Homeनागपूर न्यूजअंबाझरी प्रकल्पाचा विरोध 'राजकीय' हेतूने!

अंबाझरी प्रकल्पाचा विरोध ‘राजकीय’ हेतूने!

विकासक नरेंद्र जिचकार यांचा पत्र परिषदेत आरोप

आंबेडकर स्मारक अद्यावत बनवणार:दिली ग्वाही

आंबेडकर स्मारकाचे वैद्य कागदपत्रे शासनाकडेच उपलब्ध नाही

वीस एकर जागेचे कोणतेही पुरावेच उपलब्ध नाही:आम्ही १५ हजार चौ.मी.मध्ये आंबेडकरांचे अद्यावत थीम पार्क साकारणार:आंबेडकरांच्या जीवनावरील फोटो गॅलरी थीम पार्क,समाज भवन राहणार वैशिष्ठे

अतिशय जीर्ण भवना ऐवजी विरोधक आंबेडकरांच्या देदिप्यमान नावाला साजेसं स्मारक का बांधत नाही?जिचकार यांचा सवाल

लीज फक्त ३० वर्षांचीच: पुढे ३० वर्षांसाठी वाढवण्याची शक्यता

पर्यावरणाला हानि नाही:विद्यमान उद्यान ६ एकर मध्ये आम्ही साढे सात एकरमध्ये उद्यान निर्माण करणार

नागपूर,ता.२१ फेब्रुवरी २०२३: अंबाझरी येथील उद्यान हे अम्यूझमेंट पार्कमध्ये विकसित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निविदा मागवून गरुडा अम्यूझमेंट पार्क(नागपूर)प्रा.लि.ला ३० वर्षांच्या करारतत्वावर दिले.या उद्यानातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन गरुडा अम्यूझमेंट पार्क(नागपूर)प्रा.लि.कडून ८ जून २०२१ रोजी जमीनदोस्त केल्याची बातमी गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली.यानंतर आंबेडकरी जनतेमध्ये चांगलाच राेष निर्माण झाला.गेल्या वर्षभरापासून या कंपनीच्या विरोधात सातत्याने धरणे,आंदोलने,निषेध,उपोषणाचा मार्ग स्वीकारत, मोठ्या संख्येने आंबेडकरी जनतेने विशेषत:महिला वर्गाने हे आंदोलन शासन दरबारी मुंबईपर्यंत पोहोचवले.या पार्श्वभूमीवर विकासक नरेंद्र जिचकार यांनी प्रेस क्लब येथे पत्र परिषद घेऊन आज अनेक बाबींचा खुलासा केला.अंबाझरी प्रकल्पाचा विरोध राजकीय हेतूने केला जात असल्याचा आरोप त्यांनी याप्रसंगी केला.

९० वर्षांसाठी लीजवर देण्यात आल्याचा आरोप देखील खोटा असून फक्त ३० वर्षांसाठी करार करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.याशिवाय पुढील ३० वर्षांसाठी ही लीज वाढू शकते असेही ते म्हणाले.हा प्रकल्प हाती घेण्या मागे एक निश्‍चित अशी भूमिका होती.पुणे-मुंबई येथील मंडळी नागपूरला आल्यास त्यांना उपराजधानीत मनोरंजनाचे एक ही साधन उपलब्ध नाही.१०-१२ वर्षांपूर्वी मी माझ्या मुलांसोबत अंबाझरीला आलो असता येथील अवस्था बघता या उद्यानाला अद्यावत स्वरुप देण्याची कल्पना सूचली.अश्‍यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने निविदा काढल्या.

