
‘पीओके फाईल्स’चित्रपट काढणार का?७ वर्षात फक्त १६ टक्के काश्मीरी पंडीतांचे पुर्नवसन
काश्मीरी पंडीतांना महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणात राखीव जागा देणारे हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे देशात एकमेवद्वितीय
मुस्लिमबहूल भागात उर्दू शाळा काढणा-या संघालाही ’जनाब संघ’म्हणणार का?
एमआयएमसोबत भाजपचीच ‘छूपी’ युती
नवाब मालिकांचा राजीनामा नाहीच:अनिल देशमुखांचा राजीनामा ही देखील चूकच
आमचा विश्वास कागदपत्रांवरच ‘पेनड्राईव्ह’वर नाही:फडणवीसांना टोला
केंद्रिय तपास यंत्रणांचा वापर सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे!
पंजाबमध्ये भाजप जिंकली असती तर तो खरा गौरव
नागपूर,ता.२२ मार्च २०२२: ‘काश्मीर फाईल्स’ देशातील या बहूचर्चित चित्रपटातील एकूण ४० ‘फाईल्स’ला चित्रपट सेंसर बोर्डने कात्री लावली.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटात कल्पनेतलाही काही भाग आला असल्याचे विधान केले होते.एकीकडे हा चित्रपट वास्तववादी घटनांवर आधारित असल्याचे सांगून त्यात, चित्रपटाच्या अनुषंगाने काल्पनिक भाग देखील आला म्हणजे नेमका कोणता भाग काल्पनीक वाटला?असा प्रश्न पत्र परिषदेत विचारण्यात आला असता,आम्ही तर पाकव्याप्त काश्मीर भारतात कधी येतोय याची आतुरतेने वाट बघत असल्याचे सांगून आजच्याच वृत्तपत्रात केंद्रिय मंत्री जितेंद्रसिंग तोमर यांचे लवकरच पाकव्याप्त काश्मीर भारतात येणार असल्याचे वक्तव्य प्रसिद्ध झाले आहे.आमच्यासारखे प्रखर हिंदूत्ववादी राष्ट्रवादी लोक वाटच बघतात आहे केंद्र सरकार हा संकल्प कधी पूर्ण करणार आहे,कधी पीओके भारताचा अविभाज्य होणार आहे,यावरच आता ‘पीओके फाईल्स’चित्रपट काढणार का?चित्रपट काढून काश्मीरी पंडीतांची घरवापसी होणार नाही,मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या कार्यकाळात फक्त १६ टक्के काश्मीर पंडितांची घरवापसी झाली आहे.१९९० मध्ये काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांसोबत जे घडले त्याची दखल घेत हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच देशात सर्वात आधी महाराष्ट्र राज्यात काश्मीरी पंडितांच्या मुलांसाठी वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या शिक्षणात २ टक्के राखीव जागा ठेवण्याचा निर्णय राबवला.देशातील एकाही राज्याने हा कित्ता गिरवला नाही किवा केंद्र सरकारने देखील काश्मीरी पंडितांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अश्या पक्रारचे आरक्षण देण्यात पुढाकार घेतला नाही.जे केंद्रानेही केलं नाही ते आम्ही केलं,असा खुलासा शिवसेनेचे खासदार व नेते संजय राऊत यांनी आज नागपूरात प्रेस क्लब येथे आयोजित पत्र परिषदेत केला.
याप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने,मुंबईचे खासदार राहूल शेवाळे,राजा विचारे,शहर संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी,महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे,किशोर कुमरिया आदी उपस्थित होते.याप्रसंगी राऊत यांनी प्रत्येक प्रश्नाला दिलखुलास उत्तरे दिली.राज्यात तीन पक्षांची आघाडी सरकार असली तरी कोणत्याही पक्षाची ताकद संघटन हीच असते असे ते म्हणाले.सत्ता असते किवा नसते,राजकारणात चढ-उतार घडतच असतात.महाराष्ट्रात गेल्या ५० वर्षात मात्र शिवसेना मजबुत संघटनेच्या बळावर उभी आहे.येत्या काळात शिवसेना अधिक ताकदीने उभी राहावी,विदर्भात ज्या ठिकाणी शिवसेना, युतीच्या काळात लढू शकली नाही तिथे भरीव कामगिरी करावी,सेनेबाबत विदर्भात अनेक समज-गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केला जातो त्याला उत्तर देण्यासाठीच ‘शिवसंवादा’चा उपक्रम हाती घेतला असून शिवसंवादाच्याद्वारे विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचे खासदार हे जनतेसोबत संवाद साधतील.विदर्भाने नेहमीच बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेवर प्रेम केलं आहे.मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे खासदार निवडून दिले.मोठ्या संख्येने शिवसेनेचे आमदारही निवडून येत होते मात्र भाजपसोबतच्या युतीच्या काळात विदर्भातील अनेक जागा भाजपसाठी सोडाव्या लागला व त्याचा आम्हाला फटका बसला असून त्या ठिकाणी पोकळी निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले. जी काही कारणे घडली असेल त्याचा मागोवा घेणे,त्यात दुरुस्ती करने व पुढील विधानसभा,लोकसभा व येत्या महानगरपालिकांच्या निवडणूकीसाठी लक्ष पुरवावे हा शिवसंवादाचा हेतू असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार असल्याची पुश्तीही त्यांनी जोडली.
