
पोलीस उपायुक्त विनिता शाहू मारहाण प्रकरण:पोलिसांच्या निष्क्रियतेचा केला निषेध
नागपूर,ता.१२ एप्रिल २०२२ : नुकत्याच दौंड येथे बदलून गेलेल्या व त्या आधी शहर पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या वरिष्ठ आयपीएस महिला अधिकारी विनिता शाहू यांना ७ जणांनी घरात घूसून मारहाण केली,घरातील जवळपास एक लख रुपये आणि काही महत्वपूर्ण कागदपत्रे चोरी केली,याप्रकरणी विनिता शाहू यांच्या तक्रारीवरुन सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणात माजी राष्ट्रवादी नेत्या व अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला धोटे यांनी महाराष्ट्राच्या गृहखात्यावर चांगलेच तोंडसुख घेतले,राज्याचे गृहखाते हे अक्षरश:झाेपलेले असल्याची घणाघाती टिका त्यांनी व्हिडीयोच्या माध्यमातून केली.
विनिता शाहू या सिव्हिल लाईन सदर परिसरात राहायच्या.आरोपी अभिनव बाेहरे(पाचपेढी,जबलपूर-मध्यप्रदेश)अभिनवची पत्नी अंकिता बोहरे,आई गीता बोहरे आणि एका मुलासह सिव्हिल लाईन्स येथे राहायचा.तो केंद्र शासनाच्या सेवेत असल्याची माहिती आहे.गेल्या ६ एप्रिल रोजी दुपारी अभिनवने विनिता शाहू यांच्यासोबत वाद घातला.या वादात अंकिता आणि गीता यांनीही त्याला साथ दिली.तसेच अन्य आरोपी विवेक यादव,अनुराग नामदेव,भूपेंद्र सिंग आणि एका युवकाने विनिता यांना शिवीगाळ करीत मारहाण केली.त्यानंतर सहा ही आरोपींनी विनिता यांच्या घरातील जवळपास एक लाख रुपयांची रक्कम आणि काही महत्वाची कागदपत्रे चोरी केली.विनिता यांना मारहाण झाल्याने त्यांनी सदर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अजय आकरे यांच्याकडे लेखी तक्रार दिली.सदर पोलिसांनी भादंविच्या कलम ३२३,३७९,४०६,५०६,(२) आणि३४ नुसार सात आरोपींवर गुन्हा दाखल केला मात्र अद्याप कोणालाही अटक झाली नाही.
नागपूरात जर एका वरिष्ठ महिला पोलिस अधिका-याला घरात घूसून मारहाण होत असेल तर सामान्य महिलांचे काय?पाेलिस विभाग एवढ्या गंभीर गुन्ह्याची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत ज्वाला धोटे यांनी अाज पोलिस आयुक्ता अमितेश कुमार यांच्यावर आज पुन्हा शरसंधान साधलं.
अकार्यक्षम महाविकास आघाडी,मूकबधिर गृहमंत्री आणि निष्क्रिय गृहखातं यामुळे संपूर्ण महाराष्ट्रच पिडीत झाला असल्याची टिका त्यांनी केली.महाराष्ट्राच्या जनतेची सुरक्षा हीच चव्हाट्यावर आली आहे.महाराष्ट्रातच्या राजधानीत गृहखातं ज्या पक्षाकडे आहे त्याच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वहर ओक निवासस्थानात जोडे,चपला,बांगड्या फेकून हल्ला करण्यात आला,ही खूप मोठी शोकांतिका आहे,दुसरीकडे उपराजधानीत महिला आयपीएस अधिका-यांच्या घरात घूसून मारहाण करण्यात आली,महत्वाचे कागदपत्रे व रोख रक्कम चोरीला गेली,या घटनेची माहिती घेण्यासाठी सदर पोलिस ठाण्यातील मुख्य पोलिस निरीक्षक विनाेद चौधरी यांच्याकडे विचारण केली असता त्यांनाच या घटनेची माहिती नव्हती!
मी १५ दिवसांपासून सुटीवर होतो,असे कारण त्यांनी सांगितले.एवढ्या गंभीर घटनेची माहिती मुख्य पोलिस निरीक्षकालाच नसणे ही लज्जास्पद बाब असल्याची टिका धोटे यांनी केली.
उपराजधानीत महिला पोलिस अधिकारी सुरक्ष्त नाही तर सामान्यांची काय अवस्था असणार?असा सवाल त्यांनी केला.चार महिन्यांपूर्वी पोलिस विभागात अश्याच प्रकारची एक घटना घडली होती ती देखील हेतुपुरस्सर दडविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यातील संपूर्ण कायदा-व्यवस्था कोलमडून पडलर असून आघाडी सरकारच्या कार्यकाळात महराष्ट्राचा ‘बिहार’ झाला आहे.स्वत:वरील इडी,सीबीआय,आयकर विभागाच्या कारवाईला टाळण्यात संपूर्ण मंत्रीमंडळ मशगुल आहे.त्यांना जनतेच्या सुरक्षेबद्दल काहीच घेणं देणं नाही.असे अकार्यक्षम गृहमंत्री असताना महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेबद्दल काय बोलावं?ते मूगबधिराच्या भूमिकेतच वावरतात.ते ‘नरोबा कुंजरवा’च्या भूमिकेत असतात,याच कारणामुळे आम्ही राष्ट्रवादी पक्षाला ’जय विदर्भ‘केला कारण गृहखातं ज्यांच्याकडे आहे त्यांनाच जनसामान्यांच्या सुरक्षेबद्दल,त्यांच्या न्याय हक्काबद्दल काहीही घेणेदेणे नाही,असा हल्लाबोल त्यांनी केला.




आमचे चॅनल subscribe करा