ती निविदा भागीदारीत मी व प्रवीण जैन यांनी भरली.पर्यटन महामंडळाने बंधनकारक अश्‍या काही अटी व शर्थीसह हा करार केला.यात हे उद्यान थीम पार्कमध्ये बदलणे करारानुसार बंधनकारक आहे.पूर्वी या उद्यानात ४०० ते ५०० पर्यटक येत होते,हे उद्यान विकसित झाल्यानंतर किमान दहा हजार पर्यटक या ठिकाणी भेट देतील,असे ते म्हणाले.याशिवाय या ठिकाणी एक्झीबिशन सेंटर देखील उभारणे आम्हाला बंधनकारक करण्यात आले आहे.या सेंटरमध्ये बैठका,चर्चासत्रे इत्यादी उपक्रम पार पडतील.१२०० प्रेक्षकांच्या बसण्याची सोय असलेले एम्फी थेटर बांधणे हे देखील करारात बंधनकारक असून या ठिकाणी विविध कलांचे सादरीकरण होईल.नाटक,लोककला इत्यादीला या मुळे प्रोत्साहन मिळेल.याशिवाय दिल्ली हटच्या संकल्पनेवर ‘नागपूर हट’ साकारल्या जाणार असून ,वेगवेगळ्या राज्यांतील विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद येथे नागपूरकर व पर्यटक घेऊ शकतील.

या ठिकाणी ५० दूकाने बांधून देणे पर्यटन महामंडळाने करारानुसार बंधनकारक केले असल्याने यातून अनेकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय लग्न समारंभासाठी प्रशस्त सभागृह बांधल्या जाणार आहे.

पूर्वी मनपाद्वारे ५ ते १० रुपये तिकीट दर होते,त्याच धर्तीवर कोट्यावधी रुपयांच्या गुंतवणूकीनंतरही आम्ही २० ते २५ रुपयांपेक्षा अधिक तिकीटाचे दर ठेवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.या उद्यानाची अतिशय दयनीय अशी अवस्था झाली होती.एकूण साढे चौरेचाळीस एकरमध्ये असलेले हे उद्यान आमची कंपनी मनोरंजनासाठी अद्यावत व सज्ज करणार असल्याचे ते म्हणाले.

या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन हे फक्त दोन ते अडीच एकरमध्ये स्थापित होतं.ते देखील अतिशय जीर्ण अवस्थेत होतं.एका बाजूला तर ते पूर्णपणे मोडकळीस आलं होतं.जून महिन्याच्या नागपूरातील पावसाच्या थैमानाने जीर्ण भाग ८ जून २०२१ रोजी कोसळून पडला.त्यातील सलाखे इत्यादी साहित्यांचा धोका येथे काम करणा-या मजूरांसाठी निर्माण झाला होता त्यामुळे आम्ही तो मलबा बाजूला सारला.

हे आंबेडकरी समाज भवन मनपाने बांधले होते व या भवनासाठी बाकायदा मनपात पैसे भरुन  उपक्रम पार पडत होते मात्र गेल्या अनेक दशकांमध्ये या भवनाची देखभालच झाली नव्हती.अतिशय वाईट अवस्थेत असणारे हे भवन तेव्हाच दुरुस्त करण्यासाठी आजचे विरोधक का सरसावले नाही?एवढ्या वाईट अवस्थेत असणा-या वास्तूला देदिप्यमान डॉ.बाबासाहेबांच्या नावावर राहू देण्या ऐवजी विरोधकांनी बाबासाहेबांच्या नावाने नवीन वास्तू का उभारली नाही?मूळात ही वास्तू २० एकर जागेवर असल्याचा आरोप द्यांदात खोटा व दुष्प्रचार करणार आहे.

किशोर गजभिये यांनी या विषयीची तक्रार पर्यटन महामंडळाकडे नोंदविल्यानंतर मी स्वत: त्यांच्या घरी गेलो होतो.त्यांना मी रितसर कागदपत्रे मागितली कारण अशी नोंद असणारी कोणतीही कागदपत्रे मनपा तसेच इतर शासकीय दरबारी नाहीत.गजभिये यांनी मनपातून हे दस्तावेज प्राप्त करुन देतो असे म्हणाले मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी ती कागदपत्रे मला दिलीच नाही.तीन ते चार वेळा मी गजभिये यांना या पुराव्यांसाठी भेटलो मात्र प्रत्येक वेळी त्यांनी रिसतर कागदपत्रे देण्यास टाळले.

त्यांनी या संपूर्ण मुद्दाला राजकीय हेतूने वादाचा मुद्दा बनवला.फक्त एकच बाजू त्यांनी आंबेडकरी समाज बांधवांपूढे मांडली.या ठिकाणी १५ हजार चौ.मी.जागेवर बाबासाहेबांच्या नावाला साजेसं असे भव्य समाज भवन बांधले जात असून,याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर थीम पार्क असे नाव दिले गेले असून पहील्या मजल्यावर त्यांच्या जीवनावरील विविध प्रसंगावरील फोटो गॅलरी रहाणार आहे.

