Homeनागपूर न्यूजॲड.सुदीप जैस्वाल यांच्या नावाने वकील फाऊंडेशनची स्थापना

ॲड.सुदीप जैस्वाल यांच्या नावाने वकील फाऊंडेशनची स्थापना

नागपूर,ता.२२ एप्रिल २०२६: स्वर्गवासी ॲडव्होकेट सुदीप जैस्वाल यांचा वकील मित्र परीवार हा फार मोठा  होता ,आयुष्यभर त्यांनी त्यांच्या मिळकतीतील जास्तीत जास्त भाग वकिलांच्या चळवळीवर तसेच त्यांच्या न्याय हक्कासाठी व कल्याणावर खर्च केला . सुदीप जैस्वाल यांनी वकीलांवर अरेरावी करणारे आणि चुकीच्या शक्तीचा वापर करणारे यांचा कायम विरोध केला , त्याकरीता व्यक्तिगत नुकसानही सहन केले.  , त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झाले .त्यांनी वकीलांमध्ये अन्यायाचा विरोध करण्याची हिम्मत , आत्मविश्वास जागृत केला होता . त्यांच्या या कामाला स्मरुण  ‘सुदीप जैस्वाल ॲडव्होकेट्स फाउंडेशन’ Sudeep Jaiswal Advocates Foundation ची स्थापना करण्यात आली आहेअशी माहिती पत्रकार परिषदेत ॲड.कमल सतूजा,ॲड.सतीश उके.ॲड.तरुण परमार आदी यांनी दिली.
स्वर्गवासी सुदीप जैस्वाल यांच्या स्मृती व त्यांनी वकिलांच्या हक्काकारीता केलेली कामे, पुढे देखील तशीच सुरु राहावी हा फाऊंडेशन स्थापन करण्याचा हेतु असल्याचे त्यांनी सांगितले.
सुदीप जैस्वाल यांनी त्यांच्या हयातीत सर्व वकील मित्रां सोबत मिळून वकिलांच्या हिताकरिता संस्था सुरु करण्याचा प्रयत्न केला होता , त्या संस्थेच्या नावात “ Central India ”  हा शब्द असल्याने, धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नोंदणी नाकारली होती. परिणामी,नावात बदल करुन फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून,नागपूरसह विदर्भातील वकील व त्यांच्या कुटूंबियांसाठी, सुदीप जैस्वाल यांच्या इच्छेप्रमाणे, पुढेही काम करीत राहणे हाच संस्था स्थापने मागील उद्देश आहे .
या करीता  सुदीप जैस्वाल ॲडव्होकेट्स फाउंडेशन Sudeep Jaiswal Advocates Foundation च्या स्थापनेची घोषणा आज करण्यात आली असून. ही संस्था विना फायदा तत्वावर काम करेल आणि पुढील उद्दिष्ठांच्या पूर्ततेसाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यात वकिलां करीता Time Bank सुरु करण्यात येईल , यात कोणी वकील आजारी असेल , काही कामानिमित्त बाहेरगावी गेला असेल , त्यांस शेतीची महत्वाची  कामे असतील तेव्हा त्यांनी whatsapp / Email द्वारे पाठविलेले अर्ज, संबधित न्यायालयात त्यांच्या पक्षकारास संपर्क न साधता. संस्थेचे इतर वकील सभासद पोहचवून देतील . हा वेळ त्या पोहचवून देणारे वकील यांच्या खात्यात जमा  होईल व त्यास तो जेव्हा त्यांच्या करीता असेच काम करायचे असेल, तेव्हा वापरण्यात येईल. किवा ही सेवा घेणारे सभासद अन्य प्रकारे त्याची परतफेड करू शकतील.
याशिवाय वकिलां करीता नागपुरात कुठेही वकीलभवन  नाही , Gymkhana , Recreation club , Consumer society नाही. अश्‍या निवासी भवनाची स्थापना करणे जेथे वकिलांना सवलतीच्या दरात व सन्मानाने सुख सोयी मिळतील , बाहेरगावच्या वकिलांना तेथे सवलतीच्या दरात निवास सोय मिळू शकेल अशी व्यवस्था करणे .
वकिलां करीता Cricket Ground बनविण्याचे काम सुरु आहें , त्याकरीता  सुदीप जैस्वाल यांच्या पत्नी यांनी ७ एकर जमीन नागपूर ग्रामीण भागात विकत घेतली असून ते  Sudeep Jaiswal Advocates Foundation ला वापरण्याकरीता देण्याचे त्यांनी मान्य केले आहे , येथे सुद्धा Gymkhana , Recreation club बनविण्यात येईल . सुदीप जैस्वाल यांची “ Advocates 11”  Team ही पुन्हा मजबूत करण्यात येईल .
