Homeनागपूर न्यूजकिंग कोबराची चमू दहनघाटावरच कार्यरत:माजी मुख्यमंत्र्यांचे मात्र नागपूरकरांसाठी ‘नियंत्रण कक्ष्’

किंग कोबराची चमू दहनघाटावरच कार्यरत:माजी मुख्यमंत्र्यांचे मात्र नागपूरकरांसाठी ‘नियंत्रण कक्ष्’


नागपूर,ता. २० एप्रिल: ‘लढा करोनाशी’या मानवी‘युद्धा‘अंतर्गत राज्याचे माजी मुख्यमंत्री व दक्ष्ि ण-पश्‍चिमचे आमदार व विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरातील करोना या महामारीच्या भीषण परिस्थितीत अतिशय अनोखी व आगळी-वेगळी अशी ‘सेवांकूर’नियंत्रण कक्ष्ाची भेट नागपूरकरांना दिली !हे नियंत्रण कक्ष् ‘फोनवरच’ डॉक्टर्स,रुग्णसेवा,समुपदेशन,प्लास्मा डोनेशन,लसीकरणासाठी नागपूरकरांना सहाय्य करणार आहे तर दूसरीकडे आज ही शहरातील किंग कोबरा ऑर्गनायझेशन यूथ फोर्सची संपूर्ण चमू शहरातील विविध दहनघाटात सर्व धर्म,पंथ,वर्गाच्या अंत्यसंस्कारात मग्न होती.

करोनाच्या वाढत्या प्रकोपाला सारेच तोंड देत असताना नागपूरातील नागरिकांसाठी आणि रुग्णांसाठी एक नियंत्रण आणि सहाय्यता कक्ष्ाचे आज सकाळी माजी मुख्यमंत्र्यांनी उद् घाटन केले.रा.स्व.संघाच्या विचारांनी प्रेरित सेवांकुर या संस्थेने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून केंद्रिय मंत्री नितीन गडकरी व फडणवीस यांची कार्यालयेसुद्धा या नियंत्रण कक्ष्ा शी जोडलेली असणार आहे.त्यामुळे संपूर्ण मदत कार्याचे अतिशय प्रभावीपणे संयोजन या एकाच ठिकाणाहून शक्य होणार असल्याचा दावा माध्यमांना प्रतिक्रिया देताना फडणवीसांनी केला. भाजपा वैद्यकीय आघाडी सुद्धा या उपक्रमात सहभागी असून, सर्व क्षेत्रातील लोक या रचनेत काम करणार असून, डॉक्टर्स, वैद्यकीय विद्यार्थी, आयटी आणि स्वयंसेवक-कार्यकर्ते यात योगदान देतील. आपत्कालीन सेवेसाठी दोन रुग्णवाहिका येथे तैनात असतील असे ते म्हणाले.

गरजू रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी सहाय्य करणे, त्यासाठी रुग्णवाहिका, इतरही सहाय्य पुरवणे आदी समन्वय या माध्यमातून होईल. या कक्षामार्फत समुपदेशनाची सुद्धा सेवा देण्यात येणार आहे. प्लास्मा डोनेशन आणि लसीकरण यासाठी सुद्धा हा कक्ष काम करेल. या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात गरजूंना दिलासा मिळेल, असा विश्वास यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपुरातील गरजू नागरिक या नियंत्रण कक्षाशी 08929908958 या हेल्पलाईन क्रमांकावर क्रमांकावर संपर्क करू शकतील.

मात्र खरा प्रश्‍न हा आहे आज नागपूरात दररोज जे शंभरीच्या पार करोना महामारीमुळे मृत्यू होत आहेत ते थांबविण्यासाठी मुख्यमंत्री,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपच्या नेते,कार्यकर्त्यांतर्फे कोणती भरीव मदत केली जात आहे?नियंत्रण कक्ष्ाची खरी गरज ही फेब्रुवरी महिन्यात जेव्हा शहरात व नागपूर जिल्ह्यात करोनाची दूसरी लाट आली तेव्हा होती की एप्रिलच्या मध्यावर?जेव्हा दररोज मृत्यूचा आकडा भयावह स्थितीमध्ये पोहोचत आहे?असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

(नकली इंजेक्शन विकणारा भामटा व किंग कोब्राची चमू)

दूसरीकडे ज्यांना खरंच नागपूरकरांची मदत करायची आहे अश्‍या अनेक स्वयंसेवी संघटना आज ही रस्त्यावर उतरुन प्रत्यक्ष् जनतेसोबत विविध रुग्णालये,औषधी केंद्रे व दहनघाटांवर लढत आहेत.आजच किंग कोबराच्या चमूने सक्करदरा हद्दीत रेमडिसिव्हिरचे नकली इंजेक्शन विकणा-या भामट्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.या भागात हा भामटा संदिग्ध अवस्थेत फिरत असताना या संघटनेच्या लक्ष्मीकांत माटे यांना दिसला त्यांनी तातडीने संघटनचे अध्यक्ष् अरविंद रतौडी यांच्याकडे शंका व्यक्त केली.रतौडी यांनी ताबडतोब घटनास्थळ गाठून या भामट्याला पकडले,त्याच्या जवळ रेमडिस्विहरचे नकली इंजेक्शन होत जे तो एका गरजूला २८ हजार रुपयांमध्ये विकण्यास तिथे आला होता!हे इंजेक्शन जर रुग्णाला लावल्या गेले असते तर…….?

