Homeनागपूर न्यूजआता ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंध:पालकमंत्र्यांची घोषणा

आता ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंध:पालकमंत्र्यांची घोषणा


भाजी दूकान,अत्यावश्‍यक सेवा आता दूपारी ४ पर्यंत

सव पक्ष्ीय लोकप्रतिनिधी यावेळी बैठकीत हजर :व्यापारी वर्ग व्हीसीद्वारे हजर

नागपूर,ता. २० मार्च: पालकमंत्री नितीन राऊत यांनी आता ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंध लागू राहण्याची घोषणा केली.आज विभागीय आयुक्त कार्यालयात घेतलेल्या बैठकीनंतर ही घोषणा केली मात्र हा लॉक डाऊन नसून कडक निर्बंध असल्याचे त्यांनी सांगितले.विशेष म्हणजे या बैठकीत खासदार नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील आमदार हे देखील सहभागी झाले होते.यावेळी व्हीसीद्वारे शहरातील व्यापारी वर्ग बैठकीत सहभागी झाला तसेच त्यांनी आपल्या समस्या मांडल्या.वाढत्या करोनाचा प्रार्दुभाव बघता असे कडक निर्बंध लावण्याची गरज नितीन राऊत यांनी प्रतिपादीत केली.

३१ मार्चपर्यंत वाढवलेल्या निर्बंधामध्ये लोकांना जीवनाश्‍यक वस्तूंचा तुटवडा जाणवनार नाही या दृष्टिने आता भाजीची दूकान,अत्यावश्‍यक वस्तू,सेवा आता दूपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.सध्या ते १ वाजेपर्यंत सुरु होते.

याशिवाय हॉटेल,रेस्टॉरेंटमधून ऑन लाईन पार्सल सायंकाळी ११ वाजतापर्यंत मिळणार तर ७ वाजेपर्यंत हॉटेल रेस्टॉरेंट सुरु राहणार.

त्यावश्यक वस्तूंचा ठोक पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना ४ वाजे पर्यंत दुकान सुरू ठेऊ शकतील. ( आता १ वाजेपर्यंत परवानगी होती )

# शाळा महाविद्यालय बंद राहतील. ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षा होईल,केंद्रिय लोकसेवा तसेच राज्यसेवा आयोगाच्या परिक्ष्ा निर्धारित वेळेत होतील ( आता ही बंद आहेत )

सर्व सार्वजनिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम बंद राहतील ( आता ही बंद आहेत )

लग्न घरघुती पातळीवर 50 पेक्षा कमी उपस्थितांमध्ये होऊ शकतील ( आता ही अशीच स्थिती आहे )

अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाई साठी पोलिसांना मोकळीक देण्यात आली आहे.
मनपा आयुक्त तसेच जिल्हाधिकारी त्यांच्या पातळीवर वेगळे निर्देश परित करु शकतील.(सध्या मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी दूचाकी वाहनांवर एक तर चारचाकीत दोन जणांनाच परवागनी प्रदान केली आहे)

बैठकीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देत संपूर्ण लॉकडाऊन हा काही पर्याय नाही आहे, गरिबांचे त्यामुळे मोठे नुकसान होत असल्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष् नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लोकांचा रोजगार त्यामुळे बुडतो असे आम्ही मी व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी हीच मागणी बैठकीत पालकमंत्री यांच्यासमोर मांडली असल्याचे ते म्हणाले.

वाटल्यास कडक नियम तयार करावे आणि त्याची अंमलबजावणी करून घ्यावी अशी मागणी ही आम्ही केली.
पालकमंत्र्यांनी ही त्याबद्दल सकारात्मकता दाखविली आहे असल्याचे ते म्हणाले.

याशिवाय लसीकरण केंद्र वाढवण्याबद्दल ही चर्चा झाली आहे. आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू करण्याबाबत चर्चा झाली. तसेच स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन ही काही केंद्र चालवण्याबद्दल चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

आधी ज्या खाजगी रुग्णालयात कोविड वार्ड सुरू करण्यात आले होते, मात्र दरम्यानच्या काळात ते बंद केले गेले.ते ही सुरू करण्याबद्दल बैठकीत चर्चा झाली,

हाय डिपेंडेन्सी बेडस वाढवण्याची आम्ही मागणी केली आहे. त्याबद्दल प्रशासनाने २५ मार्च पर्यंत ३०० खाटा वाढवण्याचे आश्वासन दिले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

आम्हाला वाटतंय की नागपूरात कोरोना विरोधात लढ्याचा काम हळुवार सुरू आहे, त्याची गती वाढवली पाहिजे,असे देखील ते म्हणाले.

Latest बातम्या