‘विदर्भाचा’मुद्दा ठरला सुपरफ्लॉप!केवळ
नागपूर,ता. ४ डिसेंबर: नागपूर विभागाच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची घोषणा अचानक राज्य शासनातर्फे नोव्हेंबरच्या पहील्या आठवड्यात झाली आणि…ही निवडणूक जिंकून विधान परिषदेत आमदार म्हणून जाण्याचे वेध राजकीय पक्ष्ांच्या प्रस्थापित उमेदवारांना लागले. काँग्रेस पक्ष्ाने या जागेसाठी काँग्रेसचे ॲड.अभिजित वंजारी यांचे नाव जवळजवळ सहा महिन्यांपूर्वीच निश्चित केले होते तर वंजारी यांनी नागपूर विभागाच्या सहाही जिल्ह्यात जवळपास दोन वर्षांपूर्वीच मोर्चेबांधणी सुरु केली होती.
भारतीय जनता पक्ष्ाने मात्र अचानक ९ नोव्हेंबर रोजी सिंटींग एमएलए प्रा.अनिल सोले यांचे तिकीट कापून त्या ठिकाणी महापौर संदीप जोशी यांना उमेदवारी घोषित केली. १२ नोव्हेंबर रोजी दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला व प्रचाराला सुरवात केली. १ डिसेंबर रोजी मतदान पार पडले व ३ डिसेंबर रोजी मतमोजणीला प्रारंभ झाला. एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. काल गुरुवार दि. ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वा.पासून पहील्या फेरीच्या मतमोजणीला सुरवात झाली. २८ टेबलवर प्रत्येकी १ हजार मतांची मोजणी करण्यात आली.
नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये पहिल्या २८ हजार मतांपैकी २ हजार २३४ अवैध व २५ हजार ७६६ मते वैध ठरलीत. पहील्या फेरीत उमेदवारांना विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेल्या पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत-
अभिजीत वंजारी १२ हजार ६१७, संदीप जोशी ७ हजार ७६७, राजेंद्रकुमार चौधरी ४७, इंजीनियर राहुल वानखेडे ७६४, ॲङ सुनिता पाटील ४०, अतुलकुमार खोब्रागडे १ हजार ७३४, अमित मेश्राम १०, प्रशांत डेकाटे ३६०, नितीन रोंघे ६६,
नितेश कराळे १ हजार ७४२, डॉ. प्रकाश रामटेके ३८, बबन तायवाडे २५, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ६, सी.ए. राजेंद्र भुतडा ४३५, प्रा.डॉ. विनोद राऊत ४२, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल २५, शरद जीवतोडे ८,
प्रा.संगीता बढे १६ आणि इंजीनियर संजय नासरे २४ मते पडलीत.
यानंतर दुस-या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली, नागपूर पदवीधर मतदारसंघातील एकूण ५८ हजार मतमोजणी मध्ये दुसऱ्या फेरीअखेर उमेदवार निहाय मिळालेली मते-
वंजारी ११४९७ मते,संदीप जोशी ९०८५,राजेंद्रकुमार चौधरी ४५,राहूल वानखेडे ७५७,ॲड.सुनीता मनोहर पाटील २५,अतुलकुमार खोब्रागडे १९१०, अमित मेश्राम २५,प्रशांत डेकाटे २४९,नितीन रोंघे १६२,नितेश कराळे १२५७, डॉ.प्रकाश रामटेके ३०,बबन शरदराव तायवाडे १६,ॲड.मोहम्मद गफ्फार १९,सीए राजेंद्र भूतडा २९६,प्रा.विनोद राऊत ३६,ॲड.विरेंद्र जायसवाल १३,शरद जिवतोडे ९,प्रा.संगीत बधे २५,इंजिनियर रघूनाथ नासरे ९ मते.
नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये तिसऱ्या फेरीअखेर एकूण ८४ हजार मतांपैकी ७ हजार २२८ अवैध व ७६ हजार ७७२ मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली –
अभिजीत वंजारी ३५ हजार ५०९, संदीप जोशी २५ हजार ८९८, राजेंद्रकुमार चौधरी १४९, इंजीनियर राहुल वानखेडे २हजार ३२३, ॲङ सुनिता पाटील ९५, अतुलकुमार खोब्रागडे ५ हजार ७५७, अमित मेश्राम ४२, प्रशांत डेकाटे ९०३, नितीन रोंघे ३१५,
नितेश कराळे ४ हजार ३१४, डॉ. प्रकाश रामटेके १०२, बबन तायवाडे ६२, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ३९, सी.ए. राजेंद्र भुतडा ९८७, प्रा.डॉ. विनोद राऊत १०४, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल ४८, शरद जीवतोडे २४, प्रा.संगीता बढे ६१ आणि
इंजीनियर संजय नासरे ४० मते पडली आहेत. प्रत्येक फेरीत २८ हजार मतांची मोजणी करण्यात आली.
उन्माद उतरला…गडकरी यांचे बोल ठरले खरे! https://sattadheesh.com/?p=9766
चौथ्या फेरी अखेर उमेदवारांना मिळालेली एकूण मते –
नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्ये चौथ्या फेरीअखेर एकूण १ लाख १२ हजार मतांपैकी ९ हजार ६३० अवैध व १ लाख २ हजार ३७० मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली.
अभिजीत वंजारी ४७ हजार ३७१, संदीप जोशी ३४ हजार ६६४, राजेंद्रकुमार चौधरी १९२, इंजीनियर राहुल वानखेडे ३ हजार १८३, ॲङ सुनिता पाटील १२२, अतुलकुमार खोब्रागडे ७ हजार ५०५, अमित मेश्राम ५१, प्रशांत डेकाटे १ हजार २४५, नितीन रोंघे ४२१, नितेश कराळे ५ हजार ७१९, डॉ. प्रकाश रामटेके १५३, बबन तायवाडे ७५, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ५६, सी.ए. राजेंद्र भुतडा १ हजार २५८, प्रा.डॉ. विनोद राऊत १३३, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल ५५, शरद जीवतोडे ३२, प्रा.संगीता बढे ८७ आणि इंजीनियर संजय नासरे ४८ मते पडली.
नागपूर पदवीधर निवडणुकीतील पाचव्या फेरीअखेर उमेदवार निहाय मते-
अभिजीत वंजारी ८ हजार ५७६, संदीप जोशी ६ हजार ८७६, राजेंद्रकुमार चौधरी ४१, इंजीनियर राहुल वानखेडे ५६९, ॲङ सुनिता पाटील ८५, अतुलकुमार खोब्रागडे ९९४, अमित मेश्राम ७, प्रशांत डेकाटे २७३, नितीन रोंघे १०१, नितेश कराळे ११७०, डॉ. प्रकाश रामटेके ३६,बबन तायवाडे १३, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ५, सी.ए. राजेंद्र भुतडा २७९, प्रा.डॉ. विनोद राऊत ४१, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल ११, शरद जीवतोडे ५,प्रा.संगीता बढे ३३ आणि इंजीनियर संजय नासरे ८ मते पडली.
पाचव्या फेरीअखेर एकूण १ लाख ३३ हजार ५३ मतांपैकी ११ हजार ५६० अवैध व १ लाख २१ हजार ४९३ मते वैध ठरलीत.
[नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये आज झालेल्या मतमोजणीच्या पाचव्या फेरीअखेर १ लक्ष ३३ हजार ५३ मतांची मोजणी पूर्ण झाली. तथापि, पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा ६० हजार ७४७चा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. (अभिजित गोविंदराव वंजारी एकूण मते ५५ हजार ९४७, संदीप जोशी एकूण मते ४१ हजार५४०, अतुल कुमार खोब्रागडे ८ हजार४९९, नितेश कराळे ६ हजार८८९ मते मिळाली ) विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे या निवडणुकीतील मतमोजणीचा भाग क्रमांक २ सुरु करण्यात आला. त्यानुसार दुसऱ्या पसंतीक्रमाची मते बाद फेरी नुसार मोजणीला सुरुवात झाली]