काय चाललं आहे नागपूरच्या रस्त्यांवर?महामारीच्या काळात जेव्हा अख्खी मानवजातच संकटात सापडली आहे तेव्हा काही लोकांना व राजकीय नेत्यांना फक्त या महामारीतही‘संधी’ दिसत आहे!आज मंगळवार दि.२० एप्रिल रोजी एकूण ९१ लोकांच्या मृत्यूची नोंद आहे!हा तर फक्त ‘प्रशासकीय’ आकडा आहे,वास्तव याहून भयाण आहे!

रतौडी सांगतात त्याप्रमाणे दहनघाटांवर ‘मरने के बाद भी शांती नही मिल रही!’एवढे भयाण चित्र उमटले आहे.लांबच लांब मृतदेहांची वेटिंग आहे.१९९२ पासून या शहरातील गरीब,गरजूंसाठी शिक्ष्ा आणि आरोग्याचा वसा घेऊन ही संघटना रस्त्यावर उतरुन नि:स्वार्थ भावाने काम करीत आहे.दूसरीकडे माजी मुख्यमंत्री हे त्यांच्या मतदार संघात आजच्या तारखेत ‘नियंत्रण कक्ष्ाचे’उद् घाटन करत आहे?नाव आहे ‘सेवांकूर!’ही,अशी सेवा आजच्या मरणकाळात नागपूरकरांना अपेक्ष्ति आहे का?असा संताप आता व्यक्त केला जात आहे.

मानकापूर हद्दीत नुकतेच एकाच कुटुंबातील ५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.यात वडील,आजोबा,मुलगा,पत्नी आणि भाऊ यांचा समावेश आहे.हे सर्व करोनाच्या दहशतीत हार्टअटैकने गेले.त्या घराच्या भिंती कायमच्या अबोल झाल्या आहेत.काय करणार ‘सेवांकूर’ या कुटुंबासाठी आता?काेणतं समुपदेशन गेलेले जीव परत अाणनार आहेत?मानकापूर घाटावर एकाच कुटुंबातील या ५ जणांवर अंत्यसंस्कार करताना तेथील कर्मचारी देखील स्तब्ध होते!

गडकरींचे वेंटिलेटर यवतमाळात!यवतमाळचे आमदार,खासदार काय करत आहेत?
यवतमाळाच्या कोविड केंद्रासाठी देखील नागपूरचे खासदार केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे धावून गेल्याचे चित्र आहे. यवतमाळच्या सत॒ चिकित्सा प्रसारक मंडळाचे सचिव तथा सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ.प्रकाश नंदुरकर यांना तात्पुरते केंद्र सुरु करण्यासाठी नागपूरचे निष्णात डॉक्टरांचे पथक तर उपलब्ध करुनच देण्यात आले त्यासोबतच या कोविड उपचार केंद्राकरिता गडकरी यांनी नंदूरकर यांना पहील्याच भेटीतच ५ व्हेंटीलेटर्स देऊन टाकले.याशिवाय आणखी ५ व्हेंटिलेटर्स व सर्व शक्य सहकार्य करणार असल्याचे आश्‍वासन ही दिले.

प्रश्‍न हा उमटतो यवतमाळचे सर्व आमदार,खासदार यवतमाळच्या रुग्णांसाठी मग काय करत आहे?जर यवतमाळकरांच्या मदतीलाही गडकरी यांना धावावे लागत आहे तर तेथील आमदार,नगरसेवक व खासदार हे निष्क्रिय आहेत का?असा सवाल केला जात आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे मनपाच्या एकाही रुग्णालयात बेड्सची सोय नाही,निष्णात डॉक्टर्स नाहीत अश्‍यावेळी गडकरी हे नागपूरातील निष्णात डॉक्टर्स यवतमाळात पाठवत आहे?यावर देखील प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

नागपूरात मृतांचा आकडा दररोज भयाण स्थितीत पोहोचला असताना ज्या शहराचे गडकरी हे प्रतिनिधित्व करतात,ज्या शहराच्या जनतेनी त्यांना निवडून केंद्रात पाठवले,त्यांनाच मदत ‘अपूरी’ पडत असताना नागपूरच्या खासदारांचा अट्टहास हा संपूर्ण जिल्ह्याच्याच मदतीचा का?असा संताप सोशल मिडीयावर उमटला आहे.

ज्यांच्या घरातील माणूस गेला आहे,त्यांचा उद्रेग,संताप आणि निराशा ही शब्दात ही व्यक्त करता येत नाही.त्यांना काही नको होते,फक्त एका वेंटीलेटरची गरज होती…..ती ही अगदी वेळेवर…..पण?

आजचेच वृत्त आहे,मध्यप्रदेशातील भाजप नेत्यांनी ऑक्सीजन टँकरसोबत दोन तास फोटोसेशन केले!मध्यप्रदेशमध्ये देखील ऑक्सीजनचा तुटवडा असल्याने गुजरातमधून एक ऑक्सीजन टँकर शनिवारी रात्री इंदूर येथे पोहोचला.मात्र योग्य ठिकाणी पोहचण्यापूर्वीच भाजप नेत्यांनी पत्रकारांना निमंत्रण देऊन या टँकरसोबत छायाचित्रे काढली तसेच टँकरची पुजा देखील केली!यामध्ये तब्बल दोन तास वाया गेले!या दोन तासात किती रुग्णालयात किती रुग्णांना ऑक्सीजनची गरज होती!

जनप्रतिनिधी म्हणून महामारीच्या या काळात देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष्ाचे नेते व कार्यकर्ते हे जनतेची सेवा आणि मदत करीत नसून जनतेवर ‘उपकार’करीत असल्याचा अहिर्भाव यातून दिसतो,अशी टिका देखील भाजप नेत्यांवर या घटनेमुळे झाली.

Latest बातम्या