
३१ मार्च २०२६: तायवाडे कॉलेज महादुला- कोराडी व अद्वय मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसिय आंतरराष्ट्रीय परिषद “उदयोन्मुख : भारत राजकारण, समाज, अर्थव्यवस्था आणि प्रशासन क्षेत्रातील स्थित्यंतरे” या विषयावर तायवाडे कॉलेज, महादूला -कोराडी येथील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात संपन्न झाली.
यावेळी उद्घाटन समारंभाला उद् घाटक म्हणून कळमेश्वर – सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष देशमुख, बिजभाषक म्हणून जी. एच. रायसोनी विद्यापीठ अमरावती येथील कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे ,या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष सच्चिदानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे परिषदेच्या संचालक डॉ. वर्षा वैद्य, परिषदेचे समन्वयक डॉ. वकील शेख , डॉ. चंद्रशेखर गीते, परिषदेचे सयोंजक सचिव डॉ.शरद डवरे ,कुलदीप सोनकुसरे , आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. गिरीश काटकर व्यासपीठावर उपस्थित होते.
या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे यांनी केले. याप्रसंगी आमदार श्री आशिषबाबू देशमुख यांनी आजच्या काळात अशा विषयांवर परिषदेचे आयोजन करून राजकीय, सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. विनायक देशपांडे यांनी निरनिराळ्या काळात राजकीय पक्षाचे वर्चस्व राहिलेले दिसते. त्यामागील कारणे विचारात घेणे गरजेचे आहे. समाजातील परिवर्तनाचे प्रतिबिंब राजकारणात उमटलेले दिसतात. काही राज्यात एकाच पक्षाचे नेतृत्व पहायला मिळते. २०४७ पर्यंत भारत देश विकसित देशांच्या यादीत येईल असे पंतप्रधानांनी घोषित केले. ही संकल्पना आपल्याला विकसित होण्यास निश्चितच मदत करणारी आहे. २५ वर्षात भारताची सर्व क्षेत्रात तिपटीने वाढ झाली आहे. अध्यक्षीय भाषणातून डॉ. बबनराव तायवाडे यांनी विषयाचे महत्त्व अधोरेखित करताना सुमारे दोनशे संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले ही गोष्टच विषयाचे महत्त्व सांगणारी आहे. आजचे वास्तव या परिषदेच्या निमित्ताने नवीन पिढी पुढे येऊन ते विचार करायला प्रवृत्त होतील असे समाधान व्यक्त केले. डॉ. वर्षा वैद्य यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.
या उद् घाटनपर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सारिका दिवे यांनी तर आभार कुलदीप सोनकुसरे यांनी व्यक्त केले.
या परिषदेच्या पहिल्या सत्रात “उदयोन्मुख भारत राजकारण, समाज , अर्थव्यवस्था आणि प्रशासन” या विषयावर डॉ. दिगांबर तंगलवाड यांनी आपल्या वक्तव्यातून एकेकाळी काॅग्रेसचे समर्थन करणारे लोक आज काॅग्रेसमुक्त भारताच्या गोष्टी करीत आहे. यारून लोक विकासाला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते. शिवाय लोकांना परिवर्तन गरजेचे वाटते याकडेही लक्ष वेधले.तसेच प्रभावशाली नेतृत्व असेल तर त्यांना लोकांचा कल प्राप्त होत असतो असे म्हंटले.डॉ. सुरेश मैंद यांनी उदयोन्मुख भारतातील स्थित्यंतरे यावर आपले विचार मांडले.डॉ. चित्रेश सोनी यांनी सभ्यता, समाज आणि चैतन्य यावर देशाचा विकास अवलंबून असल्याचे सांगितले. नवीन एज्युकेशन पाॅलीसी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रवृत्त करणारी असल्याची जाणीव करून दिली. डॉ. अनुपकुमार सिंग यांनी भारत देशाला समजून घ्यायचे असेल तर लोकतंत्र समजून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले. या सत्राचे सुत्रसंचालन कु.अश्विनी खापर्डे हिने तर डॉ. विष्णू चव्हाण यांनी आभार व्यक्त केले. या परिषदेला ३१९ प्राध्यापक,अभ्यासक व संशोधक विद्यार्थ्यांचा भरीव सहयोग प्राप्त झाले.
…………………………………………….




आमचे चॅनल subscribe करा
