
मनपाच्या आरोग्य विभागाचे कर्मचारीच कोविड नियमाबाबत अंधारात!
नागपूर,ता. २२ सप्टेंबर: धरमपेठ झोन अंतर्गत येणा-या एका महानगरपालिकेच्या एका दवाखान्यातील आशा वर्करच्या बेजवाबदार वर्तनाची चांगलीच चर्चा मनपाच्या वर्तुळात सुरु आहे. तिचे सासरे करोना पॉझिटीव्ह निघाले मात्र तरी देखील तिने आरोग्य विभागाला कळवण्याची तसदी घेतली नाही,याशिवाय ती नियमित कामावरही हजर राहील्याचे सांगितले जात आहे.विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबातील
एकाही सदस्याने करोनाची चाचणीच केली नसाल्यची धक्कादायक बाब समाेर आली आहे.
करोनामुळे तिच्या सास-याचा मृत्यू झाला असून नुकतेच त्यांनी त्यांच्या तेरवीचा विधी पार पाडला,या वेळी देखील त्यांच्या घरी बरीच गर्दी होती. चाचणी केली तर अहवाल हा पॉझिटीव्हच येतो,अशी ‘ठाम समजूत’या कुटुंबियांची असून एकाही सदस्याने करोनाची चाचणी तर केलीच नाही उलट संपूर्ण कुटुंबिय हे नागपूर शहरातील विविध वर्तुळात बेरदकारपणे वावरत असल्याचे धक्कादायक माहिती आहे.
यालाच ‘दिव्याखाली अंधार’ असे म्हणतात. ज्या आशा वर्करच्या भरवश्यावर घरोघरी जाऊन सर्वेक्ष् ण केले जात आहे त्यांनाच अद्याप कोविडचे दिशानिर्देश योग्यरित्या कळले नसल्याचे हे द्योतक आहे.या संपूर्ण कुटुंबियांच्या संपर्कात येणा-या कित्येक नागरिक हे नकळत करोनाच्या साखळीत जखडले जात असावेत,नुकतेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या मनपाच्या बैठकीत कॉन्टेक्ट ट्रेसिंगवर भर देण्याची सूचना केली मात्र मनपाच्या आरोग्य विभागाच्या नाकाखालीच करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे हे एक बोलके उदाहरण आहे.
लवकरच याच आशा वर्कस यांच्या भरवश्यावर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मुख्यमंत्री यांच्या ’माझे कुटुंब माझी जवाबदारी’या मोहिमेला सुरवात होणार असून अश्या प्रकारच्या बेजवाबदार आशा वर्कस असतील तर त्यांच्यामार्फेत घरोघरी करोनाचा संसर्ग पसरायला वेळ लागणार नाही.आज २२ सप्टेंबर रोजी नागपूरात ६७५९ चाचण्या पार पडल्या त्यातील १६६२ लोकं हे करोना पॉझिटीव्ह निघाले. आज ४६ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरात दररोजच करोनाच्या प्रादुर्भावाचे एवं मृत्यूचे आकडे समारे येत आहे,या पार्श्वभूमीवर ‘जनता कर्फ्यू’सोबतच मनपाच्या आरोग्य विभागाने आपल्या अधीन काम करणा-या कर्मचा-यांची ‘स्वस्थ समाजाला धोकादायक’विचारसरणी बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज प्रतिपादीत केली आहे.
मनपाचे आरोग्य अधिकारी सुधरलेच नाही-
मनपाचे बहूतांश आरोग्य अधिकारी हे मनात येईल तेव्हा करोना पॉझिटीव्ह असल्याचे ‘मौखिक’सांगून घरी बसत असल्याचे चमत्कारिक चित्र मनपात उमटले आहे. एकमेव डॉ.नरेंद्र बहीरवार यांनी फक्त ते पॉझिटीव्ह असल्याचा पुरावा वरिष्ठांना सादर केला असून इतर अधिका-यांनी सुटी ही घेतली,काम आणि जवाबदारीही टाळली वरुन पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल देखील वरिष्ठांना दिलाच नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.बहूचर्चित सहाकय आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार व त्यांच्या सुविद्य पत्नी या दोघांचीही गेल्या पंधरा दिवसांपासूनची अनुपस्थिती मनपात आज चर्चेचा विषयी ठरली.सही करतात व गायब होतात,असे अधिकारी नागपूरकरांच्या आरोग्याची कितपत काळजी घेत आहेत,हे वेगळे सांगायला नको,दूसरीकडे धरमपेठच्या झोनल मेडीकल ऑफिसर या देखील वारंवार होम क्वारंटाईन होत असल्याची माहिती आहे.एखाद्या आरोग्य अधिका-याने किती वेळा होम क्वारंटाईन व्हावे,याचा कोणताही नियम अद्याप मनपाच्या आरोग्य विभागासाठी लागू करण्यात आला नाही.
