Homeनागपूर न्यूजआमदार मिटकरी यांच्या कमिशनखोरीची चौकशी करा

आमदार मिटकरी यांच्या कमिशनखोरीची चौकशी करा

Advertisements

ॲड.धर्मपाल मेश्राम यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

नागपूर,ता. १ सप्टेंबर २०२२: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे कमिशनखोरीशिवाय कोणत्याही कामांसाठी विकास निधी आवंटित करीत नाहीत,अश्‍या पद्धतीची तक्रार त्यांच्याच पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी,नुकतीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बैठकी दरम्यान उघडपणे केली.

ही तक्रार अत्यंत चिंताजनक असून आधीच राष्ट्रवादी पक्षाच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लागले आहेत.त्यांचे गृहमंत्री असलेले नेते तसेच अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री हे देखील भ्रष्टाचाराच्याच आरोपाखाली तुरुंगात आहेत आणि आता त्यांच्याच पक्षातील विधान परिषदेचे आमदार हे स्वत:ची टक्केवारी प्राप्त झाल्याशिवाय विकास निधी आवंटित करीत नाहीत,अश्‍या स्वरुपाची तक्रार जर त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष करीत असतील तर ती अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे भारतीय जनता पक्षाचे सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.

त्यामुळेच या आरोपाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे त्यांनी केली .

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांद्वारे या आरोपाची सखोल चौकशी झाली पाहिजे.विशेष तपास यंत्रणा असो,आर्थिक गुन्हे अन्वेषन शाखा असो अथवा इतर कोणत्याही सक्षम प्राधिकरणाकडून या गंभीर आरोपांची चौकशी होणे अत्यंत गरजेचे असल्याची बाब ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी उपमुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात नमूद केली.

Latest बातम्या