याशिवाय समाज भवन सभागृह,प्रशस्त असे स्टडी सेंटर,ग्रंथालय,आर्ट अण्ड क्राफ्ट स्टूडियो,कौशल्य विकास केंद्र इत्यादी या सुविधा अगदी नि:शुल्क असणार आहे.गजभिये हे सरकारमध्ये मोठ्या पदावर होते,त्यावेळी त्यांनी या जीर्ण वास्तूच्या सुधारणेसाठी काहीच प्रयत्न का केले नाही?असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.आंबेडकरी जनता ही भोळी भाबडी आहे.स्वत:गजभिये हे अनेक निवडणूका लढले,आधी ते इतर पक्षात होते मग काँग्रेसमध्ये आलेत,येथे ही ते निवडणूका जिंकण्यास यशस्वी होऊ शकले नाहीत,माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत त्यांनी आमदार,खासदार व्हावं आणि सामाजिक दायित्वातून विविध विकास प्रकल्पाच्या माध्यमातून समजाचे ऋण फेडावे,असा टोला त्यांनी हाणला.

गजभिये हे ज्या समाज भवनाच्या नावावर राजकारण करीत आहेत त्या भवनात अवैध धंदे चालत होते.संपूर्ण अराजकता माजली होती,अतिशय घाणेरडी वास्तू करुन ठेवली होती.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळासोबतच्या करारानंतर मला या वास्तूच्या दुरुस्तीसाठीच ७० ते ८० हजारांचे आधी इलेक्ट्रीकचे सामान घ्यावे लागले.मी पण समाजाचं काम करणारा माणूस असून, माझ्या लक्षात आलं असतं तर जतन करुन ठेवलं असतं,असा खुलासा त्यांनी केला.

आंबेडकर स्मारक हे फक्त दीड ते तीन हजार चौ.मी.मध्ये स्थापित होतं उर्वरित भूखंड हा रिकामा होता.गजभिये मात्र राजकीय षडयंत्रातून आंबेडकरी जनतेला भडकविण्याचे काम करीत असून, या संबंधी कोणताही लेखी पुरावा ते देत नाही.सरकारी गॅझेटमध्ये देखील नाव नाही तरी देखील ते एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना आंदोलन करण्यास प्रवृत्त करीत आहे मात्र खरी वस्तूस्थिती सांगत नाही,ही वस्तूस्थिीती सांगण्यासाठीच आज पत्रकार परिषद घेत असल्याचे ते म्हणाले.

सर्वात महत्वाचे म्हणजे नागपूर शहराच्या नावलौकिकात भर घालणा-या या प्रकल्पासाठी गडगंज पैसा असणारे शहरातील विकासक ही पुढे आले नाहीत.ना कोणी निविदा भरल्या.या प्रकल्पासाठी कोणत्याही बँका कर्ज देणार नाही तरी देखील समाजाप्रति कृतज्ञतेच्या भावनेतून हा प्रकल्प विकसित करीत असल्याचे ते म्हणाले.५० दूकानांमधून अनेक कुटूंब आणि किती जणांना रोजगार मिळणार आहे.

हे स्मारक पाडल्याचा आरोपावरुन अति.आयुक्तांनी समिती गठीत केली आहे.लवकरच सत्य समोर येईल मात्र डॉ.बाबासाहेबांचे भव्य असे थीम पार्क या ठिकाणी बनत आहे ते बनवण्यासाठी आंदोलन केले पाहिजे की थांबवण्यासाठी?असा प्रश्‍न त्यांनी केला.

मी स्वत:गजभिये यांच्या घरी गेलो.एमटीडीसीचे पत्र दिले,विषयाला तपासून बघण्यास सांगितले.पूर्वी ते ४० एकर जागेवर आंबेडकरांचे स्मारक होते असा दावा करीत होते यानंतर आता तेच २४ एकरवर स्मारक होते,असे सांगत आहे मात्र एक ही कागद दाखवत नाही.