नागपूरात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव विकोपाला पोहोचला असताना गलेलठ्ठ पगार घेणा-या मनपा आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिका-यांचे हे ‘जीवावर आल्यासारखी नोकरी करणं’मात्र जनतेच्या चागंल्याच जीवावर बेतत आहे.डॉ.गंटावार दाम्पत्य यांच्या विरोधात युद्धाचा शंख फूंकणारे सत्ताधारी नेते ही अचानक ‘चिडीचूप’झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.धरमपेठच्या झोनल मेडीकल ऑफिसर(झेडएमओ)विरोधात नुकतेच शिक्ष् कांनी आंदोलन केले होते. एका शिक्ष्ि केच्या पतीला करोनाचा संसर्ग झाल्यामुळे त्यांना मनपाच्या करोनाच्या सर्वेक्ष् णापासून सुटी हवी होती मात्र या झेडएमओ त्यांच्यावर चांगल्याच ओरडल्या. त्यांना होम क्वारंटाईन होण्यास नकार देण्यात आला.यावर दोन दिवस शिक्ष् कांचे आंदोलन पेटले,शेवटी या ‘जवाबदार’ झेडएमओ यांना त्यांची माफी मागावी लागली,हे विशेष!
मनपा मुख्यालयातील आणखी एक वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी या देखील वारंवार होम क्वारंटाईन होतात मात्र काल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीला अवार्जून उपस्थित होत्या,यावर दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली जात होती.कामाप्रति एवढी कर्मठता नागपूरकर नागरिकांच्या अारोग्यासाठी दाखवली असती तर कदाचित नागपूरच्या पॉझिटीव्ह रुग्णांच्या संख्येत काही अंशी कमतरता आली असती,असा टोला त्यांना हाणल्या जात आहे.
कोविडच्या जीवघेण्या काळातही काही महिला वैद्यकीय अधिका-यांच्या आपापसातीत हेवेदावे यामुळे कामाप्रति दुर्लक्ष् होऊन,मनात येईल तेव्हा सुटी टाकून घरी बसणा-या या बेजवाबदार वैद्यकीय अधिका-यांप्रति नवनियुक्त आयुक्त राधाकृष्णन बी.हे योग्य कारवाई करतील का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.महत्वाचे म्हणजे गेल्या पाच महिन्याच्या काळात मनपाच्या आरोग्य विभागाच्या किती वैद्यकीय अधिका-यांनी करोना पॉझिटीव्ह असल्याचे जाहीर केले मात्र अहवाल वरिष्ठांकडे सादर केला नाही,याची माहिती आयुक्तांने लिखित स्वरुपात घ्यावी,अशी मागणी कोविड काळात प्रामाणिकपणे ज्यांनी कामे केली त्यांच्याद्वारे केली जात आहे.
याशिवाय जमिनीस्तरावर आशा वर्कस यांचे मार्गदर्शन व समुपदेशन करणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे. ज्या अाशा वर्करने असे बेजवाबदार वर्तन केले कदाचित त्यांच्या आर्थिक प्रश्नांमुळे त्यांनी ही बाब लपवली असावी,याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. १४ दिवस होम क्वारंटाईन होऊन घरी बसावे लागेल,कुटुंबातील इतर सदस्य यांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यास सर्वांच्याच उपचाराचा खर्च,असे अनेक प्रश्न या वर्गाचे असून शकतात.शहरात करोनाचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर मनपाच्या आरोग्य विभागाच्या प्रत्येक घटकाने आपापली जवाबदारी ओळखून कर्तव्य पार पाडणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.

आमचे चॅनल subscribe करा