
सहकार व पणण मंत्री यांचा आदेश र द्द करण्याची मागणी
नागपूर,ता. ७ ऑगस्ट: केन्द्र सरकारने नुकतेच शेतकरी हिताचे तीन कृषी विधेयके मंजुर करुन नवीन कृषी विषयक कायदा लागु केला. या नवीन कृषी कायदयानुसार देशातील सर्व शेतकरी दलालांच्या जोखडातुन मुक्त होवुन त्यांना स्वकष्टाने पिकवलेल्या शेतीमालाला कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य प्राप्त झाले असुन ‘एक देश एक बाजारपेठ’ ही नवीन संकल्पना साकार झाली .नवीन कृषी कायदयाची त्वरीत अंमलबजावणी करण्याचे सर्व राज्यांना निर्देशही देण्यात आले. मात्र राज्यातील सहकर मंत्री यांनी पत्राद्वारे या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी असे कळवले.त्यांच्या या पत्राची भारतीय जनता पक्ष्ातर्फे आज होळी करण्यात आली.
राज्य सरकारने दिनांक १० ऑगस्ट २०२० रोजी परीपत्रक काढुन सर्व जिल्हा उपनिंबंधक व सर्व बाजार समीत्यांनी केन्द्र सरकारच्या शेतक-यांच्या उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार (प्रचलन व सुवीधा) अध्यादेश -२०२० नुसार तात्काळ अंमलबजावणी करावी असे आदेशीत केले. परंतु नंतर केवळ विरोधासाठी विरोध म्हणुन स्वपक्षाच्याच वाशी येथील कृषी बाजार समीती सभापती शशीकांत शिंदे यांना जाणीव पुर्वक अपील करायला सांगुन त्वरेने सुणवणी घेण्यात येवुन केंद्राच्या निर्णयाला स्थगीती देण्याचा एकतर्फी आदेश पारीत करण्यात आला.
तसेच दिनांक ३० सप्टेंबरच्या मंत्रीमंडळ बैठकीतही केन्द्र सरकारच्या कृषी कायद्यांची अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याच्या व केन्द्र सरकारच्या कृषी कायद्याला, राज्यात स्थगीती देण्याच्या इराद्याने मंत्रीमंडळ उपसमीती नेमण्याचा व विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केवळ कृषी उत्पन्न बाजार समीती सभापतीच्या अपीलावर एकतर्फी निर्णय घेणे, दिनांक २४ जुन व १० ऑगस्ट रेाजी केन्द्रीय कृषी कायदयाच्या स्वत:च काढलेल्या अंमलबजावणी आदेशाला स्थगिती देणे. मंत्रीमंडळ बैठकीतही जाणीव पुर्वक शेतकरी विरोधी निर्णय घेणे या सर्व घडामोंडीवरुन राज्यातील आघाडी सरकार शेतकरी विरोधी असुन, राज्य सरकारच्या निर्णयाचा जिल्हा भारतीय जनता पक्ष्ातर्फे तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
केन्द्र सरकारने संमत केलेल्या कृषी विषयक कायदयाच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचा सहकार मंत्री यांच्या आदेशाला त्वरीत रदद करुन मंत्रीमंडळातील ठरावही रदद करण्यात यावा व शेतकरी हितासाठी राज्यात त्वरीत नवीन कृषी कायदयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी जिल्हा भारतीय जनता पक्ष्ाची मागणी आहे. या आदेश पत्राची होळी जिल्हाधिकारी कार्यालया समोर माजी उर्जा मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, भाजपा प्रदेश महामंत्री ,जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
याप्रसंगी खासदार डॉ महात्मे , आमदार गिरीश व्यास, आनंदराव राऊत, रमेश मानकर, किशोर रेवतकर, अविनाश खळतकर, ईमेश्वर यावलकर, अजय बोढारे,अनिल निधान,संदीप सरोदे,संध्याताई गोतमारे,विशाल भोसले,अंबादास उके,आदर्श पटले, दीपचंद शेंडे, कपिल आदमने,प्रमोद हत्ती आदी पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

आमचे चॅनल subscribe करा