अशी झाली विजयाची घोषणा-
नागपूर पदवीधर निवडणुकीमध्ये १७ व्या एलिमिनेशन फेरीनंतर कोटा पूर्ण केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. १७ व्या एलिमिनेशन फेरीनंतर अभिजित वंजारी यांना ६१ हजार ७०१ तर भाजपचे संदीप जोशी यांना ४२ हजार ७९१ मते मिळाली. या निवडणुकीसाठी ६० हजार ७४७ मतांचा कोटा ठरवण्यात आला होता.

पदवीधरांच्या या निवडणुकीत एकूण टपाली व मतपेटीतील मते मिळून १ लक्ष ३३ हजार ५३ मतदारांनी मताधिकार बजावला. त्यातील ११ हजार ५६० मते अवैध ठरली. वैध ठरलेल्या १ लक्ष २१ हजार ४९३ मतांचा एकल संक्रमण प्राधान्यक्रम निवडणूक पद्धतीनुसार कोटा काढण्यात आला. यानुसार एकूण वैद्य मत भागीला दोन अधिक एक अशा सूत्रानुसार ६० हजार ७४७ मतांचा कोटा ठरला.
तथापि, पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा ६० हजार ७४७ चा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही.
(अभिजीत गोविंदराव वंजारी पहिल्या पसंतीची एकूण मते ५५ हजार ९४७, संदीप जोशी एकूण मते ४१ हजार ५४०, अतुल कुमार खोब्रागडे ८ हजार ४९९, नितेश कराळे ६ हजार ८८९ मते मिळाली ) विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे या निवडणुकीतील मतमोजणीचा भाग क्रमांक २ अनुसार इलिमेशन फेरी सुरु करण्यात आली.

