
लॉक डाऊन म्हणजे प्रशासन व पालकमंत्र्यांचा हेकेखोरपणा
नागपूर,ता. ११ मार्च: शहरात पुन्हा दि.१४ ते २१ मार्च पर्यंत कडक लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय पालकमंत्री नितीन राऊत आणि प्रशासनाने घेतला आहे हा अत्यंत वेडेपणाचा निर्णय असल्याचे विधान माजी महापौर संदीप जोशी यांनी आज फेसबूक व्हिडीयोच्या माध्यमातून केला.
ज्या पद्धतीने ही संचारबंदी लागू केली त्याचे कदापि समर्थन करता येणार नसल्याचे ते म्हणाले.कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे,बाधितांची संख्या वाढत आहे मात्र दंडाच्या रकमेत आणखी वाढ जर केली असती,५०० रु.च्या ऐवजी तीन ते चार हजार रु.दंड आकरला गेला असता तरी देखील परिस्थिती ही सुधारली असती,असे त्यांनी सांगितले.
मात्र शहरातील सर्वसामान्य माणूस,गाेर गरीब माणूस,मध्यमवर्गीय माणूस आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नियम पाळणा-या नागरिकांवर कडक संचार बंदी लादणे हा एक प्रकारचा अन्याच असल्याचे त्यांनी सांगितले.
ही संचारबंदी म्हणजे अत्यंत दूर्देवी असून क्लेषकारक निर्णय असल्याचे म्हणता येईल.अशी कडक संचारबंदी लागू केल्यानंतर बाधितांच्या संख्येत घट होईल अशी कोणतीही शाश्वती नसताना फक्त आपला हेकेखोरपणा दाखवण्यासाठीच पालकमंत्री व प्रशासनाने संचार बंदी नागपूरकर जनतेवर लादली,असा घणाघाती आरोत संदीप जोशी यांनी केला.
हा शुद्धपणाचा वेडेपणाचा निर्णय असल्याचा आरोप जोशी यांनी केला.
आज धंतोली येथील विभागीग कार्यालयासमोर आ.गिरीश व्यास यांच्या नेतृत्वात आ.प्रवीण दटके,महापौर दयाशंकर तिवारी व भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी कडक संचारबंदीच्या संदर्भात गुळगुळीत भूमिका मांडली असताना माजी महापौर संदीप जोशी यांनी समाज माध्यमांवर मांडलेली सुस्पष्ट भूमिका ही सर्वस्वी वेगळी असल्याने याबाबत कार्यकर्त्यांमध्येच चर्चा रंगली होती.

आमचे चॅनल subscribe करा