Homeनागपूर न्यूजउपराजधानीत ‘भारत बंद’ला समिश्र प्रतिसाद: काँग्रेसकडून जबरीने दूकाने बंद करण्याचा प्रयत्न

उपराजधानीत ‘भारत बंद’ला समिश्र प्रतिसाद: काँग्रेसकडून जबरीने दूकाने बंद करण्याचा प्रयत्न


आघाडीसह इतर अनेक पक्ष्ांचा बंदमध्ये सहभाग

नागपूर,ता.८ डिसेंबर :केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले असले तरी उपराजधानी नागपूरात ‘भारत बंद ’आंदोलनाचे समिश्र पडसाद उमटले.अनेक ठिकाणी काँग्रेस पक्ष्ाच्या कार्यकर्त्यांनी मात्र दूकानदारांना जबरीने दूकाने बंद पाडण्यास भाग पाडल्याचे दृष्य उमटले.मात्र आंदोलनकारींची पाठ फिरताच दूकानदारांनी आपली दूकाने पुन्हा उघडून व्यवसाय केला.

संपूर्ण देश विशेषत: पंजाब प्रांत ढवळून निघालेल्या कृषि कायद्यांच्या विरोधात सध्या शेतकरी आंदोलनकारींनी देशाची राजधानी दिल्लीचा घेराव घालून देशाची राजधानीच जायबंद करुन ठेवली आहे.त्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी या बंदला उपराजधानीत आज अनेक संस्था व सघटनांनी समर्थन दिले मात्र काहींनी विरोध दर्शविला.

बंदच्या आंदोलनात राजकीय पक्ष् आपसहीत शिवसेना,वंचित आघाडी,बीआरएसपीचाही सहभाग होता.याशिवाय राष्ट्रीय ओबीसी महासंघाच देखील बंदला पाठींबा होता. अखिल भारतीय शेतकरी संषर्घ समन्वय समितीने शेतकरी आंदोलनात ३५० हून अधिक संघटना सहभागी झाले असल्याचा दावा केला आहे.जनमंच,प्रगती शेतकरी कामगार पक्ष्, स्वाभिमानी संघटना,प्रहार संघटना,न्यू यंग क्लब फॉर्मस ग्रूप यांनी ‘काळा कायदा रद्द करा’अश्‍या घोषणा दिल्या.यासोबतच टायगर ऑटोरिक्ष्ा संघटना,आम आदमी पक्ष्ासह रेशन दूकानदार संटनेने बंदला समर्थन दिले.या अंतर्गत सकाळी ११ वाजता संविधान चौकात रेशन दूकानदार संघटनेतर्फे केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेष करण्यात आला.महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वर्कर्स फेडरेशननेही बंदमध्ये सहभाग नोंदवला.

डाव्या विचारसरणीच्या सर्व कामगार संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या.मात्र भारतीय मजदूर संघासह उजव्या विचारसरणीच्या संघटनांचा बंदला विरोध दिसून आला.शेकक-यांच्या मागण्यांसाठी ‘आयटक‘च्या आव्हानाप्रमाणे इतर क्ष्ेत्रातील कामगार,कर्मचा-यांनी एकत्र येत बंद पाळला.

दूपारी ३ पर्यंत तरी दूकाने बंद ठेवा!काँग्रेसच्या आंदोलनका-यांचा चमत्कारीक बंद!
शहरातील मुख्य बाजारपेठेत फिरताना काँग्रेस पक्ष्ाच्या आंदोलनकारींनी जबरीने दूकानदारांना दूकाने बंद पाडण्यास भाग पाडल्याचे चित्र उमटले.अनेक दूकानदारांनी याचा विरोध ही केला.यामुळे आंदोलनकारी व दूकानदारांमध्ये बाचाबाचीचे प्रसंग ही उद् भवले.काँग्रेसपक्ष्ाच्या आंदोलनकारींनी दूकानदारांना उद्देशून ‘कूछ तो शर्म करो’ असे म्हणताच अनेक दूकानदार संतापले.‘तूम लोग अपनी रोटी पका रहे हो दूसरो की रोजी रोटी क्यो बंद कर रहे हो?’अश्‍या शब्दात आंदोलनका-यांना सुनावताच थोडा विनम्र पवित्रा घेत ‘दूपहर के ३ बजे तक तो दूकाने बंद रखो’अशी चमत्कारीक विनंती केल्याने अनेक दूकानदारांनी आंदोलनकारी निघून जाईपर्यंत शटर तात्पुरते बंद केले.व आंदोलनकारी निघून जाताच पुन्हा आपली दूकाने उघडून दिवसभर व्यवसाय केला.

दूसरीकडे काँग्रेस पक्ष्ाचे (जिल्हा)शहराध्यक्ष् आ.विकास ठाकरे हे देखील रस्त्यावर फिरुन दूकानदारांना शांततेत भारत बंद आंदोलनात सहभागी होण्याची व बंदला समर्थन देण्याची विनंती करीत होते.

आप’च्या कार्यकर्त्यांनीही झांशी राणी चौकात आंदोलन केले.कोराडी नाक्यावर अखिल भारतीय काँग्रेस कमेटी हिंगणा मनपा संघातील नेत्या कुंदा राऊत यांच्या नेतृत्वात बंदसाठी आव्हान करण्यात आले.परिणामी कोराडी नाका परिसर हा पूर्णत: बंद होता.
मात्र बंदला भारतीय किरकोळ व्यापारी महासंघ,ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट वेलफेअर असोसिएशन,भारतीय किसान संघाने विरोध दर्शवित बाजारपेठा,ट्रान्सपोर्टसह संपूर्ण व्यवहार नेहमीप्रमाणे सुरु रहाणार असल्याची घोषणा केली होती,त्याप्रमाणे कळमना मार्केट,कॉटन मार्केट सुरु होते.

शेतक-यांच्या मागण्या या रास्त असल्यातरी सध्या केंद्र सरकारसोबत चर्चा सुरु असताना बंद पाळणे संयुक्तिक होणार नसल्याचे त्यांचे म्हणने होते.हीच भूमिका नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स आणि चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री ॲण्ड ट्रेन्डने घेतली होती.याशिवाय बँक,विमा,वीज मंडळ,पोस्टसह सर्व प्रकारची शासकीय कार्यालये सुरु होती.

Latest बातम्या