यावेळी वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या अनुपस्थितीविषयी छेडले असता,मला वाटलंच हा प्रश्न विचाल्या जाणारच अशी मिश्किली करीत ,गवळी यांच्या मागे केंद्र सरकारने ईडीचा ससेमिरा लवला आहे त्याच संदर्भात त्यांना आज न्यायालयाच जाने भाग होते,त्यांनी पक्षाची रितसर परवानगी घेऊनच अनुपस्थिती दर्शवली असल्याचे राऊत यांनी सांगितले.
याप्रसंगी केंद्रिय तपास यंत्रणांवर चांगलेच तोंडसुख घेत ही यंत्रणा ‘खुळखुळा’ करुन टाकली असल्याचे ते म्हणाले.हा खुळखुळा हलवत दाखविला जात राहतो.या यंत्रणांचा सर्वाधिक दुरुपयोग मोदी सरकारच्या कार्यकाळात होत असून मी स्वत: याचा भुक्तभोगी असल्याचे त्यांनी सांगितले.माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसामागे ही ईडी लागली,माझ्या कुटुंबियांना लक्ष्य करण्यात आले मात्र गेल्या वर्षभरातही ईडीला आमच्या विरोधात काहीही सापडले नाही.आजच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनेर्जी यांना इडीने दिल्लीत पाचारण केले आहे.असे असले तरी व कितीही दबाव आणला तरी आम्ही ‘झुकणार’नाही,इडीच्या आड राजकीय षडयंत्र रचली जात आहेत,तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे.युपीएच्या काळात दहा वर्षात फक्त २३ कारवाया झाल्या होत्या मात्र गेल्या ७ वर्षात २३ हजार धाडी टाकण्यात आल्याचा संताप व्यक्त करीत, केंद्रिय तपास यंत्रणा या सत्ताधारी भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे वापरली जात असल्याची जळजळीत टिका त्यांनी केली. कितीही कारवाया झाल्या तरी आम्ही अजिबात घाबरणार नाही,या यंत्रणा आमचा ’बाल ही बांका’करु शकत नसल्याचा हंूकार त्यांनी भरला.
तुम्ही मुंबईच्या पत्र परिषदेत बॉम्ब फोडणार होता मात्र तो फूटलाच नाही,तुम्हाला फडणवीस यांची दहशत वाटली का?यावर खाेटे आरोप करने म्हणजे बॉम्ब फोडणे आहे का?असा प्रतिप्रश्न राऊत यांनी केला.त्या पत्र परिषदेत मी इडीच्या काही अधिका-यांचा कोट्यावधीचा भ्रष्टाचार १३ पानांचे कागदोपत्री पुरावे देऊन बाहेर काढला होता.त्या अधिका-यांनी जवळपास ६० ते ७० बिल्डरर्सकडून कोट्यावधीची खंंडणी गोळा केली होती,तुमच्या नजरेत ही बाब म्हणजे बॉम्ब नाही का?असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
गोपीचंद पडळकर यांच्या विधानाविषयी विचारले असता,कोणाला उत्तर द्यायचं?असा उपरोधिक सवाल त्यांनी केला.काय आहे हे ’जनाब?’.या देशात २२ कोटी मुसलमान राहतात.यात हजारो मुस्लिम हे भाजपचे देखील मतदार आहेत.देशाला हिंदूत्वावादी विचारधारेने घेऊन जाणारा राष्ट्रीय स्वयंसंघ, ज्याच्याकडे आपण सगळे आदराने पाहतो त्या संघप्रमुख मोहनजी भागवतांनीच मुस्लिम हे या देशाचाच अविभाज्य भाग असल्याचे विधान केले होते,मग आता तुम्ही संघालाही ’जनाब संघ’म्हणनार का?असा पलटवार राऊत यांनी केला.भागवतांनीच सांगितलं आहे की हिंदू-मुस्लिम यांचा ‘डीएनए’ एकच आहे,मुस्लिमांसाठी संघाने ‘मुस्लिम मंच’ देखील काढला तर आता त्यांनाही ’जनाब संघ’म्हणनार का?या देशात मुस्लिमांनी राहूच नये अशी भूमिका मांडणारा मूळात हिंदूच नाही,अशी भूमिका भागवतच मांडतात,केंद्र सरकारनेच केरळसारख्या राज्यात मुस्लिम राज्यपाल नेमला आहे.‘मोहम्मद अली जिन्नाने या देशाची एकदा फाळणी केली तुम्ही तर दररोज फाळणी करताय’याची किंमत चुकवाची लागेल,असा इशारा यावेळी राऊत यांनी भाजपला दिला.
अटलबिहारी बाजपेयी यांच्याच काळात केंद्रात अल्पसंख्याक सेलची निर्मिती झाली,अशी आठवण देखील त्यांनी स्मरणात आणून दिली.
