कोणी करोना बाधित आढळला तर त्याची शासकीय रुग्णालयामध्ये पुरेशी सोय केल्याशिवाय रुग्णाला रुग्णालयातून हलवता येत नाही.परंतू काही खासगी रुग्णालयांनी रुग्णांची पुरेशी सोय न करता त्यांना रुग्णालयातून जबदरस्ती हाकलून लावल्याचा आरोप पवार यांनी केला.

शासनाने देखील कोविडचे रुग्ण हे शासनमान्य यंत्रणेद्वारेच तपासल्या जातील असे दिशानिर्देश दिल्यामुळे देखील खासगी रुग्णालये कोविड रुग्णांना उपचारापासून दूर ठेवित आहे. शहरात हजारो रुग्णालये असताना,त्यांच्याकडे पुरश्‍या खाटा व आरोग्याच्या सोयी उपलब्ध असताना ज्या रुग्णालयांची तयारी कोविडवर उपचारा करण्याची आहे अश्‍या रुग्णालयांना मनपाने त कोविड उपचारासाठी तातडीने परवानगी प्रदान करावी,अशी मागणीही पवार यांनी केली.यामुळे शासकीय आरोग्य सेवेवरील ताण कमी होईल व रुग्णांचे हाल होणार नाही,अशी मागणी ‘जय जवान जय किसान’संघटनेतर्फे करण्यात आली.

शासनातर्फे खासगी डॉक्टरांवरील सर्व बंधने दूर करण्यात यावी असे ते म्हणाले. या महामारीमध्ये डॉक्टरांची मोठी संख्या ही आरोग्य सेवा देण्यापासून दूर आहे. त्यांच्यावर विश्‍वास ठेऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणून शहरातील जनतेला या महामारीपासून वाचविण्याचा प्रयत्न करण्याची आवश्‍यकता असल्याचे ते म्हणाले.

मात्र जर खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लृट होत असेल त्यांची तक्रार ’जय जवान जय किसान’संघटनेकडे आल्यास संघटनेतर्फे अश्‍या लृटारु रुग्णालये व डॉक्टर्सविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.

पत्र परिषदेत संघटनेचे सचिव अरुन वनकर,उपाध्यक्ष् मिलिंद महादेवकर उपस्थित होते.

Latest बातम्या