जाता-जाताही मुंढे म्हणाले..मिडीयाला दूर करा!
नागपूर,ता. ११ सप्टेंबर: मनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुुंढे हे आज शुक्रवारी बदली झाल्यानंतर मुंबईसाठी प्रस्थान करित असताना त्यांच्या सिव्हिल लाईन्स,जवाहर वसतीगृहाजवळील बंगल्यासमोर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना निरोप देण्यास चांगलीच गर्दी केली. युवा काँग्रेस व काही शिवसैनिकाचे कार्यकर्ते यात आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी मुंढे यांच्यावरच नव्हे तर त्यांच्या कारवर देखील चाहत्यांनी फूलांचा वर्षाव केला.
यावेळी जोरदार नारेबाजी करत भारतीय जनता पक्ष्ासाठी ‘मुर्दाबाद‘चे नारे लागत हाेते तसेच मुंढे यांच्यावर फूले वाहून जंगी सलामी दिली जात होती.अवघ्या सात महिन्याच्या कार्यकाळाच्या अवधीत मुंढे यांनी नागपूरकरांचे काळीज काबिज केल्याचे हे दृष्य आहे अशी चर्चा होती तर दूसरीकडे ही युवा काँग्रेसची निव्वळ स्टंटबाजी असल्याचे म्हटल्या जात होते. एककीडे काँग्रेसचेच विद्यमान दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मुुंढे यांच्या एकंदरित कारभाराविषयी वारंवार तक्रार नोंदवली होती तर दूसरीकडे काँग्रेसच्याच युवा मोर्च्याचे अध्यक्ष् बंटी शेळके हे मुंढेंच्या समर्थनार्थ वारंवार आंदोलन करीत असल्याचे दृष्य देखील नागपूरकरांनी बघितले.
आज देखील मुंढे यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेसच्या युवा मोर्च्याच्ेच सदस्य हे नारेबाजी करीत होते.
मिडीयाला बाजू करा….
विशेष म्हणजे मुंढे यांनी बाहेर पडताच ‘मिडीयाला बाजू करा’असे वाक्य उच्चारले. यावरुन मुंढेंना नागपूरच्या मिडीयावर विशेष नाराजी असल्याचे दिसून पडतंय. ज्या मिडीयाने मुंढेच्या कार्यपद्धतीला नागपूरात एवढा मोठा कवरेज दिला,त्याच मिडीयावर जाता-जाता मुंढेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत कटू बोल बोलून मिडीयाला बाजूला करा,असे उच्चारले. त्यांची सर्व रुची ही त्यांच्या नावाने जंगी नारेबाजी करणारे युवा काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक यांच्याकडून अभिनंदन स्वीकारण्यात होती असे व्हिडीयोमध्ये स्पष्टपणे दृष्टिपणास येत आहे. असे असले तरी नागपूरकर मिडीयाकर्मींनी मात्र तरीही मुंढेंवर होणा-या पुष्पवर्षावाचे कव्हरेज थांबवले नाही आणि त्यांच्या मागे-मागे शूट करीत फिरले,यावर देखील अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली.
गणपती विर्सजनात गर्दी नको मात्र निरोप समांरभात गर्दी चालते का?
मुंढे यांच्या बदली नंतर अनेक नागरिकांना गहीवरुन आले असले तरी दूसरीकडे अनेक नागरिकांना याचा अतिशय आंनद झाला असल्याचे पोस्ट सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झालेत. आमच्या घरी गणपती विसर्जनाला लोकांनी गर्दी करायची नाही हे सांगताना यांच्या विसर्जन सोहळा चांगलाच रंगरेला दिसतोय..यांना विरोधही कोणत्याही सामान्य माणसानी केला नव्हता आणि समर्थनातही सामान्य माणूस उतरलेला नव्हता,ही फक्त स्टंटबाजी आहे,अशी टिका नेटीझन्सनी केली. तर एका नेटीझनने ‘कामधंधे करा रे मित्रांनो,तुमच्या परिवाराला तुमची गरज आहे मुंढेंची नाही…’अशी टिका केली. एकीकडे शहरात दररोज ४० च्या वर नागरिक हे करोनाने मृत्यू पावत आहे दूसरीकडे मुंढे यांच्या निवासस्थानासमाेर एवढी गर्दी करुन नारेबाजी कशी करु शकतात?अशी नाराजी ही व्यक्त झाली.आम्ही मुंढे यांचा सपोर्ट करतो मात्र अश्याप्रकारच्या निष्काळजी गर्दीचे समर्थन मुळीच करता येत नाही. सोशल डिस्टंसिंग न बाळगता एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी करणे,झेंडे फडकवणे, नारेबाजी करणे,ते ही एका सनदी अधिका-याची बदली झाल्यामुळे ते शहरातून जात असताना,हे मुळीच समर्थनीय नसल्याची टिका देखील झोडण्यात आली.
एकीकडे मुंढेच हे आतापर्यंत पदावर होते तेव्हा सोशल डिस्टंसिंग पाळा असे नागरिकांना धमकावित होते तर दूसरीकडे आजच्या निरोप समारोपात मात्र त्यांना एवढी गर्दी दिसत असतानासुद्धा एक ही शब्द त्यांनी या ‘स्वागतोत्सुक’नागपूरकरांसाठी सुरिक्ष्त अंतर राखा म्हणून काढला नसल्याचे आश्यर्च व्यक्त केले जात आहे. हीच का मुंढेंना नागपूरकरांची काळजी?हेच का नागपूरकरांशी प्रेम?असा चिमटा देखील हा स्वागत,निरोप व नारेबाजी समारंभ आटोपल्यानंतर त्यांच्या निवासस्थानासमोर एेकू आला.

आमचे चॅनल subscribe करा