अधिवेशना पूर्वी शहरभरातील बौद्ध विहारांमध्ये पोस्टर लावले,यानंतर मी त्यांना गेस्ट हाऊसमध्ये भेटलो,माहोल का खराब करता?असा प्रश्‍न विचारला,आता तुम्ही २४ एकर जागेवर स्मारक असल्याचा दावा करता,किमान कागदपत्रे तर द्या,अशी मागणी ही केली.मनपामधून काढल्यानंतर देतो असे आश्‍वासन त्यांनी दिले.मात्र कागदपत्रे दिलीच नाही कारण असे कोणतेही कागदपत्रे मनपाच्याही रेकॉर्डमध्ये नाही.

गजभिये हे आएसआय असून हूशार आहेत मात्र तरी देखील ते आंबेडकरी जनतेला संभ्रमित करत आहेत.त्यांना जर खरोखरंच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी आस्था असेल तर त्यांनी एखादी जागा घ्यावी व बाबासाहेबांच्या नावाचं भवन आंबेडकरी जनतेच्या हितासाठी निर्माण करावे,असे आव्हान याप्रसंगी जिचकार यांनी केले.

काँग्रेसचे माजी पालकमंत्री व उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या मताविषयी विचारले असता सगळ्यांचा बाबासाहेबांच्या अद्यावत थीम पार्कसाठी पाठींबा असल्याचे जिचकार म्हणाले.राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांची देखील पार्टनरशिप या प्रकल्पात असल्याच्या चर्चेविषयी विचारले असता,मला कोणाच्याही पैश्‍यांची गरज नसल्याचे जिचकार म्हणाले.मी चतुर्थ श्रेणीतील कर्मचा-याचा मूलगा असून स्वबळावर वर आलो.लोकांच्या पैशांवर धंदा करणारा मी नाही,उलट आणखी एका काँग्रेसी नेत्याच्या मूलाची ऑफर,या प्रकल्पातील ६ एकर जागेच्या भागीदारीसाठी आली होती,ती देखील धुडकावली,ते ही नेते प्रकल्प विरोधकांना फूस लावित असल्याचा आरोप त्यांनी केला!

आंबेडकरांच्या नावाचे भव्य असे थीम पार्क या ठिकाणी आमची कंपनी साकारत असून, ज्या कोणी आंदोलनकर्त्यांना शंका किवा प्रश्‍न असेल त्यांनी आम्हाला भेटावे,त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करुन जिल्हाधिकारी यांच्या समक्ष एफिडेवीटवर लिहून देऊ,भूमिपूजन करु त्याच्या दोन वर्षात भव्य असे प्रशस्त आंबेडकरी भवन उभे करुन दाखवू.

या प्रकल्पामुळे पर्यावरणाच्या -हास तसेच तलावामध्ये होणा-या लेझर शो व बांधकामाविषयी प्रश्‍न विचारला असता,कायद्यानुसार हेरिटेज अश्‍या तलावाच्या शंभर फूटांमध्ये कोणतेही बांधकाम करता येत नाही तरी देखील आम्ही ११० फूट जागा सोडली असल्याचे ते म्हणाले.आमचा प्रकल्पच उद्यान म्हणून साकारला जाणार असल्यामुळे आज या उद्यानातील साढे चौरेचाळीस एकर जागेमधील ६ एकर जागेवर उद्यान आहे ते आम्ही साढे सात एकरवर निर्माण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.आम्ही आणखी हिरवळ व झाडे वाढवत असल्याचे ते म्हणाले.

सर्वात महत्वाचे म्हणजे या उद्यानाला लहूजी साळवे हेच नाव देण्यात आले असून उद्यानाच्या आत लहूजी साळवे यांचा पूर्णाकृती पुतळा देखील असल्याचे त्यांनी सांगितले.याशिवाय सकाळी ६ ते ९ या वेळेत पहाट पक्ष्यांसाठी उद्यानात पायी चालणे,योगा, जॉगिंग करने नि:शुल्क राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी त्यांनी अंबाझरी प्रकल्प नेमका कसा असणार आहे,याची लघू चित्रफित पत्रकारांना स्क्रीनवर दाखवली.

…………………………………………….

Latest बातम्या