सर्व क्षेत्रातील, भ्रष्टाचारी , अपात्र , अकार्यक्षम , कामचोर , आळशी , काम टाळणारे , घाबरट अधिकारी यांच्या कृत्यांचा Data Base, वकील सदस्यांच्या उपयोगाकरीता तयार करण्याचे काम व याकरीता महाराष्ट्रातील सर्वच वकील संघटना व बार असोसीएशन यांच्या कडील माहिती व त्यांनी केलेली या संदर्भातील निवेदने व कारवाई याची माहिती, त्यात ठेवण्यात येईल . तसेच येथील वकील अन्य जिल्ह्यात काही कामा करीता गेल्यास त्यांना सहकार्य व आवश्यक मदत मिळवून देणे किंवा अन्य जिल्ह्याच्या ठिकाणी त्यांच्यावर काही समस्या आल्यास , त्याचे निराकरण होण्यासाठी त्यांना मदत मिळावी या करीता प्रयत्न करणे , तेथील वकील मित्र – संघटन यांच्याशी संबंध व संपर्क ठेवण्याचे काम हे Foundation करेल .
Foundation च्या कोणत्याही वकिलासोबत कोणताही दुर्दैवी प्रकार घडल्यास, त्याच्या कुटूंबियाला कायदेशीर मदत करणे , त्या वकीलाची संपत्ती बळकाविणे ,त्यांना  दमदाटी करणे , त्यांच्यावर अन्याय करणे, हे होवू नये याची काळजी संस्था घेईल.या मोबदल्यात ते शुल्क किवा अन्य कोणताही मोबदला  घेणार नाहीत .
या Foundation करीता सदस्य हे त्यांच्या सोयीप्रमाणे देणगी, सहकार्य व श्रमदान करून संस्थेचे काम सुरु ठेवतील.वकिलांवर तसेच कर्तव्यनिष्ठ न्याय क्षेत्रातील अधिकारी यांच्यावर होणारे अन्याय या विरुद्ध आवाज उचलणे हे काम या Foundation चे सदस्य करतील .
वकिलांना, कोर्ट अधिकारी म्हणून न्यायालयात व सरकारी अधिकारी यांच्या समोर बाजू मांडताना अनेक तास त्यांना उभंच राहवं लागतं, ही त्यांना एकप्रकारची शिक्षाच असते. कधी कधी वकील थकल्याने पक्षकाराची बाजू बरोबर मांडू शकत नाही , त्याचे लक्ष शारीरिक त्रास आणि थकवा याकडे असतो, वरिष्ठ वकील यांना हा त्रास फार होतो, यामुळे पक्षकारास न्याय मिळवून देण्यात अनेकदा वकिलांकडून अडचण निर्माण होते. उभे राहून बाजू मांडणे हा मा. न्यायालयाचा सन्मान आहे,  ते प्रचलन आहे मात्र, कोणत्याही कायद्यात तसे बंधन नाही,
Advocates Act or Bar Council of India (BCI) guidelines मध्येही याचा उल्लेख नाही ते  etiquette चा भाग आहे .  काही न्यायालयात वकिलांना बाजू मांडताना त्यांच्या फाईल ठेवण्याचीही जागा नसते . इतर काही देशांमध्ये व भारतीय पद्धती प्रमाणे बाजू मांडताना सुरवातीलाच एकदाच मा. न्यायालयास उभे राहून सन्मान देवून, यानंतर पक्षकारासाठी बाजू मांडताना बसून, बाजू मांडण्याची नियमावली suo moto   तयार करण्याकरीता व अश्‍या प्रकारच्या ‘मानवीय’ सुधार याबाबत,  मा.सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांना याचिकेद्वारे निवेदन देणे,अश्‍या स्वरुपाच्या सुधारा करीता प्रयत्न करणे , हे काम या Foundation चे सदस्य करतील .
वकीलांवरील हल्ले , Bar Council व पोलिसात खोट्या तक्रारी करणा-यांच्या  विरोधात दंडनीय कायदा तयार करण्याकरीता शासनाकडे ही संस्था पाठपुरावा करेल.
अश्‍यारितीने ही संस्था वकीलांच्या कल्याणासाठी कार्यरत राहील,असे पत्रकार परिषदेला संबाेधित करताना त्यांनी सांगितले.याप्रसंगी ॲड.वैभव जगताप, ॲड.लुबेश मेश्राम,ॲड.कौशल त्रिवेदी, ॲड.रमेश राठोड, ॲड. नकूल परमार, ॲड. अरुण बालपांडे, ॲड. ओ.आर.यादव, ॲड. दर्यानी,सुनील चाखोरे आदी उपस्थित होते.
………………………………………………..
Advertisements

Latest बातम्या