

फडणवीस यांच्या रक्ततुलेचे महत्व मिटकरी यांना कळू शकत नाही
नागपूर,ता.२१ ऑगस्ट २०२२: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमरावती येथे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी रक्ततुला केली मात्र यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जे भाष्य केले ती त्यांची वैफल्यग्रस्तता दर्शवित असून मिटकरी हे वैफल्यग्रस्त राजकारणी असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केला.
मिटकरी यांच्यावर प्रहार करताना, मिटकरी हे राजकारणातील थिल्लरपणा असल्याची कठोर टिकाही त्यांनी केली.महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर तर ते वैफल्यग्रस्तच झाले असल्याचे ॲड.मेश्राम म्हणाले.
सत्ता गेल्याने एक प्रकारची वैमनस्कता अमोल मिटकरी यांच्यामध्ये आढळून येत आहे त्यामुळेच ते अक्षरश: बरगळायला लागले आहेत.राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तसेच अमोल मिटकरींनी भाषणाच्या पलीकडे आजवर तसेही कोणतेही काम केले नाही.
त्यांना सेवाभाव कळत नाही.रक्ततुलेच्या अनुषंगाने ते रक्त रुग्णांच्या कामी येत असते.यातून अनेक रुग्णांचा जीव वाचविला जात असतो मात्र सेवाभावाची भावनाच मिटकरी यांच्यात नसल्याची टिका करीत, निव्वळ आवेशात भाषणे करने,लोकांना संभ्रमित करुन आपल्या राजकारणाची पोळी शेकणे एवढंच काम करीत असणा-या राष्ट्रवादीच्या या आमदाराला सेवाभाव कळणार नाही,त्यामुळेच सतत आपल्या वैफल्यग्रस्ततेतून व वैमनस्कतेतून मिटकरी हे रक्ततुलेसारख्या सेवाभावी उपक्रमांवर देखील जहरी टिका करीत असल्याचा आरोप ॲड.धर्मपाल मेश्राम यांनी केला.

आमचे चॅनल subscribe करा