Homeनागपूर न्यूजराज्याला वीजेच्या झळा, राऊतांच्या सभेत चोरीची वीज!

राज्याला वीजेच्या झळा, राऊतांच्या सभेत चोरीची वीज!

Advertisements

नागपूर,ता.२२ एप्रिल २०२२: एकीकडे राज्यात विजेचे भारनियमन सुरु झाले असून उर्जामंत्री नितीन राऊत यांनी याची स्पष्ट कबुलीच दिली. सध्या राज्यात १४ हजार मेगाव्हॉटचा तुटवडा असल्याचे त्यांनी मान्य केले.दूसरीकडे सूर्य माथ्यावर कोपला आहे,विदर्भात पारा हा ४५ डिग्री पल्ल्याड पोहोचला असून नागरिकांचा जीव उन्हाच्या काहीलीमुळे हैरान झाला असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे उपराजधानीत पुनश्‍च आगमन झाले.त्यांच्या आगमनानंतर बेसा पॉवर हाऊसजवळ त्यांची सभा भरली.या सभेत शिवसेनेच्या पदाधिका-यांनी चक्क वीज खांबांवर आकडे टाकून वीजेची चोरी केल्याची चांगलीच चर्चा रंगली.आज माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी पत्र परिषद घेऊन आघाडी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले,वीजेचा जास्तीचा अधिभार नागरिकांकडून वसूल करण्यात येत असून आघाडी सरकार ही किती भ्रष्ट आहे याचा पाढाच त्यांनी वाचला.यावेळी संजय राऊत यांच्या सभेसाठी चोरीची वीज वापरण्यासंबंधीचा प्रश्‍न विचारला असता,हे संजय राऊत यांनाच कळायला हवे,असा टोला त्यांनी हाणला.

संजय राऊत यांनाच हे कळायला हवे,त्यांनीच ती सभा रद्द करायला हवी होती,किमान सभेसाठी वीज कुठून घेतली याची चौकशी करायला हवी होती,अधिकृत परवानगीने तात्पुरते मीटर घेतले आहे की नाही ,कींवा वीज जनरेटरवर घेतली आहे का?याची चौकशी करायला हवी होती,जेवढी वीज वापरली त्याचे भुगतान केले जाणार की नाही याची ही शहनिशा करायला हवी होती.ज्या ठिकाणी वक्त्याची सभा होते त्या ठिकाणी सगळं काही अधिकृत आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी वक्त्याची असल्याचे बावणकुळे म्हणाले.

राऊत यांनी या सभेत महापालिकेत सत्ता द्या,मुंबईच्या धर्तीवर उपराजधानीचा विकास करु,अशी ग्वाही दिली यावर देखील खासगीत, मुंबई मनपातील भ्रष्टाचाराचा डोळे दिपवणारा जो भंडाफोड झाला यावर नागरिकांमध्ये कुजबुज ऐकू आली.मुंबईत मनपातील शिवसेनेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांनी यशवंत जाधव यांनी करोनाच्या २४ महिन्यांच्या काळात एकूण ३८ संपत्ती खरेदी केल्या,या संपत्तीची किंमत ४०० कोटी असल्याचे तपासात पुढे आले.यातील मला फक्त १० टक्के मिळाले असून उर्वरित ९० टक्के कोणाकोणाला वाटप झाले?याची बरीच चर्चा मुंबई मनपातील विरोधकांमध्ये रंगली.यशंवत जाधव यांच्याकडे तपास अधिका-यांना जी डायरी सापडली त्यात त्या संपत्तीतील एक हिस्सा ‘मातोश्री’ला गेल्याची नोंद आहे.

या मातोश्रीवरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संजय राऊतांमध्ये बराच कलगीतुरा ही रंगला.

नागपूरात आल्यावर ‘बरेच नागपूरकर हल्ली मुंबईत असतात म्हणून आम्ही आमचा मुक्काम येथे हलवला’ असा टोमणा देखील संजय राऊतांनी फडणवीस यांना मारला.नागपूरातील तीन दिवसीय मुक्कामात त्यांचे बरेच व्यस्त कार्यक्रम आहेत मात्र उत्तर नागपूरात सुरेश साखरे यांनी जो मेळावा आयोजित केला निदान त्यात तरी तीन चार तारांवर आकडे टाकून चोरीची वीज वापरली जाऊ नये,अशी रणरणत्या उन्हाची काहीली साहणा-या व भारनियमानाचे चटके सोसणा-या नागपूरकरांची राऊतांकडून अपेक्षा आहे.

Latest बातम्या