त्यानुसार दुसऱ्या पसंतीक्रमाची मते इलिमिशन फेरी नुसार मोजणीला घेण्यात आली. एलिमिनेशन पद्धतीचा अवलंब करुन ही मतांची तूट भरून काढण्यात आली. त्यानंतर दुपारी अडीच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी अभिजित वंजारी यांना विजयी घोषित केले. यावेळी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य संवर्धन तथा क्रीडामंत्री सुनील केदार, खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास ठाकरे, आमदार राजू पारवे, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी पाचव्या फेरी अखेर पहिल्या पसंतीच्या मतमोजणीमध्ये अभिजीत वंजारी ५५ हजार ९४७, संदीप जोशी ४१ हजार ५४०, राजेंद्रकुमार चौधरी २३३, इंजीनियर राहुल वानखेडे ३ हजार ७५२, ॲड. सुनिता पाटील २०७, अतुलकुमार खोब्रागडे ८ हजार ४९९, अमित मेश्राम ५८, प्रशांत डेकाटे १ हजार ५१८, नितीन रोंघे ५२२, नितेश कराळे ६ हजार ८८९, डॉ. प्रकाश रामटेके १८९, बबन तायवाडे ८८, ॲड. मोहम्मद शाकीर अ. गफ्फार ६१, सी.ए. राजेंद्र भुतडा १ हजार ५३७, प्रा.डॉ. विनोद राऊत १७४, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल ६६, शरद जीवतोडे ३७, प्रा.संगीता बढे १२० आणि इंजीनियर संजय नासरे यांना ५६ मते पडली होती. या निवडणुकीत एकूण वैध मते १ लक्ष २१ हजार ४९३ ठरली. ११ हजार ५६० मते अवैध ठरली.
तर इलिमेशन पध्दतीच्या १७ व्या फेरीअखेर अभिजीत वंजारी यांना ६१ हजार ७०१, संदीप जोशी ४२ हजार ७९१ , अतुल कुमार दादा खोब्रागडे यांना १२ हजार ६६ मते मिळाली.
विदर्भाचा मुद्दा ठरला पुन्हा सुपरफ्लॉप!
विदर्भवादी उमेदवार नितीन रोंघे यांनी विदर्भाच्या मुद्दावर निवडणूक लढवली होती.विदर्भाच्या मुद्दाला घेऊन त्यांनी नागपूर विभागाचे सहाही जिल्हे पिंजून काढले होते.मतदारांसमोर आपले मुद्दे मुद्देसूदपणे मांडले मात्र मतदारांनी सपशेल विदर्भाचा मुद्दा या निवडणूकीत नाकारला असल्याचे दिसून पडतंय. रोंघे यांना पहील्या फेरीत फक्त ६६ मते,दुस-या फेरीत १६२,तिस-या फेरीत ८७, तर पाचव्या फेरीपर्यत केवळ ३१५ मते पडली होती.रोंघे यांच्या पदरात विदर्भवादी मतदारांनी एकूण ५२२ मते टाकली,यावरुन या निवडणूकीत पुन्हा एकदा ‘विदर्भ’हा मुद्दा गैरलागू ठरला तर दुसरीकडे ॲड.अभिजित वंजारी यांच्या विजयासाठी मतांचे विभाजन होऊ नये यासाठी देखील अनेक विदर्भवादी मतदारांनी वंजारी यांच्या पारड्यात मते टाकल्याचे बोलले जात आहे.अनेक विदर्भवादी मतदारांचे भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना पराभूत करणे हाच एकमेव उद्देश्य असल्याने रोंघे यांच्या पारड्यात मत टाकण्याऐवजी वंजारी यांच्या पारड्यात लक्ष् णीय विदर्भवाद्यांचे मत गेल्याचे सांगितले जात आहे.
मात्र रोंघे यांनी या पुढे देखील प्रत्येक निवडणूक विदर्भाच्याच नावाने लढत राहील असा प्रण घेतला आहे.त्यांना मिळालेल्या मतांच्या या आकड्यामुळे अजिबात निराश नसल्याचे सांगितले.

वंजारी यांच्या घरी जल्लोष-
विजयी उमेदवार ॲड.अभिजित वंजारी यांनी विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार यांच्या हस्ते विजयाचे प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर सहकुटुंब टेकडीच्या गणपतीचे दर्शन घेतले.त्यांच्या या नेत्रदिपक यशाने आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आज दिवसभर जल्लोष साजरा केला.विजयाचे प्रमाणपत्र घेताना त्यांचासोबत क्रिडा मंत्री सुनील केदार हे देखील उपस्थित होते. आ.विकास ठाकरे यांनी देखील हा आघाडीच्या कार्यकर्त्यांचाच विजय असल्याचे सांगून भाजपचा गड भाजपच्याच कर्मभूमीत ध्वस्त केल्याचा जास्त आंनद आहे,अशी भावना व्यक्त केली व संपूर्ण मतदारांचे आभार मानले.या पुढेही एकीने लढणार,असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला.

आमचे चॅनल subscribe करा