फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपामनपा निवडणूक: बीएलओंच्या घोळाची 'यादीच' मनपा निवडणूकीत गार्ह्य

मनपा निवडणूक: बीएलओंच्या घोळाची ‘यादीच’ मनपा निवडणूकीत गार्ह्य

मनपा प्रशासकाची डोळेझाक;मतदार यादी तीच ‘कायम’

दुबार,तिबार मतदारांचा प्रश्‍न ऐरणीवर

मतदार यादीत सुधारणा करण्याचे अधिकार मनपाला नाही:मनपा आयुक्तांची पत्रकार परिषदेत स्पष्टोक्ती

नागपूर,ता.१६ डिसेंबर २०२५: विधानसभा निवडणूकीसाठी जुलै २०२४ ची मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाने गार्ह्य धरली आहे,त्या यादीत लाखो दुबार,तिबार मतदारांची नावे असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता,काँग्रेसचे शीर्षस्थ नेते राहूल गांधी यांनी देखील दिल्लीत पत्रकार परिषदा घेऊन पुराव्यांनिशी महाराष्ट्रात विधान सभा निवडणूकीत मोठ्या प्रमाणात ‘मत चोरी’झाली असल्याचा आरोप केला,नागपूरात देखील सहा ही विधान सभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप विरोधकांनी  केला.असे असतानाही अगामी नागपूर महानगरपालिका निवडणूकीत जुलै २०२४ चीच मतदार यादी गार्ह्य धरुन निवडणूका होणार असल्याची माहिती आज मनपा मुख्यालयात पत्रकार परिषदेत  मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी  यांनी दिली.

मात्र,मनपाच्या ज्या बुथ लेवल अधिका-यांनी (बीएलओ )नी मतदार याद्यांमध्ये लोकशाहीला मारक त्रुटी ठेवल्या त्यांच्यावर प्रशासक राज असतानाही मनपा आयुक्तांना कोणतीही कारवाई करण्याची सवड मिळाली नाही व पुन्हा त्याच याद्या नागपूरकर मतदारांंवर लादण्याचे कसब, राज्य निवडणूक आयोगाची ढाल पांघरुन मनपा आयुक्तांनी लीलया साधले,यातून पुन्हा चौथ्यांदा भारतीय जनता पक्षाचे सरकार मनपात येण्याचा मार्ग सुकर झाला असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 दुबार मतदारांची यादी सुधारित करण्यात आली का?असा प्रश्‍न केला असता,राज्य निवडणूक अयोगाने जी यादी विधान सभा निवडणूकीसाठी गार्ह्य धरली होती तीच यादी मनपा गार्ह्य धरत असते,त्यात कोणतीही सुधारणा किवा बदल करण्याचा अधिकार मनपाला नाही,अशी माहिती त्यांनी दिली.हीच यादी झोननिहाय वाटप केली जाते,यातील नावे डिलिट किंवा नावे जोडण्याचा अधिकार मनपाला नाही.मात्र,आयोगाने केलेल्या सूचनेनुसार ‘संभाव्य’ दुबार मतदारांची पडताळणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राथमिक चौकशीत दुबार मतदार आढळले तर काय करायचे याची माहिती संबंधित मतदान केंद्र अधिका-यांना देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.दुबार मतदार आढळल्यास त्यांच्याकडून संमती पत्र भरुन घेऊन दोन पैकी कोण्या एकाच मतदान केंद्रावर मतदान करण्याचे पत्र आम्ही मतदाराकडून भरुन घेऊ,यानंतर त्या मतदाराला दूस-या मतदान केंद्रात मतदान करता येणार नाही.याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या अतिशय स्पष्ट सूचना असल्याचे मनपा आयुक्त म्हणाले.
सध्या अश्‍या दुबार मतदारांची संख्या ९५ हजार असल्याचे त्यांनी सांगितले.सध्या या नावांची छाननीची प्रक्रिया सुरु असल्याचे ते म्हणाले.ही यादी आम्ही झोनमध्ये पाठविली असून अद्याप ३५ ते ३६ हजार दुबार मतदारांची छायाचित्रे मॅच केली जात आहे.ज्या ठिकाणी छाननी होऊ शकली नाही तो ‘संभाव्य ’दुबार मतदार मतदान केंद्रात आल्यावर, त्या मतदाराकडून ‘शपथपत्र’भरुन घेण्यात येईल.हीच प्रक्रिया विधान सभेत पार पडली असल्याचा ‘दावा’ याप्रसंगी मनपा आयुक्तांनी केला.
आता मतदार यादी अद्यावत होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत आयोगाचे दिशानिर्देश आले असल्याचे ते म्हणाले.महापालिका केंद्रनिहाय मतदान यादी येत्या २२ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करणार असून सध्या नागपूरात दहा ही प्रभाग मिळून एकूण २४ लाख ८३ हजार ११२ मतदार आहेत.यामध्ये १२ लाख २६ हजार ६९० स्त्री तर १२ लाख ५६ हजार १६६ पुरुष मतदार आहेत.इतर २५६ मतदार असून अंदाजे ३ हजार १६७ मतदान केंद्र असणार आहेत,यात आणखी वाढ होऊ शकते,अशी माहिती त्यांनी दिली.
विधान सभेत प्रचंड मोठ्या संख्येने दुबार,तिबार मतदारांनी मतदान केल्याची ओरड विरोधकांनी केली.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दूबार नावे मतदार यादीतून वगळण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाला केली आहे.त्यामुळे आयोगाने दुबार नावे तारांकित करण्याचा निर्णय घेतला तसेच अशा व्यक्तिंकडून मतदान केंद्रावर शपथ पत्र लिहून घेण्याची सूचना केली.नागपूरात लाखाे दुबार नावे असलेल्या मतदारांच्या घरी जाऊन त्यांची ओळख पटवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून ,महापालिकेतील झोनल अधिका-यांना तश्‍या सूचना देण्यात आल्या आहेत .मात्र, मतदार यादीत एकापेक्षा अधिक वेळा नावे असणे कायद्याने गुन्हा असल्याने अश्‍या मतदाररांचा शोध घेणे ‘कार्यक्षम’मनपा कर्मचा-यांना दुरापस्तच आहे,त्यामुळे ज्या अतिशय घोळ असलेल्या मतदार यादीमुळे नागपूरात भाजपचे सहा पैकी चार आमदार निवडून आले असा आरोप केला जातो,तीच यादी मनपा निवडणूकीत पुन्हा चौथ्यांदा भाजपला सत्ता मिळवून देणार का?अशी चर्चा आहे.
एकाच मतदान केंद्रावरील मतदाराचे चक्क दोन ते तीन ठिकाणी मतदार यादीत नाव आहे.महत्वाचे म्हणजे लाखो मृतकांची नावेच मतदार यादीतून अद्याप डिलिट करण्यात आली नाही. मनपाकडून जन्म मृत्यूचा संपूर्ण डेटा निवडणूक आयोगाकडे पाठवला जात असल्याचे एका अधिका-याचे म्हणने आहे.तरी देखील मतदार यादीतून मृतकांची नावे डिलिट करण्याची तसदी लोकशाहीचा डोलारा सांभाळणारे प्रशासन व अधिकारी घेत नसल्याने निवडणूका केवळ फार्स बनून राहील्या आहेत.नागपूरातील मनपा निवडणूक देखील याला अपवाद नाही.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh official युट्युब चॅनलवर उपलब्ध)
…………………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या