यावेळी ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुस्लिमीन (एमआयएम)चे आघाडीत सहभागी होण्याविषयीचा प्रश्न विचारला असता,एमआयएमची ‘छूपी युती’ही भाजपसोबतच असल्याचा आरोप राऊत यांनी केला.उत्तर प्रदेश निवडणूकीत ही छूपी युती संपूर्ण देशानेच बघितली असून शिवसेनेला बदनाम करण्यासाठी हे नाट्य घडवून आणण्यात आले,असा आरोप त्यांनी केला.आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकमेकात ‘विलय’केला नसून आपापली राजकीय विचारधारा कायम ठेऊन आघाडी केली असल्याचे त्यांनी सांगितले.भारतीय जनता पक्षाने आपल्या विचारधारेलाच तिलांजली देऊन काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीच्या पक्षासोबत युती केली तेव्हा भाजपची विचारधारा कुठे गेली होती?अशी जळजळीत टिका त्यांनी केली.
चंद्रूपरच्या आमदारांनी फडणवीस काळातील जलयुक्त शिवारात झालेल्या एकशे पंचवीस कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार का?यावर उत्तर देताना मुख्यमंत्री कार्यालयाने याची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे राऊत यांनी सांगितले.
नवाब मलिक यांच्या प्रश्नावर बोलताना,मलिक यांना चुकीच्या अारोपांखाली अटक झाली आहे,असे ते म्हणाले.मलिक यांचा राजीनामा मुळीच घेतला जाणार नसल्याचे सांगून, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही राजीनामा घेणे ही घाईघाईत केलेली चूकच असल्याची पुश्ती त्यांनी जोडली.भाजपने सुरवातीपासून संपूर्ण मंत्रीमंडळच कारागृहात जाणार असल्याचा भ्रम निर्माण केला,आम्ही पण पाहतोच आहोत,मंत्रीमंडळ कारागृहात जातो की आणखी कोणी जातो!असा गर्भित इशारा यावेळी राऊत यांनी दिला.
भविष्यात भाजप-सेना युती पुन्हा होऊ शकते का?यावर बोलताना शिवसेना एखादी भूमिका घेते तर ती टोकाला नेत असते असे ते म्हणाले.सेनेच्या विषयी भाजपने केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात जे वातावारण निर्माण केलं अाहे ते बघता आता युती होणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले.अपघाताने युतीतून आम्ही बाहेर पडलो,आमचे मार्ग वेगळे झाले मात्र भाजप ज्याप्रकारे सूडाने वागत आहे ते आम्ही कधीही विसरु शकत नाही असे सांगून, जो हे विसरेल तो खरा राजकारणी नाहीच,अशी पुश्तीही त्यांनी जोडली.
आघाडीच्या काळातील अडीच वर्षात भाजपला एक ही घोटाळा सापडला नाही,यावर बोलताना हा प्रश्न आम्हाला न विचारला इडीला विचारा,आम्ही तर इडीच्याच अधिका-यांच्या भ्रष्टाचाराचे शंभर पुरावे देऊनसुद्धा कोणतीच कारवाई झाली नाही,यावर तुम्ही ‘पेन ड्राईव्ह’दिला नाही अशी मिश्किली करताच,आमचा कागदपत्रांवरच विश्वास आहे,पेनड्राईव्हवर नाही,असा चिमटा त्यांनी फडणवीस यांना काढला.
न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची पुर्नचौकशी होणार का?यावर बोलताना ॲड.सतीश उके यांनी आज मला भेटण्याची वेळ मागितली असून मी आज त्यांना भेटणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
चार राज्यात भाजपने निर्विवाद यश प्राप्त केल्याबद्दल विचारले असता,मी त्याला विजय मानत नाही,त्यांची आधीपासूनच त्या-त्या राज्यात सत्ता होती,असे त्यांनी सांगितले.त्यांनी विजय मिळवला नसून फक्त आपली सत्ता कायम राखली आहे,याउलट जर त्यांनी पंजाबमध्ये सत्ता मिळवली असती तर अख्ख्या देशात त्यांचा गौरव झाला असता असे सांगून पजांबमध्ये आम्हाला २ टक्के तर भाजपला ७ टक्के मते मिळाली असल्याचे ते म्हणाले.
येत्या डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूका आहेत,शिवसेना गुजरात विधान सभा लढण्याची हिंमत करेल का?यावर राजकारणात हिंमतची गोष्ट करता येत नसल्याचे ते म्हणाले.
नागपूरात गडकरी यांची भेट घेणार का?या प्रश्नावर गडकरी हे सर्वांचेच प्रिय असल्याचे सांगून फडणवीस हे देखील सर्वांना प्रिय असल्याची पुश्ती त्यांनी जोडली.
शिवसेना नागपूरात लढली तरी शिवसैनिकांना राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना साथ द्यावी लागेल,यासारखी शोकांतिका नाही,भाजपच्या या विधानाकडे राऊतांचे लक्ष वेधले असता,एमआयएमला भाजपची साथ मिळते यापेक्षा दुसरी ती शोकांतिका ती कोणती?असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
नागपूरात अधिवेशन कधी घेणार आहात?या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली.

आमचे चॅनल subscribe करा